आरोग्यासाठी स्मार्ट गॅझेट्स: हे ८ गॅझेट्स ठाऊक आहेत का?

पूर्वी तब्येत बिघडली असल्यास त्याचे निदान माहित करून घेण्यासाठी देखील डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करावी लागत असे. परंतु आजच्या डिजिटल युगात आरोग्यासाठी स्मार्ट गॅझेट्स चा असा शोध लागला आहे की प्रत्येक सेकंदाला आपल्याला आपल्या आरोग्याची माहिती मिळू शकते. हेच स्मार्ट गॅझेट्स आपल्या आरोग्याची काळजी घेण्यास तत्पर आहेत. आणि या गॅझेट्समुळे आपल्याला स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणं अत्यंत सोयीस्कर झालं आहे. ही गॅझेट्स आपल्या नियमित वापरासाठी अत्यंत उपयुक्त ठरू शकतील. आपल्या निरोगी आरोग्यासाठी तत्पर असणाऱ्या व्यक्तींनी आपल्या नियमित जीवनशैलीत या गॅझेट्सचा वापर नक्कीच करावा!

आरोग्यासाठी स्मार्ट गॅझेट्स पुढीलप्रमाणे:

१) स्मार्ट वॉच:

स्मार्ट वॉच हे अत्यंत सोपं आणि स्मार्ट उपकरण आहे जे आपण २४ तास सोबत हातात घालून स्वतःच्या आरोग्याची तपासणी कधीही करू शकतो. ही स्मार्ट वॉच आपल्या आरोग्यावर नेहमी वॉच ठेवून असते आणि याचा फायदा म्हणजे आपण आपल्या आरोग्याबाबत अलर्ट असतो. या गॅझेटमध्ये फक्त वेळच नाही तर हृदयाचे ठोके, रक्तदाब, कधी चालत आहात किंवा बसले आहात, किती पावलं चाललात हे ट्रॅक करण्याची क्षमता आहे. आरोग्यासाठी स्मार्ट गॅझेट्स पैकी हे गॅझेट वापरण्यासाठी देखील अत्यंत सोपं आहे. 

आरोग्यासाठी स्मार्ट गॅझेट्स

२) फिटनेस ट्रॅकर्स:

फिटनेस ट्रॅकर्सने तुम्ही किती पावले चालले, किती कॅलरी खर्च केल्या आणि झोप कितपत चांगली होत आहे याची माहिती देऊ शकतात. यामुळे तुम्ही आपल्या दैनिक जीवनात अधिक सक्रिय होण्यासाठी प्रेरित होऊ शकता. आपल्याकडून जर चालणे कमी होत असेल तर त्यात आपण याच्या मदतीने प्रगती करू शकतो. आपला फिटनेस हा आपल्याला आणखीन निरोगी बनवत असतो त्यामुळे हे गॅझेट खूपच उपयुक्त आहे. 

३) स्मार्ट वेट स्केल्स:

४) स्मार्ट हायड्रेशन बॉटल्स:

अनेकदा बिझी असल्याने आपण पाणी पिणे विसरून जातो. स्मार्ट हायड्रेशन बॉटल्स तुम्हाला नियमितपणे पाणी पिण्याची आठवण करून देतात. काही हायड्रेशन बॉटल्समध्ये पाणी पिऊन घेतल्यावर तुम्ही किती पाणी प्याल हे ट्रॅक करण्याची प्रणाली असते. या गॅझेटमुळे आपल्या रोजच्या पाणी पिण्याच्या प्रमाणात बदल घडेल आणि त्वचा तजेलदार राहण्यास तसेच शरीरातील विषारी घटक पाण्याद्वारे बाहेर पडण्यास मदत होईल. 

५) स्मार्ट बेड:

स्मार्ट बेड्स तुमच्या झोपेचा दर्जा आणि वेळ ट्रॅक करतात. ते तुमच्या झोपेच्या पद्धतीवर आधारित सल्ला देखील देऊ शकतात. या बेडमध्ये तापमान समायोजन, हलक्या आणि गडद झोपेच्या फेजला ट्रॅक करण्याची क्षमता असते, जे शरीराच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. आपली झोप आपल्या निरोगी आयुष्यासाठी अत्यंत महत्वाचा घटक आहे. झोप व्यवस्थित झाल्यास आपले आरोग्य सुदृढ आहे हे आपण ओळखू शकतो. यामुळे स्मार्ट बेड हे गॅझेट अत्यंत उपयोगाचे आहे. 

६) स्मार्ट ब्रीदिंग गॅझेट्स:

ताण आणि मानसिक आरोग्य देखील शारीरिक आरोग्याच्या बाबतीत महत्त्वाचे आहे. काही स्मार्ट गॅझेट्स श्वासोश्वासाचे मॉनिटर करतात आणि तुम्हाला ताण कमी करण्यासाठी श्वासाचे व्यायाम सुचवतात. आपल्या रोजच्या दिनचर्येत व्यायामाचे खूप महत्व आहे, परंतु त्याबाबत आपल्याला मार्गदर्शन मिळणे देखील तितकेच गरजेचे आहे आणि त्यामुळे स्मार्ट ब्रीदिंग गॅझेट हे आपल्यासाठी गाईड म्हणून उपयोगी ठरू शकेल.  

७) स्मार्ट हेल्थ मॉनिटरिंग डिव्हाइसेस:

रक्तदाब, शुगर लेव्हल्स, हृदयाचे ठोके मोजणारे आणि इतर काही आरोग्य मापदंड मोजणारे डिव्हाइसेस देखील बाजारात उपलब्ध आहेत. या डिव्हाइसेसने तुम्ही नियमितपणे आपल्या आरोग्याचा मागोवा ठेवू शकता आणि आवश्यक तेव्हा डॉक्टरांशी संपर्क साधू शकता. शुगर लेव्हल, बीपी हे चेक करण्यासाठी आता डॉक्टरांची भेट घेण्याची गरज नाही. या गोष्टी आता आपण या स्मार्ट हेल्थ मॉनिटरिंग डिव्हाइसच्या माध्यमाने स्वतः घरबसल्या करू शकतो. 

आरोग्यासाठी स्मार्ट गॅझेट्स

८) महिलांसाठी उपयुक्त ऍप्स:

मोबाईलवर देखील असे अनेक ऍप्स उपलब्ध आहेत जे आपल्या आरोग्याची माहिती आपल्यापर्यंत पोहोचवत असतात, परंतु महिलांसाठी दर महिन्याचा ठरलेला आरोग्यविषयक प्रश्न म्हणजे मासिक पाळी. अनेक कारणास्तव महिला त्यांची तारीख विसरत असतात आणि त्याबाबत पूर्वतयारी करण्यास विसरू शकतात. अशावेळी पिरियड ट्रॅकर हे ऍप अत्यंत उपयोगी ठरते. तारखेपूर्वी ते महिलांना रिमाइंडर देत असतं तसेच त्यांचे त्या काळातील आरोग्य, फ्लो याकडे देखील ते ऍप काळजीपूर्वक लक्ष देत असतं आणि त्याविषयी माहिती देऊन महिलांना सतर्क करत असतं. 

स्मार्ट गॅझेट्स आज तुमच्या आरोग्याची काळजी घेण्यास तसेच जीवनशैली सुधारण्यास मदत करण्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकतात. हे गॅझेट्स तुम्हाला आपल्या आरोग्याची स्थिती कधीही आणि कुठेही तपासण्यासाठी मदत करतात. मात्र, याद्वारे मिळालेल्या माहितीचा योग्य प्रकारे उपयोग करणे आणि तज्ञांच्या सल्ल्यानुसार पावले उचलणे आवश्यक आहे. आरोग्यासाठी स्मार्ट गॅझेट्स चा वापर आपण सर्वांनीच करणं हे आजच्या युगात महत्वपूर्ण ठरत आहे. जसे आरोग्यासाठी स्मार्ट गॅझेट्स येत आहेत तसेच आपणही ते वापरण्यास तंत्रज्ञानाबाबतीत स्मार्ट होणं आवश्यक आहे. 

आरोग्यासाठी स्मार्ट गॅझेट्स कोणते?

स्मार्ट वॉच, फिटनेस ट्रॅकर्स, स्मार्ट वेट स्केल्स, स्मार्ट हायड्रेशन बॉटल्स, स्मार्ट बेड, स्मार्ट ब्रीदिंग गॅझेट्स, 
स्मार्ट हेल्थ मॉनिटरिंग डिव्हाइसेस, महिलांसाठी उपयुक्त ऍप्स इत्यादी आरोग्यासाठी स्मार्ट गॅझेट्स उपलब्ध आहेत.

स्मार्ट वॉच महत्वाचे का आहे?

स्मार्ट वॉच हे अत्यंत सोपं आणि स्मार्ट उपकरण आहे जे आपण २४ तास सोबत हातात घालून स्वतःच्या आरोग्याची तपासणी कधीही करू शकतो. ही स्मार्ट वॉच आपल्या आरोग्यावर नेहमी वॉच ठेवून असते आणि याचा फायदा म्हणजे आपण आपल्या आरोग्याबाबत अलर्ट असतो. या गॅझेटमध्ये फक्त वेळच नाही तर हृदयाचे ठोके, रक्तदाब, कधी चालत आहात किंवा बसले आहात, किती पावलं चाललात हे ट्रॅक करण्याची क्षमता आहे. आरोग्यासाठी स्मार्ट गॅझेट्स पैकी हे गॅझेट वापरण्यासाठी देखील अत्यंत सोपं आहे. 

स्मार्ट गॅझेट्स का महत्वाचे ठरतात?

स्मार्ट गॅझेट्स आज तुमच्या आरोग्याची काळजी घेण्यास तसेच जीवनशैली सुधारण्यास मदत करण्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकतात. हे गॅझेट्स तुम्हाला आपल्या आरोग्याची स्थिती कधीही आणि कुठेही तपासण्यासाठी मदत करतात. मात्र, याद्वारे मिळालेल्या माहितीचा योग्य प्रकारे उपयोग करणे आणि तज्ञांच्या सल्ल्यानुसार पावले उचलणे आवश्यक आहे. आरोग्यासाठी स्मार्ट गॅझेट्स चा वापर आपण सर्वांनीच करणं हे आजच्या युगात महत्वपूर्ण ठरत आहे. जसे आरोग्यासाठी स्मार्ट गॅझेट्स येत आहेत तसेच आपणही ते वापरण्यास तंत्रज्ञानाबाबतीत स्मार्ट होणं आवश्यक आहे.

Leave a Comment