आपल्या दैनंदिन जीवनात तणाव वाढण्याची अनेक कारणं असू शकतात. दररोज विशिष्ट परिस्थिती तसेच अनेक व्यक्तींचा सामना आपल्याला करावा लागतो आणि त्या अनुभवांवर तणाव अवलंबून असतात. काही कारणे शारीरिक, मानसिक, सामाजिक असू शकतात. यावेळी तणाव कमी करण्याचे उपाय माहित असणे अतिशय गरजेचे आहे. सर्वप्रथम तणाव निर्माण होण्याची कारणं पाहूया.
तणाव निर्माण होण्याची काही कारणं:
१) कामाचा दबाव:
उदरनिर्वाहासाठी प्रत्येकाला काम करणं भाग आहे, परंतु कधी कधी काम असह्य झाल्याने किंवा कामाचा प्रचंड दबाव आल्याने तणाव निर्माण होऊ शकतो. या तणावामुळे आपल्या तब्येतीवर परिणाम होऊ शकतो.

आणखी वाचा- डिप्रेशन उपचार न केल्यास आत्मविश्वास गमवाल! १० उपचार पद्धती!
२) आर्थिक समस्या:
आर्थिक समस्या ही अनेकांना आहे आणि याचा ताण देखील अनेक लोकांना आहे, आजच्या युगात महागाई अगदी गगनाला भिडली आहे आणि त्यात जर आर्थिकदृष्ट्या लोक कमकुवत असतील तर त्यांना या गोष्टीचा मोठ्या प्रमाणावर ताण येतो.
३) नात्यांमधील तणाव:
नात्यांमध्ये समज-गैरसमजातून अनेक वादविवाद होण्याची शक्यता असते. मित्र, स्नेही, नातेवाईक, कुटुंब इत्यादी नात्यांमध्ये काही घटना घडून त्याचे तणावात रूपांतर होण्याची शक्यता वर्तवता येते.
४) स्वास्थ्य समस्या:
लहानात लहान ते मोठ्यात मोठ्या स्वास्थ्याबद्दलच्या समस्यांना आज अनेक जणांना सामोरे जावे लागत आहे. आपल्या ऐकिवात ते नेहमीच येत असते. परंतु स्वास्थ्यामध्ये आलेला बिघाड देखील व्यक्तीचा ताण तणाव वाढवण्यास कारणीभूत ठरू शकतो. गंभीर आजार, शारीरिक पीडा, किंवा दीर्घकालीन आजार असलेले व्यक्ती मानसिक तणावाचा सामना करत असतात. यामुळे शरीरावर आणि मनावर ताण पडतो.
५) सामाजिक दबाव:
आपण समाजात राहत असल्यामुळे कोणताही निर्णय घेताना आधी समाजाचा विचार करावा लागतो. समाजातील आणि इतर लोकांच्या अपेक्षांचे वजनही तणाव वाढवू शकते. समाजाच्या आदर्शांचे पालन करणे, इतरांच्या तुलनेत आपले जीवन किंवा कामकाज योग्य असणे ही काळाची गरज आहे, अशी भावना व्यक्तीला तणावात टाकू शकते.
६) भावनिक आणि मानसिक ताण:
दैनंदिन जीवनात आपण अनेक समस्यांना सामोरे जातो. त्यामध्ये अनेक घटना अशा असतात ज्यामुळे आपण भावनिक किंवा मानसिक रित्या दुखावले जाण्याची शक्यता असते. अशा घटनांमुळेही तणाव निर्माण होऊ शकतो. ब्रेकअप होणे, जवळची व्यक्ती दूर जाणे किंवा कुटुंबातील अनेक समस्या यामुळे भावनिक खच्चीकरण होऊन ताण तणाव निर्माण होण्याची शक्यता असते.
७) जीवनातील बदल:
जीवनात होणारे मोठे बदल जसे की स्थानिक बदल, नोकरीत बदल, लग्न, किंवा पालकत्व देखील तणाव वाढवू शकतात. हे बदल अनेक वेळा अनपेक्षित आणि कठीण असतात, ज्यामुळे मानसिक तणाव वाढतो.

८) मद्यपान व धूम्रपान:
जास्त प्रमाणात कॅफीन, मद्यपान, किंवा तंबाखूचे सेवन देखील तणावाचे कारण ठरू शकते. हे पदार्थ शरीरावर आणि मनावरचा तणाव वाढवतात.
९) वेळेचे नियोजन नसणे:
जीवनातील कार्ये वेळेवर पूर्ण न करणे, अव्यवस्थित राहणे आणि वेळेचे नियोजन न करणे यामुळे तणाव वाढतो. यामुळे कामांचा दबाव आणि मानसिक थकवा येतो.
तणाव कमी करण्याचे उपाय:
तणाव कमी करण्याचे उपाय तुम्हाला जरूर माहित असायला हवे, कारण रोजच्या दिनचर्येत आपल्याला तणाव असल्यास कोणतेही काम करण्यात आपले चित्त लागत नाही. मग तुम्ही विद्यार्थी असाल तर अभ्यासात लक्ष न लागणे, शिक्षक किंवा नोकरदार असाल तर आपल्या कामाकडे दुर्लक्ष होणे, कलावंत असाल तर रियाजाकडे दुर्लक्ष होणे या सर्व गोष्टी तणाव निर्माण झाल्यास आपल्याकडून आपसूक होत असतात. परंतु यामुळे आपलं भविष्य धोक्यात येऊ शकतं आणि म्हणूनच तणाव आल्यास तो लवकरात लवकर दूर सारण्याचा प्रयत्न करावा. यामुळे तणाव कमी करण्याचे उपाय खाली दिले आहेत. हे उपाय आपण जीवनात समाविष्ट केल्यास एक तणावरहित आयुष्य जगण्यास तुम्हाला नक्कीच मदत होईल.
१) प्राणायाम:
आपल्या रोजच्या दिनचर्येत प्राणायाम याचा समावेश केल्यास आपले मन शांत होण्यास तसेच लक्ष केंद्रित करण्याची शक्ती वाढल्यास आपले मन विचलित होणे कमी होते आणि यामुळे तणाव कमी करण्यास मदत होते. प्राणायाम केल्याने मन शांत राहते आणि सकारात्मक ऊर्जा शरीरात निर्माण होऊन नकारात्मक विचार तसेच तणाव दूर राहण्यास मदत होते.

२) नियमित व्यायाम:
व्यायाम तणाव कमी करण्यासाठी एक उत्तम उपाय आहे. नियमित चालणे, धावणे, योग किंवा ध्यान हे आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. व्यायाम केल्याने मेंदूत एंडोर्फिन नावाच्या रसायनाचे प्रमाण वाढते, ज्यामुळे आपल्याला आनंद आणि आराम मिळतो.
३) ध्यान:
ध्यान केल्याने मनावरील तसेच शरीरावरील ताण कमी होण्यास मदत होते. ध्यान ही पद्धत अनेक वर्षांपासून मनःशांतीसाठी रूढ आहे. ध्यानामुळे मानसिक शांती मिळते आणि तणावाचा प्रभाव कमी होतो. रोज थोडा वेळ काढून डोळे मिटून शांत बसून ध्यान केल्याने आपल्याला ताजेतवाने वाटते आणि तणाव कमी होतो.
४) पुरेशी झोप:
पुरेशी आणि शांत झोप तणाव कमी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. रोजच्या जीवनात सात ते आठ तास झोपेची आवश्यकता असते, नाहीतर झोपेच्या अभावामुळे मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर तणावाचा प्रभाव वाढतो. त्यामुळे पूर्ण झोप घेणे गरजेचे आहे.
५) योग्य आहार:
तणाव कमी करण्यासाठी पौष्टिक आहार महत्त्वाचा आहे. फळं, भाज्या, ड्रायफ्रूट्स आणि प्रोटीन युक्त पदार्थ आहारात समाविष्ट करणे आवश्यक आहे. चांगला आहार शरीराला चालना देतो आणि तणाव कमी करतो.
६) हसणे:
हसणे हा तणाव कमी करण्याचा एक सोपा आणि आनंददायी उपाय आहे. हसल्यामुळे शरीरातील ताण कमी होतो आणि मानसिक शांती मिळते. तणाव असूनही हसत राहिल्यास कितीही संकटं आली तरी त्यातून मार्ग काढण्यास आपण समर्थ असतो.
७) वेळापत्रक:
दैनंदिन जीवनात वेळापत्रकाचे फार महत्व आहे. आपण आपले काम, ध्येय आणि इतर महत्वाच्या गोष्टी वेळेत पूर्ण करण्यासाठी नियोजन करणे अत्यावश्यक आहे. यामुळे तणाव कमी करण्यास मदत होईल.

८) कुटुंबासोबत वेळ घालवणे:
तणाव असल्यास आपण कुटुंबासोबत तसेच मित्र परिवारासोबत वेळ घालवणे हा तणाव कमी करण्याचे उपाय यामध्ये अगदी उत्तम उपाय आहे. त्यांच्याशी संवाद साधल्यास तणावाचे कारण समजून त्यावर मार्ग काढणे सोपे होण्याची शक्यता असते. तणाव मुक्त होण्यासाठी मार्गदर्शन मिळू शकते.
तणाव आल्याने आपल्याला कोणतीही वाट दिसत नाही. आपण आपल्या तणावात आणि दुःखात अडकून पडतो, त्यामुळे तणाव कमी करण्याचे उपाय अवलंबून आपण तणाव कमी करण्याचा प्रयत्न करावा आणि नेहमी आनंदी राहण्याचा प्रयत्न करावा. यामुळे आपले आयुष्य अगदी तणावरहित आणि सुखकर होते यात कोणतीही शंका नाही.
आणखी वाचा- ६ आनंदी राहण्याचे मार्ग देतील तुमच्या आयुष्याला कलाटणी!
मानसिक तणाव का निर्माण होतो?
आपल्या दैनंदिन जीवनात तणाव वाढण्याची अनेक कारणं असू शकतात. दररोज विशिष्ट परिस्थिती तसेच अनेक व्यक्तींचा सामना आपल्याला करावा लागतो आणि त्या अनुभवांवर तणाव अवलंबून असतात. काही कारणे शारीरिक, मानसिक, सामाजिक असू शकतात. यावेळी तणाव कमी करण्याचे उपाय माहित असणे अतिशय गरजेचे आहे.
टेन्शन कमी होण्यासाठी काय करावे?
आपल्या रोजच्या दिनचर्येत प्राणायाम याचा समावेश केल्यास आपले मन शांत होण्यास तसेच लक्ष केंद्रित करण्याची शक्ती वाढल्यास आपले मन विचलित होणे कमी होते आणि यामुळे तणाव कमी करण्यास मदत होते. प्राणायाम केल्याने मन शांत राहते आणि सकारात्मक ऊर्जा शरीरात निर्माण होऊन नकारात्मक विचार तसेच तणाव दूर राहण्यास मदत होते.
ताण वाढल्याने काय होते?
रोजच्या दिनचर्येत आपल्याला तणाव असल्यास कोणतेही काम करण्यात आपले चित्त लागत नाही. मग तुम्ही विद्यार्थी असाल तर अभ्यासात लक्ष न लागणे, शिक्षक किंवा नोकरदार असाल तर आपल्या कामाकडे दुर्लक्ष होणे, कलावंत असाल तर रियाजाकडे दुर्लक्ष होणे या सर्व गोष्टी तणाव निर्माण झाल्यास आपल्याकडून आपसूक होत असतात. परंतु यामुळे आपलं भविष्य धोक्यात येऊ शकतं आणि म्हणूनच तणाव आल्यास तो लवकरात लवकर दूर सारण्याचा प्रयत्न करावा. यासाठी
तणाव कमी करण्याचे उपाय तुम्हाला जरूर माहित असायला हवे.