तुम्हाला नियमित पाळी येण्यात अडचण येत आहे का? तुमची पाळी ठराविक काळापेक्षा जास्त येत आहे का? म्हणजेच पाळी प्रदीर्घ काळ चालत आहे का? जेव्हा पाळी ३५ दिवसानंतर येत असेल किंवा २५ दिवसांच्या आत येत असेल तेव्हा त्याला अनियमित पाळी येणे असं म्हणतात. आणि याच अनियमिततेला PCOS म्हणतात. यासाठी PCOS उपाय करणे अत्यावश्यक आहे. परंतु यापूर्वी PCOS लक्षणे माहित असणं अत्यावश्यक आहे.

PCOS ची लक्षणे:
१) मासिक पाळीची अनियमितता:
PCOS असल्यास मासिक पाळी दर तीस दिवसांनी न येता त्यापूर्वी किंवा नंतर येते. प्रत्येक महिन्यात पाळी अनियमित असेल तर हे PCOS चे लक्षण असल्याचे समजावे.
२) वजन वाढणे:
अधिक वजन वाढणे किंवा पोटावरची चरबी वाढणे हे देखील PCOS चे लक्षण आहे.
३) केसांची वाढ:
स्त्रियांना पुरुषांप्रमाणे चेहऱ्यावर, पाठीवर, ओठांवर अतिरिक्त केस येण्यास सुरुवात होणे हे PCOS चे लक्षण आहे.
४) त्वचा निस्तेज होणे:
PCOS असल्यास त्वचेवरील तेज कमी होऊन त्वचा निस्तेज होण्याची शक्यता असते. तसेच त्वचेत देखील बदल होतो, म्हणजेच त्वचा अगदीच तेलकट किंवा रुक्ष होते.
५) चेहऱ्यावर पिंपल्स:
चेहऱ्यावर अनेक पिंपल्स येणे हे देखील PCOS चे लक्षण आहे. एरवी पिंपल्स येणे ही नॉर्मल गोष्ट आहे परंतु सतत पिंपल्स येणे ही मात्र काळजीची बाब आहे.
६) मानसिक ताण:
PCOS मुळे महिलांना मानसिक ताण, अधिक चिंता तसेच डिप्रेशन येण्याची शक्यता वर्तवता येते.
PCOSची कारणं:
१) हार्मोनल इम्बॅलन्स:
PCOS मध्ये, महिलांच्या शरीरातील अँड्रोजेन (पुरुष हार्मोन) यांची वाढ झाल्यामुळे PCOSची समस्या निर्माण होते. यावेळी PCOS उपाय अत्यंत आवश्यक आहे.
२) इन्सुलिन रेजिस्टन्स:
PCOS असलेल्या महिलांमध्ये इन्सुलिनची प्रतिक्रिया योग्यप्रकारे होत नाही, ज्यामुळे वजन वाढू शकते.
३) जेनेटिक घटक:
काही वेळा या विकाराचा प्रभाव कुटुंबातील इतर महिलांमध्येही दिसतो. कुटुंबातील इतिहासामुळे देखील हा रोग उद्भवतो.
PCOS हा रोग अत्यंत गंभीर आहे. याचा स्त्रियांवर शारीरिक, मानसिक, भावनिक रित्या परिणाम होत असतो. PCOS उपाय न केल्यास स्त्रियांना वंध्यत्व देखील येऊ शकते. यामुळे PCOS उपाय करणे अत्यंत आवश्यक आहे.
PCOS उपाय:
१) संतुलित आहार:
स्त्रियांनी आपला आहार संतुलित ठेवावा. बाहेरील जंक फूड अथवा तेलकट पदार्थ खाणे टाळावे. आपल्या नियमित आहारात ताजी फळं, हिरव्या पालेभाज्या, धान्य, प्रोटीनयुक्त पदार्थांचा समावेश करावा. आहारात साखरेचे प्रमाण कमी करावे. ताज्या व नैसर्गिक पदार्थांचा समावेश आपल्या आहारात करावा. हा PCOS उपाय अत्यंत गुणकारी ठरतो.
२) नियमित व्यायाम:
स्त्रियांचे शरीर कार्यरत राहिल्याने त्यांना PCOS ची समस्या उद्भवणे टळते, किंवा PCOS समस्या असल्यास तिचे परिणाम कमी करण्यास मदत होते. यासाठी नियमित व्यायाम, योग, प्राणायाम या गोष्टींचा रोजच्या दिनचर्येत समावेश करणे स्त्रियांसाठी अत्यंत आवश्यक आहे. तसेच चालणे, धावणे यासारखे व्यायाम देखील करणे आवश्यक आहे. यामुळे आपले शरीर कार्यरत राहते आणि शरीर स्वस्थ राहते. नियमित व्यायाम हा PCOS उपाय सर्व स्त्रियांनी आपल्या नियमित जीवनशैलीत नक्कीच समाविष्ट करावा.
३) तणाव कमी करणे:
स्त्रियांनी रोजच्या आयुष्यातील मानसिक ताणतणाव कमी केल्याने PCOS ची समस्या दूर सारणे सोईस्कर जाते. कोणत्याही प्रकारचा ताण घेणे हे स्त्रियांच्या आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक ठरू शकते,
४) आयुर्वेदिक उपचार:
रासायनिक औषधींऐवजी आयुर्वेदिक उपचार म्हणजेच त्रिफला, शतावरी, गोक्षुर हे योग्य PCOS उपाय ठरू शकतात. त्यामुळे तज्ज्ञांचा सल्ला घेऊन या आयुर्वेदिक उपचार सुरु करावे.
५) वजन नियंत्रित ठेवणे:
PCOS मुळे वजन वाढण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे नियमित व्यायाम करून वजन नियंत्रित ठेवणे अत्यावश्यक आहे. यामुळे PCOS ने होणारे दुष्परिणाम टळण्याची शक्यता आहे. हा PCOS उपाय अत्यंत गुणकारी आहे.
६) तज्ज्ञांचा सल्ला:
PCOS ची समस्या वाढण्याआधीच आपण डॉक्टरांचा सल्ला घेणं अत्यावश्यक आहे. हार्मोनल इम्बॅलन्समुळे जर आपल्याला PCOS चा त्रास होत असेल तर यावेळी तज्ज्ञांचा PCOS उपाय गरजेचा ठरतो.
स्त्रियांना रोजच्या कामातील व्यापामध्ये PCOS चा वाढीव त्रास सहन करणे अत्यंत अवघड असते त्यामुळे या सर्व PCOS उपाय आपण आपल्या जीवनशैलीत समाविष्ट करावे, निरोगी राहावे तसेच स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावे हे अत्यावश्यक आहे.
PCOS म्हणजे काय?
तुम्हाला नियमित पाळी येण्यात अडचण येत आहे का? तुमची पाळी ठराविक काळापेक्षा जास्त येत आहे का? म्हणजेच पाळी प्रदीर्घ काळ चालत आहे का? जेव्हा पाळी ३५ दिवसानंतर येत असेल किंवा २५ दिवसांच्या आत येत असेल तेव्हा त्याला अनियमित पाळी येणे असं म्हणतात. आणि याच अनियमिततेला PCOS म्हणतात. यासाठी PCOS उपाय करणे अत्यावश्यक आहे. परंतु यापूर्वी PCOS लक्षणे माहित असणं अत्यावश्यक आहे.
मासिक पाळी अनियमित येण्याचे काय कारण?
PCOS असल्यास मासिक पाळी दर तीस दिवसांनी न येता त्यापूर्वी किंवा नंतर येते. प्रत्येक महिन्यात पाळी अनियमित असेल तर हे PCOS चे लक्षण असल्याचे समजावे.
PCOS उपाय कोणते?