हिवाळ्यातील आहार: सुदृढ आणि निरोगी आरोग्याकडे वाटचाल!

हिवाळा सुरु आहे. सध्या जवळजवळ सर्वच सर्दी – खोकल्याने ग्रासले आहेत. डॉक्टरांकडे ताप, सर्दी, खोकला यासाठी रुग्णांची गर्दी होत आहे. हिवाळ्यात आपल्याला आरोग्याची काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे आणि त्यामुळेच हिवाळ्यातील आहार हा इतर ऋतूंमधील आहारांपेक्षा वेगळा असावा. आपल्या आहारात काही गरम पदार्थांचा समावेश करावा. आज आपण हिवाळ्यातील आहार कसा असावा याविषयी बोलणार आहोत. 

हिवाळ्यातील आहार

हिवाळ्यातील आहार वेगळा का असावा ?


हिवाळ्यात आहार वेगळा असावा याला काही विशिष्ट कारणे आहेत. हवेतील थंड वातावरणामुळे शारीरिक बदल होत असतात आणि त्यामुळे शरीर कमजोर पडत असून रोगप्रतिकारक शक्ती कमी होण्याची शक्यता असते. या वातावरणात आपले शरीर सुदृढ राहण्यासाठी हिवाळ्यात आपल्या आहारात गरम पदार्थ समाविष्ट करणे गरजेचे ठरते. गरम पदार्थ आपल्या शरीरात उब निर्माण करतात, प्रतिकारक शक्ती वाढवतात तसेच आपल्या शरीरात आवश्यक ऊर्जा निर्माण करतात. हिवाळ्यात शरीरात पुढील काही विशिष्ट बदलांमुळे हिवाळ्यातील आहार वेगळा असावा. 

पचनशक्ती:

हिवाळ्यात आपल्या शरीरात चयापचय क्रिया अगदी योग्यरीत्या होत असते आणि त्यामुळे कितीही जड पदार्थ पचवण्यास शरीर समर्थ असते. म्हणूनच या दिवसात जड पदार्थ अवश्य खावेत. पचनशक्ती वाढली असल्याने आपल्याला हिवाळ्यात भूक देखील जास्त लागते त्यामुळे पोटभर जेवण करणे आवश्यक आहे. 

त्वचा कोरडी पडणे:

बाहेरील थंड वातावरणामुळे आपली त्वचा कोरडी आणि रुक्ष होण्याची शक्यता असते. आणि म्हणूनच त्वचेला हायड्रेशन मिळवण्यासाठी आणि निरोगी ठेवण्यासाठी जास्त फॅट्स असलेले पदार्थ तसेच शरीराला हायड्रेट करणारी फळे आपल्या हिवाळ्यातील आहार यात समाविष्ट करावीत. 

मानसिक शांतता:

हंगामी पदार्थांचा लाभ:

हिवाळ्यात उष्ण पदार्थांचा हंगाम असतो. पालेभाज्या, कंदमुळं इत्यादी बाजारात उपलब्ध होतात. यांचा समावेश आपण हिवाळ्यातील आहार यात करावा. हंगामी पदार्थ शरीरातील प्रतिकारक शक्ती शाबूत ठेवण्यात मदत करतात. 

या पदार्थांनी होतो हिवाळ्यातील आहार पौष्टिक:

१) कंदमुळे:

हिवाळ्यात हंगामी पदार्थांमध्ये कंदमुळांचा समावेश असतो, कारण हिवाळ्यात कंदमुळे पोषक ठरतात. बटाटा, लसूण, बिट, सुरण, रताळे इत्यादी कंदमुळे हिवाळ्यातील आहार पौष्टिक बनवतात. 

२) हंगामी फळं: 

संत्री, मोसंबी, द्राक्ष, सफरचंद ही हिवाळ्यातील हंगामी फळं शरीराला हायड्रेट ठेवण्यात मदत करतात, त्यामुळे हिवाळ्यातील आहारात याचा समावेश नक्कीच करावा. 

३) पालेभाज्या:

पालक, शेपू, मेथी, मोहरीची भाजी, नवलकोल, मुळ्याच्या पानांची भाजी इत्यादी पालेभाज्या हिवाळ्यात पोषक ठरत असतात. यांच्या सेवनामुळे शरीरात उष्णता कायम राहते तसेच यांमध्ये अनेक जीवनसत्व असल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढून सर्दी, फ्लू, खोकला यापासून आपण वाचण्याची शक्यता असते, या सर्वांचा आपल्या हिवाळ्यातील आहार मध्ये समावेश करावा. 

४) कडधान्ये:

मटकी, मूग, वाल, उडीद, तूर इत्यादी कडधान्यांचा आपल्या हिवाळ्यातील आहार यात समावेश करावा. 

५) सुका मेवा:

सुका मेवा म्हणजेच काजू, बदाम, पिस्ता इत्यादी उष्ण पदार्थांमध्ये मोडले जातात. त्यामुळे हिवाळ्यात शरीरातील उष्णता कायम राहण्यासाठी सुका मेवा आहारात समाविष्ट करणं लाभदायक ठरते. 

६) मसालेदार पदार्थ:

धने, जिरं, हिंग, तिरफळं, तेजपत्ता इत्यादी गरम मसाले आपल्या आहारात वापरल्याने हिवाळ्यातील सर्दी, खोकला, फ्लू या आजारांशी लढणे सोपे जाते. 

७) मांसाहार:

हिवाळ्यात आहार वेगळा असावा कारण त्याचा थंड हवामानाशी आणि शरीराच्या वाढलेल्या उर्जा व पोषण आवश्यकतेशी संबंध आहे. योग्य आहार घेतल्याने शरीराला आवश्यक ऊर्जा, उब, प्रतिकारशक्ती आणि मानसिक आराम मिळतो. हिवाळ्यात योग्य आहार निवडून आपले शरीर सुदृढ ठेवणे आणि रोगांपासून बचाव करणे शक्य होते.

हिवाळ्यातील आहार कसा असावा ?

या वातावरणात आपले शरीर सुदृढ राहण्यासाठी हिवाळ्यात आपल्या आहारात गरम पदार्थ समाविष्ट करणे गरजेचे ठरते. गरम पदार्थ आपल्या शरीरात उब निर्माण करतात, प्रतिकारक शक्ती वाढवतात तसेच आपल्या शरीरात आवश्यक ऊर्जा निर्माण करतात. हिवाळ्यात शरीरात पुढील काही विशिष्ट बदलांमुळे हिवाळ्यातील आहार वेगळा असावा.

हिवाळ्यात काय खावे ?

हिवाळ्यात उष्ण पदार्थांचा हंगाम असतो. पालेभाज्या, कंदमुळं इत्यादी बाजारात उपलब्ध होतात. यांचा समावेश आपण हिवाळ्यातील आहार यात करावा. हंगामी पदार्थ शरीरातील प्रतिकारक शक्ती शाबूत ठेवण्यात मदत करतात. 

हिवाळ्यात शरीरावर काय परिणाम होतो ?

हिवाळ्यातील आहार वेगळा असावा याला काही विशिष्ट कारणे आहेत. हवेतील थंड वातावरणामुळे शारीरिक बदल होत असतात आणि त्यामुळे शरीर कमजोर पडत असून रोगप्रतिकारक शक्ती कमी होण्याची शक्यता असते. या वातावरणात आपले शरीर सुदृढ राहण्यासाठी हिवाळ्यात आपल्या आहारात गरम पदार्थ समाविष्ट करणे गरजेचे ठरते.

Leave a Comment