लंग कॅन्सर म्हणजेच फुप्फुसाचा कर्करोग हे जगभरात मृत्यूचे प्रमुख कारण बनले आहे. यापासून सर्वांनी सावध राहणे अत्यंत आवश्यक आहे. खोकला, आवाजात खरखर आणि छातीत दुखत असल्यास ही लंग कॅन्सरची काही लक्षणं आहेत. ही लक्षणं जर आपल्यात दिसत असतील तर त्वरित आरोग्य तपासणी करावी. या लेखात आपण लंग कॅन्सर म्हणजे काय आणि त्याची लक्षणे तसेच उपचार याविषयी चर्चा करणार आहोत. हा लेख आपण पूर्ण वाचा तसेच आपल्या आप्तेष्टांना देखील माहिती मिळावी यासाठी नक्कीच शेयर करा.
लंग कॅन्सरची लक्षणे:
१) खोकला:
फुप्फुसाचा कर्करोग ओळखण्याचे मुख्य लक्षण म्हणजे खोकला. या रुग्णाला भयंकर खोकला येतो तसेच खोकला येताना त्यासोबत रक्त देखील येतं. खोकल्यामध्ये रक्त दिसणं फुप्फुसाचा कर्करोगच्या प्राथमिक लक्षणांपैकी एक आहे. कधी कधी, रक्त गडद रंगाचं असू शकतं.

२) श्वासाचा त्रास:
फुप्फुसाचा कर्करोग असल्यास श्वास घेण्यास त्रास होतो. श्वास घेताना छातीत दडपण येते, धाप लागते.
३) वजन कमी होणे:
लंग कॅन्सरचे एक सामान्य लक्षण म्हणजे अचानक वजन कमी होणे. कॅन्सरच्या पेशी शरीरातील पोषणावर परिणाम करतात, ज्यामुळे शरीरातील अन्न पचवण्याची क्षमता कमी होते. त्यामुळे वजन कमी होते. मग रुग्णाने कितीही खाल्लं तरी त्याचे वजन मोठ्या प्रमाणात कमी होत असते.
४) छाती दुखणे:
कॅन्सर फुफ्फुसांमधील पेशींमध्ये पसरल्यावर छातीत वेदना होऊ शकतात. या वेदना जखम झाल्याप्रमाणे अनुभव देतात. कधी कधी, लंग कॅन्सर छातीवरून इतर शारीरिक भागांकडे पसरतो आणि त्यामुळे पाठ दुखणे, खांदे दुखणे इत्यादी वेदना संभवतात. हे लक्षण कधी कधी लोक ओळखू शकत नाहीत, म्हणून डॉक्टरांचा सल्ला घ्यावा लागतो.
५) अशक्तपणा जाणवणे:
लंग कॅन्सरच्या रुग्णांना थोडीशी हालचाल केल्यास थकवा जाणवायला लागतो आणि धाप लागते. कॅन्सरमुळे शरीरातील ऊर्जा कमी होते आणि शरीराची कार्यक्षमता घटते, साधे काम पूर्ण करण्यास देखील या रुग्णांना त्रास होतो.
६) आवाजात बदल:
लंग कॅन्सर फुफ्फुस आणि श्वास नळीमध्ये वाढत जातो, ज्यामुळे आवाज खरखरीत होऊ शकतो. या रुग्णांच्या आवाजात एक प्रकारे जडपणा भासतो.
लंग कॅन्सरची प्रमुख कारणे:
१) धूम्रपान:
लोकांमध्ये फुप्फुसाचा कर्करोग होण्याचे मुख्य कारण हे धूम्रपान आहे. धूम्रपान करणाऱ्या व्यक्तींमध्ये हा रोग मोठ्या प्रमाणात आढळला जातो. तंबाखूतील रसायने फुफ्फुसाच्या पेशींमध्ये बदल घडवून कॅन्सर निर्माण करतात. परंतु धूम्रपान केल्यानेच कॅन्सर होतो असेही नाही. धूम्रपान न करणाऱ्या लोकांमध्ये देखील फुप्फुसाचा कर्करोगचे रुग्ण आढळून येतात.

२) प्रदूषण:
मोठ्या शहरांमध्ये वायू प्रदूषण आणि प्रदूषित वातावरणामुळे फुफ्फुसांवर ताण येतो. कार्बन मोनोऑक्साइड, नायट्रोजन ऑक्साइड, आणि सल्फर डायऑक्साइड सारखे प्रदूषण करणारे रसायने कॅन्सरचा धोका वाढवू शकतात.
३) अनुवांशिक:
कुटुंबात लंग कॅन्सर असलेल्या व्यक्तीमध्ये त्याची लक्षणे किंवा कॅन्सर होण्याचा धोका जास्त असतो. जर आपल्या कुटुंबातील इतर सदस्यांमध्ये लंग कॅन्सर असेल, तर तो आनुवंशिकदृष्ट्या होण्याची दाट शक्यता असते.
४) पचनसंस्था आणि इतर इन्फ्लेमेटरी रोग:
ज्यांना दीर्घकालीन फुफ्फुसाच्या इन्फ्लेमेटरी विकारांची (जसे की COPD) समस्या आहे, त्यांना लंग कॅन्सर होण्याचा धोका जास्त असतो. यामुळे फुफ्फुसांच्या पेशींमध्ये दीर्घकालीन सूज निर्माण होऊन ते कॅन्सरचे कारण बनतात.
आपल्याला लंग कॅन्सरची लक्षणे दिसू लागल्यास त्वरित तज्ज्ञांचा सल्ला घेऊन त्याचे निदान करावे. लंग कॅन्सरचे निदान करण्यासाठी एक्स-रे, सिटी स्कॅन, बायोस्पी आणि पेट स्कॅन ही विविध तंत्र उपलब्ध आहेत.
लंग कॅन्सरवर उपचार:
१) सर्जरी:
सर्जरी ही या फुफ्फुसाच्या कर्करोगावरील महत्वाची उपचार पद्धती आहे. या पद्धतीमध्ये कॅन्सर असलेला फुफ्फुसाचा भाग काढून टाकला जातो. या सर्जरीमध्ये लव्हेक्टॉमी, पनेमोनेक्टॉमी, सेगमेंटेक्टॉमी हे प्रकार उपलब्ध आहेत.
२) केमोथेरपी:
किमोथेरपीमध्ये रसायनांचा वापर केला जातो, जो कॅन्सरच्या पेशींना नष्ट करतो. हे उपचार मुख्यतः कॅन्सर सर्वत्र पसरल्यास (मेटास्टेटिक कॅन्सर) किंवा शस्त्रक्रियेसाठी योग्य नसलेल्या रुग्णांसाठी वापरले जातात. किमोथेरपीमध्ये कॅन्सरच्या पेशींना नष्ट करण्यासाठी शरीरात फिरणारे औषध दिले जाते. किमोथेरपीमुळे काही वेळा साइड इफेक्ट्स (जसे की जास्त उलट्या, थकवा, कमी प्लेटलेट्स इत्यादी) होऊ शकतात.

३) रेडिएशन थेरपी:
रेडिएशन थेरपीमध्ये हाय-एनर्जी रेडिएशन वापरून कॅन्सरच्या पेशींना नष्ट करण्याचा प्रयत्न केला जातो. याचा उपयोग मुख्यतः कॅन्सरच्या पेशींना टार्गेट करण्यासाठी केला जातो. काही वेळा रेडिएशन थेरपीमुळे कॅन्सरच्या लक्षणांना नियंत्रित केले जाऊ शकते.
४) इम्युन थेरपी:
इम्यून थेरपी म्हणजे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवून कॅन्सरशी लढा देण्यासाठी उपचार होय.
लंग कॅन्सरवर हे उपचार जरी असले तरी आपण त्यापासून सावध राहणे अत्यंत आवश्यक आहे. यावेळी आपण धुम्रपानापासून दूर राहणे उत्तम. वातावरणातील प्रदूषण कमी करण्यास आपण हातभार लावल्याने पर्यावरण दूषित होणार नाही तसेच आपल्यासह इतरांच्या आरोग्याचाही धोका टळेल. आपली जीवनशैली सुधारणे हे आपल्याला या कॅन्सरपासून दूर ठेवण्यास मदत करू शकते. आपण नियमित व्यायाम केला, पौष्टिक आहार घेतला आणि पुरेशी झोप घेतली तर आपण या कॅन्सरच्या रोगापासून स्वतःचा बचाव करू शकतो. आपले आरोग्य सुदृढ राहण्यासाठी नियमित आरोग्य तपासणी करणे आवश्यक आहे.
लंग कॅन्सर कसा उद्भवतो?
लंग कॅन्सर म्हणजेच फुप्फुसाचा कर्करोग हे जगभरात मृत्यूचे प्रमुख कारण बनले आहे. यापासून सर्वांनी सावध राहणे अत्यंत आवश्यक आहे. खोकला, आवाजात खरखर आणि छातीत दुखत असल्यास ही फुप्फुसाचा कर्करोगची काही लक्षणं आहेत. ही लक्षणं जर आपल्यात दिसत असतील तर त्वरित आरोग्य तपासणी करावी. या लेखात आपण फुप्फुसाचा कर्करोग म्हणजे काय आणि त्याची लक्षणे तसेच उपचार याविषयी चर्चा करणार आहोत. हा लेख आपण पूर्ण वाचा तसेच आपल्या आप्तेष्टांना देखील माहिती मिळावी यासाठी नक्कीच शेयर करा.
फुप्फुसाच्या कर्करोगाची लक्षणे कोणती?
फुप्फुसाचा कर्करोग ओळखण्याचे मुख्य लक्षण म्हणजे खोकला. या रुग्णाला भयंकर खोकला येतो तसेच खोकला येताना त्यासोबत रक्त देखील येतं. खोकल्यामध्ये रक्त दिसणं लंग कॅन्सरच्या प्राथमिक लक्षणांपैकी एक आहे. कधी कधी, रक्त गडद रंगाचं असू शकतं. लंग कॅन्सर असल्यास श्वास घेण्यास त्रास होतो. श्वास घेताना छातीत दडपण येते, धाप लागते. लंग कॅन्सरचे एक सामान्य लक्षण म्हणजे अचानक वजन कमी होणे. कॅन्सरच्या पेशी शरीरातील पोषणावर परिणाम करतात, ज्यामुळे शरीरातील अन्न पचवण्याची क्षमता कमी होते. त्यामुळे वजन कमी होते. मग रुग्णाने कितीही खाल्लं तरी त्याचे वजन मोठ्या प्रमाणात कमी होत असते.
फुप्फुसाचा कर्करोग टाळण्यासाठी काय करावे?
फुप्फुसाचा कर्करोग पासून सावध राहणे अत्यंत आवश्यक आहे. यावेळी आपण धुम्रपानापासून दूर राहणे उत्तम. वातावरणातील प्रदूषण कमी करण्यास आपण हातभार लावल्याने पर्यावरण दूषित होणार नाही तसेच आपल्यासह इतरांच्या आरोग्याचाही धोका टळेल. आपली जीवनशैली सुधारणे हे आपल्याला या कॅन्सरपासून दूर ठेवण्यास मदत करू शकते. आपण नियमित व्यायाम केला, पौष्टिक आहार घेतला आणि पुरेशी झोप घेतली तर आपण या कॅन्सरच्या रोगापासून स्वतःचा बचाव करू शकतो. आपले आरोग्य सुदृढ राहण्यासाठी नियमित आरोग्य तपासणी करणे आवश्यक आहे.