आरोग्य विमा: एका उत्तम आरोग्यासाठी उत्तम उपाय!

आरोग्य विमा

आरोग्य विमा आणि त्यांचे प्रकार:

आपण जर आपला आरोग्य विमा काढला असेल तर अशा वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत विमाधारक म्हणून आपल्याला उपकचराचे पैसे भरावे लागत नाहीत. रुग्णांच्या संपूर्ण ट्रीटमेंटचा खर्च विमा कंपनी करते. या विमा पॉलिसीमध्ये अनेक फायदे देखील मिळतात. आज आपण आरोग्य विमाचे अनेक प्रकार आणि त्यांचे फायदे जाणून घेऊ… 

१) वैयक्तिक आरोग्य विमा:

वैयक्तिक विमा हा आपल्या कुटुंबासाठी राखीव असतो. यात आपण, आपला जोडीदार, मुलं आणि पालक यांचा समावेश होतो. या प्रकारच्या विम्यात आपल्याला वैद्यकीय खर्च, हॉस्पिटलमधील खोलीचं भाडं, शस्त्रक्रिया खर्च, दिवसभराची हॉस्पिटलची सेवा या सर्वांचा समावेश असतो. या विम्याचा लाभ १८ ते ७० वर्ष वयोगटातील लोक घेऊ शकतात. 

२) फॅमिली आरोग्य विमा:

फॅमिली फ्लोटर आरोग्य विमा आपल्या कुटुंबासाठी अत्यंत उपयुक्त ठरतो. या विम्यात कुटुंबातील प्रत्येक सदस्यांचा वैयक्तिक विमा काढण्यात येतो. याचा प्रीमियम वैयक्तिक विम्यापेक्षा कमी असतो. हा विमा तुमच्या जोडीदाराला, मुलांना आणि पालकांना कव्हर करू शकते. जर तुम्ही आणि तुमच्या कुटुंबातील सदस्य ६० वर्षांपेक्षा कमी असतील तर तुम्ही फॅमिली फ्लोटर हेल्थ इंश्युरन्सचा लाभ घेऊ शकता. 

३) ग्रुप आरोग्य विमा:

ग्रुप आरोग्य विमा म्हणजेच ग्रुप हेल्थ इंश्युरन्स पॉलिसी कंपन्यांसाठी तयार करण्यात आली आहे. काही कोर्पोरेट कंपन्यांमध्ये आपल्या कर्मचाऱ्यांसाठी हा विमा खरेदी केला जातो. या विम्याची प्रीमियम रक्कम कमी असते. ही योजना आपल्याला आजारपण, गंभीर आजार किंवा प्रसूतीसाठी रुग्णालयात दाखल झाल्यावर मिळते. अनेक कंपन्या त्यांच्या कर्मचाऱ्यांची अशाप्रमाणे काळजी घेत असते. 

४) ज्येष्ठ नागरिकांचा आरोग्य विमा:

६० वयापेक्षा जास्त असलेल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी हा विमा आहे. जर आपले पालक ६० किंवा त्यापेक्षा जास्त वयाचे असतील तर त्यांच्यासाठी हा विमा अत्यंत उपयोगी ठरेल. नियमीत औषधं, अपघात किंवा आजारामुळे रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी आणि नंतरचे खर्च सर्व या विम्यात कव्हर होते. तसेच यात मानसोपचाराचा खर्च देखील कव्हर होतो. ज्येष्ठ नागरिकांना आजार होण्याची शक्यता अधिक असते म्हणून या विम्याचा प्रीमियम देखील अन्य विम्यांपेक्षा अधिक असते. 


५) मातृत्व आरोग्य विमा:

नुकतेच लग्न झालेल्या जोडप्याने होणाऱ्या बाळासाठी या विम्याचा लाभ नक्कीच घ्यावा. या विम्यात बाल प्रसूती आणि नवजात बालकाचे ९० दिवसांपर्यंत कव्हरेज मिळते.

 
६) गंभीर आजार आरोग्य विमा:

क्रिटिकल इलनेस पॉलिसी म्हणजेच गंभीर आजार विमा यात कर्करोग, स्ट्रोक, हृदयविकार, अर्धांगवायू अशा मोठ्या आजारांचा समावेश करण्यात आला आहे. या सर्व आजारांच्या उपचारांचा खर्च विमा कंपनी उचलते. सध्याच्या जीवनशैलीत गंभीर आजार देखील वाढत चालले आहेत म्हणून विमा कंपन्यांनी हा विमा तयार केला आहे. 

आरोग्य विमा खरेदीचे फायदे:

१) आर्थिक संरक्षण:


आपल्यावर आलेल्या कोणत्याही आपत्कालीन वैद्यकीय समस्येत आपल्याला विमा असल्याने आर्थिक संरक्षण मिळते. दवाखान्यात रुजू करण्यापासून ते औषधं, खोलीचे भाडे, सर्जरीचा खर्च सर्व काही विमा कंपनी पाहते. 


२) प्रारंभिक तपासणी आणि चाचणीसाठी मदत:

बहुतेक हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसी योजनांमध्ये वार्षिक तपासणी आणि काही चाचण्या देखील समाविष्ट असतात. यामुळे कोणत्याही लक्षणांचा प्राथमिक टप्प्यावरच शोध लागतो आणि रोग वाढण्याआधीच उपचार सुरू करता येतात.

३) गंभीर आजारांच्या मोठ्या खर्चांपासून सुटका:

काही गंभीर आजार जसं की कर्करोग, हृदयविकार मधुमेह या रोगांच्या उपचाराचा खर्च मोठ्या प्रमाणात असतो. विमाच्या मदतीने त्या भयंकर खर्चापासून आपली सुटका होऊ शकते कारण या उपचारांचा खर्च विमा विकत घेतल्यास विमा कंपनी करते. 

४) टॅक्स सूट:

विमा विकत घेतल्यास अनेक विमा कंपन्यांद्वारे आयकर कायद्यांतर्गत कर सवलत मिळू शकते. भारतीय आयकर कायद्यात कलम ८०D अंतर्गत हा फायदा दिला जातो.

५) रुग्णालयात सुविधा आणि सेवा: 

विमा कंपन्यांद्वारे रुग्णालयांमध्ये कॅशलेस सेटलमेंट सुविधा देखील दिली जाते. यामुळे रुग्णालयात उपचार घेताना ग्राहकांना त्वरित पैसे भरण्याची आवश्यकता पडत नाही. उपचारांची सुरुवात त्वरित करण्यात येते.

आरोग्य विमा विषयी माहिती?

आपण जर आपला आरोग्य विमा काढला असेल तर अशा वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत विमाधारक म्हणून आपल्याला उपकचराचे पैसे भरावे लागत नाहीत. रुग्णांच्या संपूर्ण ट्रीटमेंटचा खर्च विमा कंपनी करते. या विमा पॉलिसीमध्ये अनेक फायदे देखील मिळतात.

फॅमिली हेल्थ इंश्युरन्स म्हणजे काय?

फॅमिली फ्लोटर आरोग्य विमा आपल्या कुटुंबासाठी अत्यंत उपयुक्त ठरतो. या विम्यात कुटुंबातील प्रत्येक सदस्यांचा वैयक्तिक विमा काढण्यात येतो. याचा प्रीमियम वैयक्तिक विम्यापेक्षा कमी असतो. हा विमा तुमच्या जोडीदाराला, मुलांना आणि पालकांना कव्हर करू शकते. जर तुम्ही आणि तुमच्या कुटुंबातील सदस्य ६० वर्षांपेक्षा कमी असतील तर तुम्ही फॅमिली फ्लोटर हेल्थ इंश्युरन्सचा लाभ घेऊ शकता.

रुग्णालयात चांगली सुविधा कशी मिळवावी?

विमा कंपन्यांद्वारे रुग्णालयांमध्ये कॅशलेस सेटलमेंट सुविधा देखील दिली जाते. यामुळे रुग्णालयात उपचार घेताना ग्राहकांना त्वरित पैसे भरण्याची आवश्यकता पडत नाही. उपचारांची सुरुवात त्वरित करण्यात येते

सर्वात चांगला विमा कोणता?

क्रिटिकल इलनेस पॉलिसी म्हणजेच गंभीर आजार विमा यात कर्करोग, स्ट्रोक, हृदयविकार, अर्धांगवायू अशा मोठ्या आजारांचा समावेश करण्यात आला आहे. या सर्व आजारांच्या उपचारांचा खर्च विमा कंपनी उचलते. सध्याच्या जीवनशैलीत गंभीर आजार देखील वाढत चालले आहेत म्हणून विमा कंपन्यांनी हा विमा तयार केला आहे.

Leave a Comment