योग आणि प्राणायाम: सुखी आणि निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली!

काही व्यक्तींचा असा समज आहे की योग आणि प्राणायाम हे एकच आहे, परंतु यामध्ये बरेच अंतर आहे. यामध्ये अंतर जरी असले तरी या दोन्ही पद्धती आपल्या आरोग्याला सुदृढ ठेवण्यात तितकीच मदत करतात. आपल्या रोजच्या दिनचर्येत योग आणि प्राणायाम या दोन्हींचा समावेश नक्कीच करावा. 

आणखी वाचा योग व आयुर्वेद संदर्भात- योग व आयुर्वेद यांचा एकत्रित जीवनशैलीत समावेश ठरतो गुणकारी!

योग आणि प्राणायाम

योग म्हणजे काय?

योग ही प्राचीन भारतीय व्यायाम साधना आहे जी अनेक शतकांपासून आपल्या भारतात साधक करत आहेत. ही साधना भारतातच नाही तर अनेक देशांमध्ये अनेक लोक आपल्या जीवनशैलीत समाविष्ट करत असल्याचे चित्र आपल्याला दिसते. योग म्हणजे शरीर, मन आणि आत्मा यांचा समन्वय साधण्याची प्रक्रिया आहे. योगामधील अनेक आसनांद्वारे आपण अंतर्मन आणि बाह्यजगाचा समतोल साधण्याचा प्रयत्न करतो. 

योगाचे अनेक प्रकार आहेत. हठयोग हा प्रकार शारीरिक आसनांचा अभ्यास आणि श्वासांच्या नियंत्रणावर आधारित आहे. या प्रकारामुळे शारीरिक ताकद वाढते आणि शरीर लवचिक होते. राजयोग म्हणजे ध्यान आणि साधना. ध्यानधारणा करून मनःशांती मिळवण्यासाठी हा योग प्रकार महत्वाचा ठरतो. कर्मयोग हे रोजच्या कार्याशी निगडित आहे तसेच भक्तियोग हे देवाच्या तसेच निसर्गाच्या भक्तीशी तर ज्ञानयोग हे अनेक विषयावरील अभ्यासाशी संबंधित योग प्रकार आहे. हे सर्व योग आपण आपल्या जीवनात नियमितपणे आचरावेत. यामुळे होणारे फायदे अनेक आहेत. 

योगाचे फायदे:

१) शारीरिक लवचिकता आणि ताकद वाढणे:

योगामधील आसनांद्वारे आपले शरीर लवचिक होते तसेच आपली ताकद वाढते. योग म्हणजे एक प्रकारे व्यायाम आहे आणि तो नियमितपणे केल्याने आपले शरीर सुदृढ आणि राहण्यास मदत होते. 

२) वजन कमी होणे:

३) रक्ताभिसरण सुधारते:

योगाभ्यासामुळे शरीरातील अनेक स्नायू, नसा मोकळ्या होतात, तसेच योगामधील श्वसनाच्या प्रक्रियांमुळे हृदयाच्या गतीला देखील चालना मिळते आणि शरीरातील रक्ताभिसरण सुधारते. 

४) ताण तणाव कमी होणे:

योग साधनेमुळे शरीर कार्यान्वित होते तसेच एकप्रकारे आपल्या बुद्धीचे मेडिटेशन होते. यामुळे आपल्याला नियमित आयुष्यात आलेला ताण तणाव कमी होण्यास मदत होते. 

५) अनेक रोगांपासून बचाव:

योग साधना ही अत्यंत प्रबळ अशी साधना आहे. यामुळे शरीरातील अनेक समस्या नाहीशा होतात आणि त्यामुळे मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार अशा अनेक मोठमोठ्या रोगांपासून आपला बचाव होतो. 

प्राणायाम म्हणजे काय?

प्राणायाम म्हणजे ‘प्राण’ (श्वास) आणि ‘आयाम’ (नियंत्रण) म्हणजेच श्वासावर नियंत्रण. याचा उद्देश श्वासोच्छवासावर नियंत्रण करून शरीर आणि मनावर सकारात्मक प्रभाव टाकणे आहे. प्राणायामाद्वारे शारीरिक, मानसिक आणि भावनिक रित्या आपण शांत आणि तणावमुक्त राहू शकतो. प्राणायामात केल्या जाणाऱ्या श्वास आणि उच्छ्वास याद्वारे शरीरात ऑक्सिजनचे प्रमाण वाढते. श्वासावर लक्ष केंद्रित केल्यास स्मरणशक्ती वाढते. प्राणायामात घेतल्या जाणाऱ्या दीर्घ श्वासामुळे हृदयाचे कार्य सहज होते आणि शरीरात रक्ताभिसरण योग्यरीत्या होण्यास सुरुवात होते. दीर्घ श्वासामुळे हृदयास ऑक्सिजनचा पुरवठा योग्य प्रमाणात होतो आणि यामुळे हृदयविकार, उच्च रक्तदाब यासारख्या समस्यांपासून आपण दूर राहतो. 

प्राणायामात अनेक प्रकार आहेत. अनुलोम विलोम हे श्वासाची गती नियंत्रित करून मानसिकरीत्या बळ देते. कपालभारती प्राणायाम शरीरातील विषारी घटक बाहेर काढण्यास मदत करते. भस्त्रिका प्राणायाम शरीरातील ऊर्जा वाढवते व रक्ताभिसरण सुदृढ करतो तसेच सूर्य भेद प्राणायाम मनाला शांती देऊन मानसिक स्थैर्य मिळवण्यास उपयोगी ठरतो. योग आणि प्राणायाम हे भिन्न असले तरी त्यांचे फायदे मात्र समान आहेत. आपल्या आरोग्याला कोणताही रोग ग्रासू नये तसेच शरीर आतून स्वच्छ राहावे, निरोगी राहावे आणि मन शांत राहावे हाच योग आणि प्राणायाम यांचा हेतू आहे. 

योग आणि प्राणायाम यांचे एकत्रीकरण:

आपल्या जीवनशैलीत सर्व काही योग्य वेळेत किंवा योग्य प्रमाणात करणे सहज शक्य होत नाही, परंतु योग आणि प्राणायाम यासाठी मात्र दिवसातून अर्धा तास तरी काढावा. यामुळे आपल्या आयुष्यातील शारीरिक, मानसिक आणि भावनिक रित्या अनेक समस्या दूर होऊ शकतात. शरीरातील अनेक समस्या नष्ट होऊन शरीर सुदृढ होते. योग आणि प्राणायाम मन शांत ठेवण्यास मदत करते आणि त्यामुळे आपल्या ध्येयाकडे लक्ष केंद्रित करणे सोपे जाते. या साधनांमुळे आपले शरीर, मन स्वस्थ राहते आणि त्यामुळे आपले रोजचे जीवन अगदी आनंदात जाते.

योग आणि प्राणायाम यात फरक आहे का?

काही व्यक्तींचा असा समज आहे की योग आणि प्राणायाम हे एकच आहे, परंतु यामध्ये बरेच अंतर आहे. यामध्ये अंतर जरी असले तरी या दोन्ही पद्धती आपल्या आरोग्याला सुदृढ ठेवण्यात तितकीच मदत करतात. आपल्या रोजच्या दिनचर्येत योग आणि प्राणायाम या दोन्हींचा समावेश नक्कीच करावा. 

योग, प्राणायाम आपल्या जीवनशैलीत समाविष्ट करावे का?

आपल्या जीवनशैलीत सर्व काही योग्य वेळेत किंवा योग्य प्रमाणात करणे सहज शक्य होत नाही, परंतु योग आणि प्राणायाम यासाठी मात्र दिवसातून अर्धा तास तरी काढावा. यामुळे आपल्या आयुष्यातील शारीरिक, मानसिक आणि भावनिक रित्या अनेक समस्या दूर होऊ शकतात. शरीरातील अनेक समस्या नष्ट होऊन शरीर सुदृढ होते. योग आणि प्राणायाम मन शांत ठेवण्यास मदत करते आणि त्यामुळे आपल्या ध्येयाकडे लक्ष केंद्रित करणे सोपे जाते. या साधनांमुळे आपले शरीर, मन स्वस्थ राहते आणि त्यामुळे आपले रोजचे जीवन अगदी आनंदात जाते.

प्राणायामात कोणकोणते प्रकार असतात?

प्राणायामात अनेक प्रकार आहेत. अनुलोम विलोम हे श्वासाची गती नियंत्रित करून मानसिकरीत्या बळ देते. कपालभारती प्राणायाम शरीरातील विषारी घटक बाहेर काढण्यास मदत करते. भस्त्रिका प्राणायाम शरीरातील ऊर्जा वाढवते व रक्ताभिसरण सुदृढ करतो तसेच सूर्य भेद प्राणायाम मनाला शांती देऊन मानसिक स्थैर्य मिळवण्यास उपयोगी ठरतो. योग आणि प्राणायाम हे भिन्न असले तरी त्यांचे फायदे मात्र समान आहेत. आपल्या आरोग्याला कोणताही रोग ग्रासू नये तसेच शरीर आतून स्वच्छ राहावे, निरोगी राहावे आणि मन शांत राहावे हाच योग आणि प्राणायाम यांचा हेतू आहे. 

Leave a Comment