मधुमेह व जीवनशैली रोग टाळा, आपली जीवनशैली सुधारा!

या विषयाशी संबंधित काही लेख- हिवाळ्यातील आहार: सुदृढ आणि निरोगी आरोग्याकडे वाटचाल!

मधुमेह व जीवनशैली रोग टाळा

मधुमेह (Diabetes)

मधुमेह हा एक जीवनशैली रोग आहे ज्यामुळे शरीरात इन्सुलिनचं उत्पादन कमी होतं आणि कार्य व्यवस्थित होत नाही. इन्सुलिन हा शरीरासाठी आवश्यक असा हॉर्मोन आहे जो रक्तातील ग्लुकोज पातळी नियंत्रित करतो. जेव्हा शरीर इन्सुलिनचे योग्य प्रमाण तयार करत नाही किंवा इन्सुलिनला योग्य प्रकारे वापरू शकत नाही, तेव्हा रक्तातील ग्लुकोज ( साखर ) पातळी वाढते आणि मधुमेह होतो.

मधुमेहाचे प्रकार:

टाईप 1 मधुमेह: 

हा प्रकार साधारणपणे लहान वयात होतो. यामध्ये शरीर इन्सुलिन तयार करणे पूर्णपणे थांबवते.

टाईप 2 मधुमेह: 

हा प्रकार सामान्यत: प्रौढांमध्ये आणि वयस्क व्यक्तींमध्ये दिसतो. यामध्ये शरीर इन्सुलिन निर्माण करते, परंतु त्याचा वापर शरीरात योग्य प्रकारे होत नाही.

गर्भधारणेमधील मधुमेह (Gestational Diabetes): 

गर्भवती महिलांमध्ये असलेल्या असामान्य ग्लुकोजच्या पातळीला “गर्भधारणेमधील मधुमेह” म्हटले जाते. 

मधुमेह व जीवनशैली रोग यांची कारणे:

१) अस्वस्थ आहार:

आपला आहार नियमित असेल, त्यात मोठ्या प्रमाणात जीवनसत्व नसतील, आहार वेळच्या वेळी होत नसेल तर मधुमेह व जीवनशैली रोग उद्भवतात. आपला आहार नियमित व पौष्टिक असावा याची काळजी आपण घेतली पाहिजे. यामुळे आपण निरोगी राहण्यास मदत होईल. 

२) व्यायामाची कमतरता:

निरोगी आरोग्यासाठी नियमित व्यायामाची आवश्यकता असते. आपल्या शरीराची हालचाल होणे अत्यंत महत्वाचे आहे. नियमित व्यायाम न नेल्याने अनेक जीवनशैली रोग उद्भवू शकतात. त्यामुळे आपल्या सुदृढ आरोग्यासाठी नियमित अर्धा तास तरी व्यायाम करणे अत्यावश्यक असल्याचा तज्ज्ञांचा देखील सल्ला आहे. 

३) मानसिक ताण तणाव:

मानसिक ताण तणाव असल्यास आपले लक्ष इतरत्र लागत नाही. त्यामुळे नियमित जीवनशैली सांभाळणे देखील कठीण होऊन बसते. जेवण योग्यरित्या होत नाही, व्यायाम टाळला जातो. तसेच मानसिक स्वास्थ्य बरे नसेल तर शारीरिक आरोग्य बिघडते. अशा पद्धतीने जीवनशैलीवर परिणाम होऊन अनेक जीवनशैली रोग होण्याची संभावना असते. यामुळे आपले मानसिक ताण तणाव कमी करण्याचा प्रयत्न करावा तसेच आपल्या आहार आणि व्यायामाकडे लक्ष द्यावे. 

४) जीनद्वारे रोग होणे:

आपल्या कुटुंबात वारस्यात कुणाला जर हे मधुमेह व जीवनशैली रोग असतील तर जीन्सद्वारे ते आपल्याला होण्याची शक्यता असते. 

मधुमेह व जीवनशैली रोग कसे ओळखावे?

मधुमेह रोग ओळखण्याची काही लक्षणे आहेत. वारंवार तहान लागणे, सतत लघवी लागणे, वजन कमी होणे, दृष्टी धूसर होणे, सतत चक्कर येणे तसेच जखमा लवकर बऱ्या न होणे ही मधुमेह रोगाची लक्षणे आहेत. ही लक्षणे आपल्यात दिसत असल्यास आपण त्वरित तज्ज्ञांचा सल्ला घेणं अत्यावश्यक आहे. तज्ज्ञ आपल्याला त्या रोगावर नियंत्रण मिळवण्यासाठी सल्ला देतील. 

मधुमेह रोगावर नियंत्रण कसे ठेवावे?

मधुमेह रोगावर नियंत्रण ठेवण्यासाठी जीवनशैली सुधारण्याची आवश्यकता आहे. आपल्या नियमित जीवनात चांगला बदल घडवून आणणे आवश्यक आहे. संतुलित आहार करणे, म्हणजे नियमित आहारात फळ, पालेभाज्या, धान्य तसेच फायबर्स, प्रोटिन्स आणि मिनरल्स युक्त पदार्थांचा समावेश करणे गरजेचे आहे. तसेच शरीराची हालचाल होण्यासाठी नियमित अर्धा तास तरी व्यायाम करणे आवश्यक आहे. यामुळे शरीरातील ग्लुकोज पातळी नियंत्रित राहण्यास मदत होते. तसेच वजनावर देखील नियंत्रण ठेवणे अत्यावश्यक आहे. 

आपल्या जीवनशैलीत आपली झोप व्यवस्थित होत आहे की नाही याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. आपली झोप पूर्ण झाल्यास शरीरात रोगप्रतिकारक शक्ती वाढते तसेच शरीराला विश्रांती मिळून इन्स्युलिनचे कार्य सुधारते. यामुळे झोप पूर्ण होणं अतिशय गरजेचं आहे.

मधुमेह यासह जीवनशैलीचे आणखीन रोग आहेत जसं की स्ट्रोक, लठ्ठपणा, रक्तदाब, सांधेदुखी, इत्यादी. आहारात कमी पोषण असल्यास म्हणजेच जंक फूड, तेलकट पदार्थ, शिळे पदार्थ, तिखट आहार यामुळे कोलेस्ट्रॉल वाढून हृदयविकार होण्याची शक्यता असते. धूम्रपान, मद्यपान, शारीरिक निष्क्रियता, मानसिक ताण, वाढते वय, हायपरटेंशन यामुळे देखील जीवनशैली रोग होण्याची संभावना वर्तवता येते. यामुळे आपले आरोग्य निरोगी ठेवणे अत्यंत महत्वाचे आहे आणि त्यासाठी आपल्या जीवनशैलीत सुधार आणणे देखील तितकेच महत्वाचे आहे. यामुळे आपण रोगांपासून दूर राहण्यास मदत होईल. आपलो जीवनशैली पौष्टिक आहार, व्यायाम आणि पुरेशी झोप याने संपन्न असायला हवी याची काळजी घ्यावी. 

जीवनशैली रोग म्हणजे काय?

मधुमेह व जीवनशैली रोग जसे की लठ्ठपणा, हृदयविकार, रक्तदाब हे रोग आजकाल खूप सामान्य होत चालले आहेत. या आजारांच्या रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. हे रोग आपल्या नियमित हालचाली म्हणजेच जीवनशैलीवर अवलंबून असतात. आपला आहार, आपली हालचाल, झोपेचे प्रमाण, ताण तणाव इत्यादी गोष्टी या रोगांना कारणीभूत ठरत असतात. 

मधुमेह कशामुळे होतो?

मधुमेह हा एक जीवनशैली रोग आहे ज्यामुळे शरीरात इन्सुलिनचं उत्पादन कमी होतं आणि कार्य व्यवस्थित होत नाही. इन्सुलिन हा शरीरासाठी आवश्यक असा हॉर्मोन आहे जो रक्तातील ग्लुकोज पातळी नियंत्रित करतो. जेव्हा शरीर इन्सुलिनचे योग्य प्रमाण तयार करत नाही किंवा इन्सुलिनला योग्य प्रकारे वापरू शकत नाही, तेव्हा रक्तातील ग्लुकोज ( साखर ) पातळी वाढते आणि मधुमेह होतो.

जीवनशैली रोग कोणकोणते?

जीवनशैलीचे रोग आहेत जसं की स्ट्रोक, लठ्ठपणा, रक्तदाब, सांधेदुखी, इत्यादी. आहारात कमी पोषण असल्यास म्हणजेच जंक फूड, तेलकट पदार्थ, शिळे पदार्थ, तिखट आहार यामुळे कोलेस्ट्रॉल वाढून हृदयविकार होण्याची शक्यता असते. धूम्रपान, मद्यपान, शारीरिक निष्क्रियता, मानसिक ताण, वाढते वय, हायपरटेंशन यामुळे देखील जीवनशैली रोग होण्याची संभावना वर्तवता येते.

Leave a Comment