2025 मधील कॅन्सरवरील नवीन लस: एक आशेचा किरण!

HPV लस: ग्रीवा कॅन्सरविरोधातील एक महत्त्वाचं शस्त्र!

एचपीव्ही (Human Papillomavirus) हा एक विषाणू आहे, जो ग्रीवा कॅन्सरसह इतर कॅन्सरच्या प्रकारांना कारणीभूत ठरू शकतो. HPV लस लहान वयोगटाला दिली जाते, ज्यामुळे HPV विषाणूला शरीरात प्रवेश करण्यापासून रोखता येते. या लसीमुळे कॅन्सरच्या जोखमीमध्ये मोठ्या प्रमाणात घट झाली आहे.

कॅन्सरवरील नवीन लस यांचे प्रकार :

प्रिव्हेंटिव्ह व्हॅक्सिन्स:

या लसी कॅन्सर निर्माण करणाऱ्या विषाणूंशी लढतात, त्यांच्या विरोधात शरीराच्या रोगप्रतिकारक प्रणालीला सक्षम करतात. या लसींमुळे कॅन्सर होण्यापूर्वीच त्याविरोधी रोगप्रतिकारक प्रणालीला प्रतिबंधित करण्यास मदत मिळते. 

HPV लस:

HPV हा एक विषाणू आहे जो गर्भाशय, घसा यासंबंधी कॅन्सरचे कारण ठरतो. ‘HPV लस’ ही कॅन्सरवरील नवीन लस त्या विशिष्ट HPV कॅन्सरच्या विषाणूंशी लढण्यापासून बचाव करतात. 

हेपेटायटिस बी लस :

लिव्हर कॅन्सरचा कारक असलेला हा हेपेटायटिस बी विषाणू शरीरात जाताच त्याविरोधात रोगप्रतिकारक शक्ती तयार करण्यासाठी कॅन्सरवरील नवीन लास यांमध्ये हेपेटायटिस बी लस सुद्धा तयार केली गेली आहे. यामुळे लिव्हर कॅन्सरच्या धोका टळतो. 

थेराप्युटिक लस:

थेराप्युटिक लस ही कॅन्सरवरील नवीन लस आहे ज्यामुळे कॅन्सरच्या पेशींविरोधात शरीराच्या रोगप्रतिकारक प्रणालीला सक्रिय होतात. याचा उद्देश कॅन्सरला उपचाराच्या पद्धती म्हणून टाकणे आहे. थेराप्युटिक लस जेव्हा रोगांचे उपचार करते तेव्हा त्या पेशींच्या विशिष्ट घटकांशी संबंध येतो ज्यामुळे लस अधिक प्रभावी ठरते. या लसीमध्ये देखील प्रकार आहेत.

१) प्रोव्हेंज लस:

प्रोव्हेंज ही एक थेराप्युटिक लस आहे हि प्रोटेस्ट कॅन्सरच्या उपचारासाठी वापरली जाते. या लसींच्या वापरामुळे रोगप्रतिकारक शक्ती कॅन्सरच्या पेषींविरोधात कार्यरत होतात. 

२) ट्युमर स्पेसिफिक अँटिजेन लस :

ट्युमर स्पेसिफिक अँटीजेन लस ही कॅन्सरवरील नवीन लस मधील एक लस आहे ज्यामुळे या विशिष्ट कँसरविरोधात लढण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती निर्माण होते आणि आपले शरीर त्या पेशींवर हल्ला करू शकते.

कॅन्सर या रोगाला प्रत्येक जण घाबरत असत, कारण त्या रोगाला कोणतेच औषध नव्हते. परंतु आता या लसींच्या रूपात त्या विषाणूंवर मात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कॅन्सरवरील नवीन लस यांचा शोध हा एक क्रांतिकारी शोध मानला जाऊ शकतो. यामुळे कॅन्सरमुळे होणारे परिणाम टाळता येण्याची शक्यता आहे. कॅन्सरसारख्या भीषण रोगाशी सामना करण्यासाठी हे एक प्रभावी साधन ठरू शकतं. कॅन्सरचा मात केल्यास ही लस आपल्या शरीरात पुनरागमन करण्यास असमर्थ ठरेल असेही तज्ज्ञांचे मत आहे.

कॅन्सरवरील नवीन लस

WHO च्या कॅन्सरवरील नवीन लस यावर मार्गदर्शक सूचना

WHO कॅन्सर लसीविषयी अधिक जागरूकता निर्माण करत आहे आणि अशा लसींच्या उपलब्धतेसाठी पुढाकार घेत आहे. जगभरात याबाबतचं संशोधन व क्लिनिकल ट्रायल्स वाढत आहेत. काही लसींना क्लिनिकल ट्रायल्समध्ये चांगले परिणाम मिळाले आहेत. वैज्ञानिकांनी ही लस कॅन्सरच्या विविध प्रकारांवर प्रभावी ठरु शकते, असे मत व्यक्त केले आहे.

कॅन्सरवरील नवीन लास यामधील आणखी एक महत्त्वाचा भाग म्हणजे कस्टमाइझ्ड लस. प्रत्येक रुग्णाची शरीराची जैविक रचना आणि कॅन्सर पेशी वेगवेगळी असते. म्हणून, पर्सनलाइज्ड लस विकसित करणे, जे प्रत्येक रुग्णाच्या विशिष्ट कॅन्सरशी जुळते, या शोधाने लसींच्या प्रभावीतेमध्ये आणखी सुधारणा केली जाऊ शकते.

कॅन्सरवरील लसींचे संशोधन आणि विकास एक क्रांतिकारी बदल घडवण्याच्या मार्गावर आहे. जरी यावर अजून काही चाचण्या आणि परीक्षणे आवश्यक असली, तरी कॅन्सरवरील लसींमुळे कॅन्सरचे नियंत्रण करणे आणि त्याचे निवारण करणे शक्य होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे. आगामी काळात, कॅन्सरवरील लसींमुळे रोगाचे निदान, उपचार आणि जीवनाच्या गुणवत्तेमध्ये एक महत्त्वपूर्ण बदल होईल, हे निश्चित आहे.

कॅन्सरवर इलाज काय ?

रशियाने कॅन्सरसारख्या भीषण रोगावरील लसीचा शोध लावला आहे. २०२५ च्या सुरुवातीपासून ही कॅन्सरवरील नवीन लस सर्वांसाठी विनामूल्य उपलब्ध आहे,

कर्करोगासाठी लस आहे का ?

कॅन्सरमध्ये जसे विविध प्रकार आहेत त्याप्रमाणे त्यावरील लसींचे देखील विविध प्रकार आहेत. विशिष्ट कॅन्सरवर विशिष्ट लसीचा परिणाम होत असतो. कॅन्सरवरील नवीन लस दोन मुख्य प्रकारात विभागल्या जातात. 

कर्करोगावर लस कुणी बनवली ?

रशियाने कॅन्सरसारख्या भीषण रोगावरील लसीचा शोध लावला आहे. २०२५ च्या सुरुवातीपासून ही कॅन्सरवरील नवीन लस सर्वांसाठी विनामूल्य उपलब्ध आहे, असं सांगण्यात येत आहे. कॅन्सरवरील लस हा या क्षेत्रातील एक आशेचा किरण आहे. वैज्ञानिक आणि डॉक्टर आता इम्यून थेरपीच्या मदतीने कॅन्सरवरील लसींवर संशोधन करत आहेत, ज्या शरीराच्या इम्यून सिस्टमला कॅन्सरच्या पेशींविरोधात लढण्यासाठी सशक्त करतात.

Leave a Comment