आजच्या डिजिटल युगात ऑनलाईन प्लॅटफॉर्म अत्यंत महत्वाचं आणि सोयीचं ठरत आहे. पूर्वी आपल्या आरोग्याची तपासणी करण्यासाठी तज्ज्ञांच्या क्लिनिकमध्ये जावे लागत असे, काही ठिकाणी तर क्लिनिक अत्यंत दूरवर असत. पेशंट्सना आपल्या आरोग्याची तपासणी करण्यासाठी बऱ्याच लांब जावे लागत असे, परंतु आता प्रत्येक पेशंट घरबसल्या डॉक्टरांचा सल्ला मिळवू शकतो. आणि आरोग्याची तपासणी करण्यासाठी सध्या डॉक्टरांऐवजी स्मार्टफोन वापरण्यात येतो. होय, हेल्थकेअर अॅप्स वापरून आपण आपल्या आरोग्याची नियमित आणि घरच्या घरी तपासणी करण्यास यशस्वी ठरतो. हे हेल्थकेअर अॅप्स फक्त आपल्याला आरोग्याची माहिती देत नाहीत, तर ती आपल्या आरोग्याच्या स्थितीवर लक्ष ठेवून, योग्य मार्गदर्शन देखील करतात. चला, हेल्थकेअर अॅप्सच्या काही महत्त्वाच्या फायद्यांबद्दल चर्चा करूया.
जाणून घ्या- घरबसल्या आरोग्य तपासणी आता एका क्लिक वर! ४ अॅप्सची माहिती!
१) आरोग्य ट्रॅकिंग:
हेल्थकेअर अॅप्स आपल्याला आपल्या शारीरिक स्थितीचे ट्रॅकिंग करण्याची सुविधा देतात. यामध्ये चालणे, धावणे, कॅलोरी बर्न, हार्ट रेट, स्लीप सायकल इत्यादी गोष्टींचे मोजमाप करणे समाविष्ट आहे. या माहितीचा उपयोग करून आपल्याला आपल्या आरोग्याची काळजी अत्यंत सोयीस्कररित्या घेता येते. यामुळे आपले आपल्या आरोग्याकडे लक्ष राहते आणि आपण आपले आरोग्य सुधरवण्यास सक्षम होतो.

२) डॉक्टरचा सल्ला:
काही हेल्थकेअर अॅप्स डॉक्टरांची ऑनलाईन कन्सल्टेशनची सुविधा देखील देतात. यामुळे, जेव्हा डॉक्टरांशी प्रत्यक्ष भेट देणे शक्य नसते तेव्हा आपल्याला एखाद्या लक्षणाबद्दल त्वरित सल्ला घेता येतो. हे आपल्याला त्वरित उपचार घेण्याची संधी प्रदान करते. यावेळी सर्दी, खोकला, ताप या सामान्य समस्येपासून ते हृदयविकार, हायपरटेन्शन, ब्लडप्रेशर, मधुमेह अशा मोठमोठ्या आजारांवर देखील डॉक्टरांचा सल्ला या अॅप्सद्वारे मिळणं शक्य आहे.
३) मेडिकल रेकॉर्ड्स:
हेल्थकेअर अॅप्स आपली वैद्यकीय माहिती, टेस्ट रिपोर्ट्स, औषधांची माहिती इत्यादी एकाच ठिकाणी साठवू शकतात. यामुळे, आपल्याला आपला आरोग्य इतिहास पुन्हा शोधणे, किंवा आपातकालीन परिस्थितीत सुलभता मिळवणे सोपे होते. आपल्या आरोग्याची तसेच त्याच्या रिपोर्ट्सची काळजी हे अॅप्स घेत असतात, त्यामुळे आपण निर्धास्त राहू शकतो.
४) मानसिक आरोग्य:
आरोग्य फक्त शारीरिकच नाही तर मानसिक असू शकते. काही हेल्थकेअर अॅप्स मानसिक आरोग्य, मानसिक तणाव कमी करण्याच्या उपायांवर लक्ष केंद्रित करतात. यामुळे आपल्या मानसिक स्वास्थ्याचे निरीक्षण आणि देखभाल करणे शक्य होते. या अॅप्सच्या मदतीने आपण आपली मनस्थिती सुदृश ठेवण्यात यशस्वी ठरू शकतो.
५) न्यूट्रिशन आणि डायट ट्रॅकिंग:
आपल्या आहाराची योग्य माहिती ठेवणे आणि त्याचे संतुलन राखणे खूप महत्त्वाचे आहे. हेल्थकेअर अॅप्स आपल्या आहाराचे मोजमाप करतात, कॅलोरीज काउंट करतात आणि योग्य आहारसल्ला देतात. यामुळे वजन कमी करणे किंवा निरोगी जीवनशैली पाळणे सोपे होते.
६) घरपोच औषधांचा पुरवठा:
कोणत्याही औषधाची आवश्यकता असल्यास, या अॅप्समधून ते ऑनलाइन ऑर्डर करू शकता. यामुळे आपल्याला फिजिकल स्टोअर्सला भेट देण्याची गरज नसते, आणि आपली औषधे जलद आणि सोप्या पद्धतीने मिळवता येतात.

७) चाचणी आणि रिपोर्ट्स:
काही अॅप्समध्ये चाचण्या आणि टेस्टिंग सर्विसेस उपलब्ध करतात. त्यामुळे आपल्याला आपले रिपोर्ट्स पाहण्यासाठी डॉक्टरकडे जाण्याची आवश्यकता नाही.
हेल्थकेअर अॅप्स आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी एक उत्कृष्ट साधन आहेत. ते एकाच ठिकाणी विविध सेवा पुरवतात, ज्यामुळे आपल्याला आरोग्याची निगा राखणे, उपचार घेणे आणि जीवनशैली सुधारणा करणे खूपच सोपे होते. आपण आपल्या स्मार्टफोनचा वापर आपल्या आरोग्यासाठी किती फायदेशीर ठरवू शकतो, हे पाहिल्यानंतर हे स्पष्ट आहे कीहेल्थकेअर अॅप्स भविष्यात आरोग्य व्यवस्थापनाचा अविभाज्य भाग बनतील.
हेल्थकेअर अॅप्स म्हणजे काय?
आजच्या डिजिटल युगात ऑनलाईन प्लॅटफॉर्म अत्यंत महत्वाचं आणि सोयीचं ठरत आहे. पूर्वी आपल्या आरोग्याची तपासणी करण्यासाठी तज्ज्ञांच्या क्लिनिकमध्ये जावे लागत असे, काही ठिकाणी तर क्लिनिक अत्यंत दूरवर असत. पेशंट्सना आपल्या आरोग्याची तपासणी करण्यासाठी बऱ्याच लांब जावे लागत असे, परंतु आता प्रत्येक पेशंट घरबसल्या डॉक्टरांचा सल्ला मिळवू शकतो. आणि आरोग्याची तपासणी करण्यासाठी सध्या डॉक्टरांऐवजी स्मार्टफोन वापरण्यात येतो. होय, हेल्थकेयर अॅप्स वापरून आपण आपल्या आरोग्याची नियमित आणि घरच्या घरी तपासणी करण्यास यशस्वी ठरतो. हे हेल्थकेयर
अॅप्स फक्त आपल्याला आरोग्याची माहिती देत नाहीत, तर ती आपल्या आरोग्याच्या स्थितीवर लक्ष ठेवून, योग्य मार्गदर्शन देखील करतात. चला, हेल्थकेअर अॅप्सच्या काही महत्त्वाच्या फायद्यांबद्दल चर्चा करूया.
हेल्थकेअर अॅप्सचा काय फायदा?
हेल्थकेअर अॅप्स आपल्याला आपल्या शारीरिक स्थितीचे ट्रॅकिंग करण्याची सुविधा देतात. यामध्ये चालणे, धावणे, कॅलोरी बर्न, हार्ट रेट, स्लीप सायकल इत्यादी गोष्टींचे मोजमाप करणे समाविष्ट आहे. या माहितीचा उपयोग करून आपल्याला आपल्या आरोग्याची काळजी अत्यंत सोयीस्कररित्या घेता येते. यामुळे आपले आपल्या आरोग्याकडे लक्ष राहते आणि आपण आपले आरोग्य सुधरवण्यास सक्षम होतो. काही हेल्थकेअर अॅप्स डॉक्टरांची ऑनलाईन कन्सल्टेशनची सुविधा देखील देतात. यामुळे,
जेव्हा डॉक्टरांशी प्रत्यक्ष भेट देणे शक्य नसते तेव्हा आपल्याला एखाद्या लक्षणाबद्दल त्वरित सल्ला घेता येतो. हे आपल्याला त्वरित उपचार घेण्याची संधी प्रदान करते. यावेळी सर्दी, खोकला, ताप या सामान्य समस्येपासून ते हृदयविकार, हायपरटेन्शन, ब्लडप्रेशर, मधुमेह अशा मोठमोठ्या आजारांवर देखील डॉक्टरांचा सल्ला या अॅप्सद्वारे मिळणं शक्य आहे.