आपल्या सकाळच्या दिनचर्येतील आरोग्यदायी सवयी लावणं अत्यावश्यक आहे. त्यामुळे आपले आरोग्य निरोगी राहण्यास मदत होऊ शकेल. आपण सकाळी उठल्या उठल्या काय करता ? मोबाईल चेक करता ना ? बोस्टन कन्सल्टिंग ग्रुपच्या रिपोर्टनुसार ८४ टक्के मोबाईल धारकांना देखील हीच सवय आहे. परंतु ही सवय तुमचा दिवस आणि त्यासोबत आरोग्यही खराब करू शकते.
सकाळच्या दिनचर्येत आरोग्यदायी सवयी लावल्याने हे दुष्परिणाम टळतील
तज्ज्ञांच्या मतानुसार उठल्या उठल्या आपला मेंदू डेल्टा अवस्थेतून थिटा अवस्थेत म्हणजेच गाढ झोपेतून स्वप्नांच्या अवस्थेत आणि नंतर अल्फा अवस्थेकडे जातो. तेव्हा आपण जागे असतो, पण काही माहितीपूर्वक हालचाल करत नाही. नंतर मेंदू बीटा अवस्थेत गेल्यावर आपण अलर्ट असतो. याच सगळ्या प्रक्रियेत जेव्हा आपला मेंदू असतो त्यावेळी जर आपण मोबाईल वापरला तर मेंदूवर ताण येऊ शकतो. यामुळे राग, चिडचिड वाढण्याची शक्यता तज्ज्ञांनी दर्शवली आहे. उठल्यावर कमीतकमी ३० मिनिटानंतर मोबाईल वापरावा असा तज्ज्ञांचा सल्ला आहे.
या ऐवजी आपण सकाळच्या दिनचर्येतील आरोग्यदायी सवयी जर लावून घेतल्यात तर आपल्या डोक्यावरचा ताण कमी होण्यासाठी, आपले आरोग्य सुधारण्यासाठी आणि संपूर्ण दिवस सकारात्मक जाण्यासाठी मदत होऊ शकते.

सकाळच्या दिनचर्येत आरोग्यदायी सवयी ज्या सकारात्मक बदल घडवून आणू शकतात :
१) लवकर झोपणे
सध्याच्या जगात रात्री १० वाजता झोपणारे फारच कमी आढळतात. उशिरापर्यंत जागल्याने डोळ्याखाली डार्क सर्कल्स, झोप पूर्ण न झाल्याने चिडचिड, पचनक्रिया व्यवस्थित न होणे, पित्त खवळणे, पिंपल्स येणे, उष्णता वाढणे असे अनेक दुष्परिणाम उद्भवतात. आपल्या आरोग्यासाठी ते त्रासदायक ठरतात. आपली झोप सात ते आठ तास होणं गरजेचं आहे असा तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला आहे.
रात्री १० ते २ या वेळेत गाढ झोप होत असते. आणि या वेळेत झोपल्याने पचनक्रिया निरोगी राहते, पांढऱ्या रक्ताच्या पेशींमध्ये वाढ होते, झोप पूर्ण झाल्यामुळे सकारात्मक ऊर्जा दिवसभर राहते. शरीरातील हार्मोन्स संतुलित राहतात असे अनेक फायदे यावेळेत झोपल्याने आरोग्याला होत असल्याचं तज्ज्ञ डॉक्टरांचं म्हणणं आहे. सकाळच्या दिनचर्येतील आरोग्यदायी सवयी लावण्यासाठी सर्वप्रथम लवकर झोपण्याची सवय लावणे महत्वाचे ठरते.
२) लवकर उठणे
रात्री लवकर झोप न लागल्याने झोप पूर्ण होण्यासाठी जर आपण उशिरापर्यंत झोपत असाल तर हे आपल्या आरोग्यावर परिणामकारक ठरू शकतं. यामुळे अंगात सुस्ती वाढते, वजन वाढते, चिडचिड, डोकेदुखी अशा अनेक समस्या उशिरापर्यंत झोपल्याने उद्भवतात. सकाळच्या दिनचर्येतील सर्वात चांगली आणि महत्वाची सवय म्हणजे सकाळी लवकर उठणे. रात्री १० ते सकाळी ७ ही वेळ झोपेसाठी उत्तम मानली जाते. याउपर झोपल्यास आरोग्यावर अनेक दुष्परिणाम होण्याची संभावना असते. त्यामुळेच सकाळी लवकर उठणे ही एक सकाळच्या दिनचर्येतील चांगली आणि आरोग्यदायी सवय आहे. त्यानंतर आपण सकाळच्या दिनचर्येतील आरोग्यदायी सवयी यांची सुरुवात करू शकतो.
४) पाणी पिणे
सकाळी उठल्याबरोबर शक्य तितक्या लवकर पाणी प्या. जर आपली झोप अपूर्ण राहत असेल तर याचे कारण शरीरात पाण्याची कमतरता देखील असू शकते. सकाळी भरपूर पाणी प्यायल्याने शरीर हायड्रेट राहते तसेच आपल्या दिवसाची सुरुवात ताजीतवानी होते. सकाळच्या दिनचर्येतील ही आरोग्यदायी सवय अतिशय गुणकारी आहे.
५) चालणे
सकाळचं सूर्याचं कोवळं ऊन हे एकप्रकारे आपल्या शरीरासाठी औषधच असतं. त्यामुळे रोज सकाळी बाहेर कोवळ्या उन्हात चालण्याची सवय ही अतिशय आरोग्यदायी आहे. आपली हाडं मजबूत राहण्यासाठीची जीवनसत्व कोवळ्या उन्हात असतात. सकाळच्या शुद्ध ऑक्सिजनचा पुरवठा देखील शरीराला होतो, वजन कमी होण्यास मदत होते, मानसिक आणि शारीरिक थकवा नाहीसा होतो, स्टॅमिना वाढतो, पचनक्रिया सुधारते. यामुळे फुप्फुसाची कार्यक्षमता वाढते आणि हृदयविकारापासून आपण लांब राहतो. सकाळी चालण्याचे आपल्या आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत त्यामुळे ही सवय आपण सकाळच्या दिनचर्येतील अनेक आरोग्यदायी सवयींमध्ये नक्कीच समाविष्ट करावी.
६) व्यायाम
आपल्या शरीराची हालचाल होणे फार महत्वाचे आहे. मन आणि शरीर प्रसन्न तसेच निरोगी राहण्यासाठी व्यायाम करणे अत्यंत आवश्यक आहे. परंतु यासाठी जिमला जाऊ शकत नसल्यास आपण घरच्या घरी किंवा एखाद्या गार्डनमध्ये देखील व्यायाम करू शकता. व्यायाम आपल्याला शारीरिकरीत्या सक्रिय ठेवण्यास मदत करतो. नियमित व्यायाम केल्याने हृदयरोग, मधुमेह, स्ट्रोक, कँसर या मोठ्या आजारांपासून आपला बचाव होण्यास मदत होते तसेच वजन नियंत्रित ठेवणे सोपे जाते. आपल्या सकाळच्या दिनचर्येतील आरोग्यदायी सवयी यामध्ये व्यायामाचा समावेश नक्कीच करावा.
७) निरोगी न्याहारी
सकाळी उठल्यावर शरीराला जशी पाण्याची गरज असते तशीच अन्नाचीही गरज असते. घरचे सात्विक, पौष्टिक आणि प्रथिने युक्त अन्न खाल्याने दिवसभर आपल्या शरीरात ऊर्जा निर्माण होते. सकाळचा नाश्ता हा आपल्या दिवसभरातीत सेवनांमध्ये महत्वाचे सेवन मानले जात असल्याचं आपणा सर्वांनाच ठाऊक आहे. सकाळचा नाश्ता टाळल्याने शरीरात अनेक समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे सकाळचा नाश्ता हा अत्यंत पौष्टिक असणे गरजेचे आहे. सकाळच्या दिनचर्येतील आरग्यदायी सवयीनमध्ये पौष्टिक आहार देखील महत्वाचा आहे.
८) ध्यान करणे
दिवसभर आपल्याला अनेक व्यक्तींना, स्थितीला, समस्यांना तोंड द्यावे लागते. या समस्या सोडवण्यासाठी मन आणि बुद्धी स्थिर, शांत असणे फार महत्वाचे असते. यासाठी सकाळी ध्यान करणे हा एक चांगला मार्ग आहे. सकाळच्या प्रहरी आपण ध्यानधारणा केल्याने मन शांत, स्थिर राहण्यास मदत होते. आसनावर मांडी वाळून डोळे बंद करून दोन मिनिटे शांत बसावं, ओंकाराचा जप करावा. यामुळे आपले श्वासावर लक्ष केंद्रित होऊन आपले चक्र आणि मन संरेखित होते. यामुळे आपले ताणतणाव दूर होऊन मनाला शांतता प्राप्त होण्यास मदत होते. ध्यान करणे ही सवय आपण सकाळच्या दिनचर्येतील आरोग्यदायी सवयीनमध्ये समाविष्ट करू शकतो.
९) योगसाधना
जिमसारख्या ठिकाणी काही विशिष्ट वयापर्यंत आपण जात असतो, परंतु योगसाधना ही एक अशी साधना आहे ज्यात वयाचं काहीच बंधन नाही. काही योगासने आपल्या सकाळच्या दिनचर्येत समाविष्ट केल्याचे अनेक फायदे आहेत. योगासनांमुळे शरीर टवटवीत राहते, शरीरात सकारात्मक ऊर्जा वाढते, शरीर लवचिक राहते, बद्धकोष्ठता, मधुमेहासारख्या आजारांशी लढण्यात मदत होते, योगासनांमुळे राग, मत्सर सारख्या षड्रिपू दूर सारण्यास मदत होते. रोगप्रतिकारक शक्ती वाढते. योगासनांमुळे मन आणि शरीर प्रसन्न राहते आणि त्यामुळे संपूर्ण दिवस अगदी प्रसन्न जाण्यास मदत होते. यामुळे योगसाधना आपल्या सकाळच्या दिनचर्येतील आरोग्यदायी सवयींमध्ये समाविष्ट करणं हे अत्यंत आरोग्यदायी ठरेल !
१०) दिनचर्या लिहिणे
दिवसभरातील असंख्य कामं करता करता आपले काही महत्वाच्या कामांकडे दुर्लक्ष होऊ शकतं. त्यामुळे आपल्या हातात आपल्या कामांची लिस्ट असणं अत्यंत महत्वाचं आहे. त्यासाठी रोज सकाळी दिवसभर करावयाची कामं आपण लिहिण्यास सुरुवात करावी. यामुळे आपले ध्येय देखील निश्चित होते तसेच कामांकडे दुर्लक्ष होणे टळते. या सवयीमुळे आपला दिवस अत्यंत सोयीस्कर तणावमुक्त होऊ शकतो.
आपले जीवन आरोग्यदायी असणे फार महत्वाचे आहे, त्यामुळे आरोग्याची हेळसांड न करता त्याकडे दुर्लक्ष न करता आपल्या कामांसोबतच स्वास्थ्य जपणे फार महत्वाचे आहे. सध्याच्या प्रदूषणयुक्त जगात आपण आपल्या आरोग्याची जास्त प्रमाणात काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. वर नमूद केलेल्या सकाळच्या दिनचर्येतील आरोग्यदायी सवयी यांचा समावेश आपल्या जीवनात नक्कीच करावा !
-
सकाळी उठल्यावर काय करावं ?
सकाळी उठल्याबरोबर शक्य तितक्या लवकर पाणी प्या. जर आपली झोप अपूर्ण राहत असेल तर याचे कारण शरीरात पाण्याची कमतरता देखील असू शकते. सकाळी भरपूर पाणी प्यायल्याने शरीर हायड्रेट राहते तसेच आपल्या दिवसाची सुरुवात ताजीतवानी होते. सकाळच्या दिनचर्येतील ही आरोग्यदायी सवय अतिशय गुणकारी आहे.
-
मोबाईलचे दुष्परिणाम
नियमित व्यायाम केल्याने हृदयरोग, मधुमेह, स्ट्रोक, कँसर या मोठ्या आजारांपासून आपला बचाव होण्यास मदत होते तसेच वजन नियंत्रित ठेवणे सोपे जाते.
-
सकाळी नाश्ता कसा असावा ?
घरचे सात्विक, पौष्टिक आणि प्रथिने युक्त अन्न खाल्याने दिवसभर आपल्या शरीरात ऊर्जा निर्माण होते. सकाळचा नाश्ता हा आपल्या दिवसभरातीत सेवनांमध्ये महत्वाचे सेवन मानले जात असल्याचं आपणा सर्वांनाच ठाऊक आहे.