दिवसेंदिवस विज्ञान प्रगती होतंय आणि त्यासोबतच उपचारांच्या पद्धती देखील प्रगती होत आहेत. अनेक वर्षांपूर्वी आयुर्वेदिक उपचारांनी रोग बरा करण्याची पद्धत होती, परंतु विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या विकासामुळे प्रत्येक रोगावर आधुनिक उपचार पद्धती यांचा शोध लागत आहे. यामुळे रोगाचं निदान ओळखणं देखील सोपं होत आहे. आधुनिक उपचार पद्धती ही आजच्या काळातील वैज्ञानिक क्षेत्रातील एक महत्वपूर्ण प्रगती आहे असं म्हणणं योग्य ठरेल. आधुनिक उपचार पद्धती अनेक आहेत, त्यातील आपण काही पद्धती आज पाहणार आहोत.

आधुनिक उपचार पद्धती पुढील प्रमाणे:
१) मिनीमली इन्व्हेसिव्ह तंत्रज्ञान:
पूर्वी सीझर किंवा बायपास वगैरे अशा सर्जिकल प्रक्रियांमध्ये मोठा कट मारावा लागत होता, परंतु मिनीमली इन्व्हेसिव्ह तंत्रज्ञान या आधुनिक उपचार पद्धती यामुळे रुग्णांच्या शरीरावर छोटे कट मारून देखील अचूकपणे उपचार करता येतो. यामुळे रुग्णांच्या शरीराला कमी प्रमाणात इजा होते तसेच सर्जरीनंतर रिकव्हरी देखील लवकर होते. लॅपरोस्कोपी आणि रोबोटिक सर्जरी या पद्धतींचा यात समावेश होतो.
२) रोबोटिक सर्जरी पद्धत:
रोबोटिक सर्जरी ही एक आधुनिक पद्धती आहे ज्यात एका रोबोटच्या मदतीने शस्त्रक्रिया केली जाते. या सर्जरीमध्ये कोणतीही चूक होण्याची शक्यता टळते आणि सर्जरीसाठी वेळही फार कमी लागतो. या सर्जरीनंतर रुग्णांच्या रिकव्हरीची प्रक्रिया कमी होऊ शकते. यामुळे रुग्णाची सुरक्षा होते आणि डॉक्टरांचा वेळ वाचतो.
३) लेझर उपचार:
लेझर उपचार आज अत्यंत प्रगती उपचार झाला आहे. त्वचा, डोळे, दात अशा शारीरिक अवयवांवर उपचार करण्यासाठी ही पद्धत वापरण्यात येते. त्वचेवरील डाग, पिगमेंटेशन, अवांछित केस तसेच पिंपल्सचे डाग, टॅटू, चेहऱ्यावरील सुरकुत्या काढण्यासाठी त्वचेवर हे उपचार केले जातात, तसेच रेटिना उपचार लेझरद्वारे डोळ्यावर करता येते. दात पिवळे पडल्यास त्यावर लेझर ट्रीटमेंट करून दात स्वच्छ केले जातात. या नव्हे तर आणखीन अनेक उपचारांमध्ये लेझर पद्धतीचा समावेश केला जातो.
४) जीनोम थेरपी:
ही थेरपी जीन बदलून केली जाणारी थेरपी आहे. जीन बदलून अनुवांशिक विकार, कँसर आणि इन्फेक्शन्स यावर उपचार केला जातो.
५) स्टेम सेल थेरपी:
स्टेम सेल थेरपी ही आधुनिक उपचार पद्धती शरीरातील विशेष प्रकारच्या पेशी वापरून हृदयाचा आजार तसेच कॅन्सर अशा मोठ्या रोगांवर उपचार करते. शरीरतील विविध पेशींची दुरुस्ती किंवा पुनर्निर्माण या पद्धतीमुळे होणे शक्य आहे.
६) इम्युनोथेरपी:
शरीरतील इम्यून सिस्टीम वाढवण्यासाठी इम्युनोथेरपी या आधुनिक उपचार पद्धती चा वापर होतो. ही थेरपी शरीरातील इम्यून सिस्टीमला बळकट करते आणि त्यामुळे शरीरातील प्रतिकारशक्ती वाढून कॅन्सरसारख्या रोगाच्या पेशींवर मात करते. या आधुनिक उपचार पद्धती वापरून कॅन्सरला पराभूत करण्याचे प्रमाण वाढले आहे.
७) स्मार्ट डिव्हाईस आणि हेल्थ ट्रॅकिंग:
आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने विविध स्मार्ट डिव्हायस तयार केले गेले आहेत, ज्याचा वापर रुग्णांच्या आरोग्याची सतत मॉनिटरिंग करण्यासाठी केला जातो. काही जण स्मार्ट वॉच फक्त फॅशन म्हणून वापरत असतात, परंतु स्मार्ट वॉच, फिटनेस ट्रॅकर्स तसेच अन्य उपकरणे रुग्णाच्या हृदय गती, रक्तदाब, ग्लुकोज लेवल आणि इतर आरोग्य समस्या ट्रॅक करतात.
या सर्व आधुनिक उपचार पद्धती रुग्ण तसेच डॉक्टरांचाही वेळ वाचवतात. रुग्णांना अधिक प्रभावी आणि अचूक उपचार वेळच्या वेळी मिळणं शक्य झालं आहे. आणि डॉक्टरांना देखील या पद्धतींचा वापर करून रोगाचे निदान आणि उपचार कळण्यास सोपे झाले आहे. आधुनिक उपचार पद्धती हा वैज्ञानिक क्षेत्रातील क्रांतिकारी बदल आहे असं म्हणणे वावगे ठरणार नाही!
आधुनिक उपचार पद्धतीचा फायदा काय ?
विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या विकासामुळे प्रत्येक रोगावर यांचा शोध लागत आहे. यामुळे रोगाचं निदान ओळखणं देखील सोपं होत आहे. आधुनिक उपचार पद्धती ही आजच्या काळातील वैज्ञानिक क्षेत्रातील एक महत्वपूर्ण प्रगती आहे असं म्हणणं योग्य ठरेल.
आधुनिक उपचार पद्धती कोणकोणत्या आहेत ?
मिनीमली इन्व्हेसिव्ह तंत्रज्ञान, रोबोटिक सर्जरी, लेझर उपचार, जीनोम थेरपी, स्टेम सेल थेरपी, इम्युनोथेरपी अशा अनेक पद्धती विकसित झाल्या आहेत.
आधुनिक उपचार पद्धतींचा काय उपयोग ?
या सर्व पद्धती रुग्ण तसेच डॉक्टरांचाही वेळ वाचवतात. रुग्णांना अधिक प्रभावी आणि अचूक उपचार वेळच्या वेळी मिळणं शक्य झालं आहे. आणि डॉक्टरांना देखील या पद्धतींचा वापर करून रोगाचे निदान आणि उपचार कळण्यास सोपे झाले आहे.
स्मार्ट वॉचचा उपयोग काय ?
आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने विविध स्मार्ट डिव्हायस तयार केले गेले आहेत, ज्याचा वापर रुग्णांच्या आरोग्याची सतत मॉनिटरिंग करण्यासाठी केला जातो. स्मार्ट वॉच, फिटनेस ट्रॅकर्स तसेच अन्य उपकरणे रुग्णाच्या हृदय गती, रक्तदाब, ग्लुकोज लेवल आणि इतर आरोग्य समस्या ट्रॅक करतात.