आयुर्वेद हे एक प्राचीन भारतीय औषधशास्त्र आहे, ज्यामध्ये शरीराच्या संतुलनाच्या दृष्टीने जीवनशैली, आहार आणि उपचारांवर भर दिला जातो. आयुर्वेदानुसार, जेवणाची वेळ आणि आहाराचा प्रकार आपल्या शरीरावर आणि मनावर महत्त्वपूर्ण परिणाम करतो. आयुर्वेदामध्ये प्रत्येक व्यक्तीच्या प्रकृतीला, दिनचर्येला, आणि ऋतूंना महत्त्व दिले जाते. या सर्व घटकांचा विचार करून आयुर्वेदात जेवणाच्या वेळा निश्चित केल्या आहेत. जेवणाच्या वेळा या दिवसातून चार असतात. आपण त्या विस्ताराने पाहूया.
जाणून घ्या- सेंद्रिय आहार व औषधे: आरोग्यदायी प्रकृतीस महत्वपूर्ण!
रोजच्या दिनचर्येतील जेवणाच्या वेळा:
१) सकाळी:
आयुर्वेदानुसार सर्वात महत्वाचे म्हणजे सकाळी लवकर उठणे! आयुर्वेदात ब्रह्ममुहूर्ताचे खूप महत्व सांगितले आहे जे साधारणतः पहाटे चार ते सहा वाजेच्या दरम्यान असते. या वेळी वातावरण शुद्ध वायूने प्रसन्न झाले असते. आणि शरीराची ऊर्जा सुद्धा सर्वांत जास्त असते. ब्राह्ममुहूर्तावर थोडा व्यायाम करून स्नान केल्यास आणि त्यानंतर थोडा नाश्ता केल्यास शरीर आणि आरोग्य सुदृढ राहण्यास मदत होते. या वेळी हलक्या पदार्थांपासून सुरुवात करावी, कारण सकाळी शरीराला ऊर्जा मिळवण्यासाठी खूप आवश्यक असते.
सकाळचा नाश्ता हलका फुलका म्हणजे मोड आलेले कडधान्य, ,ओट्स, डाळी, फळे, सूप आणि दूध या पदार्थांनी युक्त असावा. यामुळे शरीर ताजेतवाने होते आणि पचनक्रिया सुरळीत होते. यामुळे दिवसभराची ऊर्जा तयार होण्यास मदत होते. संपूर्ण दिवस आपल्या शरीरात ऊर्जा कायम असते आणि आपल्या दिनचर्येत ठरवलेल्या सर्व ठराविक गोष्टी वेगाने पूर्ण करण्यास सकाळी केलेला आहार आपल्याला मदत करते.

२) दुपारचे जेवण:
जेवणाच्या वेळा यामधील दुपारचे जेवण हे अत्यंत महत्वाचे आहे. आयुर्वेदानुसार, दुपारी जेवणाची सर्वोत्तम वेळ दुपारी १२ ते १ वाजताच्या दरम्यान असते. या वेळेस पचनशक्ती सर्वोच्च असते, कारण पचनाची अग्नी ही दुपारच्या वेळी सर्वात तीव्र असते. दुपारचे जेवण पौष्टिक, संतुलित आणि पचायला सोपे असावे. यामध्ये डाळ, भात, चपाती, भाज्या, कोशिंबीर वगैरे पदार्थ असावे ज्याने शरीराला सर्वोत्तम पोषण मिळण्यास मदत होते.
पचन अग्नी सर्वोच्च असताना शरीरास पोषण मिळवून त्याचे अधिक योग्य पचन होऊ शकते. यामुळे शरीरातील वायू, पित्त आणि कफ यांचे संतुलन राखले जाते.
३) संध्याकाळचा नाश्ता:
आयुर्वेदानुसार संध्याकाळी ६ ते ७ च्या दरम्यान थोडासा आहार घेणे योग्य ठरते. संध्याकाळी शरीराची पचनशक्ती कमी होऊ लागते. म्हणूनच, संध्याकाळचे जेवण हलके आणि पचायला सोपे असावे. यामध्ये सूप, सॅलड, आणि फळे यांचा समावेश करता येतो. कडक आणि तळलेले पदार्थ टाळणे अधिक चांगले ठरते. हे शरीराच्या पचन प्रक्रियेस मदत करते आणि रात्रीच्या आरामदायक झोपेसाठी तयार करते.
४) रात्रीचे जेवण:
आयुर्वेदानुसार दुपार आणि रात्रीचे जेवण हे आपल्या आरोग्यासाठी महत्वाचे ठरते. दुपारचे जेवण जड असले तरी चालेल, परंतु रात्रीचे जेवण हे हलके फुलके असावे. रात्री ८ ते ९ च्या सुमारास रात्रीचे जेवण करणे योग्य ठरते. रात्री आपली पचनशक्ती कमी असते आणि झोपल्यावर आपल्या शरीराला आरामाची गरज असते त्यामुळे अन्न पचनाच्या बाबतीत जड आणि तिखट पदार्थ टाळावेत. झोपेसमयी शरीराच्या शांततेला योग्य दिशा मिळवण्यासाठी पचनाची प्रक्रिया अधिक सहज होईल.

जेवणामधील अंतर:
आयुर्वेदानुसार जेवणाच्या दरम्यान तीन ते चार तासांचे अंतर ठेवणे आवश्यक आहे. एक वेळेवर जेवण झाल्यानंतर दुसरे जेवण घेण्यापूर्वी पचन प्रक्रिया पूर्ण होणे आवश्यक आहे. यामुळे अन्न पूर्णपणे पचले जाते आणि शरीराला नवीन अन्न पचवण्यासाठी जागा मिळते.
आपले आरोग्य सुदृढ राहण्यासाठी या चारही जेवणाच्या वेळा पाळणे अत्यंत महत्त्वाचे ठरते. या जेवणाच्या वेळा मधील एकही वेळ चुकवू नये आणि एकही जेवण चुकवू नये. सकाळचा नाश्ता जर आपण चुकवला तर दिवसभरातील ऊर्जा आपल्याला मिळत नाही. यामुळे आपले शरीर थकलेले आणि ऊर्जारहित भासते. दुपारचे जेवण टाळल्याने शरीरात गॅस निर्माण होण्याची शक्यता वर्तवता येते आणि त्यामुळे आरोग्यविषयक अनेक समस्या उद्भवतात.
संध्याकाळी नाश्ता केल्यास दिवसभरात वापरलेली ऊर्जा परत मिळवण्यात मदत होते. त्यामुळे संध्याकाळचा नाश्ता देखील महत्वाचा ठरतो आणि रात्रीचे हलके फुलके जेवण यामुळे आपला आहार पुर्णत्वाला जातो यामुळे रात्रीचे जेवण देखील टाळू नये. सर्वच जेवणाच्या वेळा अत्यंत महत्वाच्या आहेत.
योग्य जेवणाच्या वेळा कोणत्या?
आयुर्वेद हे एक प्राचीन भारतीय औषधशास्त्र आहे, ज्यामध्ये शरीराच्या संतुलनाच्या दृष्टीने जीवनशैली, आहार आणि उपचारांवर भर दिला जातो. आयुर्वेदानुसार, जेवणाची वेळ आणि आहाराचा प्रकार आपल्या शरीरावर आणि मनावर महत्त्वपूर्ण परिणाम करतो. आयुर्वेदामध्ये प्रत्येक व्यक्तीच्या प्रकृतीला, दिनचर्येला, आणि ऋतूंना महत्त्व दिले जाते. या सर्व घटकांचा विचार करून आयुर्वेदात जेवणाच्या वेळा निश्चित केल्या आहेत. जेवणाच्या वेळा या दिवसातून चार असतात.
संध्याकाळी किती वाजता जेवण करावे?
आयुर्वेदानुसार संध्याकाळी ६ ते ७ च्या दरम्यान थोडासा आहार घेणे योग्य ठरते. संध्याकाळी शरीराची पचनशक्ती कमी होऊ लागते. म्हणूनच, संध्याकाळचे जेवण हलके आणि पचायला सोपे असावे. यामध्ये सूप, सॅलड, आणि फळे यांचा समावेश करता येतो. कडक आणि तळलेले पदार्थ टाळणे अधिक चांगले ठरते. हे शरीराच्या पचन प्रक्रियेस मदत करते आणि रात्रीच्या आरामदायक झोपेसाठी तयार करते.
रात्रीचे जेवण कसे असावे?