हृदयरोग म्हणजे हृदय आणि रक्तवाहिन्यांसंबंधी असलेल्या आजारांचा समूह. हृदयरोगांमध्ये अनेक प्रकार असतात आणि यामुळे हृदयाची कार्यक्षमता कमी होऊ शकते. हृदयरोग हे जीवनशैलीवर आधारित असतात. आपल्या अनियमित आणि विचित्र जीवनशैली जसं की अनियमित आहार, व्यायाम तसेच तंबाखू सेवन, मद्यपान आणि मानसिक स्थितीवर ही कारणे हृदयरोगाला कारणीभूत ठरतात. हृदयरोग प्रतिबंध अत्यंत महत्वाचे ठरते.

हृदयरोगाचे प्रकार:
१) कोरोनरी धमणी रोग:
हा रोग हृदयाच्या रक्तवाहिन्यांमधील ब्लॉकेज किंवा संकुचनामुळे होतो. त्यामुळे हृदयाला रक्त पुरवठा कमी होतो, ज्यामुळे हृदयाच्या पेशींमध्ये ऑक्सिजन कमी होतो आणि हा रोग उद्भवू शकतो.
२) हृदयविकाराचा झटका:
हृदयाच्या रक्तवाहिन्या अचानक बंद होऊन हृदयाला रक्त पुरवठा होणं थांबतं. जे हृदयाच्या पेशींमध्ये नुकसानीला कारणीभूत ठरतं. आणि यामुळे हृदयविकाराचा झटका येण्याची देखील शक्यता आहे.
३) हृदयवात:
हृदयाच्या व्हॉल्वमध्ये रक्तपुरवठा योग्यरीत्या होत नसल्यास हृदयावर ताण येतो आणि हृदयवात उद्भवतो.
४) हृदयाचे अनियमित ठोके:
आपल्या जीवनशैलीमधील काही त्रुटींमुळे हृदयाचे ठोके अनियमित होतात, त्यामुळे शरीरात रक्त पुरवठा योग्यरीत्या होत नाही.
हृदयरोग होण्याची कारणे:
१) चुकीचा आहार:
आपल्या व्यस्त जीवनशैलीमुळे आपण आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतो. वेळेअभावी पौष्टिक आहार न करता बाहेरील जंक फूड खाऊन पोट भरत असतो. किंवा आपल्या आहारात अनियमितता असते. अशा आहारात केलेल्या चुकांमुळे हृदयाला हवे ते महत्वाचे घटक मिळत नाहीत आणि त्यामुळे हृदयरोग होण्याची शक्यता बळावते.
२) व्यायामाची कमतरता:
व्यायाम केल्याने शरीराची हालचाल होते आणि शरीरातील स्नायू तसेच रक्तवाहिन्या मोकळ्या होतात आणि रक्तपुरवठा सुकर होतो. परंतु नियमित व्यायाम होत नसेल तर मात्र रक्तवाहिन्या संकुचित होऊन रक्तपुरवठा होण्यासाठी अडथळा निर्माण होतो.
३) लठ्ठपणा:
शरीराच्या लठ्ठपणामुळे अंगात चरबी मोठ्या प्रमाणात निर्माण होते आणि रक्तवाहिन्या संकुचन पावतात. यामुळे रक्तप्रवाहामध्ये अडथळा येतो. याच कारणामुळे नियमित व्यायाम करणं अत्यावश्यक आहे.
४) तंबाखू व मद्यपान:
तंबाखू आणि दारूमध्ये अनेक घटक असतात जे आपल्या आरोग्यासाठी, शरीरासाठी घातक ठरतात. त्यामुळे तंबाखू आणि मद्यपानाचे सेवन जर आपण करत असाल तर आपण ते त्वरित टाळावे.
५) मधुमेह:
रक्तातील साखरेच्या पातळीची अनियमितता देखील हृदयरोग होण्यासाठी कारणीभूत ठरते. मधुमेह रोग असल्यास हृदयरोग प्रतिबंध घालणे आवश्यक ठरते.
६) उच्च रक्तदाब:
उच्च रक्तदाब म्हणजेच हाय ब्लड प्रेशरची समस्या असल्यास हृदयरोग संभावना बळावते.
छातीत दुखणे किंवा दबाव जाणवणे, श्वास घेण्यास त्रास होणे, हळूहळू थकवा जाणवणे, पाय किंवा पोट सूजणे, चक्कर येणे किंवा हलके फुलकेपणाची भावना, घाम जास्त येणे, विशेषतः आराम करत असताना मळमळ किंवा उलटी होणे ही लक्षणं दिसत असल्यास हृदयविकार असल्याची शंका बळावते. ही लक्षणं दिसत असल्यास त्वरित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
हृदयरोग प्रतिबंधासाठी काही महत्त्वाची पद्धतींचा अवलंब करणे आवश्यक आहे. हृदयरोग होण्याचे मुख्य कारण म्हणजे जीवनशैलीतील अपुरी काळजी आणि चुकीचे आहार-विहार. त्यापासून बचाव करण्यासाठी जीवनशैलीत बदल करणे गरजेचे आहे.
हृदयरोग प्रतिबंध टिप्स:
१) पौष्टिक आहार:
आपल्या आहारातील जंक फूड, तेलकट पदार्थ, जास्त मीठ टाळा आणि पोषणयुक्त, फळे, भाज्या, कडधान्ये, आणि फायबर्स असलेले पदार्थ आपल्या आहारात समाविष्ट करा.
२) नियमित व्यायाम:
शरीरात रक्तपुरवठा प्रत्येक वयात होण्यासाठी शरीर कार्यरत राहणे अत्यावश्यक आहे. यासाठी आपल्या शरीरातील सुस्ती टाळावी आणि नियमित व्यायाम करण्यास सुरुवात करावी. आपल्या जीवनशैलीत नियमित व्यायामाचा समावेश केल्यास आरोग्य सुदृढ राहते आणि हृदयरोग प्रतिबंध होतो म्हणजेच हृदयरोग होण्याचा धोका टळतो.
३) मद्यपान व धूम्रपान टाळणे:
आपल्याला जर मद्यपान व धूम्रपानाची सवय असेल तर ती त्वरित सोडावी. या सवयीमुळे तुमच्या आरोग्यावर अत्यंत वाईट परिणाम होण्याची शक्यता असते. या सवयी अनेक रोगांना आमंत्रण देते यामुळे मद्यपान व धूम्रपान ही सवय टाळावी.
४) मानसिक ताण कमी करणे:
मानसिक ताण असल्यास त्याचा परिणाम आरोग्यावर होत असतो यामुळे हृदयरोग प्रतिबंध करण्यासाठी मानसिक ताण कमी करणे अत्यावश्यक आहे.
५) वजन नियंत्रित ठेवणे:
आपल्या वजनावर नियंत्रण ठेवणं महत्वाचं आहे. वजनात वाढ झाल्याने शरीर सुस्त होते आणि हृदयाचे कार्य देखील अडचणीत येऊ शकते. त्यामुळे वजन नियंत्रण ठेवण्यासाठी नियमित व्यायाम, योग करणे आवश्यक आहे.
६) रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉलचे परीक्षण करा:
उच्च रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉल हृदयरोगाची कारणे असू शकतात, त्यामुळे हृदयरोग प्रतिबंध करण्यासाठी त्याचे नियमितपणे परीक्षण करणे महत्वाचे आहे.
७) दवाखान्यात नियमित तपासणी:
हृदयरोगाची लक्षणे ओळखण्यासाठी डॉक्टर कडे नियमितपणे जाऊन तपासणी करा. आपल्याला हृदयरोगाची लक्षणं दिसू लागल्यास त्वरित त्याची तपासणी करून त्यावर उपचार करणे अत्यावश्यक आहे. यामुळे हृदयरोग प्रतिबंध सहज होते.
हृदयरोगाची लक्षणे कोणती?
छातीत दुखणे किंवा दबाव जाणवणे, श्वास घेण्यास त्रास होणे, हळूहळू थकवा जाणवणे, पाय किंवा पोट सूजणे, चक्कर येणे किंवा हलके फुलकेपणाची भावना, घाम जास्त येणे, विशेषतः आराम करत असताना मळमळ किंवा उलटी होणे ही लक्षणं दिसत असल्यास हृदयविकार असल्याची शंका बळावते. ही लक्षणं दिसत असल्यास त्वरित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
नियमित तपासणी का महत्वाची आहे?
हृदयरोगाची लक्षणे ओळखण्यासाठी डॉक्टर कडे नियमितपणे जाऊन तपासणी करा. आपल्याला हृदयरोगाची लक्षणं दिसू लागल्यास त्वरित त्याची तपासणी करून त्यावर उपचार करणे अत्यावश्यक आहे. यामुळे हृदयरोग प्रतिबंध सहज होते.
हृदयरोग प्रतिबंध कसे करावे?