तंबाखू सेवनात आपला भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे, ही काही अभिमानाची गोष्ट नव्हे! तंबाखू आणि मद्य हे आरोग्यासाठी अत्यंत घातक पदार्थ आहेत. आपली तरुण पिढी या पदार्थांच्या अधीन जाऊन अगदी मश्गुल झालेली दिसत आहे. अशावेळी तंबाखू व मद्य सेवनाविरोधी जनजागृती करणं गरजेचं झालं आहे आणि त्यासाठीच हा लेख सर्वांपर्यंत पोहोचवणं अत्यावश्यक आहे. तंबाखू आणि मद्य यांचे अधिक सेवन आरोग्याच्या दृष्टीने हानिकारक असून, यामुळे अनेक शारीरिक, मानसिक आणि सामाजिक समस्यांचा सामना करावा लागतो. अनेक व्यक्ती या व्यसनांच्या अधीन जाऊन अनेक संकटांना सामोरे जात आहेत. म्हणूनच, याविरोधी जनजागृती अत्यंत महत्त्वाची आहे.
तंबाखू व मद्य सेवनाविरोधी जनजागृती:
तंबाखू:
जगभरात तंबाखू सेवन करण्यात भारत दुसरा क्रमांक पटकावत आहे आणि ही अत्यंत चिंतेची बाब आहे. भारतात २६ करोडहून जास्त तरुण तंबाखूचे सेवन करत असल्याची माहिती इंटरनेटद्वारे मिळत आहे. तंबाखूमध्ये ४००० रासायनिक रसायने आढळतात जी आरोग्यासाठी अत्यंत घातक ठरतात. त्यात सर्वात हानिकारक म्हणजे निकोटीन. निकोटीन हे रसायन शरीराला तंबाखूचे आणखी सेवन करण्यास भाग पाडतं, त्याचे सेवन पुन्हा पुन्हा करण्यास निकोटीन शरीराला उत्तेजित करत असतं आणि त्यामुळे शरीराला त्याची सवय लागून व्यक्ती त्या पदार्थाच्या अधीन जाऊ लागतो. निकोटीन मानवाच्या छोट्या मेंदूवर परिणामकारक ठरतो. जर त्या व्यक्तीला वेळच्या वेळी तंबाखू मिळाली नाही तर त्या व्यक्तीचा संताप होऊ लागतो. मानसिक ताण, बेचैनी, चिडचिडेपणा सुरु होतो. आणि म्हणूनच त्याच्यासमोर शारीरिक, मानसिक, कौटुंबिक, सामाजिक समस्या उभ्या राहतात आणि जगणं कठीण होण्याची शक्यता असते.

तंबाखूच्या सेवनाचे दुष्परिणाम:
१) कर्करोग:
तंबाखूच्या सेवनामुळे सर्वात मोठा धोका म्हणजे कर्करोग होण्याची शक्यता. तोंडाचा कर्करोग, ओठांचा, जबड्याचा कर्करोग तसेच फुप्फुसाचा, घश्याचा, पोटाचा, किडनीचा, मूत्राशयाचा कर्करोग होण्याची शक्यता वर्तवली जाते. भारतात तंबाखूच्या सेवनामुळे कर्करोग झालेल्या रुग्णांचे प्रमाण अधिक आहे. फुप्फुसाचा कॅन्सर आणि इतर कॅन्सर होण्याचे ९० टक्के कारण हे धूम्रपान आहे.
२) छातीत दुखणे:
तंबाखूच्या सेवनामुळे अनेक विषारी तसेच धोकादायक घटक शरीरात जात असतात त्यामुळे छातीत दुखण्यास सुरुवात होते.
३) हृदयविकाराचा झटका:
धूम्रपान केल्याने तसेच तंबाखू खाल्ल्याने त्याची शरीराला सवय होते आणि सतत नको ते घटक आपल्या शरीरात जात असतात आणि रक्ताद्वारे ते संपूर्ण शरीरात पसरतात. अशावेळी हृदयाच्या कार्यात अडथळा येऊन हृदयविकाराचा झटक्या येण्याची संभावना असते. यामुळे रक्तवाहिन्यांचा विकार देखील संभवतो.
४) टीबी:
तंबाखूच्या सेवनामुळे अनेक रुग्णांना टीबी म्हणजेच ट्युबरक्युलॉसिस या रोगाचा सामना करावा लागत आहे. जितके जास्त धूम्रपान तितका जास्त टीबी माणसाला होतो.
तसेच तंबाखूचे सेवन करणाऱ्या व्यक्तीला मधुमेह होण्याची शक्यता वाढते, रक्तातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी होते. यावेळी हृदयरोग, पक्षाघात होण्याची दाट शक्यता निर्माण होते.
मद्यपान करण्याचे दुष्परिणाम:
मद्यपानाच्या अधिक सेवनाने यकृत, हृदय, रक्तदाब आणि पचनसंस्था यांवर गंभीर परिणाम होतात. मद्यपानाने मानसिक विकार, न्यूरोलॉजिकल समस्या आणि इतर शारीरिक विकार देखील उद्भवू शकतात. तसेच, मद्यपानामुळे मानसिक स्थिरता कमी होऊन अपघात, हिंसा आणि कुटुंबीय समस्यांचा सामना करावा लागतो.

तंबाखू व मद्य सेवनाविरोधी जनजागृती चे महत्व:
तंबाखू व मद्य सेवनाविरोधी जनजागृती योजनेसाठी खालील बाबी महत्त्वाच्या आहेत:
शाळा आणि महाविद्यालयांमध्ये जनजागृती:
विद्यार्थ्यांना तंबाखू आणि मद्यपानाचे दुष्परिणाम शाळा आणि महाविद्यालयांमध्ये शिकवले जातात. त्यासाठी कार्यशाळा, निबंध स्पर्धा आणि चित्रकला स्पर्धांचा आयोजन करणे आवश्यक आहे. म्हणजे लहान वयातच तंबाखू आणि मद्यपान याचे दुष्परिणाम मुलांच्या मनावर बिंबवले जातील.
समाज माध्यमांचा वापर:
सोशल मीडिया, रेडिओ, टेलिव्हिजन, वृत्तपत्र आणि अन्य सार्वजनिक माध्यमांचा वापर करून तंबाखू आणि मद्याचे दुष्परिणाम लोकांपर्यंत पोहोचवता येतात. प्रभावी जाहिराती आणि प्रेरणादायक संदेश लोकांना जागरूक करू शकतात.
मुलाखती आणि प्रोत्साहन:
समाजातील आदर्श व्यक्तींच्या मुलाखती घेऊन, त्यांचे अनुभव सांगून दुसऱ्यांना प्रेरणा देणे महत्त्वाचे आहे. यामुळे लोक अधिक जागरूक होतात आणि सकारात्मक बदल घडवू शकतात.
संकल्प घेणे:
तंबाखू आणि मद्याच्या सेवनासंबंधी सार्वजनिक ठिकाणी संकल्प घेणे आणि यासंबंधी विविध क्षेत्रातील व्यक्तींनी एकत्र येऊन एक मजबूत विरोध करण्याची आवश्यकता आहे.
तंबाखू आणि मद्यपानाचे अति सेवन हे समाजातील विकृती वाढवण्याचे एक मुख्य कारण ठरत आहे. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी शासकीय, सामाजिक आणि व्यक्तिगत पातळीवर तंबाखू व मद्य सेवनाविरोधी जनजागृती महत्त्वाची आहे. प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे आणि तंबाखू व मद्यपानाचे सेवन टाळले पाहिजे. यासाठी एकत्र येऊन या व्यसनांचे विरोधात आवाज उठवणे ही काळाची ही काळाची गरज आहे.
तंबाखूचे दुष्परिणाम काय आहेत?
तंबाखूच्या सेवनामुळे सर्वात मोठा धोका म्हणजे कर्करोग होण्याची शक्यता. तोंडाचा कर्करोग, ओठांचा, जबड्याचा कर्करोग तसेच फुप्फुसाचा, घश्याचा, पोटाचा, किडनीचा, मूत्राशयाचा कर्करोग होण्याची शक्यता वर्तवली जाते. भारतात तंबाखूच्या सेवनामुळे कर्करोग झालेल्या रुग्णांचे प्रमाण अधिक आहे. फुप्फुसाचा कॅन्सर आणि इतर कॅन्सर होण्याचे ९० टक्के कारण हे धूम्रपान आहे.
मद्यपान केल्याने काय परिणाम होतो?
मद्यपानाच्या अधिक सेवनाने यकृत, हृदय, रक्तदाब आणि पचनसंस्था यांवर गंभीर परिणाम होतात. मद्यपानाने मानसिक विकार, न्यूरोलॉजिकल समस्या आणि इतर शारीरिक विकार देखील उद्भवू शकतात. तसेच, मद्यपानामुळे मानसिक स्थिरता कमी होऊन अपघात, हिंसा आणि कुटुंबीय समस्यांचा सामना करावा लागतो.
तंबाखू व मद्यपान विरोधी जनजागृती कशी करावी?
तंबाखू आणि मद्यपानाचे अति सेवन हे समाजातील विकृती वाढवण्याचे एक मुख्य कारण ठरत आहे. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी शासकीय, सामाजिक आणि व्यक्तिगत पातळीवर
तंबाखू व मद्य सेवनाविरोधी जनजागृती महत्त्वाची आहे. प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे आणि तंबाखू व मद्यपानाचे सेवन टाळले पाहिजे. यासाठी एकत्र येऊन तंबाखू व मद्य सेवनाविरोधी जनजागृती ही काळाची ही काळाची गरज आहे.