१ सफरचंदाचे आरोग्यदायी फायदे अनेक! 


ही संज्ञा प्रत्येकाच्या ऐकिवात असेलच. प्रत्येकाच्या तोंडी ही संज्ञा ऐकायला मिळते. परंतु ही संज्ञा इतकी जगजाहीर का आहे माहित आहे का ? सफरचंद हे खूप पौष्टिक फळ आहे. सफरचंदाचे आरोग्यदायी फायदे आपल्याला माहित असले पाहिजेत. सध्या सुरु असलेल्या हिवाळा ऋतूत तर हे फळ अत्यंत महत्वाचे आहे. रोजच्या दिनचर्येत सफरचंद खाण्याचं महत्व आपल्याला माहित असायला हवं. 

सफरचंदाचे आरोग्यदायी फायदे

सफरचंदाचे आरोग्यदायी फायदे पुढीलप्रमाणे:

१) व्हिटॅमिन C मिळते: 

सफरचंदामध्ये व्हिटॅमिन C मोठया प्रमाणात आहे ज्यामुळे आपली त्वचा तजेलदार राहण्यास मदत होते, प्रतिकारक शक्ती वाढते, हिरड्या मजबूत होतात तसेच मेमरी सुधारण्यास मदत होते. व्हिटॅमिन C हा शरीरासाठी अत्यंत महत्वाचा घटक आहे. हे सफरचंदाचे आरोग्यदायी फायदे प्रत्येकाला ठाऊक असायला हवे.  

२) वजन कमी करण्यास मदत होते:

३) चयापचय क्रियेत सुधार होतो:

सफरचंद खाल्ल्याने व्हिटॅमिन C, मिनरल्स, फायबर्स शरीरात जातात जे आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी असतात. सफरचंद खाल्ल्याने भूक देखील कमी लागते आणि त्यामुळे बाहेरील जंक फूड, तेलकट पदार्थ तसेच आरोग्याला हानिकारक असे पदार्थ खाण्याची इच्छा कमी होते. पोटात पौष्टिक अन्न असल्याने चयापचय क्रिया सुधारते. यामुळे शरीर सुदृढ राहते, रक्ताभिसरण प्रक्रिया सुधारते तसेच हृदयविकारापासून किंवा पोटाच्या विकारांपासून आपली सुरक्षा होते. 


डॉक्टरांच्या सांगण्यानुसार दिवसाला एक सफरचंद खाल्ल्याने आपण अनेक रोगांपासून दूर राहतो. सफरचंदातील अनेक गुणकारी घटक शरीरात रोगांवर मात करणारे घटक तयार करते ज्यामुळे विषाणू शरीरात आल्यास त्याविरोधात रोग प्रतिकारक शक्ती काम करून आपला त्या रोगापासून बचाव होतो. 


५) डिटॉक्स:


शरीर डिटॉक्स होणं अत्यंत गरजेचं आहे. त्यातल्या त्यात यकृत हे शरीरातील विषारी द्रव बाहेर काढण्याचे कार्य करते त्यामुळे यकृत डिटॉक्स होणं गरजेचं आहे आणि सफरचंद हेच काम करतं, सफरचंद यकृत डिटॉक्स करण्याचं काम करतं आणि त्यामुळे शरीर स्वच्छ आणि निरोगी राहण्यास मदत होते. 


६) अनेक रोगांपासून सुरक्षा :

सफरचंद आपल्या रोजच्या आहारात ग्रहण केल्याने मधुमेह तसेच टाईप २ मधुमेह या रोगापासून आपला बचाव होतो. तज्ज्ञांच्या मतानुसार सफरचंद नियमित खाल्ल्याने मधुमेहाचा धोका १८ टक्क्यांनी कमी होतो असा अभ्यास आहे. तसेच रक्तदाब, कोलेस्ट्रॉल, हृदयविकार, ब्लड प्रेशर, कर्करोग, दमा या समस्यांवरही सफरचंदाचे आरोग्यदायी फायदे होत असल्याचे दिसून येते. 

सफरचंदाचे फायदे काय आहेत ?

चवीला गोड असलेलं हे फळ आरोग्यासाठी देखील अत्यंत गुणकारी ठरतं. सफरचंदामध्ये फायबर, मिनरल्स, व्हिटॅमिन C आणि अँटी- ऑक्सिडंट्स असतात जे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत महत्वाचे असतात.

कोणते फळ खावे ?

सफरचंद रोज खाल्ल्याने अनेक आजारांपासून आपण दूर राहतो. म्हणूनच तज्ज्ञ डॉक्टर देखील रोजच्या आहारात सफरचंदाचा समावेश करण्याचा सल्ला देतात.

वजन कमी करण्यासाठी कोणते फळ खावे ?

सफरचंदामध्ये अनेक मिनरल्स तसेच फायबर्स असल्याने सफरचंद खाल्ल्याने पोट भरल्यासारखे वाटते आणि लवकर भूक लागत नाही. सफरचंदात पाण्याचे प्रमाण जास्त असते त्यामुळे शरीर हायड्रेट राहण्यास मदत होते. सफरचंद खाल्ल्याने आपले जेवण आपोआप कमी होते आणि वजन कमी होण्यास मदत होते. हे सफरचंदाचे आरोग्यदायी फायदे आत्मविश्वास वाढवण्यास उपयोगी ठरतील.

सफरचंद का खावे ?

सफरचंद खाल्ल्याने व्हिटॅमिन C, मिनरल्स, फायबर्स शरीरात जातात जे आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी असतात. सफरचंद खाल्ल्याने भूक देखील कमी लागते आणि त्यामुळे बाहेरील जंक फूड, तेलकट पदार्थ तसेच आरोग्याला हानिकारक असे पदार्थ खाण्याची इच्छा कमी होते. पोटात पौष्टिक अन्न असल्याने चयापचय क्रिया सुधारते.

Leave a Comment