केसगळती थांबवण्यासाठी उपाय १०: केस वाढवण्यास उपयोगी!

केसगळती ही अगदी सामान्य समस्या आहे. अनेक स्त्रिया तसेच पुरुषही या समस्येला सामोरे जात असतात. परंतु या समस्येसाठी महागड्या गोळ्या औषधे घेऊन देखील ही समस्या दूर होत नाही किंवा काहींना महागड्या गोळ्या औषधे परवडणे देखील कठीण असते. यावेळी आपण केसगळती थांबवण्यासाठी उपाय घरगुती आणि आयुर्वेदिक पाहणार आहोत. आयुर्वेदानुसार, केसगळती थांबवण्यासाठी आणि केसांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी विविध नैसर्गिक आणि आयुर्वेदिक उपाय आहेत. हे उपाय शरीरातील दोष कमी करून, केसांच्या मुळांची मजबुती वाढवण्यास आणि केसांची गुणवत्ता सुधारण्यास मदत करतात. आज आपण केसगळती थांबवण्यासाठी उपाय पाहूया… 

जाणून घ्या- टक्कल पडण्यावर उपाय ७: जीवनशैली देखील महत्वाची!

केसगळती थांबवण्यासाठी उपाय:

१) नारळाचं तेल: 

केसगळती थांबवण्यासाठी उपाय

नारळाचं तेल हे केस गळती थांबवण्यासाठी अतिशय गुणकारी आहे. जर केसांना नारळाच्या तेलाने मसाज केला तर प्रथिनांची क्षती रोखली जाते तसेच केस मऊ आणि सतेज होण्यास मदत होते. नारळाचे दूध डोक्यावर चोळल्यानेही असेच चांगले परिणाम दिसून येतात. 

२) कांद्याचा रस:

कांद्याचा रस लावल्यास केसांची वाढ होते तसेच टक्कल कमी होण्यास देखील मदत होते. कांद्याचा रसाचा उग्र वास जरी येत असला तरी तो आपल्या केसांच्या वाढीसाठी आणि केसगळती थांबवण्यासाठी उपाय उत्तम आहे.

३) कोरफड आणि मेथीचे दाणे:

४) बीट आणि मेहेंदी:

बीट आणि मेहेंदी पावडर ह्यांना एकत्र पाण्यात कालवून, त्यांची पेस्ट केसाला लावल्यास केस गळणे कमी होते तसेच डोक्यावर वयानुसार वाढत असलेल्या पांढऱ्या केसांना रंग लागून ते लपण्यास मदत होते. 

५) आवळा पावडर आणि लिंबाचा रस: 

आवळा पावडर तसेच लिंबाचा रस डोक्याला लावल्यास केस गळण्याचे प्रमाण कमी होते तसेच केसांना चमक येते. हा केसगळती थांबवण्यासाठी उपाय महिन्यातून दोन किंवा एकदा केल्यास केसगळती लवकर थांबण्यास मदत होते. 

६) भृंगराज तेल:

भृंगराज तेल हे आयुर्वेदातील एक अत्यंत प्रभावी उपाय आहे, जे केसांच्या गळतीला थांबवण्यास मदत करते. यामध्ये केसांच्या मुळांना पोषण देणारे आणि रक्तप्रवाह सुधारणारे गुण असतात. या तेलाने स्कॅल्पवर मसाज केल्याने ते अत्यंत परिणामकारक ठरते. हे तेल केसांच्या टोकाला देखील लावावे, याने केसांमध्ये येणारे स्प्लिटन्सवर योग्य उपचार होण्यास मदत होते. 

केसगळती थांबवण्यासाठी उपाय

७) संतुलित आहार:

केसगळती थांबवण्यासाठी उपाय म्हणजे योग्य आहार आणि उत्तम पोषण आपली आहारात समाविष्ट करणे. आपल्या आहारात प्रोटीन, आयर्न, व्हिटॅमिन C, आणि बायोटिनयुक्त पदार्थांचा समावेश करा. यावेळी आहारात पालक वापरावा. त्यात आयर्न आणि फोलेट असतो, जो केसांच्या गळतीला थांबवण्यास मदत करतो. तसेच अंड्यात प्रोटीन आणि बायोटिन असतात जे केसांची गळती कमी करतात. यामुळे आपल्या आहारात अंड्याचा समावेश केल्यास हा केसगळती थांबवण्यासाठी उपाय परिणामकारक ठरतो. संत्रीमध्ये व्हिटॅमिन C मुबलक प्रमाणात असतो, ज्यामुळे केसांना पोषण मिळते आणि गळती थांबते.

८) व्यायाम, योग:

नियमित व्यायाम, योग आणि ध्यान केल्याने शरीर कार्यरत राहते, परिणामी शरीरातील रक्तप्रवाह अगदी योग्यरीत्या होत असतो आणि त्यामुळे केसांच्या मुळाला देखील रक्तपुरवठा उत्तमरीत्या होण्यास मदत होते. यामुळे नियमित व्यायाम, योग केसगळती थांबवण्यासाठी उपाय अतिशय गुणकारी आहे. 

९) ताणतणाव कमी करणे: 

तणाव देखील केसांच्या गळतीचे प्रमुख कारण असू शकते. ताणतणाव कमी करण्यासाठी दररोज योग, ध्यान करणे आवश्यक आहे. यामुळे हळूहळू तणाव नियंत्रणाखाली येण्यास सुरुवात होईल आणि केसांची गुणवत्ता आणि घनता सुधारण्यास मदत होईल.

१०) प्राकृतिक हर्बल तेल वापरा:

आयुर्वेदानुसार, काही हर्बल तेलांचा वापर केसांच्या गळतीला थांबवण्यासाठी फायदेशीर आहे. यामध्ये काही विशिष्ट तेलांचा समावेश आहे जसे की चंदन तेल, नारळ तेल, आवळा तेल इत्यादी. हे हर्बल तेल आपल्या केसगळती थांबण्यासाठी उपाय कारक ठरतात.

केसांची गळती थांबवण्यासाठी आयुर्वेदिक उपाय प्रभावी असतात, आणि त्याचा वापर नियमितपणे केल्याने दीर्घकालीन परिणाम मिळवता येतात. नैसर्गिक घटकांचा वापर करून तुम्ही केसांच्या गळतीवर नियंत्रण मिळवू शकता. त्यामुळे, आयुर्वेदिक तेल, मसाज, संतुलित आहार, आणि तणाव कमी करणारे उपाय स्वीकारणे आवश्यक आहे. परंतु जर या सर्व गोष्टींनी केसगळती थांबत नसेल किंवा केसांची वाढ होत नसेल तर मात्र आपण याबाबत डॉक्टरांचा सल्ला घेणे अत्यावश्यक आहे. तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार केल्याने यावर त्वरित फरक पडण्यास सुरुवात होऊ शकेल. 

केस दाट होण्यासाठी घरगुती उपाय कोणते?

रात्रीच्या वेळी कोरफडीच्या पातीचे दोन तुकडे करून त्यामध्ये मेथीचे दाणे पेरावे आणि कोरफड बंद करून रात्रभर तशीच राहू द्यावी. सकाळी नारळाचे तेल गॅसवर गरम करण्यास ठेवून त्यात जास्वंदाची फुलं आणि रात्री मेथीचे दाणे पेरून ठेवलेल्या कोरफडीचा गर त्यात टाकावा आणि ते तेल छान पैकी उकळून घ्यावे. तेल थंड झाल्यास आपल्या केसांना व केसांच्या मुळांना लावावे. हे तेल आठवड्यातून दोन ते तीन वेळा लावल्यास आणखीन गुणकारी ठरते. या तेलामुळे केस दाट होतात, कोंडा कमी होतो तसेच केस लांबसडक होण्यास मदत होते. हा केसगळती थांबवण्यासाठी उपाय अतिशय गुणकारी आहे. 

केस गळतीवर आयुर्वेदिक तेल कोणते?

आयुर्वेदानुसार, काही हर्बल तेलांचा वापर केसांच्या गळतीला थांबवण्यासाठी फायदेशीर आहे. यामध्ये काही विशिष्ट तेलांचा समावेश आहे जसे की चंदन तेल, नारळ तेल, आवळा तेल इत्यादी. हे हर्बल तेल आपल्या केसगळती थांबण्यासाठी उपाय कारक ठरतात.

केस गाळण्याची कारणे कोणती?

केसगळती ही अगदी सामान्य समस्या आहे. अनेक स्त्रिया तसेच पुरुषही या समस्येला सामोरे जात असतात. परंतु या समस्येसाठी महागड्या गोळ्या औषधे घेऊन देखील ही समस्या दूर होत नाही किंवा काहींना महागड्या गोळ्या औषधे परवडणे देखील कठीण असते. यावेळी आपण केसगळती थांबवण्यासाठी उपाय घरगुती आणि आयुर्वेदिक पाहणार आहोत. आयुर्वेदानुसार, केसगळती थांबवण्यासाठी आणि केसांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी विविध नैसर्गिक आणि आयुर्वेदिक उपाय आहेत. हे उपाय शरीरातील दोष कमी करून, केसांच्या मुळांची मजबुती वाढवण्यास आणि केसांची गुणवत्ता सुधारण्यास मदत करतात.

Leave a Comment