शाळेत जाणारी सध्याची पिढी ही आहाराकडे दुर्लक्ष करत असल्याचे अनेक शाळांमधून तसेच त्यांच्या पालकांकडून ऐकायला मिळते. परंतु शालेय पोषण आहारात बदल केल्याने किंवा त्याकडे परखडपणे लक्ष दिल्यास शालेय मुलांना आहाराची शिस्त लागू शकते. यासाठी शालेय पोषण आहार प्रमाण ठरवणे अत्यंत गरजेचे आहे. चला तर मग त्याविषयी आणखी माहिती मिळवूया. शालेय पोषण आहार प्रमाण, त्याचे महत्व आणि त्याचे फायदे पाहुयात.
शालेय पोषण आहार प्रमाण: आवश्यक घटक

१) प्रोटिन्स:
प्रोटिन्स म्हणजेच प्रथिने शरीराच्या ऊती आणि पेशींना तयार करण्यास मदत करतात. त्यामुळे शालेय मुलांच्या आहारात यांचा समावेश असणे अत्यंत आवश्यक आहे. मुग, सोयाबीन, दूध, अंडी, कडधान्ये आणि मांसाहार हे प्रथिनांचे चांगले स्त्रोत आहेत. या पदार्थांचा शालेय पोषण आहार प्रमाण यात समावेश करावा.
२) फॅट्स:
शरीरासाठी आवश्यक असलेले फॅट्स हे यकृत, हाडे, त्वचा आणि इतर अवयवांना सहाय्य करतात. यामुळे फॅट्स समाविष्ट असलेल्या पदार्थांचा म्हणजेच गहू, तेल, तूप, शाकाहारी पदार्थ अशा पदार्थांचा शालेय विद्यार्थ्यांच्या पोषण आहारात समावेश करावा.
३) कार्बोहायड्रेट:
विद्यार्थ्यांना ऊर्जा प्रदान करणारे मुख्य घटक म्हणजे कार्बोहायड्रेट्स. भात, गहू, तांदूळ, बटाटे आणि फळे हे कार्बोहायड्रेटचे प्रमुख स्त्रोत आहेत. या घटकांचा त्यांच्या पोषणामध्ये समावेश केल्याने त्यांच्या दैनंदिन जीवनात अभ्यास, छंद, कला याकडे लक्ष देण्यास शरीरात आणखी ऊर्जा निर्माण होते.
४) व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स:
शरीराला विविध कार्यांसाठी आवश्यक असलेले घटक म्हणजे व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स. फळे, भाज्या, दूध, अंडी, गहू, तांदूळ यांमध्ये या घटकांचे प्रमाण जास्त असते. यामुळे कोणत्याही आरोग्याच्या समस्या त्यांना उद्भवण्याची प्रमाण कमी होण्यास मदत होईल.
५) पाणी:
शालेय पोषण आहार प्रमाण यातील सर्वात महत्वाचा घटक म्हणजे पाणी. वेळोवेळी पाणी पिणे हे शालेय विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाचे आहे. शरीरातील पाण्याचे प्रमाण नियंत्रित राखण्यासाठी आणि अनेक जीवनसत्वे मिळवण्यासाठी अधिक पाणी पिणे फार महत्वाचे आहे.
शालेय पोषण आहार प्रमाण: मार्गदर्शन
१) वैयक्तिकृत पोषण:
प्रत्येक विद्यार्थ्याला अनुसरून म्हणजेच वय, लिंग आणि शरीरयष्टीनुसार त्यांचे पोषण ठरवण्यात यावे. यामुळे त्यांची वाढ योग्यरीत्या होते.
२) विविधता:
शालेय मुले चंचल असतात, त्यांना कोणत्याही गोष्टीत सातत्य आवडत नाही, त्यामुळे आहारात विविधता असणे आवश्यक आहे. आहारात विविधता असल्याने मुलं अगदी आनंदाने तसेच आवडीने आहाराचा आस्वाद घेतील.
३) संतुलित आहार:
शालेय मुलांच्या आहारात प्रथिने, कार्बोहायड्रेट्स, फॅट्स, व्हिटॅमिन्स, मिनरल्स आणि पाणी यांचा योग्य प्रमाणात समावेश असावा लागतो.

शालेय पोषण आहार प्रमाण: महत्त्व
१) शारीरिक विकास:
पोषणयुक्त आहारामुळे विद्यार्थ्यांचा शारीरिक विकास योग्यरीत्या होतो. हाडे, स्नायू, त्वचा आणि इतर शरीराच्या भागांमध्ये योग्य वाढ होण्यास शालेय पोषण आहार मदत करते.
२) मानसिक आरोग्य:
योग्य पोषण विद्यार्थ्यांच्या मेंदूची कार्यक्षमता सुधारते, ज्यामुळे त्यांना शिकायला आणि लक्ष केंद्रित करायला मदत होते. तसेच शालेय पोषणातील संतुलित आहार मुलांना संयम शिकवतो. यामुळे मुलांची चिडचिड कमी होण्यास मदत होते.
३) रोग प्रतिकारशक्ती:
योग्य आहाराने विद्यार्थ्यांमध्ये रोगप्रतिकारशक्तीची वाढ होते. विविध रोगांपासून बचाव करण्यासाठी योग्य पोषणयुक्त आहार अत्यंत महत्वाचा आहे.
४) योग्य वाढ:
योग्य पोषण आहारामुळे मुलांच्या शारीरिक, मानसिक तसेच बौद्धिक वाढीमध्ये कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण होत नाही. यामुळे मुलांची सर्वांगीण वाढ अगदी योग्यरीत्या होते. तसेच अनेक रोगांची शक्यता देखील टळते.
शालेय पोषण आहार हे विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. योग्य आहारामुळे विद्यार्थ्यांची शारीरिक आणि मानसिक क्षमता वाढते, तसेच ते शिक्षणासाठी अधिक सक्षम होतात. शालेय पोषण आहार मानकांची अंमलबजावणी शिक्षण संस्था, सरकार आणि पालक यांच्या सहयोगातून निश्चित करता येते.
शालेय पोषण आहार प्रमाण म्हणजे काय?
शाळेत जाणारी सध्याची पिढी ही आहाराकडे दुर्लक्ष करत असल्याचे अनेक शाळांमधून तसेच त्यांच्या पालकांकडून ऐकायला मिळते. परंतु शालेय पोषण आहारात बदल केल्याने किंवा त्याकडे परखडपणे लक्ष दिल्यास शालेय मुलांना आहाराची शिस्त लागू शकते. यासाठी शालेय पोषण आहार प्रमाण ठरवणे अत्यंत गरजेचे आहे. चला तर मग त्याविषयी आणखी माहिती मिळवूया. शालेय पोषण आहार प्रमाण, त्याचे महत्व आणि त्याचे फायदे पाहुयात.
मुलांचा आहार कसा असावा?
प्रोटिन्स म्हणजेच प्रथिने शरीराच्या ऊती आणि पेशींना तयार करण्यास मदत करतात. त्यामुळे शालेय मुलांच्या आहारात यांचा समावेश असणे अत्यंत आवश्यक आहे. मुग, सोयाबीन, दूध, अंडी, कडधान्ये आणि मांसाहार हे प्रथिनांचे चांगले स्त्रोत आहेत. या पदार्थांचा शालेय पोषण आहार प्रमाण यात समावेश करावा. शरीरासाठी आवश्यक असलेले फॅट्स हे यकृत, हाडे, त्वचा आणि इतर अवयवांना सहाय्य करतात. यामुळे फॅट्स समाविष्ट असलेल्या पदार्थांचा म्हणजेच गहू, तेल, तूप, शाकाहारी पदार्थ अशा पदार्थांचा शालेय विद्यार्थ्यांच्या पोषण आहारात समावेश करावा.
शालेय पोषण आहार प्रमाणमुळे काय फायदा होतो?
पोषणयुक्त आहारामुळे विद्यार्थ्यांचा शारीरिक विकास योग्यरीत्या होतो. हाडे, स्नायू, त्वचा आणि इतर शरीराच्या भागांमध्ये योग्य वाढ होण्यास शालेय पोषण आहार मदत करते. योग्य पोषण विद्यार्थ्यांच्या मेंदूची कार्यक्षमता सुधारते, ज्यामुळे त्यांना शिकायला आणि लक्ष केंद्रित करायला मदत होते. तसेच शालेय पोषणातील संतुलित आहार मुलांना संयम शिकवतो. यामुळे मुलांची चिडचिड कमी होण्यास मदत होते.