कर्करोग या साध्या नावाने देखील आपण घाबरतो. कारण या रोगावर त्वरित उपचार नाही. परंतु या कर्करोगामध्ये अनेक प्रकार आहेत आणि ते आपल्याला माहित असले पाहिजेत. या लेखात आपण स्तनाचा कर्करोग याविषयी माहिती घेणार आहोत तसेच स्तनाचा कर्करोग लक्षणे देखील पाहणार आहोत. स्तनांचा कर्करोग म्हणजे स्तनांमधील पेशींमध्ये होणारी अनपेक्षित आणि विकृत वाढ. प्रथम आपण हा कर्करोग का होतो ते पाहू…
स्तनाचा कर्करोग लक्षणे यापूर्वी स्तनाचा कर्करोग का होतो याचे स्पष्ट निदान अजून समोर आले नाही परंतु काही विशिष्ट घटकांमुळे हा रोग संभवण्याची शक्यता आहे.
आणखी वाचा – ४ कर्करोग निदान व उपचार ५ तुम्हाला ठाऊक आहेत का?

स्तनाचा कर्करोग का होतो?
१) कौटुंबिक इतिहास:
आपल्या कुटुंबात पूर्वी कुणाला कर्करोग असल्यास तो जेनेटिकल पद्धतीने कुटुंबात पसरण्याची शक्यता आहे.
२) वय:
वय वाढल्यावर कर्करोगाची जोखीम वाढते.
३) हार्मोनल इम्बॅलन्स:
मासिक पाळी, गर्भधारणा यासारख्या काळात हार्मोन्स असंतुलित होत असतात. अशा वेळी कर्करोग होण्याची संभावना आहे.
४) लठ्ठपणा:
लठ्ठपणा किंवा जास्त वजन वाढणे यामुळे हा कर्करोग उद्भवतो. जास्त वजन असलेल्या स्त्रियांना कर्करोग होण्याचा संभव असतो.
५) धूम्रपान व मद्यपान:
धूम्रपान व मद्यपान यामुळे काही विषारी घटक शरीरात प्रवेश करतात आणि त्यामुळे कर्करोग होण्याची संभावना जागृत होते.
६) केमिकल्स किंवा रेडिएशन:
काही केमिकल्स, औद्योगिक पदार्थ किंवा अधिक रेडिएशनसाठी संपर्क होणे यामुळे कर्करोग संभवतो.
कर्करोगाचे निदान लवकर स्पष्ट होऊन त्यावर त्वरित उपचार करणे अत्यावश्यक आहे. अशा वेळी आपल्याला स्तनाचा कर्करोग लक्षणे माहित असणे गरजेचे आहे.
स्तनाचा कर्करोग लक्षणे:
१) स्तनात गाठ व सूज:
स्तनात विशिष्ट गाठ किंवा सूज येते आणि त्या ठिकाणी अत्यंत असह्य वेदना होतात. स्तनाचा कर्करोग लक्षणे यातील हे लक्षण कर्करोग समजण्यासाठी सहज सोपे आहे. स्तनांच्या भागात गाठ किंवा सूज असल्यास त्वरित तज्ज्ञांची भेट घ्यावी आणि तपासणी करावी.
२) स्तनांमधून स्त्राव:
स्तनांचा कर्करोग झाल्यास स्तनांच्या निप्पलमधून रक्तस्त्राव, पाणी किंवा अन्य द्रवांचा स्त्राव होत असतो. या स्तनाचा कर्करोग लक्षणे वरून आपण कर्करोगाचे निदान करू शकतो.
३) स्तनाच्या आकारात बदल:
काही वेळा स्तनाच्या आकारात किंवा रूपात असमानता दिसून येते. त्यांच्या आकारात फरक पडतो. कधी हा फरक दोन्ही स्तनांमध्ये असतो तर कधी कोणत्याही एकाच स्तनात फरक पडतो. हा फरक कधी लगेच जाणवतो किंवा कधी जाणवत देखील नाही. अशा वेळी तज्ज्ञांचा सल्ला घेऊन त्वरित उपचार सुरु करणे अत्यावश्यक ठरते.
४) त्वचेतील बदल:
स्तनाचा कर्करोग लक्षणे यात हे एक लक्षण म्हणजे स्तनाच्या त्वचेमध्ये लालसरपणा जाणवतो किंवा त्वचेवर ओरखडे पडतात. स्तनाचे निप्पल प्रमाणापेक्षा जास्त आत गेले असल्याचे जाणवते हे देखील स्तनाचा कर्करोग लक्षणे आहेत.
स्तनाच्या कर्करोगावरील उपचार:
स्तनाच्या कर्करोगाचा उपचार रोगाच्या प्रकार, टाक्सोन्स आणि स्टेजवर अवलंबून असतो. मुख्य उपचार पद्धतीमध्ये खालील गोष्टी समाविष्ट आहेत.
१) सर्जरी:
सर्जरीमध्ये कर्करोग असलेल्या स्तनाचा भाग किंवा संपूर्ण स्तन काढून टाकले जाते. हा एक उपचार या स्तनाच्या कर्करोगावर आहे.
२) किमोथेरपी:
कर्करोगाच्या पेशी कमी करण्यासाठी किंवा नष्ट करण्यासाठी औषधे वापरली जातात.
३) रेडिएशन थेरपो:
या थेरपीमध्ये कर्करोगाच्या पेशी नष्ट करण्यासाठी विशेष रेडिएशन वापरले जाते.
४) हार्मोनल थेरपी:
हार्मोनसाठी असलेली उपचार पद्धती जी कर्करोगाच्या वृद्धीस प्रतिबंध करते.
५) इम्युनोथेरपी:
या थेरपीमध्ये इम्यून सिस्टीम स्ट्रॉंग केली जाते म्हणजेच शरीराच्या रोगप्रतिकारक शक्तीला वाढवण्याबाबत उपचार केले जातात.
कर्करोगाची सुरुवातीची तपासणी:
१) मॅमोग्राफी:
यामध्ये स्तनाचा एक्स-रे वापरून कर्करोगाची तपासणी करण्यात येते.
२) सोनोग्राफी:
या तपासणीमध्ये गाठ किंवा सूजन तपासण्यासाठी ध्वनी लहरींचा वापर करण्यात येतो.
३) बायोस्पी:
या बायोस्पी तपासणीमध्ये कर्करोगाच्या पेशींची तपासणी करण्यासाठी तज्ञ डॉक्टर पेशी घेतात आणि त्यावरून निदान ओळखता येते.
तसेच हा कर्करोग बरा करण्यासाठी आपल्या जीवनशैलीत काही महत्वाचे बदल करावे. म्हणजेच आपला आहार पौष्टिक असावा, मद्यपान व धूम्रपानाचे सेवन टाळावे, नियमित व्यायाम करावा, आपल्या गायनॅकॉलॉजिस्टशी नियमित संपर्कात राहावे. यामुळे आपल्यावर कर्करोगाचा धोका टाळण्यास मदत होते.
स्तनाचा कर्करोग प्रथम तपासणी कशी करावी?
स्तनाचा कर्करोग ओळखण्यासाठी काही विशिष्ट तपासणी पद्धती आहेत
मॅमोग्राफी: यामध्ये स्तनाचा एक्स-रे वापरून कर्करोगाची तपासणी करण्यात येते.
सोनोग्राफी: या तपासणीमध्ये गाठ किंवा सूजन तपासण्यासाठी ध्वनी लहरींचा वापर करण्यात येतो.
बायोस्पी: या बायोस्पी तपासणीमध्ये कर्करोगाच्या पेशींची तपासणी करण्यासाठी तज्ञ डॉक्टर पेशी घेतात आणि त्यावरून निदान ओळखता येते.
स्तनाचा कर्करोग कसा ओळखावा?
स्तनात विशिष्ट गाठ किंवा सूज येते आणि त्या ठिकाणी अत्यंत असह्य वेदना होतात. स्तनाचा कर्करोग लक्षणे यातील हे लक्षण कर्करोग समजण्यासाठी सहज सोपे आहे. स्तनांच्या भागात गाठ किंवा सूज असल्यास त्वरित तज्ज्ञांची भेट घ्यावी आणि तपासणी करावी. स्तनांचा कर्करोग झाल्यास स्तनांच्या निप्पलमधून रक्तस्त्राव, पाणी किंवा अन्य द्रवांचा स्त्राव होत असतो. या स्तनाचा कर्करोग लक्षणे वरून आपण कर्करोगाचे निदान करू शकतो.
स्तनाचा कर्करोग याची लक्षणे कोणती?
काही वेळा स्तनाच्या आकारात किंवा रूपात असमानता दिसून येते. त्यांच्या आकारात फरक पडतो. कधी हा फरक दोन्ही स्तनांमध्ये असतो तर कधी कोणत्याही एकाच स्तनात फरक पडतो. हा फरक कधी लगेच जाणवतो किंवा कधी जाणवत देखील नाही. अशा वेळी तज्ज्ञांचा सल्ला घेऊन त्वरित उपचार सुरु करणे अत्यावश्यक ठरते. स्तनाचा कर्करोग लक्षणे यात हे एक लक्षण म्हणजे स्तनाच्या त्वचेमध्ये लालसरपणा जाणवतो किंवा त्वचेवर ओरखडे पडतात. स्तनाचे निप्पल प्रमाणापेक्षा जास्त आत गेले असल्याचे जाणवते हे देखील स्तनाचा कर्करोग लक्षणे आहेत.