नेत्रपटल म्हणजे डोळ्यांच्या मागील एक पातळ पडदा त्यावर चित्र तयार होऊन ते ऑप्टिक नर्व्हद्वारे मेंदूपर्यंत पोहोचते. जर नेत्रपटलात काही समस्या निर्माण झाली, तर दृष्टीवर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो. अशा वेळी दुरुस्ती नेत्रपटलाची करणे अत्यंत आवश्यक आहे नाहीतर त्यामुळे आपल्या दृष्टीवर मोठ्या प्रमाणात धोका निर्माण होऊ शकतो. प्रथम आपण नेत्रपटलाच्या समस्या पाहुयात ज्यापासून आपण काळजी घेणे आवश्यक आहे.
आणखी वाचा- डोळ्यांचे आरोग्य सांभाळण्यासाठी ८ महत्वाच्या टिप्स!
दुरुस्ती नेत्रपटलाची: नेत्रपटल समस्या
१) रॅटीनल डिटॅचमेंट:
रॅटीनल डिटॅचमेंट अर्थात नेत्रपटलाची वेगळीक म्हणजे नेत्रपटल डोळ्याच्या आतील भागापासून वेगळं होणं. यामुळे दृष्टीला हानी होऊ शकते किंवा दृष्टी पूर्णतः नष्ट होऊ शकते. ही समस्या वेगवेगळ्या कारणांमुळे होऊ शकते, उदाहरणार्थ आघात, अपघात, वयातील बदल, डोळ्याच्या इन्फेक्शनमुळे, मॅक्युला क्षेत्रातील छिद्र यामुळे ही समस्या उद्भवू शकते.

२) डायबिटिक रेटिनोपॅथी:
डायबिटीजमुळे रक्तवाहिन्यांमध्ये खराबी येते आणि त्यामुळे नेत्रपटलावर रक्तस्राव होऊ शकतो. यामुळे दृष्टी धूसर होऊ शकते. डायबिटिक रेटिनोपथीच्या लक्षणांमध्ये धूसर किंवा बदललेली दृष्टी, रंगातील वेगळेपण ही लक्षणे समाविष्ट आहेत.
३) मॅक्युलर डेनेरेशन:
ही एक सामान्य समस्या आहे, विशेषतः वृद्ध लोकांमध्ये ही समस्या उद्भवते. यामध्ये नेत्रपटलाचा मॅक्युला (दृष्टीचा केंद्रभाग) कमी होतो आणि त्यामुळे स्पष्ट दृष्टीवर परिणाम होतो. मॅक्युलर डेनेरेशन दोन्ही प्रकारांमध्ये असू शकते, एक म्हणजे कोरडेपणा आणि दुसरा म्हणजे ओलावा.
४) रेटिनल व्हेन ऑक्लुजन:
याचा अर्थ रेटिनल रक्तवाहिन्यांमध्ये अडथळे येणे. यामुळे नेत्रपटलावर रक्तस्राव होण्याची शक्यता वर्तवता येते. यामुळे दृष्टीवर परिणाम होऊ शकतो.
५) रेटिनल आर्टरी ऑक्लुजन:
रेटिनल आर्टरी ऑक्लुजन म्हणजे रेटिनातून रक्त वाहून नेणाऱ्या रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा येणे. यामुळे अचानक दृष्टी अधू होऊ शकते. ही समस्या सामान्यत: स्ट्रोक किंवा हृदयविकारांमुळे होऊ शकते.
नेत्रपटलाच्या समस्या आपल्या दृष्टीवर गंभीर परिणाम करू शकतात. त्यामुळे, याचे त्वरित निदान आणि यावर त्वरित उपचार आवश्यक आहे. जर तुम्हाला वरील कोणतेही लक्षण दिसत असल्यास, जसे की धूसर दृष्टी, फ्लोटर्स दिसणे, प्रकाशाच्या चमकाचे लक्षण, तर त्वरित नेत्रतज्ञांकडून तपासणी करा. योग्य उपचारामुळे दृष्टीचे नुकसान टाळता येऊ शकते. आता आपण दुरुस्ती नेत्रपटलाची याची माहिती पाहुयात.
दुरुस्ती नेत्रपटलाची: दुरुस्ती पद्धती
१) लेजर थेरपी:
लेजर थेरपी ही एक अत्याधुनिक वैद्यकीय उपचार पद्धत आहे, यामध्ये एक विशेष लेझर उपकरणाचा वापर करून नेत्रपटलावर असलेल्या समस्येच्या ठिकाणी लेझर किरणांचा वापर केला जातो. हे विकार असलेल्या भागांना स्थिर ठेवण्याचे काम करते.

२) क्रायोथेरपी:
क्रायोथेरपी मध्ये, टिशू फ्रीझ करण्यासाठी थंड पदार्थांचा वापर केला जातो. या पद्धतीचा वापर मुख्यत: रक्तवाहिन्यांच्या विकारांना थांबवण्यासाठी केला जातो.
३) सर्जिकल दुरुस्ती:
काही वेळा शस्त्रक्रियेद्वारे, नेत्रपटलाची वेगळीक किंवा इतर विकार शस्त्रक्रियेने दुरुस्त केले जातात. या प्रक्रियेत नेत्रपटलाना पुन्हा जोडणे किंवा इंप्लांट करणे आवश्यक असू शकते.
४) विक्ट्रेक्टॉमी:
डोळ्यातील पडदा आणि काचेच्या काही समस्यांवर उपचार करण्यासाठी विक्ट्रेक्टॉमी ही डोळ्यांची शस्त्रक्रिया आहे. प्रक्रियेदरम्यान, तुमचे शल्यचिकित्सक व्हिट्रीयस काढून टाकतात आणि त्याच्या जागी दुसरे द्रावण देतात. व्हिट्रीयस हा जेलसारखा पदार्थ आहे जो तुमच्या डोळ्यांच्या मागील भागाला भरतो.
दुरुस्ती नेत्रपटलाची याचे फायदे अनेक आहेत. यामुळे दृष्टी सुधारते आणि आणखी उजळते. दुरुस्ती नत्रपटलाची यामुळे दृष्टीला होणारे विकार तसेच दृष्टीचे होणारे नुकसान टाळता येते. चांगल्या उपचारांद्वारे दृष्टी दीर्घकाळ ठेवण्यात मदत होते. दुरुस्ती नेत्रपटलाची यामध्ये अत्यंत महत्त्वाचे उपचार आहेत, ज्यामुळे अनेक दृष्टीविकारांवर मात केली जाऊ शकते. यासाठी वेळेवर योग्य उपचार घेणं आवश्यक आहे, कारण दृष्टीसंबंधी समस्यांचे प्रारंभिक स्टेजवर उपचार केल्यास परिणाम चांगले असतात. तसेच, नेत्रपटलाच्या दुरुस्तीच्या प्रक्रियेसाठी तज्ज्ञ डॉक्टर्सकडून मार्गदर्शन घेतल्यास दृष्टी पुन्हा मिळवण्याची शक्यता अधिक असते. अशाप्रकारे, नेत्रपटलाच्या दुरुस्तीच्या प्रक्रिया यशस्वीपणे राबवून आपली दृष्टी पुन्हा एकदा तंदुरुस्त केली जाऊ शकते.
नेत्रपटल म्हणजे काय?
नेत्रपटल म्हणजे डोळ्यांच्या मागील एक पातळ पडदा त्यावर चित्र तयार होऊन ते ऑप्टिक नर्व्हद्वारे मेंदूपर्यंत पोहोचते. जर नेत्रपटलात काही समस्या निर्माण झाली, तर दृष्टीवर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो. अशा वेळी दुरुस्ती नेत्रपटलाची करणे अत्यंत आवश्यक आहे नाहीतर त्यामुळे आपल्या दृष्टीवर मोठ्या प्रमाणात धोका निर्माण होऊ शकतो.
नेत्रपटलाच्या समस्या कोणत्या?
रॅटीनल डिटॅचमेंट अर्थात नेत्रपटलाची वेगळीक म्हणजे नेत्रपटल डोळ्याच्या आतील भागापासून वेगळं होणं. यामुळे दृष्टीला हानी होऊ शकते किंवा दृष्टी पूर्णतः नष्ट होऊ शकते. ही समस्या वेगवेगळ्या कारणांमुळे होऊ शकते, उदाहरणार्थ आघात, अपघात, वयातील बदल, डोळ्याच्या इन्फेक्शनमुळे, मॅक्युला क्षेत्रातील छिद्र यामुळे ही समस्या उद्भवू शकते. डायबिटीजमुळे रक्तवाहिन्यांमध्ये खराबी येते आणि त्यामुळे नेत्रपटलावर रक्तस्राव होऊ शकतो. यामुळे दृष्टी धूसर होऊ शकते. डायबिटिक रेटिनोपथीच्या लक्षणांमध्ये धूसर किंवा बदललेली दृष्टी, रंगातील वेगळेपण ही लक्षणे समाविष्ट आहेत.
रेटिनल व्हेन ऑक्लुजन आणि रेटिनल आर्टरी ऑक्लुजन यात फरक काय?
रेटिनल व्हेन ऑक्लुजन याचा अर्थ रेटिनल रक्तवाहिन्यांमध्ये अडथळे येणे. यामुळे नेत्रपटलावर रक्तस्राव होण्याची शक्यता वर्तवता येते. यामुळे दृष्टीवर परिणाम होऊ शकतो. तर रेटिनल आर्टरी ऑक्लुजन म्हणजे रेटिनातून रक्त वाहून नेणाऱ्या रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा येणे. यामुळे अचानक दृष्टी अधू होऊ शकते. ही समस्या सामान्यत: स्ट्रोक किंवा हृदयविकारांमुळे होऊ शकते.