आरोग्य दिन साजरा करण्यासाठी या ६ शिबिरांचे आयोजन करा!

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन ( WHO ) म्हणजेच जागतिक आरोग्य संघटना या संस्थेची स्थापना ७ एप्रिल १९४८ रोजी स्थापित झाली. १९४८ मध्येच त्यांनी पहिली जागतिक आरोग्य सभा बोलावली आणि ‘आरोग्य दिन’ साजरा करण्याची मागणी करण्यात आली. या मागणीनुसार पहिला ‘आरोग्य दिन’ हा ७ एप्रिल १९५० रोजी साजरा करण्यात आला आणि त्यानुसार दरवर्षी या WHO संस्थेचा वर्धापन दिनाच्या दिवशी आरोग्य दिन साजरा करण्याची पद्धत सुरु झाली. हा दिन साजरा करण्याचा उद्देश आरोग्याबद्दल लोकांमध्ये जनजागृती करणे आहे. याविषयी अधिक जाणून घेऊया. 


आरोग्य हा आपल्या जीवनातील अमूल्य ठेवा आहे. याला जपणे अत्यंत आवश्यक आहे. आरोग्य निरोगी असेल तर आपण आपले कोणतेही ध्येय पूर्णत्वास नेण्यात यशस्वी ठरतो. परंतु आरोग्याकडे दुर्लक्ष केल्यास अनेक समस्या उद्भवू शकतात. अनेक रोग आपल्याला ग्रासू शकतात. सर्व रोगांपासून दूर राहण्यासाठी आणि आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आरोग्य दिनाच्या दिवशी जनजागृती करण्यात येते, म्हणूनच आरोग्य दिनाचे महत्त्व अधिक आहे. आरोग्य दिनाच्या निमित्ताने अनेक संस्था आरोग्याबाबत जनजागृती करण्यासाठी अनेक उपक्रम राबवत असतात त्याबद्दल थोडी माहिती मिळवूया. 


आरोग्य दिन निमित्ताने राबवण्यात आलेले उपक्रम:


१) आरोग्य तपासणी शिबिर:


अनेक संस्था या दिवशी आरोग्याबाबत जनजागृती व्हावी यासाठी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात येते. आरोग्य तपासणी शिबिरात मोफत किंवा कमी शुल्क आकारून नागरिकांच्या आरोग्याची तपासणी करण्यात येते आणि त्यांना त्यांच्या आरोग्याविषयी माहिती देण्यात येते. यावेळी नागरिकांना आपले आरोग्य किती सुदृढ आहे किंवा आरोग्यात काय त्रुटी आहेत याविषयी माहिती मिळते आणि त्यावर उपचार करणे नागरिकांना सोपे जाते. 

आरोग्य दिन


२) व्यसनविरुद्ध जनजागृती:


आरोग्यासाठी हानिकारक असलेल्या व्यसन म्हणजेच दारू, सिगारेट, तंबाखू या व्यसनाविरुद्ध जनजागृती व्हावी यासाठी शिबीर भरवतात. यावेळी ही व्यसने आपल्या आरोग्यासाठी किती घातक आहे याबद्दल माहिती देण्यात येते. 


३) योग व व्यायाम शिबीर:


४) आहार मार्गदर्शन:


आरोग्य दिन साजरा करण्याच्या निमित्ताने काही संस्थांकडून नागरिकांना आहार विषयक मार्गदर्शन देण्यात येते. आहारात काय समाविष्ट करावे आणि काय टाळावे याची माहिती या मार्गदर्शन शिबिरात देण्यात येते. आपल्या आरोग्यासाठी कॅल्शियम, व्हिटॅमिन असे अनेक घटक अत्यंत महत्वाचे आहेत व ते आपल्याला कोणते पदार्थ सेवन केल्यास मिळतील याची देखील माहिती या मार्गदर्शनात देण्यात येते. 


५) मासिक पाळी विषयक मार्गदर्शन:


शालेय मुलींना मासिक पाळीविषयी पुरेशी माहिती नसते, यामुळे काही आरोग्य संस्था जास्तीत जास्त शाळांमध्ये जाऊन मुलींमध्ये तसेच मुलांमध्ये देखील मासिक पाळी विषयक मार्गदर्शन करतात. यामध्ये मासिक पाळीचे महत्व, त्यात घेतली जाणारी काळजी, त्यात पाळली जाणारी स्वच्छता याविषयी मुलींमध्ये जनजागृती करण्यात येते. 

आरोग्य दिन


६) मानसिक आरोग्याविषयी मार्गदर्शन:


शारीरिक आरोग्यासोबतच मानसिक आरोग्य देखील अत्यंत महत्वाचे आहे. त्याची काळजी घेणे अत्यावश्यक आहे याविषयी मार्गदर्शन देण्यासाठी काही संस्था आरोग्य दिन निवडतात. यादिवशी लोकांमध्ये जनजागृती करण्यात पुढाकार घेत असतात. यावेळी लोकांचे कौन्सिलिंग करण्यात येते तसेच त्यांना कोणत्याही प्रकारचा मानसिक तणाव असल्यास तो कसा दूर करावा याविषयी देखील मार्गदर्शन करण्यात येते. 


‘आरोग्य दिन’ आपल्याला आपल्या आरोग्याची काळजी घेण्यास प्रवृत्त करत असतो, रोज आपण आपल्या कामांसह आपल्या आरोग्याची देखील तितकीच काळजी घ्यावी. आरोग्य सुदृढ असेल तर आपण आपली स्वप्न साकार करण्यात यशस्वी ठरतो.

आरोग्य दिन का साजरा करण्यात येतो?

आरोग्य हा आपल्या जीवनातील अमूल्य ठेवा आहे. याला जपणे अत्यंत आवश्यक आहे. आरोग्य निरोगी असेल तर आपण आपले कोणतेही ध्येय पूर्णत्वास नेण्यात यशस्वी ठरतो. परंतु आरोग्याकडे दुर्लक्ष केल्यास अनेक समस्या उद्भवू शकतात. अनेक रोग आपल्याला ग्रासू शकतात. सर्व रोगांपासून दूर राहण्यासाठी आणि आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आरोग्य दिनाच्या दिवशी जनजागृती करण्यात येते, म्हणूनच आरोग्य दिनाचे महत्त्व अधिक आहे. आरोग्य दिनाच्या निमित्ताने अनेक संस्था आरोग्याबाबत जनजागृती करण्यासाठी अनेक उपक्रम राबवत असतात त्याबद्दल थोडी माहिती मिळवूया.

WHOची स्थापना कधी झाली?

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन ( WHO ) म्हणजेच जागतिक आरोग्य संघटना या संस्थेची स्थापना ७ एप्रिल १९४८ रोजी स्थापित झाली. १९४८ मध्येच त्यांनी पहिली जागतिक आरोग्य सभा बोलावली आणि हा दिन साजरा करण्याची मागणी करण्यात आली. या मागणीनुसार पहिला ‘आरोग्य दिन’ हा ७ एप्रिल १९५० रोजी साजरा करण्यात आला आणि त्यानुसार दरवर्षी या WHO संस्थेचा वर्धापन दिनाच्या दिवशी आरोग्य दिन साजरा करण्याची पद्धत सुरु झाली. हा दिन साजरा करण्याचा उद्देश आरोग्याबद्दल लोकांमध्ये जनजागृती करणे आहे. याविषयी अधिक जाणून घेऊया. 

आरोग्य दिनानिमित्त कोणते शिबीर आयोजित करण्यात येतात?

अनेक संस्था या दिवशी आरोग्याबाबत जनजागृती व्हावी यासाठी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात येते. आरोग्य तपासणी शिबिरात मोफत किंवा कमी शुल्क आकारून नागरिकांच्या आरोग्याची तपासणी करण्यात येते आणि त्यांना त्यांच्या आरोग्याविषयी माहिती देण्यात येते. यावेळी नागरिकांना आपले आरोग्य किती सुदृढ आहे किंवा आरोग्यात काय त्रुटी आहेत याविषयी माहिती मिळते आणि त्यावर उपचार करणे नागरिकांना सोपे जाते. आरोग्य दिन साजरा करण्याच्या निमित्ताने काही संस्थांकडून नागरिकांना आहार विषयक मार्गदर्शन देण्यात येते. आहारात काय समाविष्ट करावे आणि काय टाळावे याची माहिती या मार्गदर्शन शिबिरात देण्यात येते. आपल्या आरोग्यासाठी कॅल्शियम, व्हिटॅमिन असे अनेक घटक अत्यंत महत्वाचे आहेत व ते आपल्याला कोणते पदार्थ सेवन केल्यास मिळतील याची देखील माहिती या मार्गदर्शनात देण्यात येते. 

Leave a Comment