दिवसभराच्या कामाच्या गडबडीत आपण स्वतःसाठी वेळ काढायलाच विसरतो. दिवसातून थोडा वेळ तरी स्वतःला द्यावा. एका जागी स्थिर बसावं, प्रार्थना करावी. प्रार्थना ही फक्त धार्मिक बाब नाही तर मानसिक, शारीरिक आणि भावनिक शांततेचे कारक आहे. प्रार्थनेचे आरोग्यावर होणारे सकारात्मक परिणाम हे आपल्याला निरोगी आणि आनंदी आयुष्य देण्यास मदत करतात.
मन आजारी असलं तर शरीर सुद्धा आजारी पडतं असं काहींचं म्हणणं असतं आणि ते तंतोतंत खरं आहे. आपलं मन जर तणावात असेल, दुःखी असेल, मन स्थिर नसेल तर शरीरही त्याच्या प्रभावाखाली येऊन आजारी पडू लागतं. डिप्रेशन, एन्झायटी इत्यादी समस्या या मनाच्या अस्थिरतेमुळे निर्माण होत असतात आणि त्याचा परिणाम शरीरावर होत असतो. मन प्रसन्न नसेल तर हळूहळू शरीर कमजोर पडू लागतं, आजारी पडतं. अशावेळी मनाला कोणत्या तरी सकारात्मक गोष्टीत अडकवणे अत्यंत महत्वाचे आहे. यावर प्रार्थना हे एक उत्तम औषध आहे. प्रार्थनेचे आरोग्यावर होणारे सकारात्मक परिणाम अधिक प्रभावी आहेत. यामुळे आपण आपल्या शरीरातील तसेच मनातील नकारात्मकता दूर सारून एक सकारात्मक आयुष्य जगण्यास सुरुवात करू शकतो.

प्रार्थनेचे आरोग्यावर होणारे सकारात्मक परिणाम:
१) सकारात्मक ऊर्जा:
प्रार्थनेत मानसिक, शारीरिक आणि भावनिक सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्याचे सामर्थ्य असते. मन जर अस्वस्थ असेल किंवा निराश असेल तर प्रकृतीला, देवाला किंवा सकारात्मक उर्जेला प्रार्थना करावी. यामुळे मन प्रसन्न होते तसेच शरीरात सकारात्मक ऊर्जा संचारते. शरीरात साकारात्मक ऊर्जेचा प्रवेश झाल्याने आपले आरोग्य देखील निरोगी राहण्यास मदत होते. प्रार्थनेचे आरोग्यावर होणारे सकारात्मक परिणाम हे देखील आहेत.
२) प्रसन्न वातावरण:
आपल्या सभोवतालच्या वातावरणाचा देखील आपल्या मनावर परिणाम होऊ शकतो. भोवतीचे वातावरण जर नकारात्मक असेल तर आपले मन देखील उदासीन होते. अशा वेळी डोळे मिटून शांततापूर्वक प्रार्थना करावी. यामुळे मन प्रसन्न होते आणि मन प्रसन्न झाले की सभोवतालचे वातावरण देखील प्रसन्न होते. या प्रसन्न वातावरणात वावरल्याने आपले शारीरिक आरोग्य सुधारते.
३) रोगप्रतिकारक शक्ती:
प्रार्थना ही एक ऊर्जा आहे जी आपल्या शरीरातील अनेक रोग नाहीसे करू शकते. तुम्ही पाहिलंच असेल की अनेकदा स्वास्थ्य बिघडल्यास लोक मंदिर, पंचकर्म वगैरे अशा शांत ठिकाणी जाऊन दररोज प्रार्थना करण्यास प्रारंभ करतात. कारण प्रार्थना हे रोगावरील औषध आहे. प्रार्थनेचे आरोग्यावर होणारे सकारात्मक परिणाम रोगांना आपल्या शरीरातून हद्दपार करण्यास समर्थ ठरतात. कॅन्सरचे अनेक रुग्ण प्रार्थनेने बरे झाल्याची उदाहरणं आहेतच आपल्या समोर जे प्रार्थनेचे सामर्थ्य व्यक्त करतात.
४) शारीरिक तणाव:
मनावर उदासीनतेचा पडदा असला की शरीर देखील अस्वस्थ होते आणि त्यामुळे शारीरिक ताण तणाव वाढतो. यामुळे डिप्रेशन, एन्झायटी, पॅनिक ऍटॅक, ब्रेन स्ट्रोक इत्यादी भयंकर समस्या उद्भवू शकतात. यासाठी शारीरिक ताण तणाव कमी करण्याची गरज भासते आणि शारीरिक ताण कमी करण्यासाठी मन स्थिर असणं गरजेचं आहे. यावेळी प्रार्थना एका उपचाराप्रमाणे काम करते. प्रार्थनेमुळे मन शांत व स्थिर होते आणि यामुळे ताण तणाव कमी होतो.
५) उच्च रक्तदाब:
आपली चिडचिड, अति विचार, टेन्शन, सतत व्यस्त असणे किंवा संताप होणं यामुळे उच्च रक्तदाबाची समस्या उद्भवते. परंतु उच्च रक्तदाब आपल्या आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक आहे. प्रार्थनेचे आरोग्यावर होणारे सकारात्मक परिणाम आपल्याला यातून बाहेर काढण्यास मदत करतात. प्रार्थनेत आपला राग आणि आपला ताण कमी करण्याचे सामर्थ्य आहे. प्रार्थनेमुळे उच्च रक्तदाबाची समस्या कमी होणे सहज सोपे आहे.
या जगात जितके धर्म आहेत तितक्या प्रार्थनेच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत. प्रार्थना आपला आत्मविश्वास जागृत ठेवणारी एक ऊर्जा आहे त्यामुळे प्रत्येकानेच आपापल्या मतानुसार आणि वेळेनुसार प्रार्थना करणे अत्यावश्यक आहे. प्रार्थनेचे आरोग्यावर होणारे सकारात्मक परिणाम तर आपण पहिलेच पण त्याचा अवलंब कसा करावा हे आपण पाहुयात…
सर्वप्रथम हे लक्षात घ्या की प्रार्थना ही काही देवासमोरच करण्याची क्रिया नाही. आपण प्रार्थना प्रकृतीला देखील करू शकतो. आपल्या संपूर्ण जीवनात प्रकृतीचा विशेष वाटा असतो त्यासाठी आपण प्रार्थनेद्वारे त्यांचे आभार मानू शकतो. सूर्य, चंद्र, धरती, अग्नी, वारा, वनस्पती हे सर्व निसर्गाचे भाग आहेत ज्यांचा आपल्या आयुष्यात अगदी मोलाचा वाटा आहे.
दिवसभरात जेवढा मोकळा वेळ मिळेल तेवढा प्रार्थनेसाठी काढावा. सकाळी उगवत्या सूर्याला नमस्कार करावा. त्याच्या तेजःपुंज स्वरूपातील काही अंश तेज आपल्यातही यावे अशी प्रार्थना करावी आणि दिवसाची सुरुवात अशा पद्धतीने अगदी प्रसन्नरीत्या करावी.
देवपूजा केल्याने देखील आपले मन प्रसन्न होते आणि संपूर्ण दिवस शरीरात सकारात्मक ऊर्जा कायम राहते. आपले पहिले गुरु आपले आई-वडील यांचा आशीर्वाद घेऊन त्यांना प्रार्थना करावी. आपल्या आयुष्यातील हितेच्छुकांना देखील आपण धन्यवाद म्हणून आपलं मन प्रसन्न करू शकतो. प्रार्थना आपल्यातला अहंकार नष्ट करते आणि त्यामुळे शरीरात सतत सकारात्मकता दरवळत राहते.
प्रार्थनेसाठी आपल्या वेद – पुराणांमध्ये अनेक श्लोक लिहून ठेवले आहेत. ते श्लोक पठण केल्यास बुद्धीचे तेज वाढते तसेच मन प्रसन्न राहते. योग साधना, प्राणायाम इत्यादी देखील प्रार्थनेचे स्रोत आहेत. प्रार्थनेचे आरोग्यावर होणारे सकारात्मक परिणाम हे आपल्या शारीरिक, मानसिक आणि भावनिक स्वास्थ्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरतात. त्यामुळे नियमित वेळ काढून प्रार्थनेला महत्व द्यावे.
प्रार्थनेचा परिणाम काय होतो ?
प्रार्थनेत मानसिक, शारीरिक आणि भावनिक सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्याचे सामर्थ्य असते. मन जर अस्वस्थ असेल किंवा निराश असेल तर प्रकृतीला, देवाला किंवा सकारात्मक उर्जेला प्रार्थना करावी. यामुळे मन प्रसन्न होते तसेच शरीरात सकारात्मक ऊर्जा संचारते. शरीरात साकारात्मक ऊर्जेचा प्रवेश झाल्याने आपले आरोग्य देखील निरोगी राहण्यास मदत होते. प्रार्थनेचे आरोग्यावर होणारे सकारात्मक परिणाम हे देखील आहेत
प्रार्थना का करावी ?
मनावर उदासीनतेचा पडदा असला की शरीर देखील अस्वस्थ होते आणि त्यामुळे शारीरिक ताण तणाव वाढतो. यामुळे डिप्रेशन, एन्झायटी, पॅनिक ऍटॅक, ब्रेन स्ट्रोक इत्यादी भयंकर समस्या उद्भवू शकतात. यासाठी शारीरिक ताण तणाव कमी करण्याची गरज भासते आणि शारीरिक ताण कमी करण्यासाठी मन स्थिर असणं गरजेचं आहे. यावेळी प्रार्थना एका उपचाराप्रमाणे काम करते. प्रार्थनेमुळे मन शांत व स्थिर होते आणि यामुळे ताण तणाव कमी होतो.
प्रार्थना कशी करावी ?
प्रार्थना ही काही देवासमोरच करण्याची क्रिया नाही. आपण प्रार्थना प्रकृतीला देखील करू शकतो. आपल्या संपूर्ण जीवनात प्रकृतीचा विशेष वाटा असतो त्यासाठी आपण प्रार्थनेद्वारे त्यांचे आभार मानू शकतो. सूर्य, चंद्र, धरती, अग्नी, वारा, वनस्पती हे सर्व निसर्गाचे भाग आहेत ज्यांचा आपल्या आयुष्यात अगदी मोलाचा वाटा आहे.