वाढते वजन आणि वाढती चरबी या समस्येतून सध्या अनेक जण जात आहेत. सध्याच्या व्यस्त जीवनशैलीत आरोग्याकडे लक्ष देणं कठीण होऊन बसलं आहे. ऑफिसमध्ये किंवा वर्क फ्रॉम होम असेल तर घरी लॅपटॉपसमोर बसून लठ्ठपणा वाढण्याच्या समस्या तरुण पिढीत देखील उद्भवत आहेत. अशावेळी काहींना जिमला जाणं किंवा महागडे न्यूट्रिशन घेणं शक्य नाही. म्हणूनच आज आपण वजन कमी करण्यासाठी घरगुती उपाय पाहणार आहोत ज्यामुळे आपलं वजन झटपट कमी करण्यात मदत होते.

वजन कमी करण्यासाठी घरगुती उपाय पुढीलप्रमाणे:
वजन वाढल्याने व्यक्तिमत्वावर फरक तर पडतोच, पण हृदयविकार, मधुमेह असे भयंकर रोग होण्याची संभावना वाढते. आपले वजन आपल्या व्यक्तिमत्वाला अनुसरून योग्य आहे की नाही हे बीएमआयद्वारे ( बॉडी मास इंडेक्स ) चेक करून घेणे आवश्यक आहे. आपला बीएमआय योग्य असेल तर आपण फिट आणि सुदृढ आहोत, पण आपलं बीएमआय जर जास्त असेल तर आपल्याला वजन कमी करण्याची आवश्यकता आहे. नाहीतर याचा परिणाम आपल्या आरोग्यावर देखील होऊ शकतो. म्हणूनच व्यस्त जीवनशैलीत वजन कमी करण्यासाठी घरगुती उपाय कामी येतात.
१) लिंबू पाणी:
लिंबामध्ये बऱ्याच प्रमाणात व्हिटॅमिन C असतं जे शरीरातील फॅट कमी करण्यास गुणकारी ठरतं. सकाळी उठल्यावर गरम पाण्यात लिंबू पिळून प्यायल्याने वजन कमी करण्यास मदत होते. गरम पाण्यात लिंबू सह मध टाकल्यास ते आणखी गुणकारी ठरतं. वजन कमी करण्यासाठी घरगुती उपाय यामध्ये हा उपाय रोजच्या जीवनात वापरावा.
२) जिऱ्याचं पाणी:
जिऱ्याचं पाणी पोटाची चरबी कमी करण्यासाठी उत्तम घटक आहे. रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास पाण्यात एक चमचा जिरं टाकून उकळून घ्यावं आणि झाकून ठेवावं. सकाळी उठल्याबरोबर ते पाणी गाळून प्यायल्याने पोटाची चरबी कमी होण्यास मदत होते. हा वजन कमी करण्यासाठी घरगुती उपाय रोज करावा. याने झटपट वजन कमी होण्यास मदत होते.
३) नारळाचं तेल:
नियमित आहारात तूप किंवा अन्य तेलांपेक्षा नारळाच्या तेलाचा वापर करावा. यामुळे शरीरात फॅट्स जाण्याचे प्रमाण कमी होते आणि शरीराचे फॅट्स कमी होण्यास सुरुवात होते.
४) नियमित व्यायाम:
काही जणांना जिमला जाणं किंवा बाहेर झुंबा, कार्डियोसाठी जाणं शक्य होत नाही, त्यामुळे घरच्या घरी व्यायाम करणे हा देखील वजन कमी करण्यासाठी घरगुती उपाय आहे. घरी व्यायाम करण्याच्या अनेक पद्धती आहेत. सध्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सर्व काही उपलब्ध आहे. आपल्या जीवनात वजन कमी करण्यासाठी नियमित व्यायाम खूप महत्वाची कामगिरी बजावतो.
५) फायबरयुक्त आहार:
आपले पोट फायबर युक्त अन्न न खाल्याने अतृप्त असते आणि त्यामुळे सतत भूक लागते. सध्या बाहेरील अन्न, जंक फूड, तेलकट पदार्थ इत्यादी फायबर विरहित तसेच शरीराला हानीकारक ठरत असलेला आहार आपण घेत असल्याचे प्रमाण वाढले आहे. फायबरयुक्त आहार ग्रहण केल्यास सतत भूक लागणं कमी होतं आणि शरीर तृप्त राहून वजन कमी होण्यास मदत होते.
६) पुरेशी झोप:
व्यस्त जीवनशैलीत पुरेशी झोप देखील न होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे ताणतणाव वाढत आहे. तसेच पुरेशी झोप न घेणं हे देखील वजन वाढीसाठी एक कारण ठरू शकतं. म्हणूनच पुरेशी झोप ही फार गरजेची आहे.
७) डिटॉक्स पाणी:
काकडी आणि पुदिना हे घटक शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यास तसेच उष्णता कमी करण्यास मदत करतात. एका लिटर पाण्यात काकडीचे तुकडे आणि काही पुदिन्याची पानं घालावीत आणि ते पाणी दिवसभर प्यावं. हे पाणी शरीर हायड्रेट ठेवते आणि वजन कमी करण्यात मदत करते. डिटॉक्स वॉटरमुळे शरीरातील पाण्याचं प्रमाण योग्य राहून कॅलरी बर्न होण्यास मदत होते.
हे उपाय आपण घरच्या घरी करू शकतो. यामुळे वजन कमी होण्यास नक्कीच मदत होईल. परंतु या उपायांसोबत पौष्टिक आहार, योग्य डाएट आणि व्यायाम नियमित असणं फार महत्वाचं आहे. तसेच ताण तणाव असल्यास तो बाजूला सारनं देखील तितकंच महत्वाचं ठरतं. वजन कमी करण्यासाठी घरगुती उपाय आपलं शरीर सुदृढ आणि निरोगी ठेवण्यास उपयोगी ठरेल. यामुळे वजन तर कमी होईलच परंतु शरीरात रोगप्रतिकारक शक्ती वाढून अनेक रोगांपासून लांब राहण्यास मदत होईल.
वजन कमी करण्यासाठी काय खावे ?
लिंबामध्ये बऱ्याच प्रमाणात व्हिटॅमिन C असतं जे शरीरातील फॅट कमी करण्यास गुणकारी ठरतं. सकाळी उठल्यावर गरम पाण्यात लिंबू पिळून प्यायल्याने वजन कमी करण्यास मदत होते. गरम पाण्यात लिंबू सह मध टाकल्यास ते वजन कमी करण्यास आणखी गुणकारी ठरतं.
पोटाची चरबी कमी करण्यासाठी घरगुती उपाय कोणते ?
जिऱ्याचं पाणी पोटाची चरबी कमी करण्यासाठी उत्तम घटक आहे. रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास पाण्यात एक चमचा जिरं टाकून मिसळून घ्यावं आणि झाकून ठेवावं. सकाळी उठल्याबरोबर ते पाणी गाळून प्यायल्याने पोटाची चरबी कमी होण्यास मदत होते. हा वजन कमी करण्यासाठी घरगुती उपाय रोज करावा. याने झटपट वजन कमी होण्यास मदत होते.
झटपट वजन कमी असे करावे ?
काही जणांना जिमला जाणं किंवा बाहेर झुंबा, कार्डियोसाठी जाणं शक्य होत नाही, त्यामुळे घरच्या घरी व्यायाम करणे हा देखील वजन कमी करण्यासाठी घरगुती उपाय आहे. घरी व्यायाम करण्याच्या अनेक पद्धती आहेत. सध्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सर्व काही उपलब्ध आहे. आपल्या जीवनात वजन कमी करण्यासाठी नियमित व्यायाम खूप महत्वाची कामगिरी बजावतो.