हिमोग्लोबिन हे लाल रक्तपेशींमधील प्रथिने आहेत, जे संपूर्ण शरीरात ऑक्सिजन वाहून नेण्याचं कार्य करतात. त्यामुळे हिमोग्लोबिन आरोग्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे. परंतु गरजेपेक्षा जास्त हिमोग्लोबिन शरीरात जमल्यास आरोग्यासाठी ते हानिकारक ठरू शकतं.
शरीरात कोणत्याही घटकाचे कमी किंवा जास्त प्रमाण हे आरोग्यासाठी घातक ठरू शकतं. हिमोग्लोबिनची पातळी पुरुषांसाठी १३.२ g/dL आणि स्त्रियांसाठी ११.६ g/dL ही सामान्य पातळी आहे, परंतु याहून कमी असल्यास वैद्यकीय उपचारांची गरज भासते. त्याचप्रमाणे हिमोग्लोबिनची पातळी वाढणे हे देखील एक चिंतेचे कारण आहे. अशा प्रकारे जर तुमच्या शरीरात हिमोग्लोबिनची पातळी सातत्याने वाढत राहिली तर त्याचा आरोग्यावर नेमका काय परिणाम होतो पाहू…
हिमोग्लोबिन वाढल्याने होणारे परिणाम:
१) रक्त गडद होणे (Polycythemia):
हिमो ग्लोबिनची पातळी अत्यधिक वाढल्यामुळे रक्त अधिक गडद होऊ शकते. याला “पॉलिसायथेमिया” म्हणतात, जिथे रक्ताची व्हिस्कॉसिटी (द्रवपणा) वाढते म्हणजेच रक्त पातळ न राहता गडद होते, यामुळे रक्ताच्या गतीवर परिणाम होतो आणि हृदय व रक्तवाहिन्यांवर अधिक ताण येतो.
२) हृदयावर ताण येणे:
हिमोग्लोबिन वाढल्याने रक्त अधिक गडद होते, त्यामुळे हृदयाला जास्त मेहनत करावी लागते. यामुळे हृदयाची कार्यक्षमता कमी होऊ शकते. याच्या परिणामस्वरूप हृदयविकार, उच्च रक्तदाब किंवा हृदयासंबंधित आणखी मोठे धोके उद्भवू शकतात.

३) रक्तदाबात वाढ:
जास्त गडद असलेल्या रक्तामुळे रक्तवाहिन्यांमध्ये ताण वाढतो, ज्यामुळे रक्तदाब वाढू शकतो. उच्च रक्तदाब म्हणजेच हायपरटेन्शन यामुळे इतर शारीरिक समस्या देखील निर्माण होण्याची शक्यता वर्तवता येते.
४) रक्ताच्या गाठी (Blood Clots):
हिमो ग्लोबिन पातळी वाढल्यामुळे रक्त गडद होते आणि परिणामी रक्ताच्या गाठी (blood clots) तयार होण्याची शक्यता वाढू शकते. या गाठींमुळे रक्तवाहिन्यांमध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात आणि यामुळे स्ट्रोक, हृदयविकार संभवतो किंवा डोळ्यांमध्ये रक्तपुरवठा होण्यास त्या गाठी अडवू शकतात. याचे खूप भयंकर परिणाम समोर येऊ शकतात.
५) श्वास घेताना अडचण:
हिमो ग्लोबिनची पातळी वाढल्यामुळे फुप्फुसांमधून पर्याप्त ऑक्सिजन रक्तात शोषले जात नाही, ज्यामुळे शरीराला जितक्या ऑक्सिजनची आवश्यकता आहे तितका ऑक्सिजन पुरवणे कठीण होऊ शकते. यामुळे श्वास घेण्यास त्रास उद्भवू शकतो.

६) लिव्हर आणि किडनीवर ताण:
हिमो ग्लोबिनची वाढलेली पातळी रक्ताच्या प्रवाहावर अतिरिक्त ताण आणते, ज्यामुळे लिव्हर आणि किडनीवर दबाव येऊ शकतो. या अवयवांच्या कार्यक्षमतेवर परिणाम होऊ शकतो आणि आरोग्यावर याचा भयानक परिणाम होऊ शकतो.
७) दवाखान्याचे उपचार:
वाढलेली हिमो ग्लोबिनची पातळी असलेल्या व्यक्तींना रक्त चढवले जाऊ शकते किंवा औषधे दिली जाऊ शकतात, जे रक्ताची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत करतात.
हिमोग्लोबिन वाढण्याची कारणे:
हिमो ग्लोबिन पातळी वाढण्याची कारणे अनेक आहेत. जसं की आपण उंचावर राहिल्याने उच्च उंचीवरील वातावरण कधी कधी सूट होत नाही आणि त्यामुळे याची पातळी वाढू शकते. काहींना उंचीचा फोबिया देखील असतो यामुळे हिमो ग्लोबिनची पातळी वाढू शकते. पॉलिसायथेमिया वेरा (Polycythemia Vera) सारखे रक्तविकार यामुळे देखील ही समस्या संभवते. धूम्रपान केल्याने देखील ही समस्या संभवते. कुणाला जर चयापचय विकार (metabolic disorders) असतील किंवा डिहायड्रेशन म्हणजेच शरीरात पाणी कमी असेल तरी देखील हिमोग्लोबिनची पातळी वाढण्याची समस्या संभवते.
शरीरात हिमो ग्लोबिनची पातळी खूप जास्त वाढली तर, हृदय, रक्तवाहिन्या, आणि इतर अवयवांवर त्याचे नकारात्मक परिणाम होऊ शकतात. म्हणूनही पातळी नियंत्रणात ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. या प्रकारची समस्या आढळल्यास ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. डॉक्टरांद्वारे आपल्याला योग्य सल्ला तसेच उपचार मिळू शकतात ज्यामुळे या समस्येवर मात करू शकतो आणि त्यातून सुखरूप बाहेर निघू शकतो.
हिमो ग्लोबिन म्हणजे काय?
हिमो ग्लोबिन हे लाल रक्तपेशींमधील प्रथिने आहेत, जे संपूर्ण शरीरात ऑक्सिजन वाहून नेण्याचं कार्य करतात. त्यामुळे हिमो ग्लोबिन आरोग्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे. परंतु गरजेपेक्षा जास्त हिमो ग्लोबिन शरीरात जमल्यास आरोग्यासाठी ते हानिकारक ठरू शकतं.
सामान्य हिमोग्लोबिन किती असायला हवे?
शरीरात कोणत्याही घटकाचे कमी किंवा जास्त प्रमाण हे आरोग्यासाठी घातक ठरू शकतं. हिमो ग्लोबिनची पातळी पुरुषांसाठी १३.२ g/dL आणि स्त्रियांसाठी ११.६ g/dL ही सामान्य पातळी आहे, परंतु याहून कमी असल्यास वैद्यकीय उपचारांची गरज भासते. त्याचप्रमाणे हिमोग्लोबिनची पातळी वाढणे हे देखील एक चिंतेचे कारण आहे.
हिमोग्लोबिनचे आरोग्यावर काय परिणाम होतात?
हिमोग्लोबिनची पातळी अत्यधिक वाढल्यामुळे रक्त अधिक गडद होऊ शकते. याला “पॉलिसायथेमिया” म्हणतात, जिथे रक्ताची व्हिस्कॉसिटी (द्रवपणा) वाढते म्हणजेच रक्त पातळ न राहता गडद होते, यामुळे रक्ताच्या गतीवर परिणाम होतो आणि हृदय व रक्तवाहिन्यांवर अधिक ताण येतो. हिमोग्लोबिन वाढल्याने रक्त अधिक गडद होते, त्यामुळे हृदयाला जास्त मेहनत करावी लागते. यामुळे हृदयाची कार्यक्षमता कमी होऊ शकते. याच्या परिणामस्वरूप हृदयविकार, उच्च रक्तदाब किंवा हृदयासंबंधित आणखी मोठे धोके उद्भवू शकतात. हिमोग्लोबिनची वाढलेली पातळी रक्ताच्या प्रवाहावर अतिरिक्त ताण आणते, ज्यामुळे लिव्हर आणि किडनीवर दबाव येऊ शकतो. या अवयवांच्या कार्यक्षमतेवर परिणाम होऊ शकतो आणि आरोग्यावर याचा भयानक परिणाम होऊ शकतो.