रोबोटिक सर्जरी आणि लॅप्रोस्कोपिक सर्जरी: 2 प्रगत पद्धती!

तंत्रज्ञानाच्या प्रगतीसह उपचार पद्धती देखील मोठ्या प्रमाणावर प्रगत झाल्या आहेत. विशिष्ट समस्यांवर विशिष्ट सर्जरी उपलब्ध आहेत. या सर्जरींमध्ये सर्वात जास्त वापरल्या जाणाऱ्या सर्जरी म्हणजे रोबोटिक सर्जरी आणि लॅप्रोस्कोपिक सर्जरी होय.  दोन्ही पद्धती पारंपारिक शस्त्रक्रिया पद्धतींच्या तुलनेत अधिक प्रभावी आणि सुरक्षित मानल्या जातात. तथापि, त्यामध्ये काही महत्त्वाचे फरक आहेत. जाणून घेऊया या दोनही सर्जरीचे महत्व आणि त्यातील फरक… 

हे एक अत्याधुनिक तंत्रज्ञान आहे, जे आजकाल जगभरातील रुग्णालयांमध्ये वापरले जाते. या तंत्रज्ञानामुळे सर्जरीला एक नवी ओळख लाभली आहे. पारंपारिक शस्त्रक्रिया पद्धतींमध्ये जे धोके होते त्यावर प्रभुत्व मिळवण्याची रोबोटिक सर्जरीने प्रगती केली आहे. या सर्जरीमध्ये रोबोटिक प्रणालीचा वापर केला जातो. या सर्जरीमध्ये सर्जन एका कंसोलवर बसून रोबोटला कमांड देत असतो. यावेळी हा रोबोट इतक्या सावधानतेने हालचाली करतो म्हणून ही सर्जरी अचूक आणि सुरक्षितरित्या पार पडते. रोबोटिक प्रणालीमध्ये उच्च रिझोल्यूशन, 3D व्ह्यू, सूक्ष्म नियंत्रण आणि सर्जनच्या हाताच्या हलचालींना अधिक सटीकतेने हस्तांतरण करण्याची क्षमता असते.

रोबोटिक सर्जरी, लॅप्रोस्कोपिक सर्जरी


रोबोटिक सर्जरीचे प्रकार:


१) रोबोटिक गायनॉकॉलॉजिक सर्जरी:

काही महिलांसाठी, रोबोटिक गायनॉकॉलॉजिक सर्जरी एक चांगला पर्याय असल्याचे सिद्ध होऊ शकते. गायनोकॉलॉजिकल सर्जरी म्हणजे महिला प्रजनन तंत्राशी संबंधित शस्त्रक्रिया, ज्या मध्ये गर्भाशय, अंडकोष, अंडाशय आणि इतर संबंधित अवयवांची शस्त्रक्रिया केली जाते. पारंपारिक पद्धतींपेक्षा ही सर्जरी अधिक सटीक, सुरक्षित आणि जलद रिकव्हरीसाठी प्रभावी आहे. 

२) रोबोटिक प्रोस्टेट सर्जरी:

प्रोस्टेट कॅन्सर किंवा प्रोस्टेटला इतर काही गंभीर समस्यांसाठी शस्त्रक्रिया आवश्यक होऊ शकते. पारंपारिक शस्त्रक्रियांच्या तुलनेत, रोबोटिक प्रोस्टेट सर्जरी एक अत्याधुनिक आणि प्रभावी उपचार पद्धत आहे, जी सर्जरीला अधिक अचूक, सुरक्षित आणि जलद रिकव्हरीसाठी सहाय्य करते.

३) रोबोटिक किडनी शस्त्रक्रिया:

४) रोबोटिक कोलोरेक्टल सर्जरी: 

रोबोटिक कोलोरेक्टल सर्जरी म्हणजे मोठ्या आतड्याच्या (कोलोन) आणि गुदाशयाच्या (रेक्टम) संबंधित शस्त्रक्रिया. या प्रकारच्या सर्जरीत रोबोटिक तंत्रज्ञानचा वापर करणे सर्जरीला अधिक अचूक, सुरक्षित आणि कमी वेदनादायक बनवते. रोबोटिक कोलोरेक्टल सर्जरी या तंत्रज्ञानाच्या मदतीने कोलोन किंवा रेक्टमसंबंधीचे जटिल ऑपरेशन्स पारंपारिक पद्धतींना मागे टाकत अधिक प्रभावीपणे केली जातात.

५) रोबोट स्पाइन सर्जरी:

स्पाइन सर्जरी म्हणजे पाठीच्या हाडांच्या किंवा मेंदूच्या संरचनांमध्ये असलेल्या समस्यांसाठी केलेली शस्त्रक्रिया. पारंपारिक पद्धतींमध्ये, सर्जन्सना मोठ्या कटिंग आणि सूक्ष्म कामाची आवश्यकता असते. परंतु रोबोटिक स्पाइन सर्जरीच्या मदतीने ही प्रक्रिया ही अधिक अचूक, सुरक्षित आणि वेदनारहित होऊ शकते.

ही एक कमी आक्रमक सर्जरी पद्धत आहे, ज्यामध्ये एक लहान छिद्र करून सर्जरी केली जाते. लॅप्रोस्कोप हा एक छोटा, लवचिक ट्यूब असतो जो व्हिडिओ कॅमेरा आणि लाइटसह जोडलेला असतो. हा कॅमेरा सर्जनला शरीराच्या आतल्या भागांची प्रतिमा दाखवतो, त्यामुळे सर्जन छोट्या छिद्रातूनच सर्जरी करतो. 

रोबोटिक सर्जरी, लॅप्रोस्कोपिक सर्जरी

लॅप्रोस्कोपिक सर्जरीचे प्रकार:

१) लॅप्रोस्कोपिक गॅलब्लेडर सर्जरी:

पित्ताशय काढण्यासाठी लॅप्रोस्कोपिक पद्धत अत्यंत सामान्य आहे. यामध्ये लहान छिद्रांद्वारे पित्ताशय काढला जातो.

२) लॅप्रोस्कोपिक हर्निया सर्जरी:

हर्निया काढण्यासाठी लॅप्रोस्कोपिक पद्धत वापरली जाते. या पद्धतीमध्ये जास्त अचूकता आणि सूक्ष्मपणे हर्निया सुधारता येते. 

३) लॅप्रोस्कोपिक अपेंडेक्टॉमी:

अपेंडिक्स काढण्यासाठी लेप्रोस्कोपिक पद्धतीचा वापर करण्यात येतो. 

४) लॅप्रोस्कोपिक गॅस्ट्रिक बायपास सर्जरी:

वजन कमी करण्यासाठी गॅस्ट्रिक बायपास किंवा मेटाबोलिक सर्जरीमध्ये लॅप्रोस्कोपिक तंत्रज्ञानाचा वापर केला जातो.

५) लॅप्रोस्कोपिक कोलोरेक्टल सर्जरी:

कोलोरेक्टल कॅन्सर किंवा इन्फ्लेमेटरी बाउल डिसिज (IBD) सारख्या समस्यांसाठी ही सर्जरी वापरली जाते.

६) लॅप्रोस्कोपिक किडनी सर्जरी:

किडनी कॅन्सर किंवा किडनी स्टोनसाठी लॅप्रोस्कोपिक पद्धत वापरून शस्त्रक्रिया केली जाते.

७) लॅप्रोस्कोपिक ओव्हेरियन सर्जरी:

महिलांच्या ओव्हरीची सर्जरी करताना लॅप्रोस्कोपिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येतो. 

रोबोटिक सर्जरी आणि लॅप्रोस्कोपिक सर्जरी यातील फरक:

रोबोटिक सर्जरीमध्ये सर्जन एका कन्सोलवर बसून रोबोट नियंत्रित करतो तर लॅप्रोस्कोपीक सर्जरीमध्ये सर्जन हॅन्ड्स-ऑन नियंत्रणाने सर्जरी करतात. रोबोटिक सर्जरीमध्ये अधिक सटीकता, सूक्ष्मता आणि थ्रीडी व्ह्यू असून लॅप्रोस्कोपिक सर्जरीमध्ये सटीकता कमी असूनही सूक्ष्म कटिंग करता येते. या दोनही सर्जरीमध्ये रुग्णास दुखापत कमी होते तसेच रुग्णाची रिकव्हरी देखील लवकर होते. लॅप्रोस्कोपी ही साधारण सर्जरी पद्धत असून रोबोटिक सर्जरी ही अत्याधुनिक व प्रगत सर्जरी आहे. लॅप्रोस्कोपिक सर्जरी रोबोटिक सर्जरी च्या तुलनेने कमी खर्चाची असते तर रोबोटिक सर्जरी ही महाग असते. 

लॅप्रोस्कोपिक आणि रोबोटिक पद्धती दोन्ही ही अत्याधुनिक आणि प्रभावी पद्धती आहेत. जर तुम्ही कमी कट्स आणि जलद रिकव्हरीसाठी विचार करत असाल, तर दोन्ही पद्धती उत्तम असू शकतात. तथापि, रोबोटिक पद्धती जास्त सटीक आणि जटिल सर्जरीसाठी योग्य असू शकते. 

रोबोटिक सर्जरी म्हणजे काय?

हे एक अत्याधुनिक तंत्रज्ञान आहे, जे आजकाल जगभरातील रुग्णालयांमध्ये वापरले जाते. या तंत्रज्ञानामुळे सर्जरीला एक नवी ओळख लाभली आहे. पारंपारिक शस्त्रक्रिया पद्धतींमध्ये जे धोके होते त्यावर प्रभुत्व मिळवण्याची रोबोटिक पद्धतीने प्रगती केली आहे. या सर्जरीमध्ये रोबोटिक प्रणालीचा वापर केला जातो. या सर्जरीमध्ये सर्जन एका कंसोलवर बसून रोबोटला कमांड देत असतो. यावेळी हा रोबोट इतक्या सावधानतेने हालचाली करतो म्हणून ही सर्जरी अचूक आणि सुरक्षितरित्या पार पडते. रोबोटिक प्रणालीमध्ये उच्च रिझोल्यूशन, 3D व्ह्यू, सूक्ष्म नियंत्रण आणि सर्जनच्या हाताच्या हलचालींना अधिक सटीकतेने हस्तांतरण करण्याची क्षमता असते.

लॅप्रोस्कोपिक सर्जरी म्हणजे काय?

ही एक कमी आक्रमक सर्जरी पद्धत आहे, ज्यामध्ये एक लहान छिद्र करून सर्जरी केली जाते. लॅप्रोस्कोप हा एक छोटा, लवचिक ट्यूब असतो जो व्हिडिओ कॅमेरा आणि लाइटसह जोडलेला असतो. हा कॅमेरा सर्जनला शरीराच्या आतल्या भागांची प्रतिमा दाखवतो, त्यामुळे सर्जन छोट्या छिद्रातूनच सर्जरी करतो.

रोबोटिक सर्जरी आणि लॅप्रोस्कोपिक सर्जरी यात काय फरक आहे?

रोबोटिक पद्धतीमध्ये सर्जन एका कन्सोलवर बसून रोबोट नियंत्रित करतो तर लॅप्रोस्कोपीक पद्धतमध्ये सर्जन हॅन्ड्स-ऑन नियंत्रणाने सर्जरी करतात. रोबोटिक पद्धतीमध्ये अधिक सटीकता, सूक्ष्मता आणि थ्रीडी व्ह्यू असून लॅप्रोस्कोपिक पद्धतमध्ये सटीकता कमी असूनही सूक्ष्म कटिंग करता येते. या दोनही पद्धतीमध्ये रुग्णास दुखापत कमी होते तसेच रुग्णाची रिकव्हरी देखील लवकर होते. लॅप्रोस्कोपी ही साधारण सर्जरी पद्धत असून रोबोटिक सर्जरी ही अत्याधुनिक व प्रगत सर्जरी आहे. लॅप्रोस्कोपिक पद्धती, रोबोटिक पद्धतीच्या तुलनेने कमी खर्चाची असते तर रोबोटिक पद्धत ही महाग असते. 

Leave a Comment