सुदृढ मानसिक आरोग्यासाठी योग साधनेतील ४ प्रभावी आसने!

योग ही एक प्राचीन भारतीय व्यायाम साधना आहे जी अनेक शतकांपासून आपल्या भारतात साधक करत आहेत. यामुळे शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक आरोग्य सुदृढ राहण्यास मदत होते. आजच्या धावपळीच्या युगात प्रत्येक व्यक्ती ताण तणावात असलेला सापडतो. यामुळे सगळीकडेच नकारात्मक ऊर्जा निर्माण होत असल्याचे दिसून येते. त्यामुळे या नाकारात्मकतेवर मत करून सकारात्मक वातावरण निर्मिती करणे आवश्यक आहे आणि मानसिक आरोग्य सुदृढ राहणे देखील तितकेच महत्वाचे आहे. मानसिक आरोग्यासाठी योग साधना करणे अत्यावश्यक आहे. त्याबाबत आपण आज या लेखात माहिती मिळवणार आहोत. 

मानसिक आरोग्यासाठी योग महत्वाचा:

योग साधनेमध्ये असे काही आसनं आहेत ज्यामुळे आपल्याला मनःशांती प्राप्त होते, तसेच मानसिक, शारीरिक ताण कमी होण्यास मदत होते. मानसिक आरोग्यासाठी योग साधनेचा आपल्या दैनंदिन जीवनात समावेश करणे अत्यंत महत्वाचे आहे. याचे फायदे पुढीलप्रमाणे…

१) सुदृढ आरोग्य:

योग साधना केल्याने आपल्या शरीराची योग्य ती हालचाल होत असते आणि त्यामुळे शरीरात रक्तप्रवाहाचे प्रमाण अगदी योग्यरीत्या होत असते. तसेच हृदयाच्या कार्यामध्ये कोणत्याही प्रकारचा अडथळा येत नाही. योगासनांमुळे बुद्धीला देखील चालना मिळते आणि त्यामुळे आपले आरोग्य सुदृढ होण्यात कोणतीच शंका उरत नाही. 

२) तणावरहित जीवन:

मानसिक आरोग्यासाठी योग साधना नियमित केल्यास मनःशांती प्राप्त होते तसेच प्राणायाम आणि ध्यान यामुळे शरीरावरील किंवा मनावरील ताणतणाव दूर होतो आणि मनोबल मजबूत होते. यावेळी ताण कमी झाल्याने आपल्या शरीरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होऊ लागते आणि त्यामुळे मानसिक आरोग्य योग साधनेद्वारे सुधारते. 

मानसिक आरोग्यासाठी योग

३) सकारात्मक ऊर्जा:

सध्याच्या धावपळीच्या जगात अनेकवेळा आपल्या मनात नकारात्मक विचार येतात किंवा आजूबाजूच्या नकारात्मक वातावरणाचा आपल्यावर प्रभाव पडतो. यावेळी योग आपल्या कामी येतो. योग साधनेमुळे आपल्या शरीरात सकारात्मक ऊर्जेची निर्मिती होऊन नकारात्मक विचार किंवा ऊर्जा शरीरातून बाहेर पडते आणि नकारात्मक विचारांवर नियंत्रण मिळवता येते. 

४) पुरेशी झोप:

मानसिक आरोग्यामध्ये सर्वात महत्वाची असलेली गोष्ट म्हणजे झोप. झोप पूर्ण न झाल्यास आपले मानसिक आरोग्य बिघडण्याची शक्यता वाढते. दररोज पुरेशी झोप होणे आपल्या सुदृढ आरोग्यासाठी अत्यावश्यक आहे. त्यामुळे मानसिक आरोग्यासाठी योग साधना केल्यास पुरेशी झोप मिळायला सुरुवात होते आणि आपल्या आरोग्याबाबत सकारात्मक गोष्टी घडण्यास आरंभ होतो. 

५) आत्मविश्वास वाढणे:

नियमित योग केल्याने आपल्याला मानसिक व शारीरिक प्रगती दिसून येते आणि त्यामुळे आपला आत्मविश्वास वाढण्यास मदत होते. आत्मविश्वास वाढल्यास मानसिक आरोग्य आपोआप सुधारते. यामुळे मानसिक आरोग्यासाठी योग अत्यावश्यक ठरतो. 

६) प्रतिकारशक्तीमध्ये वाढ:

योगसाधना केल्याने शरीरात कोणत्याही प्रकारचे विषाणू जाण्याचे प्रमाण कमी होऊ शकते. तसेच शरीरातील रोगप्रतिकार शक्ती वाढल्याने अनेक रोगांपासून आपला बचाव होऊ शकतो. मानसिक आरोग्यासाठी योग आपली प्रतिकारशक्ती वाढवून आपल्याला अनेक रोगांपासून दूर ठेवण्यात यशस्वी ठरते असं म्हटलं तर त्यात काहीच शंका नाही.

७) लवचिक शरीर:

योग साधनेचा समावेश आपण दैनंदिन जीवनात केल्यास आपले शरीर लवचिक होते आणि त्यामुळे शरीरसंबंधी कोणत्याही तक्रारी होण्याचे प्रमाण कमी होते. पाठदुखी, कंबरदुखी, गुडघेदुखी अशा अनेक अवयवांशी संबंधीत समस्या योग केल्याने कमी होतात असे तज्ज्ञांचे देखील मत आहे. 

मानसिक आरोग्यासाठी योग मधील काही प्रभावी आसने:

१) प्राणायाम:


प्राणायाम हे श्वासावर नियंत्रण मिळवण्यासाठीचे एक योगासन आहे ज्यामुळे शरीर तसेच मनावरील ताण तणाव कमी होतो. प्राणायाम मधील काही प्रकार म्हणजेच अनुलोम-विलोम, कपालभारती, भस्त्रिका, सीतली, सूर्यभेदी प्राणायाम हे आपल्या श्वासावर नियंत्रण ठेवण्यात तसेच मानसिक आरोग्य सुदृढ करण्यास अत्यंत प्रभावी ठरते. 


२) पद्मासन:


३) सर्वांगासन:


या आसाममध्ये संपूर्ण शरीराचे शुद्धीकरण होते असं म्हटलं तरी हरकत नाही. या आसनामुळे शरीरातील रक्तप्रवाहामध्ये सुधार येतो तसेच मेंदू देखील ऍक्टिव्ह होतो. या आसनामुळे तणाव कमी होऊन मानसिक आरोग्य सुधारते. 

मानसिक आरोग्यासाठी योग


४) गरुडासन:


योग मधील गरुडासन हे आसन ताणतणाव कमी करण्यास मदत करते तसेच लक्ष केंद्रित करण्याची क्षमता वाढवते. यामुळे मानसिक आरोग्यासाठी योग साधनेतील हे आसन देखील प्रभावी ठरते. 


दररोज आपल्या दिनचर्येतील किमान अर्धा तास तरी स्वस्थ मानसिक आरोग्यासाठी योग साधनेचा अवलंब करावा. योगाचे आपल्या आयुष्यात अनेक फायदे आपण पाहिलेच आहे. यासोबत आपला आत्मविश्वास वाढतो आणि त्यामुळे आपले ध्येय मिळवण्याच्या प्रगतीपथावर वाटचाल करण्यास आपल्याला दिशा मिळते. मन शांत असल्याने ध्येयाकडे लक्ष केंद्रित करण्यास मदत होते. 

मानसिक आरोग्यासाठी योग कशी मदत करतो?

योग ही एक प्राचीन भारतीय व्यायाम साधना आहे जी अनेक शतकांपासून आपल्या भारतात साधक करत आहेत. यामुळे शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक आरोग्य सुदृढ राहण्यास मदत होते. आजच्या धावपळीच्या युगात प्रत्येक व्यक्ती ताण तणावात असलेला सापडतो. यामुळे सगळीकडेच नकारात्मक ऊर्जा निर्माण होत असल्याचे दिसून येते. त्यामुळे या नाकारात्मकतेवर मत करून सकारात्मक वातावरण निर्मिती करणे आवश्यक आहे आणि मानसिक आरोग्य सुदृढ राहणे देखील तितकेच महत्वाचे आहे. मानसिक आरोग्यासाठी योग साधना करणे अत्यावश्यक आहे. 

चांगल्या आरोग्यासाठी कोणती योगासने करावीत?

प्राणायाम हे श्वासावर नियंत्रण मिळवण्यासाठीचे एक योगासन आहे ज्यामुळे शरीर तसेच मनावरील ताण तणाव कमी होतो. प्राणायाम मधील काही प्रकार म्हणजेच अनुलोम-विलोम, कपालभारती, भस्त्रिका, सीतली, सूर्यभेदी प्राणायाम हे आपल्या श्वासावर नियंत्रण ठेवण्यात तसेच मानसिक आरोग्य सुदृढ करण्यास अत्यंत प्रभावी ठरते. मानसिक आरोग्यासाठी योग साधनेमधील पद्मासन हे आसन ताण तणाव कमी करण्यास मदत करते तसेच मनाला शांती आणि सकारात्मक ऊर्जा मिळवण्यास प्रभावी ठरते. ध्यानासाठी हे आसन अत्यंत उपयुक्त आहे. तसेच गरुडासन, सर्वांगासन देखील चांगल्या आरोग्यासाठी महत्वपूर्ण ठरते.

आत्मविश्वास कसा वाढवावा?

नियमित योग केल्याने आपल्याला मानसिक व शारीरिक प्रगती दिसून येते आणि त्यामुळे आपला आत्मविश्वास वाढण्यास मदत होते. आत्मविश्वास वाढल्यास मानसिक आरोग्य आपोआप सुधारते. यामुळे मानसिक आरोग्यासाठी योग अत्यावश्यक ठरतो. 

Leave a Comment