लसीकरण वेळापत्रक पाळा, कुटुंबासह समाजावरील धोका टाळा!

लसीकरण आपल्या आरोग्याचे संरक्षण करण्यासाठी अत्यंत महत्वाचे आहे. लसीकरणामुळे आपले विविध संसर्गजन्य रोगांपासून संरक्षण होते तसेच आपली प्रतिकारशक्ती देखील वाढते. प्रत्येक वयाच्या गटासाठी लसीकरणाचे विशिष्ट वेळापत्रक असते. या वेळापत्रकानुसार योग्य वेळी लस घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे, यामुळे आरोग्याची सुरक्षा होत असते. लसीकरण आपल्या आरोग्यासाठी अत्यंत महत्वपूर्ण आहे. लसीकरण वेळापत्रक जाणून घेण्याआधी आपण लसीकरणाचे फायदे पाहूया. 

लसीकरण वेळापत्रक

लसीकरणाचे महत्व:


लसीकरणामुळे शरीराला विविध बॅक्टेरिया आणि विषाणूंविरुद्ध प्रतिकारशक्ती निर्माण होऊ शकते.


१) रोगांशी लढणे:


लसीकरणाचा मुख्य उद्देश शरीराला इन्फेक्शनला सामोरे जाण्यापूर्वी त्याची तयारी करून त्यावर लवकर प्रतिक्रिया देण्यासाठी तयार करणे आहे. लसीकरण झाल्यास शरीर त्या विशिष्ट रोगाशी लढण्यासाठी सक्षम होऊन रोगांचा प्रतिबंध करण्यास सक्षम ठरते. 

२) इन्फेक्शन कमी करणे:

३) प्रसार थांबणे:

जेव्हा जास्त प्रमाणात लसीकरण करण्यात येते तेव्हा त्या विशिष्ट रोगाचा प्रसार आणि प्रादुर्भाव रोखण्यास मदत होते. हे समाजासाठी खूप उपयुक्त ठरतं.

४) इन्फेक्शन टाळणे:

एका लसीकरणामुळे अनेक रोगांचे इन्फेक्शन आपण टाळू शकतो जसे की, मलेरिया, डेंग्यू, सर्दी-खोकला, पीव्ही इत्यादी. लसीकरणामुळे आपले या रोगांपासून संरक्षण होऊन शरीरावर दीर्घकालीन आणि परिणामकारक प्रभाव पडतो. 

५) लहान मुलांसाठी आवश्यक:

लहान मुलांसाठी लसीकरण अत्यंत आवश्यक आहे. अनेक भयानक रोग लहान मुलांना धोकादायक ठरू शकतात. लसीकरणामुळे मुलांना या रोगांपासून संरक्षण मिळते आणि त्यांचे शरीर दीर्घकालीन संरक्षण प्राप्त करते.

६) पैशांची बचत:

एका लसीकरणामुळे अनेक रोगांना टाळणे शक्य होते. यामुळे रोग झाल्यानंतरचे रुग्णालयातील खर्च किंवा डॉक्टरची फी हे सर्व आर्थिक खर्च कमी होतात आणि पैशांची बचत होते. 

लसीकरण हे अनेक वयोगटाप्रमाणे वेगवेगळ्या वेळापत्रकात बांधले आहे. बालवयात लसीकरण अत्यंत महत्वाचे आहे. लसीकरण हे आपल्या मुलांच्या आरोग्याचे रक्षण करण्यासाठी गरजेचं आहे. खालील वेळापत्रकानुसार लसीकरण केल्याने मुलांना विविध आजारांपासून संरक्षण मिळते: परंतु लसीकरण वेळापत्रक समजून घेणे अत्यावश्यक आहे.

लसीकरण वेळापत्रक: जन्मावेळी

१) बीसीजी लसीकरण: या लसीकरणामुळे क्षयरोगापासून संरक्षण होते.

२) ओरल पोलिओ व्हॅक्सिन: ओरल पोलिओ व्हॅक्सिन म्हणजे OPV यामुळे पोलिओ पासून मुलांचे संरक्षण होते. 

३) हिपेटाटिस बी लस: हिपेटायटिस बी हा जन्म डोस हिपेटाटिस बी या रोगापासून लहान मुलांचे संरक्षण करते.

लसीकरण वेळापत्रक: सहा आठवडे

१) ओरल पोलिओ लस: ओरल पोलिओ व्हॅक्सिन म्हणजेच OPV यामुळे मुलांचे पोलिओ रोगापासून संरक्षण होत असते त्यामुळे हा डोस कधीच चुकवू नये. 

२) पेंटाव्हॅलेंट – १: या लसीकरणामुळे डिप्थीरिया, टिटॅनस, पेर्टुसिस आणि हिपॅटायटिस बी पासून संरक्षण होते.

३) रोटाव्हायरस लस (RVV) – १: रोटाव्हायरस लस लहान मुलांचे अतिसार या रोगापासून संरक्षण करते.

४) पॅनमोकॉकल कॉन्जुगेट लस (PCV) – १: न्यूमोनिया आणि इतर संसर्गजन्य रोगांपासून मुलांचे संरक्षण होण्यासाठी ही लस अत्यावश्यक आहे.

५) निष्क्रिय पोलिओ लस (IPV) – १: पोलिओपासून संरक्षण करण्यासाठी ही लस मुलांना नक्कीच द्यावी. 

लसीकरण वेळापत्रक: १० आठवडे

१) पेंटाव्हॅलेंट – २: ही या लसीची दुसरी स्टेप आहे. यामुळे डिप्थीरिया, टिटॅनस, पेर्टुसिस आणि हिपॅटायटिस बी या रोगांपासून संरक्षण होते.

२) ओरल पोलिओ लस – २: पोलिओसाठी संरक्षण करण्यासाठी ही लस चुकवू नये. 

३) रोटाव्हायरस लस (RVV) – २: अतिसारापासून संरक्षण करते.

लसीकरण वेळापत्रक: १४ आठवडे

१) पेंटाव्हॅलेंट – ३: अनेक रोगांपासून संरक्षण होण्यासाठीचा हा या लसीचा तिसरा डोस 

२) ओरल पोलिओ लस – ३: पोलिओपासून संरक्षण

३) पॅनमोकॉकल कॉन्जुगेट लस (PCV) – २:न्यूमोनिया आणि इतर संसर्गापासून सुरक्षा

४) निष्क्रिय पोलिओ लस (IPV) – २: पोलिओपासून संरक्षण

५) रोटाव्हायरस लस (RVV) – ३: अतिसारापासून संरक्षण करते.


९ ते १२ महिने:

१) जपानी एन्सेफलायटीस (JE-1): जपानी एन्सेफलायटीस रोगापासून पासून संरक्षण होण्यासाठी ही लस जरुरी आहे.

२) गोवर आणि रुबेला (MR) – 1: गोवर आणि रुबेला या रोगांपासून संरक्षण.

३) न्यूमोकॉकल कॉन्जुगेट लस (PCV) बूस्टर: ही लस न्यूमोनिया आणि इतर संसर्गापासून संरक्षण करते.

१६ ते १८ महिने:

१) डी.टी.पी बूस्टर – १: डिप्थीरिया, टिटॅनस, आणि पेर्टुसिसपासून संरक्षण

२) हिब बी – १: हिब बॅक्टेरियापासून संरक्षण

३) निष्क्रिय पोलिओ लस बूस्टर: बालकांचे पोलिओपासून संरक्षण

४) पॅनमोकॉकल कॉन्जुगेट लस बूस्टर: न्यूमोनिया आणि इतर संसर्गापासून संरक्षण

१८ ते २४ महिने:

१) गोवर आणि रुबेला – २: गोवर आणि रुबेला पासून संरक्षण

२) जपानी एन्सेफलायटीस: जपानी एन्सेफलायटीसपासून संरक्षण

३) डी.टी.पी बूस्टर – २: डिप्थीरिया, टिटॅनस, आणि पेर्टुसिसपासून संरक्षण

४) निष्क्रिय पोलिओ लस बूस्टर: पोलिओपासून संरक्षण

४ ते ६ वर्षे:

१) डी.टी.पी बूस्टर – ३: डिप्थीरिया, टिटॅनस, आणि पेर्टुसिसपासून संरक्षण

२) निष्क्रिय पोलिओ लस (IPV) बूस्टर: पोलिओपासून संरक्षण

९ ते १४ वर्षे:

१) टिटॅनस आणि प्रौढ डिप्थीरिया: टिटॅनस आणि डिप्थीरिया पासून संरक्षण

१५ ते १८ वर्षे:

१) टिटॅनस आणि प्रौढ डिप्थीरिया (Td): टिटॅनस आणि डिप्थीरिया पासून संरक्षण

हे वेळापत्रक आपण लक्षात ठेवणं किंवा आपल्या फोनमध्ये या वेळापत्रकानुसार अलार्म लावून घेतल्यास बालकाची एकही लस चुकणार नाही आणि त्यामुळे रोग होण्याची शक्यता कमी होऊन समाजात देखील रोग पसरणे कमी होईल. अशा रीतीने आपण लसीकरण वेळापत्रक पाळून फक्त आपलेच नाही तर संपूर्ण समाजाचे संरक्षण करत आहोत.

लसीकरणचे महत्व काय?

लसीकरण आपल्या आरोग्याचे संरक्षण करण्यासाठी अत्यंत महत्वाचे आहे. लसीकरणामुळे आपले विविध संसर्गजन्य रोगांपासून संरक्षण होते तसेच आपली प्रतिकारशक्ती देखील वाढते. प्रत्येक वयाच्या गटासाठी लसीकरणाचे विशिष्ट वेळापत्रक असते. या वेळापत्रकानुसार योग्य वेळी लस घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे, यामुळे आरोग्याची सुरक्षा होत असते. लसीकरण आपल्या आरोग्यासाठी अत्यंत महत्वपूर्ण आहे.

जन्मावेळी शिशुला कोणते लसीकरण करावे?

१) बीसीजी लसीकरण: या लसीकरणामुळे क्षयरोगापासून संरक्षण होते.
२) ओरल पोलिओ व्हॅक्सिन: ओरल पोलिओ व्हॅक्सिन म्हणजे OPV यामुळे पोलिओ पासून मुलांचे संरक्षण होते. 
३) हिपेटाटिस बी लस: हिपेटायटिस बी हा जन्म डोस हिपेटाटिस बी या रोगापासून लहान मुलांचे संरक्षण करते.

लसीकरण वेळापत्रक कसे लक्षात ठेवावे?

लसीकरण वेळापत्रक आपण लक्षात ठेवणं किंवा आपल्या फोनमध्ये या वेळापत्रकानुसार अलार्म लावून घेतल्यास बालकाची एकही लस चुकणार नाही आणि त्यामुळे रोग होण्याची शक्यता कमी होऊन समाजात देखील रोग पसरणे कमी होईल. अशा रीतीने आपण लसीकरण वेळापत्रक पाळून फक्त आपलेच नाही तर संपूर्ण समाजाचे संरक्षण करत आहोत.

Leave a Comment