५ शाकाहारी पदार्थ: मांसाहाराच्या तुलनेत पोषक ठरते का?

आजच्या काळात अनेक मांसाहार करणारे लोक शाकाहाराकडे वळत असल्याचे निदर्शनास येत आहे. शाकाहारी पदार्थ देखील चवीने खाल्ले जात आहे. काही लोक तर सरळ व्हेगन होत आहेत, म्हणजेच मांस, मच्छी तसेच दुग्धजन्य पदार्थ देखील त्यांच्या आहारातून वगळला जात आहे. प्राण्यांपासून मिळणारे कोणतेच पदार्थ ही लोक त्यांच्या आहारात समाविष्ट करत नाहीत. परंतु या शाकाहारी पदार्थांमुळे हवे तितके पौष्टिक आणि शरीराला आवश्यक घटक मिळतात का? चला पाहूया या शाकाहारी पदार्थांद्वारे मिळणारे पोषक घटक!

१) हृदयाचे आरोग्य:


शाकाहारी आहार हृदयाच्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. शाकाहारी पदार्थांमध्ये मांसाहारी पदार्थांच्या तुलनेत फायबर जास्त प्रमाणात असते. तसेच कोलेस्ट्रॉल, मीठ यांचे प्रमाण देखील कमी असते. यामुळे हे शाकाहारी आहार हृदयाच्या आरोग्यासाठी उत्तम ठरतात. त्यामध्ये जास्त प्रमाणात ताजे फळे, भाज्या आणि कडधान्ये असतात, ज्यामुळे हृदयाचे कार्य सुधारते आणि रक्तदाब नियंत्रित राहतो. मांसाहाराचे सेवन कमी केल्यामुळे रक्तातील कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते. 

शाकाहारी पदार्थ

२) वजन नियंत्रणात राहते:


शाकाहारी पदार्थांमध्ये मांसाहारी पदार्थांच्या तुलनेत कमी कॅलोरी असतात. शाकाहारी आहार खाल्ल्याने आपल्या शरीरात फॅट्स जाण्याचे प्रमाण कमी होते आणि यामुळे वजन न वाढता ते नियंत्रणात राहण्यास मदत होते. 

३) पचनक्रिया सुधारते:

४) इन्फेक्शन टळते:


मांसाहारी पदार्थ खाल्ल्याने इन्फेक्शन होण्याची शक्यता वर्तवता येते. परंतु याबाबतीत शाकाहारी पदार्थ अधिक सुरक्षित असतात. शाकाहारी पदार्थ बनवण्यापूर्वी जर योग्यरीत्या धुण्यात आले तर यामधून इन्फेक्शनचा धोका टळतो. 

५) टवटवीत त्वचा:


शाकाहारी पदार्थांचे सेवन केल्याने त्वचा टवटवीत व चमकदार राहण्यास मदत करते. हिरव्या ताज्या भाज्या तसेच फळं खाल्ल्याने त्वचेमध्ये होणारे इन्फेक्शन टळते आणि त्वचा निरोगी, तजेलदार आणि टवटवीत राहण्यास मदत होते. 

१) फळे:


शाकाहारी पदार्थांमध्ये सर्वात पौष्टिक आणि महत्वाचे पदार्थ म्हणजे फळे. फळांमध्ये विविध प्रकारचे आणि शरीराला, आरोग्याला आवश्यक असलेले घटक समाविष्ट असतात जसे की प्रोटीन, फायबर, व्हिटॅमिन्स, मिनरल्स इत्यादी. सफरचंद, केली, पेरू, संत्री, मोसंबी, आंबा, डाळिंब इत्यादी पौष्टिक फळांचा समावेश आपल्या आहारात नक्कीच करावा. 

२) भाज्या आणि हिरव्या पालेभाज्या:


भाज्या आणि हिरव्या पालेभाज्या आपल्या आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी ठरते. भाज्या जीवनसत्त्वे, खनिजे आणि फायबर्सचा उत्तम स्रोत आहेत. पालक, बटाटा, गाजर, भेंडी, कोबी, टोमॅटो, पोकळा, इत्यादी भाज्यांचा समावेश आपल्या जीवनशैलीतील आहारात नक्कीच करावा. 

शाकाहारी पदार्थ

३) कडधान्ये:


कडधान्ये प्रोटिन आणि फायबर्सचे उत्तम स्रोत आहेत. मुग डाळ, तुर डाळ, मसूर डाळ, चणा डाळ, सोयाबीन इत्यादी कडधान्यांचे सेवन आपण आपल्या आहारात करणे अत्यंत महत्वाचे ठरते. 

४) धान्य:


धान्यांमध्ये तांदूळ, गहू, ज्वारी, बाजरी, ओट्स इत्यादींचा समावेश होतो. हे शरीराला ऊर्जा देतात आणि पचन प्रक्रिया सुधारतात.


५) दूध आणि दुग्धजन्य पदार्थ:


दूध, दही, लोणी, पनीर यांचा समावेश शाकाहारी आहारात होतो. हे प्रोटीन, कॅल्शियम आणि जीवनसत्त्वांची उत्तम साधने आहेत. आपल्या आरोग्यास सुदृढ ठेवण्यासाठी दूध तसेच दुग्धजन्य पदार्थांचा आपल्या आहारात समावेश करावा. 


शाकाहारी आहार घेतांना काही विशेष गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे. महत्वाचे म्हणजे प्रोटीन, आयर्न, बी१२ जीवनसत्त्व आणि ओमेगा-३ फॅटी ऍसिड्स यांची कमतरता होऊ शकते. म्हणून शाकाहारी आहार घेताना विविध प्रकारचे कडधान्ये, डाळी, शेंगफळे, फळे, भाज्या आणि दूधाचे पदार्थ संतुलित प्रमाणात सेवन करणे महत्त्वाचे आहे.

शाकाहारी पदार्थ हे सर्वार्थाने पौष्टिक असतात परंतु ते जंकफूडमध्ये देखील वापरले जातात. शाकाहारी पदार्थ खात असाल तर बाहेरील जंक फूड खाणे टाळावे. यामुळे आपल्या आरोग्याला हानी पोहोचण्याची शक्यता वर्तवता येते. घरी सात्विक आणि पौष्टिक पद्धतीने बनवलेले शाकाहारी पदार्थ आपल्या नियमित दिनचर्येत समाविष्ट करावे. 

शाकाहारी पदार्थांचे सेवन वाढत आहे का?

आजच्या काळात अनेक मांसाहार करणारे लोक शाकाहाराकडे वळत असल्याचे निदर्शनास येत आहे. शाकाहारी आहार देखील चवीने खाल्ले जात आहे. काही लोक तर सरळ व्हेगन होत आहेत, म्हणजेच मांस, मच्छी तसेच दुग्धजन्य पदार्थ देखील त्यांच्या आहारातून वगळला जात आहे. प्राण्यांपासून मिळणारे कोणतेच पदार्थ ही लोक त्यांच्या आहारात समाविष्ट करत नाहीत.

शाकाहार केल्याने कोणते फायदे होतात?

शाकाहारी आहार हृदयाच्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. शाकाहारी पदार्थांमध्ये मांसाहारी पदार्थांच्या तुलनेत फायबर जास्त प्रमाणात असते. तसेच कोलेस्ट्रॉल, मीठ यांचे प्रमाण देखील कमी असते. यामुळे हे शाकाहारी आहार हृदयाच्या आरोग्यासाठी उत्तम ठरतात. त्यामध्ये जास्त प्रमाणात ताजे फळे, भाज्या आणि कडधान्ये असतात, ज्यामुळे हृदयाचे कार्य सुधारते आणि रक्तदाब नियंत्रित राहतो. मांसाहाराचे सेवन कमी केल्यामुळे रक्तातील कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते. 
शाकाहारी आहारमध्ये मांसाहारी पदार्थांच्या तुलनेत कमी कॅलोरी असतात. शाकाहारी आहार खाल्ल्याने आपल्या शरीरात फॅट्स जाण्याचे प्रमाण कमी होते आणि यामुळे वजन न वाढता ते नियंत्रणात राहण्यास मदत होते. 

व्हेजमध्ये काय खावे?

शाकाहारी पदार्थांमध्ये सर्वात पौष्टिक आणि महत्वाचे पदार्थ म्हणजे फळे. फळांमध्ये विविध प्रकारचे आणि शरीराला, आरोग्याला आवश्यक असलेले घटक समाविष्ट असतात जसे की प्रोटीन, फायबर, व्हिटॅमिन्स, मिनरल्स इत्यादी. सफरचंद, केली, पेरू, संत्री, मोसंबी, आंबा, डाळिंब इत्यादी पौष्टिक फळांचा समावेश आपल्या आहारात नक्कीच करावा. भाज्या आणि हिरव्या पालेभाज्या आपल्या आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी ठरते. भाज्या जीवनसत्त्वे, खनिजे आणि फायबर्सचा उत्तम स्रोत आहेत. पालक, बटाटा, गाजर, भेंडी, कोबी, टोमॅटो, पोकळा, इत्यादी भाज्यांचा समावेश आपल्या जीवनशैलीतील आहारात नक्कीच करावा. 

Leave a Comment