टक्कल पडण्यावर उपाय ७: जीवनशैली देखील महत्वाची!

केस गळणे किंवा टक्कल पडणे या समस्यांना अनेक लोक सामोरे जात आहेत. ही अत्यंत सामान्य समस्या झाली आहे. विशेषतः वय वाढल्यावर किंवा आनुवंशिक कारणांमुळे टक्कल पडू शकते. हे पुरुषांमध्ये अधिक सामान्य असले तरी महिलांनाही याचा सामना करावा लागतो. टक्कल पडल्यामुळे आत्मविश्वासावर परिणाम होऊ शकतो, परंतु टक्कल पडल्यावर उपाय योग्य केल्यास व व्यवस्थित काळजी घेतल्यास यावर नियंत्रण मिळवता येऊ शकते. टक्कल पडण्यावर उपाय पाहण्यापूर्वी आपण टक्कल पडण्याची अनेक कारणे पाहून घेऊ जेणेकरून आपण त्या कारणांपासून सावध होऊ शकतो.  

१) आनुवंशिक कारणे: 

जर आपल्या कुटुंबात टक्कल पडण्याची समस्या असेल, तर यामुळे आपल्यालाही टक्कल पडण्याची शक्यता उद्भवते. आपल्याला टक्कल पडणे हे त्याचे आनुवंशिक कारण असू शकते.

२) हॉर्मोनल इम्बॅलन्स: 

हार्मोनल इम्बॅलन्स, विशेषतः टेस्टोस्टेरॉनची कमी होणे, यामुळे पुरुषांमध्ये टक्कल पडू शकते. महिलांमध्ये प्रेग्नन्सी किंवा मेनोपॉजदरम्यान हार्मोनल बदलामुळेही टक्कल पडण्याची शक्यता वर्तवता येते.

३) ताण आणि मानसिक दबाव: 

टक्कल पडण्यावर उपाय

४) असंतुलित आहार: 

आहाराद्वारे पोषणतत्व शरीरात न जाणे, कमी पाणी पिणे, अयोग्य आहार आणि जीवनशैलीचे तत्त्वज्ञान हे टक्कल पडण्याचे कारण होऊ शकते. यावेळी टक्कल पडण्यावर उपाय करणे गरजेचे ठरते. 

५) अधिक रासायनिक घटकांचा वापर करणे: 

केसांना नुकसान होऊ शकणारे शॅम्पू, हॅयर डाई किंवा अन्य उपकरणांचा वापर केल्याने केस गळती सुरु होऊ शकते तसेच टक्कल देखील पडू शकते.

१) संतुलित आहार: 

संतुलित आहार शरीरासाठी आवश्यक पोषण पुरवतो. योग्य प्रमाणात प्रोटिन, आयरन, जिंक, आणि व्हिटॅमिन्स आपल्या आहारात समाविष्ट असणे अत्यंत आवश्यक आहे. यामुळे केसांचे आरोग्य सुधारू शकते. आपल्या आहारात हायड्रेटिंग फळं, पालेभाज्या, सुका मेवा इत्यादी पोषक आणि महत्वपूर्ण घटक समाविष्ट असलेले पदार्थ आपल्या नियमित आहारात ग्रहण करायला हवे. 

२) ताण कमी करणे: 

ताणतणाव हे देखील टक्कल पाडण्याचे एक कारण आहे. यावेळी टक्कल पडण्यावर उपाय म्हणजे मानसिक ताण कमी करण्यासाठी ध्यान, योग, श्वासोच्छ्वासाचे व्यायाम करा. आपल्या जीवनशैलीत ताण कमी करण्यासाठी साधी आणि शांत जीवनशैली राखा.

३) केसांची योग्य काळजी: 

केसांना नियमितपणे तेल लावून चांगला मसाज करा. जास्वंद तेल, नारळ तेल, किंवा एखादे चांगले हर्बल तेल केसांसाठी फायदेशीर असतात. केसांच्या मुळावर सौम्यतेने मसाज केल्याने रक्तप्रवाह वाढतो आणि केसांची वाढ सुधारते.

टक्कल पडण्यावर उपाय

४) नैतिक उपाय:

काही लोक आयुर्वेदिक औषधे आणि हर्बल उपचारांचा वापर करून टक्कल पडण्यावर नियंत्रण ठेवतात. अंजीर, हळद, आवळा आणि भृंगराज यासारखी घटक केसांना पोषण देण्यासाठी आणि केसगळती रोखण्यासाठी उपयोगी पडू शकतात.

५) टॉपिकल उपचार: 

बाजारात टक्कल पडण्यावर विविध प्रकारचे तेल आणि लोशन उपलब्ध आहेत. आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेऊन औषधांचा वापर केल्याने टक्कल पडणे टाळता येते तसेच केसगळती देखील थांबण्यात हे टॉपिकल टक्कल पडण्यावर उपाय गुणकारी ठरतात.

६) केसांची नियमित तपासणी: 

आपले केस व डोक्याची त्वचा म्हणजेच स्कल नियमितपणे तपासून पहा. कोणत्याही प्रकारच्या त्वचेच्या विकार किंवा फंगल इन्फेक्शनच्या लक्षणांचा शोध घेतल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या. आपले तज्ज्ञ टक्कल पडण्यावर उपाय सुचवू शकतील. 

७) रासायनिक प्रक्रियांचा कमी वापर: 

केसांना जास्त रासायनिक प्रक्रियांचा किंवा हॉट टूल्सचा वापर टाळा. यामुळे केस तुटणे आणि गळणे कमी होईल. हर्बल शॅम्पू, आयुर्वेदिक तेल, इत्यादी साईड इफेक्ट नसलेल्या औषधांचा वापर आपण नियमित करावा जेणेकरून केसगळती थांबून टक्कल पडणे टळेल किंवा पडलेले टक्कल कमी होण्यास मदत होईल. 

टक्कल पडण्यावर उपाय अनेक प्रकारांनी उपलब्ध आहेत. प्रत्येक व्यक्तीच्या केसांची प्रकृती वेगळी असते, त्यामुळे काही वेळा डोक्याची त्वचा किंवा केसांच्या दुरुस्तीसाठी तज्ञांची मदत घेणं योग्य ठरू शकते. लवकरच योग्य काळजी घेतल्यास, केस गळणे कमी होऊ शकते आणि टक्कल पडणे थांबवता येऊ शकते. यासाठी शारीरिक व मानसिक आरोग्य दोन्ही महत्वाचे आहेत. आपल्या आरोग्याची काळजी घेणं या काळात अत्यावश्यक ठरत आहे, त्यामुळे रोजची दिनचर्या अतिशय आरोग्यदायी असावी याची काळजी घेणं गरजेचं आहे. 

टक्कल पडल्यास काय करावे?

संतुलित आहार शरीरासाठी आवश्यक पोषण पुरवतो. योग्य प्रमाणात प्रोटिन, आयरन, जिंक, आणि व्हिटॅमिन्स आपल्या आहारात समाविष्ट असणे अत्यंत आवश्यक आहे. यामुळे केसांचे आरोग्य सुधारू शकते. आपल्या आहारात हायड्रेटिंग फळं, पालेभाज्या, सुका मेवा इत्यादी पोषक आणि महत्वपूर्ण घटक समाविष्ट असलेले पदार्थ आपल्या नियमित आहारात ग्रहण करायला हवे. 

टक्कल पाडण्याचे कारण काय?

हार्मोनल इम्बॅलन्स, विशेषतः टेस्टोस्टेरॉनची कमी होणे, यामुळे पुरुषांमध्ये टक्कल पडू शकते. महिलांमध्ये प्रेग्नन्सी किंवा मेनोपॉजदरम्यान हार्मोनल बदलामुळेही टक्कल पडण्याची शक्यता वर्तवता येते. मानसिक ताणतणाव आणि चिंता यामुळे केस गळती वाढू शकते. ताणतणाव कमी करण्यासाठी दररोज योग, ध्यान करणे आवश्यक आहे. यामुळे हळूहळू तणाव नियंत्रणाखाली येण्यास सुरुवात होईल आणि केसांची गुणवत्ता आणि घनता सुधारण्यास मदत होईल.

टक्कल निवारणावर करण्यास कोणते औषधी कामी येतील?

बाजारात टक्कल पडण्यावर विविध प्रकारचे तेल आणि लोशन उपलब्ध आहेत. आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेऊन औषधांचा वापर केल्याने टक्कल पडणे टाळता येते तसेच केसगळती देखील थांबण्यात हे टॉपिकल टक्कल पडण्यावर उपाय गुणकारी ठरतात.

Leave a Comment