सर्वव्यापी तंत्रज्ञानामुळे सध्या लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच जण मोबाईल, टीव्ही अशा इलेक्टॉनिक गोष्टींच्या आहारी जात असल्याचं दिसून येत आहे. या तंत्रज्ञानाच्या अतिवापरामुळे शारीरिक व मानसिक स्वास्थ्यावर परिणाम होत आहे. व्यायाम खेळ आणि आरोग्य याकडे सर्वांचंच दुर्लक्ष होत आहे. WHO ( वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन ) च्या रिसर्चनुसार जागतिक पातळीवर १८० कोटी लोक व्यायाम करत नाहीत आणि हे त्यांच्या आरोग्यासाठी खूप हानिकारक ठरण्याची शक्यता आहे.
व्यायाम खेळ आणि आरोग्य यांचे नाते:
व्यायाम खेळ आणि आरोग्य हे एकमेकांमध्ये कनेक्टेड आहेत. निरोगी आयुष्य जगण्यासाठी व्यायाम आणि खेळ यामध्ये नियमित आपला सहभाग असणे गरजेचे आहे. त्यामुळेच आपले आरोग्य सुधारेल आणि आरोग्य व्यवस्थित असल्यास मोठ्या प्रमाणात व्यायाम आणि खेळ आपण खेळू शकतो. व्यायाम आणि खेळाचे अनेक फायदे आपण पाहुयात.
रोगप्रतिकारक शक्ती:
व्यायाम आणि खेळ यामुळे आपल्या शरीराची हालचाल होत असते. त्यामुळे आपण निरोगी राहतो तसेच आपले हृदय अगदी योग्यरीत्या काम करून रक्तप्रवाह देखील योग्य प्रमाणात होत असतो आणि त्यामुळे शरीरात रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. शरीरात अनेक चांगले बदल व्यायाम आणि मैदानी खेळांमुळे घडून येतात ज्यामुळे आपण निरोगी राहून रोग लागायचे प्रमाण कमी होण्यास मदत होते.
चयापचय सुधारणा:
व्यायाम खेळ आणि आरोग्य शरीराच्या हालचाली जागृत ठेवतं तसेच त्यामुळे भूकही योग्य प्रमाणात लागते. पोटभर जेवण आणि त्यासोबत व्यायाम आणि खेळ खेळल्याने तंदुरुस्ती वाढते आणि चयापचय प्रक्रियेत सुधारणा होते. पोटाचे विकार टाळण्यास मदत होते.
ताण तणावापासून मुक्ती:
व्यायाम खेळ आणि आरोग्य आपल्याला व्यस्त ठेवत असते, त्यामुळे इतर वाईट गोष्टींकडे किंवा नाकारात्मकतेकडे आपले दुर्लक्ष होते आणि आपल्या शरीरावरील किंवा मनावरील ताण कमी होण्यास मदत होते.
हाडे आणि स्नायूंची मजबुती:
हाडं मजबूत राहण्यासाठी त्यांची सतत हालचाल होणं महत्वाचं आहे. आपल्या शरीराची हालचाल होत असल्यावर आपली हाडं आणि स्नायू जखडून राहत नाहीत आणि त्यात ताकद वाढत जाते. त्यामुळे व्यायाम खेळ आणि आरोग्य आपली हाडं आणि स्नायूंची मजबुती वाढवतात.
झोपेची गुणवत्ता सुधारते:
आपले शरीर दिवसभर कार्यक्षम असल्यास ते थकते आणि त्याला आरामाची गरज भासते. परंतु शरीराची काही हालचाल होत नसल्यास शरीराला आरामाची किंवा झोपेची गरज वाटत नाही. व्यायाम खेळ आणि आरोग्य यामुळे झोप पूर्ण होण्यास मदत होते आणि झोपेची गुणवत्ता सुधारते.
व्यायाम खेळ आणि आरोग्य याकडे होतंय दुर्लक्ष:
पूर्वीच्या काळात मोबाईल, टीव्ही ही सर्व उपकरणं नव्हती आणि त्यामुळे लोक मनोरंजनासाठी घराबाहेर पडत असत. लहान मुलं मैदानात लपंडाव, खो-खो, कबड्डी, इद्यादी मैदानी खेळ खेळत असत. मोठी माणसं बाहेर चालण्यासाठी, व्यायामासाठी जात असत. यामुळे व्यायाम खेळ आणि आरोग्य याकडे लोकांचा कल होता. परंतु सध्या लोकांचा कल हा सोशल मीडियावर ऍक्टिव्ह राहण्याकडे जास्त आहे. तंत्रज्ञान आपल्या आरोग्यासाठी हानिकारक ठरत असल्याचं दिसून येत आहे.

व्यायाम खेळ आणि आरोग्य याकडे दुर्लक्ष होण्याची कारणं:
इलेक्रॉनिक डिव्हाईस:
पूर्वी फ्रिज, वॉशिंग मशीन सारखी आरामदायी उपकरणं उपलब्ध नसल्यामुळे महिलांना स्वतःच्या हाताने सर्व काम करावं लागत असत. घरातली सर्व कामं आता तंत्रज्ञानाने सोपी केली आहेत. व्हॅक्युम क्लिनर घर साफ करत आहे, वॉशिंग मशीन कपडे धुवत आहे, फ्रीजमुळे दोनवेळा जेवण बनवण्याची गरज संपली आहे. तसेच कार, बाईक या प्रगत गोष्टींमुळे लोकांचे चालणे देखील कमी झाले आहे. शरीराच्या हालचाली कमी होत असल्याने आरोग्याला हानी पोहचत आहे. यामुळे लठ्ठपणा, सुस्ती यया सर्व गोष्टी आपल्याला सहन कराव्या लागत आहेत. म्हणूनच व्यायाम खेळ आणि आरोग्य यापासून आपण दूर जात आहोत.
शाळेत पिटी विषयाकडे दुर्लक्ष:
सध्या शालेय शिक्षणातील पिटी हा विषय दुर्लक्षित होत असल्याचं आढळून येत आहे. पिटी म्हणजेच मैदानी खेळ, व्यायाम करण्याचा विषय. मुलांच्या आरोग्यासाठी हे खूप चांगलं ठरतं, परंतु हा विषय आला की शिक्षक दुसरा विषय शिकवण्यास घेत असल्याचे अनेक विद्यार्थी सांगतात. यामुळे शाळेत मुलांचा शारीरिक विकास दुर्लक्षित होत असल्याचे जाणवते. यामुळे व्यायाम खेळ आणि आरोग्य याकडे मुलांचे दुर्लक्ष होत आहे.
लहान मुलांचे खेळाकडे दुर्लक्ष:
पूर्वी मुलं शाळेतून आली की बाहेर आपल्या सवंगड्यांसह खेळायला जायचे, कारण त्यांच्याकडे तेच मनोरंजनाचे साधन असायचे. आता मोबाईल, व्हिडीओ गेम्स, लॅपटॉप, टीव्ही याने त्यांचे जग व्यापून टाकले आहे. शाळेतून आल्यावर दुसरे काही न करता टीव्हीसमोर किंवा व्हिडीओ गेम खेळत बसत असल्याची तक्रार अनेक पालक करताना आढळतात. यामुळे त्यांचे व्यायाम, खेळ आणि आरोग्य याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते.
व्यायाम, खेळ आणि आरोग्य सुधारणा यांचा आपल्या निरोगी आयुष्यात खूप मोठा वाटा आहे. आपले शरीर लवचिक होणे, तंदुरुस्त राहणे, फुप्फुसाची कार्यक्षमता वाढणे, कामाकडे फोकस वाढणे, स्नायुकौशल्य वाढणे असे अनेक सकारात्मक बदल आपल्या आयुष्यात होत असतात. व्यायाम, खेळ आणि आरोग्य यामुळे होत असतात.
सध्या व्यायामाचे अनेक प्रकार उपलब्ध आहेत जसं की, झुंबा, कार्डिओ, जिम आणि आपलं योग साधना तर उत्तमच! हे व्यायामाचे अनेक प्रकार तुम्हाला निरोगी आयुष्याकडे घेऊन जातात. त्यामुळे नेहमी शरीर कार्यक्षम ठेवा, आपल्या आरोग्याची काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे!
१) नियमित व्यायामाचे फायदे कोणते ?
व्यायाम, खेळ आणि आरोग्य सुधारणा यांचा आपल्या निरोगी आयुष्यात खूप मोठा वाटा आहे. आपले शरीर लवचिक होणे, तंदुरुस्त राहणे, फुप्फुसाची कार्यक्षमता वाढणे, कामाकडे फोकस वाढणे, स्नायुकौशल्य वाढणे असे अनेक सकारात्मक बदल आपल्या आयुष्यात होत असतात.
२) व्यायामाचे प्रकार कोणते ?
सध्या व्यायामाचे अनेक प्रकार उपलब्ध आहेत जसं की, झुंबा, कार्डिओ, जिम आणि आपलं योग साधना तर उत्तमच! हे व्यायामाचे अनेक प्रकार तुम्हाला निरोगी आयुष्याकडे घेऊन जातात. त्यामुळे नेहमी शरीर कार्यक्षम ठेवा, आपल्या आरोग्याची काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे!
३) व्यायाम न केल्याने काय होते ?
व्यायाम आणि खेळ यामुळे आपल्या शरीराची हालचाल होत असते. त्यामुळे आपण निरोगी राहतो तसेच आपले हृदय अगदी योग्यरीत्या काम करून रक्तप्रवाह देखील योग्य प्रमाणात होत असतो आणि त्यामुळे शरीरात रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.