मासिक पाळी अनियमितता: ७ कारणे, ३ लक्षणे आणि ५ उपाय!

मासिक पाळी अनियमितता म्हणजेच इर्रेग्युलर पिरियड्स स्त्रियांसाठी एक सामान्य समस्या आहे. कधी वेळेच्या आधी येते तर कधी उशिरा येत असते. परंतु २१ ते ३५ या दिवसांपर्यंत स्त्रियांची मासिक पाळी अनियमितता ही सामान्य मानली जाते. परंतु याहून अधिक लवकर किंवा उशिरा येत असल्यास ही काळजीची बाब ठरू शकते. ही समस्या जास्त होत असल्यास शारीरिक तसेच मानसिक समस्या उद्भवू शकतात. PCOD अथवा PCOS होण्याची यावेळी शक्यता दाट होते. 

१) ताणतणाव:


स्त्रियांना दररोजच्या जीवनशैलीत अनेक ताणतणाव असतात. यामुळे शरीरातील हार्मोन्स असंतुलित होऊन याचा परिणाम पिरियड सायकलवर होऊ शकतो आणि मासिक पाळी अनियमित होऊ शकते. 

२) PCOS:

मासिक पाळी अनियमितता याचे एक कारण म्हणजे PCOS होय. यामध्ये अंडाशयात लहान सिस्ट (फोलिकल्स) तयार होतात, ज्यामुळे अंडोत्सर्जनात अडचण येते. यावेळी तज्ज्ञांचा सल्ला घेणे अत्यावश्यक आहे. 

मासिक पाळी अनियमितता

आणखी वाचा – ६ PCOS उपाय: स्त्रियांची दर महिन्याच्या या समस्येपासून मुक्ती!

३) असंतुलित आहार:

रोजच्या दिनचर्येत असंतुलित आहार असल्याने मासिक पाळी अनियमितता ही समस्या उद्भवू शकते. यासाठी वेळेत आहार करणे आणि तेलकट पदार्थ, जंक फूड टाळून पौष्टिक आहार करणे अत्यंत महत्वाचे आहे. 

४) हार्मोनल इम्बॅलन्स:

प्रोलॅक्टिन, थायरॉईड हार्मोन्स आणि इन्सुलिन हे हार्मोन्स असंतुलन मासिक पाळीवर परिणाम करू शकते.

५) गर्भनिरोधक औषधे:

गर्भनिरोधक गोळ्यांच्या वापरामुळे मासिक पालीवर परिणाम होऊ शकतो. परंतु या गोळ्या बंद केल्यास मासिक पाळीतील अनियमितता सुधारू शकते. 

६) गर्भधारणा:

गर्भधारणेच्या सुरुवातीला मासिक पाळीच्या नियमिततेत अडथळे येत असतात. गर्भधारणा होण्यापूर्वी मासिक पाळी अनियमितता समस्या उद्भवते. 

मासिक पाळी अनियमितता

७) मेनोपॉस:

स्त्रियांना काही विशिष्ट वर्षानंतर म्हणजेच वयाच्या चाळिशीनंतर मेनोपॉस पिरियड सुरु होतो, त्यामुळे त्यांच्या मासिक पाळीच्या सायकलमध्ये अडथळा निर्माण होतो आणि मासिक पाळी अनियमिततेची समस्या उद्भवते. 

आपल्या रोजच्या दिनचर्येत मानसिक किंवा शारीरिक रित्या खालील लक्षणे दिसत असल्यास मासिक पाळी अनियमिततेची लक्षणे समजावी आणि यावर तज्ज्ञांचा त्वरित सल्ला घ्यावा. 

१) मासिक पाळी लवकर अथवा उशिरा येणे:

२) मूड सविंग्स, ताणतणाव:

स्त्रियांना मोठ्या प्रमाणात ताणतणावाला सामोरे जावे लागत असेल किंवा जास्त प्रमाणात मूड सविंग्स होत असतील तर मासिक पाळी अनियमिततेमुळे होते असते. 

३) कमी किंवा अधिक रक्तस्त्राव:

मासिक पाळीदरम्यान रक्तस्राव हा नॉर्मल असावा. काही महिलांना अत्यधिक रक्तस्राव किंवा कमी रक्तस्राव होऊ शकतो, जो मासिक पाळीच्या दरम्यान असामान्य असतो.

मासिक पाळीतील अनियमितता यावर घरगुती उपाय केल्याने देखील मासिक पाळी नियमित होऊ शकते. गर्भधारणा तसेच मेनोपॉस यावेळी मासिक पाळीत अनियमितता हे साहजिक आहे, परंतु यांची करणं जर आपली जीवनशैली असेल तर मात्र यावर उपाय करणे अत्यावश्यक आहे. 

१) संतुलित आहार:

स्त्रियांनी आपला नियमित आहार हा संतुलित ठेवावा. विशेषतः हायप्रोेटिन, व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स असलेले अन्न, जसे की फळं, भाज्या, धान्य, शाकाहारी प्रोटीन आणि ओमेगा-3 फॅटी ऍसिड्स यांचा समावेश आपल्या रोजच्या आहारात करावा. 

२) नियमित व्यायाम:

नियमित व्यायाम केल्यामुळे हार्मोनल संतुलन राखता येते आणि वजनावर नियंत्रण मिळवता येते, ज्यामुळे मासिक पाळीच्या अनियमिततेचा धोका कमी होतो.

३) ताणतणाव कमी करणे:

आपल्या रोजच्या जीवनातील ताणतणाव कमी करणे अत्यावश्यक आहे. यामुळं मासिक पाळी नियमित येण्यास मदत होईल. 

४) वजन कमी करणे:

वजन वाढणे हे देखील मासिक पाळीतील अनियमिततेला कारणीभूत ठरू शकते. यामुळे नियमित व्यायाम करून वजन कमी करणे हा यावरील उपाय आहे. 

५) तज्ज्ञांचा सल्ला घेणे:

मासिक पाळी अनियमिततेच्या दीर्घकालीन समस्येसाठी तज्ज्ञ गाईनोकॉलॉजिस्टकडे जाणे आवश्यक आहे. तज्ज्ञ आपल्या स्थितीनुसार योग्य उपचार देऊ शकतात. काही वेळेस हार्मोनल उपचार, गर्भनिरोधक गोळ्या किंवा इतर औषधांचा सल्ला दिला जाऊ शकतो.

मासिक पाळी अनियमितता म्हणजे काय?

मासिक पाळी अनियमितता म्हणजेच इर्रेग्युलर पिरियड्स स्त्रियांसाठी एक सामान्य समस्या आहे. कधी वेळेच्या आधी येते तर कधी उशिरा येत असते. परंतु २१ ते ३५ या दिवसांपर्यंत स्त्रियांची मासिक पाळी अनियमितता ही सामान्य मानली जाते. परंतु याहून अधिक लवकर किंवा उशिरा येत असल्यास ही काळजीची बाब ठरू शकते. ही समस्या जास्त होत असल्यास शारीरिक तसेच मानसिक समस्या उद्भवू शकतात. PCOD अथवा PCOS होण्याची यावेळी शक्यता दाट होते. 

अनियमित मासिक पाळीची कारणे कोणती

ताणतणाव, PCOS, असंतुलित आहार, हार्मोनल इम्बॅलन्स, गर्भनिरोधक औषधे, गर्भधारणा, मेनोपॉस इत्यादी अनियमित मासिक पाळीची कारणं असून यावर उपाय करणे अत्यावश्यक आहे.

मासिक पाळीच्या अनियमिततेवर तज्ज्ञांचा सल्ला महत्वाचा आहे का?

मासिक पाळी अनियमिततेच्या दीर्घकालीन समस्येसाठी तज्ज्ञ गाईनोकॉलॉजिस्टकडे जाणे आवश्यक आहे. तज्ज्ञ आपल्या स्थितीनुसार योग्य उपचार देऊ शकतात. काही वेळेस हार्मोनल उपचार, गर्भनिरोधक गोळ्या किंवा इतर औषधांचा सल्ला दिला जाऊ शकतो.

Leave a Comment