डोळे हा आपल्या शरीरातील सर्वात महत्वाचा आणि संवेदनशील अवयव आहे. यामुळे आपण भोवतालच्या निसर्गाचा तसेच घडामोडींचा अनुभव घेऊ शकतो. यामुळे डोळ्यांची काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे. परंतु डोळ्यांची काळजी कशी घ्यावी हा प्रश्न प्रत्येकालाच पडलेला असतो. आजच्या लेखात आपण डोळ्यांचे आरोग्य कसे जपावे यासंदर्भात माहिती मिळवणार आहोत.
डोळ्यांचे आरोग्य सांभाळण्यासाठी टिप्स:
१) इलेक्रॉनिक डिव्हाइसेसचा अतिरेक टाळा:
आजकाल फोन, लॅपटॉप, टॅब, टीव्ही या सर्व इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेसचा तरुण पिढीद्वारे तसेच लहान मुलांद्वारे देखील अतिरेक होतानाचे चित्र दिसून येते. दिवसभर मोबाईल आणि टीव्ही पाहत जेवण वगैरे अशा सर्व दिनचर्या करण्यात येतात. परंतु याचा अतिरेक आपल्या डोळ्यांना मोठ्या प्रमाणावर नुकसान करू शकेल याची माहिती आपल्याला आहे का? डोळे अतिशय नाजूक असतात आणि डोळ्यांमध्ये मोबाईल तसेच इतर इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेसची ब्लु किरणे पडल्याने त्यांच्यावर परिणाम होऊ शकतो. आपल्या नियमित दिनचर्येत या डिव्हाइसेसना विशिष्ट वेळ वापरासाठी द्यावा. याच्या आहारी जाऊ नये.
२) पौष्टिक आहार:
निरोगी दृष्टी राखण्यासाठी संतुलित तसेच पौष्टिक आहार घेणे अत्यावश्यक आहे. डोळ्यांचे आरोग्य चांगले व्हावे यासाठी प्रथिने तसेच अनेक जीवनसत्वांनी संपन्न असलेला आहार घेणे गरजेचे आहे. तुमच्या आहारात विविध ताजी फळे, पालेभाज्यांचा समावेश असावा. ज्या आहारामध्ये व्हिटॅमिन A उपलब्ध आहे असा आहार आपल्या दैनंदिन जीवनात समाविष्ट केल्याने दृष्टी निरोगी राहण्यास मदत होते.

३) डोळ्यांना विश्रांती द्या:
डोळ्यांना जास्त ताण देऊन काम करणे, मोबाईल किंवा टीव्ही पाहणे तसेच सतत पुस्तक वाचणे हे देखील डोळ्यांचे आरोग्य बिघडवण्यास कारणीभूत ठरू शकेल, त्यामुळे डोळ्यांना विश्रांतीची अत्यंत गरज आहे. दिवसातून थोडा वेळ डोळे बंद करून ठेवावे, यामुळे पुन्हा आपल्या कामासाठी सज्ज होण्यास ते पूर्णतः समर्थ असतात.
४) संरक्षणासाठी चष्मा घाला:
सूर्याच्या हानिकारक किरणांना तसेच संगणकाच्या स्क्रीनला सतत तोंड दिल्यास दृष्टीला गंभीर नुकसान होऊ शकते. शिवाय, यामुळे मोतीबिंदू आणि वयाशी संबंधित काचबिंदूचा धोका निर्माण होऊ शकतो. म्हणूनच, तुम्ही बाहेर सनग्लासेस घालून आणि पीसीवर काम करताना ब्लू-कट अँटी-ग्लेअर ग्लासेस वापरून तुमच्या डोळ्यांचे संरक्षण केले पाहिजे. असे संरक्षणात्मक चष्मे १००% पर्यंत अतिनील किरणोत्सर्ग रोखतात.
५) पाणी पिणे:
भरपूर पाणी प्यायल्याने शरीरातील विषारी घटक बाहेर पडण्यास मदत होते आणि संपूर्ण शरीर स्वच्छ राहते. सोबतच डोळे देखील स्वच्छ राहतात. शरीरातील पाणी कमी झाल्याने हायड्रेशन कमी होते आणि डोळे कोरडे होण्याची शक्यता उद्भवते. यामुळे सतत पाणी पिणे डोळ्यांसाठी लाभदायक आहे.
६) डोळ्यांची नियमित तपासणी:
डोळ्यांचे आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी त्यांची नियमित तपासणी करणे आवश्यक आहे. या तपासणीमुळे आपल्याला चष्म्याची आवश्यकता आहे का हे कळू शकते किंवा डोळ्यांमध्ये इतर काही समस्यांची पूर्वसूचना मिळू शकते.

७) चांगली झोप:
चांगली झोप हे डोळ्यांचे आरोग्य राखण्यासारखी अत्यंत महत्वाची बाब आहे. झोप पूर्ण न झाल्यास डोळ्यांमध्ये थकवा जाणवतो तसेच आपल्याला धुरकट दिसण्यास सुरुवात होते. त्यामुळे चांगली झोप घेणं दृष्टी राखण्यासाठी गरजेचं ठरतं.
८) २०-२०-२० नियमाचे पालन:
आपल्या रोजच्या दिनचर्येत २०-२०-२० नियमाचे पालन करावे. म्हणजे काय? तर प्रत्येक २० मिनिटांनी २० सेकंदापर्यंत २० फूट अंतरावर असलेल्या कोणत्याही वस्तूवर लक्ष केंद्रित करायचं. यामुळे स्क्रीनकडे पाहण्यापासून आराम मिळतो तसेच दृष्टीची केन्द्रशक्ती वाढते. ऑफिसमध्ये काम करणाऱ्या वर्गासाठी हे नियम अत्यंत उपयोगी ठरतील.
डोळे ही आपल्या अवयवातील सर्वात महत्वाचा अवयव आहे. आपण जी स्वप्न पाहत आहोत ती आपल्या डोळ्यांमुळेच पाहत असतो. डोळ्यांमुळे आपल्याला हे संपूर्ण जग दिसत असतं, यामुळे डोळ्यांची काळजी घेणं हे आपलं कर्तव्य आहे. डोळ्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी नियमित दक्षता घ्यावी.
डोळ्यांची काळजी घेणं महत्वाचं का आहे?
डोळे हा आपल्या शरीरातील सर्वात महत्वाचा आणि संवेदनशील अवयव आहे. यामुळे आपण भोवतालच्या निसर्गाचा तसेच घडामोडींचा अनुभव घेऊ शकतो. यामुळे डोळ्यांची काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे. परंतु डोळ्यांची काळजी कशी घ्यावी हा प्रश्न प्रत्येकालाच पडलेला असतो. आजच्या लेखात आपण डोळ्यांचे आरोग्य कसे जपावे यासंदर्भात माहिती मिळवणार आहोत.
मोबाईल जास्त वापरल्याने काय होते?
आजकाल फोन, लॅपटॉप, टॅब, टीव्ही या सर्व इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेसचा तरुण पिढीद्वारे तसेच लहान मुलांद्वारे देखील अतिरेक होतानाचे चित्र दिसून येते. दिवसभर मोबाईल आणि टीव्ही पाहत जेवण वगैरे अशा सर्व दिनचर्या करण्यात येतात. परंतु याचा अतिरेक आपल्या डोळ्यांना मोठ्या प्रमाणावर नुकसान करू शकेल याची माहिती आपल्याला आहे का? डोळे अतिशय नाजूक असतात आणि डोळ्यांमध्ये मोबाईल तसेच इतर इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेसची ब्लु किरणे पडल्याने त्यांच्यावर परिणाम होऊ शकतो. आपल्या नियमित दिनचर्येत या डिव्हाइसेसना विशिष्ट वेळ वापरासाठी द्यावा. याच्या आहारी जाऊ नये.
२०-२०-२० नियम म्हणजे काय?