पुण्यात अवघ्या सात दिवसात गुईलेन बॅरे सिंड्रोम चे 59 रुग्ण… 

पुण्यातील मुख्य तीन रुग्णालयांची नोंद!

पुणे शहरात एका आठवड्यात गुईलेन बॅरे सिंड्रोम या दुर्मिळ रोगाने ग्रस्त असलेले २६ रुग्ण आढळले होते, परंतु आज ती संख्या ५९ वर पोहोचली असल्याची माहिती पुण्यातील तीन मुख्य रुग्णालयांतर्फे मिळाली आहे. या रुग्णांमधील १२ रुग्ण व्हेंटिलेटर वर आहेत. यावेळी मुख्य रुग्णालयांतर्फे आरोग्य विभागाला तसेच आरोग्य अधिकाऱ्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. 

पुण्यातील दीनानाथ रुग्णालय, नवले रुग्णालय आणि पूना रुग्णालयातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे की हे रुग्ण लहान, तरुण आणि प्रौढ या वयोगटातील असून सिंहगड रोड, धायरी आणि आजूबाजूच्या परिसरातील आहेत. हे रुग्ण अंग कमजोर होणे किंवा अर्धांगवायू भासणे, डायरिया आणि दूषित अन्न, पाणी ग्रहण केल्याने ओटी पोटात दुखणे इत्यादी लक्षणांचा सामना करत होते. 

गुईलेन बॅरे सिंड्रोम

गुईलेन बॅरे सिंड्रोम चे उपचार 

हा आजार सहा महिने ते वर्षभरात बरा होतो. इम्युनोग्लोबुलीन थेरपी, प्लाज्मा फेरिसिस हे गुईलेन बॅरे या दुर्मिळ न्यूरॉलॉजिकल डिसऑर्डरचे उपचार असल्याची माहिती तज्ज्ञांद्वारे मिळाली आहे. या उपचारांनी रुग्ण या आजारातून बाहेर पडण्याची शक्यता आहे. परंतु यासाठी उपचारासह सात्विक आहार आणि फिझिकल थेरपी तसेच ऑक्युपेशनल थेरपी यामुळे पुनर्वसनास मदत होते, असा डॉक्टरांचा सल्ला आहे. 

गुईलेन बॅरे सिंड्रोम किती दिवसात बरा होतो ?

हा आजार सहा महिने ते वर्षभरात बरा होतो. इम्युनोग्लोबुलीन थेरपी, प्लाज्मा फेरिसिस हे गुईलेन बॅरे सिंड्रोम या दुर्मिळ न्यूरॉलॉजिकल डिसऑर्डरचे उपचार असल्याची माहिती तज्ज्ञांद्वारे मिळाली आहे. या उपचारांनी रुग्ण या आजारातून बाहेर पडण्याची शक्यता आहे. 

गुईलेन बॅरे सिंड्रोमवर उपाय काय ?

इम्युनोग्लोबुलीन थेरपी, प्लाज्मा फेरिसिस हे गुईलेन 
बॅरे सिंड्रोम या दुर्मिळ न्यूरॉलॉजिकल डिसऑर्डरचे उपचार असल्याची माहिती तज्ज्ञांद्वारे मिळाली आहे. या उपचारांनी रुग्ण या आजारातून बाहेर पडण्याची शक्यता आहे.

गुईलेन बॅरे सिंड्रोम म्हणजे काय ?

गुईलेन बॅरे सिंड्रोम हा एक दुर्मिळ न्यूरॉलॉजिकल डिसऑर्डर आहे. हा डिसऑर्डर शरीराच्या प्रतिकार शक्तीद्वारे आपल्या स्वतःच्या नर्वस सिस्टिमवर हल्ला करतो. या स्थितीत शरीराची रोग प्रतिकारक शक्ती स्वतःच्या स्नायूंवर आणि मज्जासंस्थेवर हल्ला करते. 

Leave a Comment