कर्करोग म्हणजे शरीरातील कोणत्याही अवयवातील पेशींची अनियंत्रित वाढ होय. शरीरातील इतर पेशी मरतात पण कर्करोगाच्या पेशींवर नियंत्रण ठेवता येत नाही आणि त्या वाढत राहतात. कर्करोगाच्या अनेक प्रकारांमध्ये शरीरातील विविध अवयव प्रभावित होऊ शकतात. म्हणूनच आज आपण कर्करोग निदान व उपचार यासंबंधी माहिती घेणार आहोत. त्याआधी कर्करोगात काही प्रकार पाहुयात…

कर्करोगाचे प्रकार:
१) ब्रेस्ट कर्करोग:
ब्रेस्ट कॅन्सर हा महिलांमध्ये आढळला जातो. स्तनांमधील पेशींची अनियंत्रित वाढ होऊन या रोग उद्भवतो.
२) फुप्फुस कर्करोग ( lung cancer ):
हा रोग शरीरातील फुप्फुसांमध्ये होतो. धूम्रपान करणाऱ्या व्यक्तींमध्ये हा कर्करोग जास्त आढळून येतो.
३) आंत्र कर्करोग ( Colon cancer ):
हा कर्करोग पचनसंस्थेच्या भागांमध्ये होतो. याला आंत्र किंवा गुदाशयातील कर्करोग देखील म्हटले जाते.
४) त्वचा कर्करोग ( Skin Cancer ):
या कर्करोगामध्ये बेसल सेल कर्करोग, स्क्वेमस सेल कर्करोग आणि मेलानोमा समाविष्ट आहेत.
५) रक्त कर्करोग (Leukemia):
क्ताच्या पेशी आणि हाडांच्या मज्जातंतूतील कर्करोग. यामध्ये रक्तातील पांढऱ्या पेशी अनियंत्रितपणे वाढू लागतात.
६) जठर कर्करोग ( Stomach Cancer ):
या कर्करोगाला गॅस्ट्रिक कर्करोग देखील म्हटले जाते. हा पचनसंस्थेच्या जठरात होणारा कर्करोग आहे.
७) किडनी कर्करोग ( KIdney Cancer ):
या कर्करोगाला रिनाला कर्करोग देखील म्हणतात. हा कर्करोग किडन्यांशी संबंधित असतो.
८) प्रोस्टेट कर्करोग:
पुरुषांच्या प्रोस्टेट ग्रंथीमध्ये होणारा कर्करोग.
९) यकृत कर्करोग ( Liver Cancer ):
हा कर्करोग मुख्यतः जास्त प्रमाणात दारू पिणाऱ्या व्यक्तींमध्ये आढळून येतो. हा कर्करोग यकृताच्या पेशींमध्ये होतो.
१०) गॅल्ब्लॅडर कर्करोग:
गॅल्ब्लॅडरमध्ये होणारा कर्करोग, जो गॅल्ब्लॅडरच्या पेशींमध्ये विकृतीमुळे होतो.
कर्करोग निदान व उपचार:
कर्करोग हा भयंकर रोग आहे. कर्करोग निदान व उपचार करणे अत्यंत आवश्यक आहे. त्याचे निदान लवकरात लवकर लक्षात आल्यास आपण त्यावर वेळीच उपचार करण्यास समर्थ ठरतो. कर्करोगाचे निदान हे अनेक तपासणींच्या आणि चाचण्यांच्या आधारे केले जाते. याचे निदान करण्यासाठी खालीलप्रमाणे विविध पद्धती वापरल्या जातात:
१) शारीरिक तपासणी:
शारीरिक तपासणीमध्ये शरीरावरील गाठी, सूज यावरून तज्ज्ञांना कर्करोग ओळखता येतो. शरीराच्या विविध भागांची तपासणी करून याद्वारे कर्करोगाची शंका वर्तवता येते.
२) रक्त चाचणी:
काही कर्करोग या रक्त चाचणी म्हणजेच ब्लड टेस्टद्वारे ओळखता येतात.
३) रेडीयोग्राफ:
फुप्फुसाचा कर्करोग किंवा हाडांचा कर्करोग रोडीयोग्राफ / X Ray द्वारे निदान करण्यात येतो. यात कर्करोगाच्या स्थितीचा अंदाज देखील घेतला जातो.
४) सिटी स्कॅन:
शरीराच्या आतल्या भागातील कर्करोगाचे निदान करण्यासाठी सिटी स्कॅनचा वापर करण्यात येतो.
कर्करोगाचे निदान करण्यासाठी आणखी काही पद्धती आहेत जसं की एमआरआय हा डोक्यातील कॅन्सर ओळखण्यासाठी, बायोस्पी म्हणजेच पेशींद्वारे कर्करोगाचे निदान ओळखण्याची पद्धती, अल्ट्रासाउंड, पेट स्कॅन तसेच मॅमोग्राफी, पॅप स्मियर चाचणी इत्यादी कर्करोग निदान चाचण्या उपलब्ध आहेत. आता आपण कर्करोगाचे उपचार पाहुयात.
कर्करोग उपचार:
कर्करोगाच्या प्रकारावर त्याची उपचार पद्धत अवलंबून असते. कर्करोगांमधील स्टेजेस आणि तो किती प्रमाणात पसरला आहे यावर देखील विविध उपचार पद्धती असतात. आपण अनेक उपचार पद्धती पाहुयात…
१) सर्जरी:
सर्जरीद्वारे कर्करोगाचे ट्युमर काढण्यासाठी किंवा इतर कर्करोग ग्रस्त अवयवांवर सर्जरी उपयोगी ठरते. कर्करोगाच्या प्रारंभी टप्प्यात सर्जरी उपयुक्त ठरते.
२) किमोथेरपी:
या उपचारांमध्ये औषधांचा वापर केला जातो. यामुळे कर्करोगाच्या पेशी नष्ट होण्यास मदत होते. हा उपचार शरीरात इतर भागांमध्ये पसरलेल्या कर्करोगावर चांगला उपाय ठरू शकतो.
३) रेडिएशन थेरपी:
रेडिएशन थेरपीमध्ये उच्च ऊर्जेच्या किरणांचा वापर करून कर्करोगाच्या पेशींचा नाश केला जातो.
४) इम्युनोथेरपी:
या उपचार पद्धतींमध्ये इम्यून सिस्टीम म्हणजे प्रतिकारशक्ती बूस्ट केली जाते ज्यामुळे शरीरातील कर्करोग पेशींशी लढण्यात मदत होते.
५) हॉर्मोन थेरपी:
ब्रेस्ट कॅन्सर तसेच प्रोटेस्ट कॅन्सर या विशिष्ट प्रकारांमध्ये हॉर्मोन थेरपी कर्करोगास नियंत्रित करण्यास प्रभावी ठरते.
कर्करोग टाळण्यासाठी आपल्याला आपली जीवनशैली सुधरवण्याची गरज आहे. धूम्रपान, मद्यपान यापासून दूर राहणे गरजेचे आहे. नियमित व्यायाम आणि पौष्टिक आहार घेणे आवश्यक आहे. मानसिक ताणतणाव कमी करणे देखील सुदृढ राहण्यासाठी अत्यंत महत्वाचे आहे. कर्करोगाची लक्षणे दिसू लागल्यास कर्करोग निदान व उपचार करणे अत्यंत आवश्यक आहे.
कर्करोग निदान व उपचार कोणते?
कर्करोग हा भयंकर रोग आहे. कर्करोग निदान व उपचार करणे अत्यंत आवश्यक आहे. त्याचे निदान लवकरात लवकर लक्षात आल्यास आपण त्यावर वेळीच उपचार करण्यास समर्थ ठरतो. कर्करोगाचे निदान हे अनेक तपासणींच्या आणि चाचण्यांच्या आधारे केले जाते.
कर्करोग टाळण्यासाठी काय करावे?
कर्करोग टाळण्यासाठी आपल्याला आपली जीवनशैली सुधरवण्याची गरज आहे. धूम्रपान, मद्यपान यापासून दूर राहणे गरजेचे आहे. नियमित व्यायाम आणि पौष्टिक आहार घेणे आवश्यक आहे. मानसिक ताणतणाव कमी करणे देखील सुदृढ राहण्यासाठी अत्यंत महत्वाचे आहे. कर्करोगाची लक्षणे दिसू लागल्यास कर्करोग निदान व उपचार करणे अत्यंत आवश्यक आहे.
कर्करोगाचे निदान करण्यासाठी कोणत्या पद्धती आहेत?
कर्करोगाचे निदान करण्यासाठी आणखी काही पद्धती आहेत जसं की एमआरआय हा डोक्यातील कॅन्सर ओळखण्यासाठी, बायोस्पी म्हणजेच पेशींद्वारे कर्करोगाचे निदान ओळखण्याची पद्धती, अल्ट्रासाउंड, पेट स्कॅन तसेच मॅमोग्राफी, पॅप स्मियर चाचणी इत्यादी कर्करोग निदान चाचण्या उपलब्ध आहेत.