शरीरातील मेटाबोलिझमला नियंत्रित करणारी थायरॉईड ग्रंथी शरीराच्या महत्वाच्या ग्रंथींपैकी एक आहे. थायरॉईडच्या समस्यांमध्ये मुख्यतः हायपोथायरॉईडीझम आणि हायपरथायरॉईडीझम येतात. ही समस्या पुरुषांपेक्षा जास्त स्त्रियांमध्ये उद्भवते. या समस्येला आपण जीवनशैली समस्या देखील म्हणू शकतो कारण ही समस्या जीवनशैलीवर आधारित असते. यामुळे थायरॉईड समस्या उपाय घरगुती रित्या देखील सोडवता येते.
थायरॉईड समस्यांची कारणं :
१) हार्मोनल इम्बॅलन्स:
हायपोथायरॉईडीझम म्हणजेच थायरॉईड ग्रंथीची क्रिया हळुवार रित्या होणे आणि हायपरथायरॉईडीझम म्हणजे थायरॉड ग्रंथीची क्रिया वेगाने होणे. ही समस्या हार्मोन्स असंतुलित झाल्यामुळे होऊ शकते.
२) आहार:
आपल्या नियमित आहारात आयोडिन, सेलेनियम, झिंक आणि इतर पोषणतत्त्वांची कमतरता थायरॉईड समस्यांना कारणीभूत ठरू शकते. आपल्या आहारातून तेलकट पदार्थ, जंक फूड यांना वगळून पौष्टिक पदार्थांचा समावेश करणे अत्यावश्यक आहे.
३) अनुवांशिकता:
कुटुंबातून अनुवांशिकरित्या थायरॉइडची समस्या उद्भवण्याची शक्यता असते. थायरॉईड समस्येचा कुटुंबाचा इतिहास असल्यास ही समस्या होण्याची दाट शक्यता असते.
४) ऑटोइम्युन विकार:
अँटीबॉडीज थायरॉईड ग्रंथीला हानी पोहोचवण्याचे कारण ठरू शकते. आपली इम्यून सिस्टीम म्हणजेच रोगप्रतिकारक शक्तीची समस्या सुरु झाल्यास थायरॉईड समस्या वाढण्याची शक्यता आहे.
५) ताणतणाव:
मानसिक ताण तणाव जास्त काळ राहिल्यास थायरॉईड ग्रंथींवर परिणाम होऊ शकतो. व्यक्ती तणावात राहिल्यास त्याच्या शरीरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होऊन ते अनेक रोगांचे कारण ठरू शकते.

थायरॉईड समस्यांची लक्षणे:
१) कमी कार्य करणारा थायरॉईड:
थायरॉईड कमी कार्य करणारा थायरॉईड म्हणजेच हायपोथायरॉईडीझम याची लक्षणे थकवा, वजन वाढणे, डोकेदुखी, त्वचा कोरडी होणे, केस गळणे, हाडं दुखणे, स्मरणशक्ती कमी होणे ही आहेत.
२) वेगाने कार्य करणारा थायरॉईड:
हायपरथायरॉईडीझम म्हणजे वेगाने कार्य करणारा थायरॉईड. वजन कमी होणे, हृदयाची धडधड वेगाने होणे, घाम येणे, निद्रानाश, थकवा, अशांती किंवा चिडचिड इत्यादी हायपरथायरॉईडीझमची लक्षणे आहेत.
थायरॉईड समस्या उपाय:
१) सफरचंद:
सफरचंदामध्ये पेक्टिन नावाचे फायबर असतात, जे थायरॉईड संप्रेरक पातळी संतुलित करण्यास मदत करते. सफरचंद खाल्ल्याने थायरॉईडच्या समस्येपासून आराम मिळतो. म्हणून थायरॉईडची समस्या असलेल्या रुग्णांनी आपल्या आहारात सफरचंदाचा समावेश करावा.
२) ब्राऊन राईस:
ब्राऊन राईसमध्ये जस्त, लोह, सेलेनियम यासारखी थायरॉईडला आवश्यक पोषक घटक असतात. या खनिजांचे सेवन थायरॉइडच्या रुग्णांना अत्यंत महत्वाचे आहे. ब्राऊन राईस हा थायरॉईड समस्या उपाय गुणकारी आहे.
३) सुका मेवा:
बदाम, अक्रोड आणि ब्राझील नट्स थायरॉइडच्या रुग्णांसाठी अत्यंत उपायकारक आहे. यामध्ये सेलेनियम, झिंक यासारखी महत्वपूर्ण खनिजे आहेत. यामुळे थायरॉईड रुग्णांनी याचे सेवन नक्कीच करावे.
४) दही:
दह्यामध्ये प्रोबायोटिक्स असतात जे शरीरातील निरोगी जीवाणूंना प्रोत्साहन देतात. या थायरॉईड समस्या उपाय केल्याने थायरॉईड समस्या दूर होऊ शकते.
५) योग आणि व्यायाम:
नियमित योगाभ्यास आणि हलका व्यायाम शरीराच्या मेटाबोलिझमला उत्तेजित करतो, जो थायरॉईड समस्यांवर सकारात्मक परिणाम करतो. त्यामुळे थायरॉईड रुग्णांनी आपल्या रोजच्या दिनचर्येत योग आणि व्यायाम यांचा समावेश नक्कीच करावा.

६) तज्ज्ञांचा सल्ला:
थायरॉइडची लक्षणं दिसून आल्यास त्वरित तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणं अत्यावश्यक आहे. त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपल्या जीवनशैलीत बदल करावा. यामुळे थायरॉइडवर उपचार करणं अधिक सोपं होतं.
७) नारळाचे तेल:
आपल्या रोजच्या आहारात नारळाच्या तेलाचा वापर करावा. यामुळे यामुळे शरीरातील मेटाबोलिझम सुधारण्यास मदत होते.
८) ताणतणाव कमी करणे:
आपल्या रोजच्या जीवनातील ताण तणाव थायरॉईड समस्येच्या वाढीला कारणीभूत ठरू शकेल, त्यामुळे ताण तणाव कमी करणे हा थायरॉईड समस्या उपाय यांपैकी एक उत्तम उपाय आहे.
थायरॉईड समस्यांचे नियंत्रण साधता येऊ शकते. योग्य आहार, व्यायाम, आणि डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली उपचार केल्यास आपल्याला लवकरच फायदा होईल. थायरॉईडच्या समस्यांवर उपचार घेताना संयम आणि धैर्य आवश्यक आहे.
थायरॉइडवर उपाय कोणते?
सफरचंदामध्ये पेक्टिन नावाचे फायबर असतात, जे थायरॉईड संप्रेरक पातळी संतुलित करण्यास मदत करते. सफरचंद खाल्ल्याने थायरॉईडच्या समस्येपासून आराम मिळतो. म्हणून थायरॉईडची समस्या असलेल्या रुग्णांनी आपल्या आहारात सफरचंदाचा समावेश करावा.
हायपोथायरॉईडीझम म्हणजे काय?
थायरॉईड कमी कार्य करणारा थायरॉईड म्हणजेच हायपोथायरॉईडीझम याची लक्षणे थकवा, वजन वाढणे, डोकेदुखी, त्वचा कोरडी होणे, केस गळणे, हाडं दुखणे, स्मरणशक्ती कमी होणे ही आहेत.
हायपरथायरॉईडीझम म्हणजे काय?
हायपरथायरॉईडीझम म्हणजे वेगाने कार्य करणारा थायरॉईड. वजन कमी होणे, हृदयाची धडधड वेगाने होणे, घाम येणे, निद्रानाश, थकवा, अशांती किंवा चिडचिड इत्यादी हायपरथायरॉईडीझमची लक्षणे आहेत.
ब्राऊन राईसचा उपयोग काय?
ब्राऊन राईसमध्ये जस्त, लोह, सेलेनियम यासारखी थायरॉईडला आवश्यक पोषक घटक असतात. या खनिजांचे सेवन थायरॉइडच्या रुग्णांना अत्यंत महत्वाचे आहे. ब्राऊन राईस हा थायरॉईड समस्या उपाय गुणकारी आहे.