जनुकीय चाचण्या आणि AI च्या प्रगतीमुळे, व्यक्तीच्या DNA आणि आरोग्याच्या गरजेनुसार आहार योजना तयार केल्या जात आहेत, ज्यामुळे वैयक्तिक पोषणाला महत्त्व मिळत आहे. वैयक्तिकृत पोषण म्हणजेच पर्सनलाइझ्ड न्यूट्रिशन ही एक नवी संकल्पना आहे जी आपले आरोग्य निरोगी राहण्यासाठी आपल्या मदतीला येते. यामध्ये व्यक्तीच्या शरीराच्या गरजा, जीवनशैली, आरोग्याच्या स्थिती आणि आनुवंशिक माहितीच्या आधारावर आपला आहार कसा असावा याबाबत सल्ला दिदिला जातो. वैयक्तिकृत पोषण हे संशोधन वैज्ञानिक आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने अत्यंत प्रभावी असे संशोधन आहे. यामध्ये जीनोम आणि मेटाबोलिझम यांच्या आधारे आपल्या शरीराच्या चांगल्या कार्यासाठी आवश्यक असलेल्या पोषण घटकांचा अभ्यास केला जातो.
वैयक्तिकृत पोषण वापर:
१) जीनोम चाचणी:
जीनोम चाचणीद्वारे आपल्या जीनमध्ये असलेल्या विविध उत्पत्तीजन्य घटकांची माहिती मिळवता येते आणि त्यामुळे शरीराच्या पोषणाच्या गरजांची ओळख होऊ शकते. वैयक्तिकृत पोषणासाठी जीनोम चाचणी एक महत्त्वपूर्ण साधन आहे.

२) मेटाबॉलिक चाचणी:
आपल्या आहारत किती कॅलरीज आहेत तसेच किती अन्नाचे प्रकार शरीराला योग्य आहेत हे शोधण्यासाठी मेटाबॉलिक चाचणीचा वापर करण्यात येतो.
३) हेल्थ ट्रॅकर ऍप्स:
आपल्या स्मार्टफोन्समध्ये अनेक न्यूट्रीशन ट्रॅकर ऍप्स असतात जे आपल्या आहाराचा ट्रॅक ठेवतात. अशा ऍप्सद्वारे शरीराला किती प्रमाणात पोषण आवश्यक आहे याबद्दल जाणून घेणे सोपे जाते आणि त्यावरून आपला आहार पोषणयुक्त केला जातो.
वैयक्तिकृत पोषण याचे फायदे:
१) योग्य आहार समजून घेणे:
वैयक्तीकृत पोषणामुळे विविध व्यक्तींच्या शरीराची विशिष्ट गरज ओळखण्यात मदत होते. यामुळे त्या विशिष्ट व्यक्तीच्या आरोग्यानुसार त्यांचा आहार ठरवणे आणि त्यांच्या आरोग्याला आवश्यक असलेली पोषणतत्त्वे समजून घेण्यास मदत होऊ शकते. यामुळे त्यांचं आरोग्य पोषणयुक्त आणि सुरक्षित होण्यास मदत होते.
२) आरोग्य सुधारणा:
कोणत्याही चाचणीशिवाय आपल्याला आपल्या आरोग्याची माहिती मिळत नसते. आपले आरोग्य सुदृढ राहण्यासाठी कोणते पोषण महत्वाचे आहे हे समजून घेण्यासाठी चाचणी करणे आवश्यक आहे. तसेच काही व्यक्ती चाचणी न करता आपल्या दैनंदिन जीवनासाठी एखादे डाएट फॉलो करायला सुरुवात करतात. परंतु त्यात जर आपल्या आरोग्यासाठी आवश्यक पोषणतत्त्वे योग्य प्रमाणात नसतील तर त्या डाएटचा काही उपयोग होऊ शकत नाही. वैयक्तिकृत पोषण यासाठीच आपल्याला उपयोगी ठरते. याद्वारे आपल्याला योग्यरीत्या आरोग्य सुधारणा करण्यात यश प्राप्त होते यात शंका नाही.

३) शुद्ध आहार:
सामान्य पोषण मार्गदर्शक सूचना अनेक लोकांसाठी लागू होतात, परंतु वैयक्तिकृत पोषण तज्ज्ञांचे मार्गदर्शन हे फक्त एकाच व्यक्तीसाठी राखीव असते. त्या विशिष्ट व्यक्तीच्या आरोग्यानुसार वैयक्तिकृत पोषण ठरवण्यात येते. आपण आपल्या शरीराच्या गरजांनुसार शुद्ध आणि संतुलित आहार घेऊ शकतो आणि म्हणूनच आपला आहार शुद्ध आणि पौष्टिक असल्याची हमी आपल्याला देता येते.
४) हॉर्मोनल चेंजेस:
प्रत्येक व्यक्तीचा आनुवंशिक घटक आणि हॉर्मोनल संतुलन वेगवेगळे असतात. त्यामुळे आपल्या शरीरातील जैविक परिणामांचा विचार करून अधिक संतुलित आहार घेणे आपल्या हार्मोन संतुलन तसेच आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरू शकते.
५) वजन नियंत्रण:
वैयक्तिकृत पोषण यामुळे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत योग्य डाएट प्राप्त होते. या डाएटमुळे आपल्या शरीरात फॅट्स कमी प्रमाणात जाण्याची शक्यता असते तसेच आपलं वजन संतुलित करण्यासाठी पोषणतत्त्वे देखील आपल्या आहारात युक्त असतात. त्यामुळे आपले वजन नियंत्रित राहण्यास देखील मदत होते.

६) पचनक्षमता वाढते:
आपले डाएट आपल्या आरोग्याला अनुसरून असल्यास त्यात जे पोषक घटक असतात ते आपल्या पचनास अपायकारक ठरत नाही आणि अन्न अगदी योग्यरीत्या पचण्यास मदत होते. यावेळी डाएटमध्ये आहारासह त्याची वेळ देखील नमूद करण्यात येते, त्यामुळे पूर्वीचे अन्न पचन झाल्याशिवाय पुढील आहार आपण घेणे त्या डाएटनुसार बहुतेक टाळतो. यामुळे शरीरातील पचनक्षमता वाढण्यास मदत होते.
७) ऊर्जास्त्रोत:
वैयक्तिकृत पोषण म्हणजेच पर्सनलाइझ्ड न्यूट्रिशनद्वारे आपल्याला योग्य तो आहार सुचवण्यात येतो आणि त्यामुळे आपल्या शरीरात कोणत्याही प्रकारचे सुस्ती निर्माण करणारे जड पदार्थ न जाता आपण अशा पदार्थांचे सेवन करतो ज्याने शरीरात ऊर्जा निर्माण होते. यामुळे या पोषणाला आपण ऊर्जास्रोत म्हणू शकतो.
वैयक्तिकृत पोषण म्हणजे काय?
जनुकीय चाचण्या आणि AI च्या प्रगतीमुळे, व्यक्तीच्या DNA आणि आरोग्याच्या गरजेनुसार आहार योजना तयार केल्या जात आहेत, ज्यामुळे वैयक्तिक पोषणाला महत्त्व मिळत आहे. वैयक्तिकृत पोषण म्हणजेच पर्सनलाइझ्ड न्यूट्रिशन ही एक नवी संकल्पना आहे जी आपले आरोग्य निरोगी राहण्यासाठी आपल्या मदतीला येते. यामध्ये व्यक्तीच्या शरीराच्या गरजा, जीवनशैली, आरोग्याच्या स्थिती आणि आनुवंशिक माहितीच्या आधारावर आपला आहार कसा असावा याबाबत सल्ला दिदिला जातो. वैयक्तिकृत पोषण हे संशोधन वैज्ञानिक आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने अत्यंत प्रभावी असे संशोधन आहे. यामध्ये जीनोम आणि मेटाबोलिझम यांच्या आधारे आपल्या शरीराच्या चांगल्या कार्यासाठी आवश्यक असलेल्या पोषण घटकांचा अभ्यास केला जातो.
जेवण पचवण्यासाठी काय करावे?
आपले डाएट आपल्या आरोग्याला अनुसरून असल्यास त्यात जे पोषक घटक असतात ते आपल्या पचनास अपायकारक ठरत नाही आणि अन्न अगदी योग्यरीत्या पचण्यास मदत होते. यावेळी डाएटमध्ये आहारासह त्याची वेळ देखील नमूद करण्यात येते, त्यामुळे पूर्वीचे अन्न पचन झाल्याशिवाय पुढील आहार आपण घेणे त्या डाएटनुसार बहुतेक टाळतो. यामुळे शरीरातील पचनक्षमता वाढण्यास मदत होते.
वजन नियंत्रणात कसे येईल?