प्रसूतीनंतरची काळजी आई आणि बाळासाठी आवश्यक!

प्रसूती म्हणजे स्त्रीचा नवीन जन्म असतो असं म्हणतात. एका जीवाला नऊ महिने पोटात वाढवून त्याला आपल्या शरीरातून वेगळं करणं यात अनेक वेदना असतात आणि म्हणूनच प्रसूती म्हणजे स्त्रीचा नवीन जन्म म्हटला जातो. परंतु या प्रक्रियेत कोणत्याही प्रकारची समस्या उद्भवू नये म्हणून प्रसूतीनंतरची काळजी घेणे अत्यावश्यक आहे. प्रसूती नॉर्मल किंवा सीझर कोणत्याही प्रकारे झाली तरी देखील स्त्रियांना त्यानंतर काळजी घेणं भाग आहे. प्रसूतीनंतर स्त्रियांचे शरीर नाजूक होते. गरोदरपणाच्या पहिल्या चाहुलीनंतर स्त्रियांमध्ये अनेक शारीरिक, मानसिक आणि भावनिक बदल घडत असतात. ज्या स्त्रिया पहिल्यांदाच आई होत आहे त्यांच्यासाठी हा लेख उपयुक्त ठरेल. 

आणखी वाचा- बाळाच्या वाढीसाठी योग्य आहार: १ वर्षापर्यंतचे डाएट!

प्रसूतीनंतरची काळजी कशी घ्यावी?

प्रसूतीनंतरची काळजी

१) पौष्टिक आहार:

प्रसूतीनंतर योग्य आहार घेणं खूप महत्त्वाचं आहे. बाळाच्या स्तनपानासाठी शरीराला अतिरिक्त ऊर्जा आणि पोषणाची आवश्यकता असते. महिलांनी प्रथिनं, व्हिटॅमिन आणि खनिजांचं भरपूर सेवन करावं. दूध उत्पादन वाढवण्यासाठी हायड्रेशनही महत्त्वाचं आहे, त्यामुळे भरपूर पाणी आणि द्रव पदार्थ पिणं आवश्यक आहे. अशा वेळी पालेभाज्या शिजवलेलं पाणी, मेथीचे लाडू, भाकरी इत्यादी पदार्थ भारतात प्रस्तुतीनंतर स्त्रीला आवर्जून दिले जातात. 

२) पुरेशी झोप:

३) मानसिक स्वास्थ्य:

गर्भधारणेत तसेच प्रसूतीनंतर स्त्रियांमध्ये शरीरासोबतच अनेक मानसिक बदल देखील होतात. ताणताणाव वाढू शकतो. अशा वेळी स्त्रियांना ‘पोस्टपार्टम डिप्रेशन’ ही समस्या उद्भवू शकते. त्यामुळे स्त्रियांच्या मानसिक आरोग्याची काळजी घेणं अत्यावश्यक आहे. डिप्रेशन जास्त प्रमाणात होत असल्यास तज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं आहे. प्रसूतीनंतरची काळजी यामध्ये स्त्रीचे मानसिक स्वास्थ्य जपणे ही कौटुंबिक जबाबदारी आहे. 

४) स्तनपान:

नवजात शिशूंसाठी आईचे दूध म्हणजेच स्तनपान अत्यंत पोषक आणि महत्वाचे ठरते. स्तनपान करताना स्त्रियांनी विशिष्ट काळजी घेणे आवश्यक आहे. स्तनपान करताना स्त्रियांनी आरामदायी स्थितीत बसणे गरजेचे आहे. स्तनपान करताना अडथळा आल्यास त्याचा परिणाम बाळाच्या पोषणावर पडू शकतो. प्रसूतीनंतरची काळजी यामध्ये बाळाच्या आरोग्यासाठी योग्य स्तनपान हे अत्यंत आवश्यक आहे. 

५) स्वच्छता:

प्रसूतीनंतर बाळ आणि आई दोघांची देखील परिस्थिती नाजूक असते आणि त्यामुळे आजूबाजूचे वातावरण अगदी स्वच्छ असावे याची काळजी घ्यावी. या काळात हायजिन पाळणे गरजेचे आहे. विशेषतः लघवी आणि इतर शारीरिक कार्यांमध्ये हायजिन पाळणे गरजेचे आहे. यामुळे आई आणि बाळ कोणत्याही संसर्गापासून दूर राहण्यास मदत होते. 

६) नियमित तपासणी:

प्रसूतीनंतर आई आणि बाळ दोघांचीही तज्ज्ञांद्वारे नियमित तपासणी करणे अत्यावश्यक आहे. प्रसूतीनंतर काही समस्या उद्भवू शकतात ज्या वेळेवर उपचार घेतल्याने सुटू शकतात. रक्तदाब, शुगर, किंवा इतर कोणत्याही अस्वस्थतेसाठी डॉक्टरांचा सल्ला महत्त्वाचा आहे.

प्रसूतीनंतरची काळजी

७) शारीरिक हालचाल:

गर्भावस्थेत आणि प्रसुतीदरम्यान शरीर संकुचन पावले असते, त्यात अनेक बदल झाले असतात, त्यामुळे शरीराची हालचाल झाल्याने लवकर रिकव्हरी होण्यास मदत होते. स्त्रियांनी प्रसूतीनंतर विशिष्ट व्यायाम, योग, प्राणायाम, हलका स्ट्रेचिंग व्यायाम इत्यादी शारीरिक हालचाली अत्यावश्यक आहे. 

८) शारीरिक काळजी:

प्रसूतीनंतर स्त्रीचे शरीर अत्यंत नाजूक झाले असते त्यामुळे प्रसूतीनंतरचे सुरुवातीचे दिवस स्त्रियांनी शरीराची अधिक काळजी घेणं अत्यावश्यक आहे. यावेळी नऊ महिने पोटाची स्थिती बदलली असल्यामुळे त्याला पूर्ववत करण्यासाठी काही दिवस पोट बांधून ठेवावं. तसेच शरीराची स्थिती नाजूक असल्याने कान देखील बांधून ठेवावेत, पायात नेहमी चप्पल ठेवावी. तसेच बाळाचे कान बांधून ठेवावेत. बाळाला बाहेरचे वातावरण लवकर मानवणार नसल्याने बाळाला काही दिवस एकाच खोलीत ठेवावे. 

८) कौटुंबिक सहकार्य:

स्त्रीची मानसिक आणि शारीरिक स्थिती नाजूक असल्याने कुटुंबाचे समर्थन आणि सहकार्य स्त्रियांसाठी खूप महत्त्वाचे आहे. बाळाची काळजी घेणं, घरकामामध्ये मदत करणं आणि मानसिक आधार देणं यामुळे स्त्रियांचा आत्मविश्वास आणि समजुतीमध्ये वाढ होते. 
अशाप्रकारे प्रसूतीनंतर स्त्रियांनी त्यांची व बाळाची दोघांची काळजी घ्यावी. यामुळे बाळ आणि आई दोघांचेही आरोग्य सुदृढ होते. 

प्रसूतीनंतरची काळजी घेणे आवश्यक का आहे?

प्रसूती म्हणजे स्त्रीचा नवीन जन्म असतो असं म्हणतात. एका जीवाला नऊ महिने पोटात वाढवून त्याला आपल्या शरीरातून वेगळं करणं यात अनेक वेदना असतात आणि म्हणूनच प्रसूती म्हणजे स्त्रीचा नवीन जन्म म्हटला जातो. परंतु या प्रक्रियेत कोणत्याही प्रकारची समस्या उद्भवू नये म्हणून प्रसूतीनंतरची काळजी घेणे अत्यावश्यक आहे. प्रसूती नॉर्मल किंवा सीझर कोणत्याही प्रकारे झाली तरी देखील स्त्रियांना त्यानंतर काळजी घेणं भाग आहे. प्रसूतीनंतर स्त्रियांचे शरीर नाजूक होते. गरोदरपणाच्या पहिल्या चाहुलीनंतर स्त्रियांमध्ये अनेक शारीरिक, मानसिक आणि भावनिक बदल घडत असतात. ज्या स्त्रिया पहिल्यांदाच आई होत आहे त्यांच्यासाठी हा लेख उपयुक्त ठरेल.  

प्रसूतीनंतरची काळजी आईने कशी घ्यावी?

प्रसूतीनंतर स्त्रीचे शरीर अत्यंत नाजूक झाले असते त्यामुळे प्रसूतीनंतरचे सुरुवातीचे दिवस स्त्रियांनी शरीराची अधिक काळजी घेणं अत्यावश्यक आहे. यावेळी नऊ महिने पोटाची स्थिती बदलली असल्यामुळे त्याला पूर्ववत करण्यासाठी काही दिवस पोट बांधून ठेवावं. तसेच शरीराची स्थिती नाजूक असल्याने कान देखील बांधून ठेवावेत, पायात नेहमी चप्पल ठेवावी. तसेच बाळाचे कान बांधून ठेवावेत. बाळाला बाहेरचे वातावरण लवकर मानवणार नसल्याने बाळाला काही दिवस एकाच खोलीत ठेवावे. 

प्रसूतीनंतर हायजिन ( स्वच्छता ) कसे पाळावे?

प्रसूतीनंतर बाळ आणि आई दोघांची देखील परिस्थिती नाजूक असते आणि त्यामुळे आजूबाजूचे वातावरण अगदी स्वच्छ असावे याची काळजी घ्यावी. या काळात हायजिन पाळणे गरजेचे आहे. विशेषतः लघवी आणि इतर शारीरिक कार्यांमध्ये हायजिन पाळणे गरजेचे आहे. यामुळे आई आणि बाळ कोणत्याही संसर्गापासून दूर राहण्यास मदत होते. 

Leave a Comment