शारीरिक वेदना, इजा आणि विकार यांच्यावर अत्यंत गुणकारी अशी थेरपी म्हणजे फिजिओथेरपी. अनेक जणांना फिजिओथेरपीचे महत्त्व माहित नाही. याबाबत लोकांमध्ये जनजागृती करण्याची गरज भासते. फिजिओथेरपी हा सामान्यतः घरी केला जाणारा व्यायाम नाही. फिजिओथेरपीस्टच्या देखरेखीखाली हा व्यायाम केला जातो. फिजिओथेरपी विशेषतः सर्जिकल रिकव्हरीसाठी वापरली जाते. आपल्याला तसेच आपल्या शरीराला लवचिक आणि मजबूत बनवण्यास ही थेरपी मदत करते.
फिजिओथेरपी फक्त इजा, जखमा आणि वेदना बऱ्या व्हाव्यात म्हणूनच घेतले जात नाही, तर रोजच्या जीवनात शरीर लवचिक राहण्यासाठी, शरीर सुदृढ ठेवण्यासाठी आणि रोजच्या जीवनात निरोगी राहण्यासाठी देखील या थेरपीचा वापर करण्यात येतो.

जाणून घेऊ फिजिओथेरपीचे महत्त्व:
१) वेदना कमी होणे:
फिजिओथेरपीमुळे शरीरावरील इजा, दुखापती कमी होतातच, परंतु शरीराच्या वेदना देखील कमी होतात. यासाठी फिजिओथेरपी विविध तंत्रांचा वापर करते. वाढत्या वयाच्या अभावामुळे कंबर दुखी, गुडघेदुखी, मान तसेच पाठ दुखी वाढू लागते. यावर फिजिओथेरपी हा एक उत्तम उपाय आहे.
२) शरीर लवचिक होणे:
फिजिओथेरपी मुळे शरीराची हालचाल होत असते. यामुळे शरीराची कार्यक्षमता वाढते, स्नायूंची ताकद वाढते आणि शरीर लवचिक होते. शरीर लवचिक झाल्यास आपल्याला दिवसभरातील कामात अंगदुखीचा अडथळा निर्माण होणे टळते.
३) हाडांची ताकद वाढणे:
कॅल्शियमच्या अभावामुळे शरीरातील हाडं कमजोर होण्याची शक्यता असते. अशावेळी फिजिओथेरपीचे महत्त्व अधिक वाढते. फिजिओथेरपीमुळे हाडं मजबूत होऊन त्यांची ताकद वाढते आणि रोजच्या कार्यांमध्ये सुलभता मिळवता येते.
४) स्नायूंवरील ताण कमी होणे:
नियमित हालचालींमध्ये चुकीच्या पद्धतीने हालचाल झाल्यास स्नायूंवर ताण येण्याची शक्यता असते. फिजिओथेरपीतील अनेक व्यायाम प्रकारांमुळे शरीरातील स्नायू कार्यरत होतात आणि त्यामुळे स्नायूंवर येणारे ताण देखील कमी होण्यास मदत होते.
५) अनेक रोगांपासून बचाव:
फिजिओथेरपीचे महत्त्व असे की यामुळे अनेक मोठ्या रोगांनी ग्रस्त असलेल्या, उदाहरणार्थ रक्तदाब, हृदयरोग, मधुमेह या रुग्णांना विशिष्ट व्यायाम तसेच थेरपीमुळे रोगांपासून आराम मिळण्याची शक्यता तज्ज्ञ वर्तवतात. फिजिओथेरपीद्वारे मल्टिपल डिझीजचे नियंत्रण होणे शक्य आहे.
६) सर्जिकल रिकव्हरी:
ऑपरेशननंतर शरीर रिकव्हर होण्यासाठी फिजिओथेरपीची मदत घेतली जाते. जखम झालेल्या भागाला पुन्हा कार्यक्षम बनवण्यासाठी आणि स्नायूंच्या हालचालीने शरीराची रिकव्हरी करण्यासाठी ही थेरपी अत्यंत महत्वाची ठरते. ऑपरेशन नंतर फिजिओथेरपि घेणं अत्यंत गुणकारी ठरतं.
अन्य क्षेत्रातील फिजिओथेरपीचे महत्त्व:
आपल्या शरीरातील अवयवांप्रमाणे फिजिओथेरपीमध्ये अनेक प्रकार आहेत जे विशिष्ट समस्यांवर प्रभावी ठरतात. वेगवेगळ्या समस्यांसाठी वेगवेगळे फिजिओथेरपी उपलब्ध आहेत. हाडे, स्नायू, मेंदू, हृदय इत्यादी विविध घटकांच्या समस्यांसाठी विशिष्ट फिजिओथेरपी तंत्र वापरण्यात येतात.
१) ऑर्थोपेडिक फिजिओथेरपी:
या फिजिओथेरपीचे महत्त्व हाडे, स्नायू आणि सांधेदुखी तसेच फ्रॅक्चर, डिस्क प्रॉब्लेम आणि पाठीच्या वेदना दूर करणे हे आहे. ही फिजिओथेरपी हाडांशी संबंधित वेदनांवर काम करते.
२) न्यूरॉलॉजिकल फिजिओथेरपी:
स्ट्रोक, पार्किंसन्स, स्नायू विकार, मेंदूच्या इजा आणि इतर न्यूरॉलॉजिकल समस्यांसाठी ही फिजिओथेरपी अत्यंत प्रभावी ठरते.
३) कार्डिओपल्मनरी फिजिओथेरपी:
हृदयरोग, श्वसन रोग आणि शस्त्रक्रियेनंतर रुग्णांच्या शारीरिक स्थितीला सुधारण्यासाठी फिजिओथेरपी महत्त्वपूर्ण भूमिका बजावते.
४) गायनॉकॉलॉजिकल फिजिओथेरपी:
गर्भावस्थेत आणि प्रसुतीनंतर महिलांच्या शारीरिक स्वास्थ्यासाठी फिजिओथेरपी महत्त्वपूर्ण आहे. तसेच पेल्विक पेन आणि ताण कमी करण्यासाठी देखील फिजिओथेरपीचा उपयोग होतो.
फिजिओथेरपीचे महत्त्व म्हणजे ही एक अत्यंत प्रभावी आणि महत्त्वपूर्ण उपचार पद्धत आहे जी शारीरिक दुखापतींना, विकारांना आणि इजा झालेल्या लोकांच्या जीवनात सुधारणा करण्यासाठी मदत करते. वेदना कमी करण्यासाठी, शरीर क्षमता वाढवण्यासाठी ही थेरपी खूप उपयुक्त ठरते. योग्य फिजिओथेरपी उपचारांसह, व्यक्तीला त्याच्या शारीरिक समस्यांवर मात करणे आणि उत्तम स्वास्थ्य साधणे शक्य होते.
निरोगी आणि सुदृढ जीवन जगण्यासाठी प्रत्येकाने फिजिओथेरपीचे महत्त्व जाणून घ्यावे आणि त्याचा लाभ घ्यावा. यामुळे शारीरिक, मानसिक तसेच भावनिकरित्या आपण निरोगी राहतो यात काही शंका नाही.
फिजिओथेरपी म्हणजे काय ?
शारीरिक वेदना, इजा आणि विकार यांच्यावर अत्यंत गुणकारी अशी थेरपी म्हणजे फिजिओथेरपी. अनेक जणांना फिजिओथेरपीने महत्त्व माहित नाही. याबाबत लोकांमध्ये जनजागृती करण्याची गरज भासते.
फिजिओथेरपीचे महत्व काय ?
फिजिओथेरपीचे महत्त्व म्हणजे ही एक अत्यंत प्रभावी आणि महत्त्वपूर्ण उपचार पद्धत आहे जी शारीरिक दुखापतींना, विकारांना आणि इजा झालेल्या लोकांच्या जीवनात सुधारणा करण्यासाठी मदत करते. वेदना कमी करण्यासाठी, शरीर क्षमता वाढवण्यासाठी ही थेरपी खूप उपयुक्त ठरते. योग्य फिजिओथेरपी उपचारांसह, व्यक्तीला त्याच्या शारीरिक समस्यांवर मात करणे आणि उत्तम स्वास्थ्य साधणे शक्य होते.
ऑर्थोपेडिक फिजिओथेरपी म्हणजे काय ?
या फिजिओथेरपीचे महत्त्व हाडे, स्नायू आणि सांधेदुखी तसेच फ्रॅक्चर, डिस्क प्रॉब्लेम आणि पाठीच्या वेदना दूर करणे हे आहे. ही फिजिओथेरपी हाडांशी संबंधित वेदनांवर काम करते.