झोपेचे आरोग्यावर होणारे परिणाम : सकारात्मक आणि नकारात्मक ! 

झोपेचे आरोग्यावर होणारे परिणाम यांना शारीरिक, मानसिक, बौद्धिक या तीन भागात पुढीलप्रमाणे विभागले आहे.

झोपेचे आरोग्यावर होणारे परिणाम

झोपेचे आरोग्यावर होणारे परिणाम : शारीरिक  

पुरेशी झोप घेतल्याने मोठमोठ्या आजारांपासून वाचवणारी शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढते. नियमित झोप आपल्या शरीरातील हार्मोन्स संतुलित ठेवते त्यामुळे वजन संतुलित राहते. आपली त्वचा अगदी टवटवीत राहते तसेच चेहरा तजेलदार राहतो. पचनक्रिया सुधारते, फुप्फुसाची कार्यक्षमता वाढते, रक्तपुरवठा योग्यरित्या होतो. हृदयविकाराचे धोके टळतात. 

परंतु झोप पूर्ण न झाल्याने शरीराला पुरेसा आराम मिळत नाही. यामुळे पचनक्रिया बिघडते. पोटातील अन्न पचन होणे फार महत्वाचे आहे. अन्नापासून रक्त तयार होऊन त्याचा पुरवठा संपूर्ण शरीराला होत असतो. आणि पचनक्रिया ही रात्री आपण झोपल्यावर होत असते. पचनक्रिया योग्यरीत्या न झाल्याने गॅस, अपचन, पोटदुखी आणि अपेंडायटिससारख्या समस्या निर्माण होतात. तसेच शरीरातील रक्ताचे प्रमाण कमी होण्याची शक्यता वाढते. रक्तपुरवठा योग्यरीत्या होऊ शकत नाही. हृदयविकार, बीपी, मधुमेह, बद्धकोष्ठता, उष्णता असे शरीरातील विकार उद्भवतात. 

तसेच झोप पूर्ण न झाल्याने शरीरावर तो परिणाम दिसून येतो, चेहऱ्यावर पिंपल्स येण्यास सुरुवात होते. सुरकुत्या दिसू लागतात. डोळ्याखाली डार्क सर्कल्स तयार होतात. झोप पूर्ण न झाल्याने डोळे लाल होणे, डोळे सुजणे या गोष्टी लगेच जाणवतात. त्यामुळेच बऱ्याच अंशी चष्मा लागण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. तसेच हार्मोन असंतुलन, व्हिटॅमिन्सची कमतरता इत्यादी त्रुटी होण्याची दाट शक्यता असते. 

आपले शरीर सुदृढ असेल तर आपण आपली ध्येय निश्चितपणे साधू शकतो, परंतु त्यासाठी झोप पूर्ण होणे अत्यंत आवश्यक आहे. आपले ध्येय साधण्यासाठी आपण झोपेच्या बाबतीत केलेली तडजोड आपल्याला इतर काही शारीरिक समस्यांमध्ये अडकवू शकतात. त्यामुळे स्वास्थ्याची काळजी घेणे अत्यावश्यक आहे. 

झोपेचे आरोग्यावर होणारे परिणाम: मानसिक 

झोपेचा मानसिक आरोग्यावर मोठा परिणाम होतो. झोप पूर्ण झाल्याने शरीरासोबतच मन सुद्धा प्रसन्न राहते. मन प्रसन्न असल्याने आपला मूड अगदी छान राहून दिवसाची सुरुवात प्रसन्न होते. मनात एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होते ज्यामुळे आपण दिवसातील प्रत्येक काम मनापासून करतो. मन स्वस्थ असलं की चिडचिड कमी होऊन रागावर नियंत्रण मिळवता येतं आणि त्यामुळे नात्यात गोडवा निर्माण होतो.

परंतु झोपेची कमतरता आपलं भावनिक असंतुलन वाढवू शकते. अशा स्थितीत आत्मविश्वास कमी होतो, राग – तणाव वाढतो. मानसिक दृढता कमी होते. स्वतःवरील विश्वास गमावण्याची शक्यता यात भासते. मनावर त्याचा नकारात्मक परिणाम होत असतो. यामुळे मन प्रसन्न न राहणे, सतत चिडचिड करणे, नकारात्मक विचार मनात येणे, कामात अडथळे येणे, कोणत्याही गोष्टीत लक्ष न लागणे, संपूर्ण दिवस उदासीनता आपल्या मनात कायम असणे या सर्व गोष्टी उद्भवतात. यामुळे आपल्या रोजच्या आयुष्यात हळूहळू फार मोठा बदल घडू शकतो. आपण अनेक गोष्टी, ध्येय, इच्छा आपल्यापासून दूर करत असतो. 

झोपेचे आरोग्यावर होणारे परिणामबौद्धिक 

झोप पूर्ण झाल्याने शरीर, मन आणि बुद्धी यांच्यावर साकारात्मक परिणाम होत असतो. आपल्या बुद्धीला कमीत कमी सहा ते सात तास झोपेची गरज असते. झोप पूर्ण झाल्यास बुद्धीची कार्यक्षमता वाढते, बुद्धी तल्लख होते, सकारात्मक विचारशक्ती काम करू लागते, कामात लक्ष लागून ते अतिशय योग्यरित्या पार पडण्यास मदत होते. बुद्धीवरील ताण नाहीसा होऊन अगदी शांत आणि प्रसन्न वातावरण अनुभवायला मिळतं. 

परंतु झोप पूर्ण न झाल्यास बुद्धीची कार्यक्षमता कुंठित होते. सतत राग, चिडचिड होत असते. विचार करण्याची क्षमता कमी होते. कोणत्याही कामात लक्ष लागत नाही. कामकाजावर परिणाम होतो, बुद्धीचा विकास खुंटतो. 

यामुळे अनेक विकार होण्याची शक्यता आहे. 

२) डिप्रेशन : अपूर्ण झोप डिप्रेशनला प्रवृत्त करते. यामुळे आपण इन्ट्रोव्हर्ट होत जातो. आत्मशक्ती, आत्मविश्वास गमावण्याची यात दाट शक्यता असते. यासोबतच स्ट्रोकसारख्या समस्या देखील उद्भवतात. 

३) स्मरणशक्ती आणि एकाग्रता कमी होणे : कमी झोपेमुळे स्मरणशक्ती आणि विचारांच्या प्रक्रियेत अडथळे येतात. ज्यामुळे एकाग्रता कमी होऊन काम करण्याची क्षमता घटते. 

बुद्धीशी संलग्न असलेले विकार आपल्याला होण्याची शक्यता आहे. नैराश्य, स्मृतिभ्रंश, संज्ञानात्मक कमजोरी सुद्धा उद्भवू शकतात. हे सर्व टाळण्यासाठी योग्य प्रमाणात झोप घेणे अत्यावश्यक आहे. 

वेगवेगळ्या वयोगटासाठी झोपेचे महत्व :

झोप ही प्रत्येक वयात महत्वाची असते. परंतु विविध वयोगटासाठी त्याचे प्रमाण वेगवेगळे असते. 

१) वय ० ते ३ महिने 

नवजात बालकांना दररोज १४ ते १७ तास झोप गरजेची असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. नवजात मुलांची झोप जास्त असते कारण या वयात शरीर आणि मनाचा वेगाने विकास होत असतो. नवजात मुलांची झोप प्रमाणात झाल्याने त्यांच्यात रोगप्रतिकारक शक्ती वाढते तसेच शरीराच्या वाढीसाठी मदत होते. 

२) वय ४ ते ११ महिने 

या वयोगटातील मुलांच्या झोपेचे प्रमाण १२ ते १५ तास प्रति दिवस इतके असते. या वयात मुलांचा शारीरिक आणि बौद्धिक विकास वेगात होत असल्याने त्यांची झोप पूर्ण होणे गरजेचे आहे. या वयात बुद्धी तल्लख असल्याने झोप पूर्ण झाल्यास स्मरणशक्ती वाढते आणि स्मृती तयार होण्यास मदत होते. तसेच मुलांची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. 

३) वय १ ते २ वर्ष 

या वयोगटासाठी तज्ज्ञांनी दररोज ११ ते १४ तास झोपेचे प्रमाण सुचवले आहे. या वयात पुरेशी झोप झाल्याने चिडचिड कमी होते. स्मरणशक्ती वाढते. पूर्ण झोप या वयात मोटर स्किल्सच्या विकासासाठी महत्वपूर्ण आहे. झोपेचा अभाव असल्यास या वयोगटातील मुलं चिडचिड करतात, जेवण करणे टाळतात, रडतात. हे परिणाम त्यांच्या विकासासाठी योग्य नाहीत. 

४) वय ३ ते ५ वर्ष 

या वयोगटासाठी दररोज १०-१३ तास झोप गरजेची असल्याचे तज्ज्ञ सांगतात. या वयात मेंदू विकसनशील होत असतो म्हणूनच झोपेचे महत्व अधिक असते. या वयात एकाग्रता, विचारशक्ती तल्लख होणे गरजेचे आहे त्यासाठी झोप पूर्ण होणे अत्यंत आवश्यक आहे. 

५) वय ६ ते १३ वर्ष 

शालेय वयाच्या या मुलांसाठी ९ ते ११ तास झोप अत्यंत आवश्यक आहे. या वयात मुलं अनेक गोष्टी शिकत असतात आणि स्मरणात ठेवत असतात, त्यामुळे यांची झोप पूर्ण होणे अत्यंत आवश्यक आहे. या वयातील मुलांसाठी झोपेची कमतरता शाळेतील प्रदर्शनावर व वर्तनावर नकारात्मक परिणाम करू शकते. 

६) वय १४ ते १७ वर्ष 

या वयोगटातील मुलं तरुण असतात त्यामुळे यांना ८ ते १० तास झोपेची आवश्यकता असते. या वयात शाररिक, मानसिक व भावनिक बदल होत असतात. चांगली झोप शारीरिक वाढ आणि मानसिक स्थैर्य टिकवते. योग्य प्रमाणात झालेल्या झोपेमुळे निर्णय घेण्याची क्षमता वाढते तसेच लक्ष केंद्रित करण्यास मदत होते. झोप पूर्ण न झाल्याने मानसिकरीत्या अनेक अभाव या वयोगटात उद्भवतात. 

७) वय १८ ते २५ वर्ष 

या वयोगटातील तरुणांना ७ ते ९ तास झोप आवश्यक आहे. या वयोगटातील तरुण विविध क्षेत्रात कार्यरत असून अनेक निर्णय त्यांना घ्यायचे असतात, त्यामुळे स्मरणशक्ती, विचारक्षमता, लक्ष केंद्रित करणे यांना फार महत्वाचे ठरते. पुरेशी झोप न झाल्याने काही चुकीचे निर्णय घेण्यात येऊ शकतात ज्यामुळे भविष्य देखील संकटात सापडू शकते. यामुळे या वयोगटाला झोप अत्यंत महत्वाची आहे. 

८) वय २६ ते ६४ वर्ष 

या वयोगटात प्रौढ व्यक्तींचा समावेश होतो. या वयोगटाला ७ ते ९ तास झोपेची गरज असल्याचे तज्ज्ञ सांगतात. शारीरिक आरोग्य आणि दीर्घकालीन आरोग्य समस्यांचा सामना करण्यासाठी योग्य प्रमाणात झोप अत्यंत महत्वाची आहे. पूर्ण झोप न झाल्याने हृदयविकार, मधुमेह आणि इतर आजारांशी सामना होण्याची शक्यता असते. 

९) वय ६५+ वर्ष 

या वयात झोपेचे प्रमाण कमी होत असल्याचे आपल्याला आढळून येते. दररोज ७ ते ८ तास झोप या वयोगटासाठी उत्तम प्रमाण आहे. चांगली झोप या वयात रोगप्रतिकारक शक्ती, स्मृती तसेच मेंदूची कार्यक्षमता शाबूत ठेवते. या वयात झोपेचा अभाव असल्यास स्मृतिभ्रंश, उदासीनता अशा अनेक मानसिक तसेच बौद्धिक आजारांना सामोरं जाण्याची शक्यता वर्तवली जाते. 

१) रात्री लवकर झोपणे गरजेचे का आहे ?

झोप पुरेशी घेतल्याने शरीर आणि मन प्रसन्न राहते, शारीरिक व मानसिक आरोग्य टिकून राहते. रात्री १० ते सकाळी ७ या वेळेत झोप घेणे अत्यंत लाभकारी ठरते, कारण यामुळे मेंदूला आराम मिळतो आणि दिवसाची सुरुवात प्रसन्नतेने होते. चिडचिड, अपचन, डोकेदुखी, नैराश्य यापासून आपण दूर राहतो. 

२) रात्री लवकर न झोपल्याने काय होते ?

झोप पूर्ण न झाल्याने शरीराला पुरेसा आराम मिळत नाही. यामुळे पचनक्रिया बिघडते. पोटातील अन्न पचन होणे फार महत्वाचे आहे. अन्नापासून रक्त तयार होऊन त्याचा पुरवठा संपूर्ण शरीराला होत असतो. आणि पचनक्रिया ही रात्री आपण झोपल्यावर होत असते. पचनक्रिया योग्यरीत्या न झाल्याने गॅस, अपचन, पोटदुखी आणि अपेंडायटिससारख्या समस्या निर्माण होतात.

३) लहान बाळ किती वेळ झोपणे महत्वाचे आहे ?

लहान मुलांच्या झोपेचं प्रमाण १२ ते १५ तास प्रति दिवस इतके असते. या वयात मुलांचा शारीरिक आणि बौद्धिक विकास वेगात होत असल्याने त्यांची झोप पूर्ण होणे गरजेचे आहे. या वयात बुद्धी तल्लख असल्याने झोप पूर्ण झाल्यास स्मरणशक्ती वाढते आणि स्मृती तयार होण्यास मदत होते. तसेच मुलांची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. 

४) स्मरणशक्ती कशी वाढवावी ?

पुरेशी झोप झाल्याने चिडचिड कमी होते. स्मरणशक्ती वाढते. पूर्ण झोप मोटर स्किल्सच्या विकासासाठी महत्वपूर्ण आहे.

Leave a Comment