सौंदर्य संतुलन: काळाची गरज, या ९ टिप्स येतील उपयोगात!

सौंदर्य कुणाला नको आहे? ते प्रत्येकालाच हवं असतं. आपण नियमित सुंदर दिसावं, आपल्या व्यक्तिमत्त्वाकडे इतरांचं लक्ष वेधलं जावं, आपला समोरील व्यक्तींवर प्रभाव पडावा यासाठी सर्वच जण प्रयत्नात असतात. यासाठी कित्येक लोक ब्युटी पार्लरची मदत घेतात. परंतु सौंदर्य हे फक्त बाहेरील उपचारांनी संतुलित राहत नाही तर सौंदर्य संतुलन हे आपले आतील आरोग्य सुदृढ राहिल्यास होते. आपली जीवनशैली निरोगी असल्यास आपले सौंदर्य संतुलन आपोआप होते. चला तर मग सौंदर्य संतुलित राहण्यासाठी जीवनशैलीत कोणते बदल करावे ते पाहूया… 

जाणून घ्या- चमकदार त्वचेसाठी घरगुती उपाय शोधात आहात? हे ७ उपाय फायदेशीर!


आपल्या शरीरात जसा आहार जातो त्याप्रमाणे आपले शरीर बदलत असते. जर आपल्या शरीरात पौष्टिक आहाराशिवाय जर घातक आहार म्हणजेच तेलकट, अति तिखट तसेच जंक फूड असे पदार्थांचे सेवन आपण करत असू तर शरीराचे पोषण होत नाही आणि त्यामुळे शरीर सुदृढता तसेच सौंदर्य संतुलन योग्यरीत्या होण्यास अडथळे निर्माण होतात. यामुळे नियमित संतुलित आहार घेणे आवश्यक आहे. फळं, भाज्या, आणि प्रथिनांचा समावेश असलेला संतुलित आहार शरीराला आवश्यक पोषण देतो. हायड्रेटेड राहण्यासाठी पुरेसं पाणी पिऊन शरीरातील टॉक्सिन्स बाहेर टाकावे. फास्ट फूड, तळलेली खाद्यपदार्थ आणि जास्त साखर असलेले पदार्थ टाळल्याने सौंदर्य कायम राहण्यास मदत होते.

सौंदर्य संतुलन


योग किंवा जिममध्ये व्यायाम करणं केवळ शरीरासाठीच नाही, तर मानसिक स्वास्थ्यासाठी देखील लाभदायक आहे. नियमित व्यायाम केल्याने शरीराची रक्ताभिसरण क्रिया सुधारते, ज्यामुळे त्वचेवर नैसर्गिक चमक येते. व्यायामामुळे शरीरातील हार्मोन्स चांगल्या प्रकारे नियंत्रित होतात, आणि स्ट्रेस कमी होतो.

३) ताणतणाव नियंत्रित ठेवणे:


आपल्या मानसिक स्थितीचा सुद्धा सौंदर्यावर प्रभाव पडतो. जर आपण मानसिकदृष्ट्या संतुलित असू, तर आपला आत्मविश्वास वाढतो आणि शरीराकडून सकारात्मक ऊर्जा मिळते. ध्यान आणि प्राणायामामुळे ताणतणाव नियंत्रणात ठेवण्यात मानसिक शांतता मिळवण्यात यश मिळते. आपल्या आवडीच्या गोष्टी करणे, छंद जोपासणे आणि झोपेची योग्य काळजी घेणं मानसिक आरोग्यासाठी महत्त्वाचं आहे.


४) त्वचेची काळजी घेणे:


सौंदर्य संतुलन करण्यासाठी त्वचेची काळजी घेणं अत्यावश्यक आहे. त्वचेला पोषण मिळवण्यासाठी एक स्किन रुटीन आमलात आणावे आणि ते नियमित फॉलो करावे म्हणजे आपली त्वचा नियमित टवटवीत आणि चमकदार राहते. प्रत्येक व्यक्तीच्या त्वचेच्या प्रकारानुसार योग्य फेस क्लीन्सर, मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन वापरणं आवश्यक आहे.

५) पुरेशी झोप:

सौंदर्य संतुलन


६) भरपूर पाणी पिणे:


त्वचा तेजस्वी आणि निरोगी राहण्यासाठी भरपूर पाणी पिणे शरीरासाठी आवश्यक आहे. यामुळे शरीरातील विषारी टॉक्सिन्स बाहेर पडतात आणि त्वचा स्वच्छ व डागरहित ठेवण्यास मदत करते. दिवसाला सात ते आठ ग्लास पाणी पिणे निरोगी त्वचेसाठी तसेच सौंदर्य संतुलन करण्यासाठी आवश्यक आहे. 


७) आनंदी राहणे:


आनंदी राहिल्याने आपले आरोग्य अत्यंत सुदृढ राहते, आपल्या मनावरील ताणतणाव दूर होतो आणि सौंदर्य संतुलन होते. यामुळे नियमित आनंदी राहणे आवश्यक आहे. यासाठी आपले छंद जोपासावे, कला जोपासावी, सतत स्वतःला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करावा. 

८) मेकअपसाठी रासायनिक प्रोडक्ट्स टाळणे:


काही महिलांच्या दिनाचर्येतील एक भाग झाला आहे मेकअप. पण या मेकअपच्या प्रोडक्ट्समध्ये अनेक रासायनिक पदार्थ असतात जे आपल्या त्वचेसाठी अत्यंत घातक ठरू शकतात. यावेळी नैसर्गिक प्रोडक्ट्स वापरावेत किंवा गरज पडेल तेव्हाच मेकअप करावा. यामुळे आपले सौंदर्य संतुलन राहण्यास मदत होते. 


९) निसर्गासोबत काही वेळ घालवणे:


आपल्या आयुष्यातील काही वेळ आपण निसर्गाशी जोडले गेलो तर आपल्याला मनःशांती मिळते. समुद्र, नदी, हिरवीगार झाडं इत्यादी नैसर्गिक सौंदर्य अनुभवल्यास आपल्यामध्ये पॉसिटीव्ह व्हाइब्स निर्माण होतात आणि त्यामुळे आपला ताणतणाव दूर होऊन आपले मन प्रसन्न होते. यामुळे आपले सौंदर्य कायम राहण्यास मदत होते.

सौंदर्य संतुलन

सौंदर्य संतुलन का महत्वाचे ठरते?

सौंदर्य कुणाला नको आहे? ते प्रत्येकालाच हवं असतं. आपण नियमित सुंदर दिसावं, आपल्या व्यक्तिमत्त्वाकडे इतरांचं लक्ष वेधलं जावं, आपला समोरील व्यक्तींवर प्रभाव पडावा यासाठी सर्वच जण प्रयत्नात असतात. यासाठी कित्येक लोक ब्युटी पार्लरची मदत घेतात. परंतु सौंदर्य हे फक्त बाहेरील उपचारांनी संतुलित राहत नाही तर सौंदर्य संतुलन हे आपले आतील आरोग्य सुदृढ राहिल्यास होते. आपली जीवनशैली निरोगी असल्यास आपले सौंदर्य संतुलन आपोआप होते.

सौंदर्य टिकून राहण्यासाठी काय करावे?

आपल्या शरीरात जसा आहार जातो त्याप्रमाणे आपले शरीर बदलत असते. जर आपल्या शरीरात पौष्टिक आहाराशिवाय जर घातक आहार म्हणजेच तेलकट, अति तिखट तसेच जंक फूड असे पदार्थांचे सेवन आपण करत असू तर शरीराचे पोषण होत नाही आणि त्यामुळे शरीर सुदृढता तसेच सौंदर्य संतुलन योग्यरीत्या होण्यास अडथळे निर्माण होतात. यामुळे नियमित संतुलित आहार घेणे आवश्यक आहे. फळं, भाज्या, आणि प्रथिनांचा समावेश असलेला संतुलित आहार शरीराला आवश्यक पोषण देतो. हायड्रेटेड राहण्यासाठी पुरेसं पाणी पिऊन शरीरातील टॉक्सिन्स बाहेर टाकावे. फास्ट फूड, तळलेली खाद्यपदार्थ आणि जास्त साखर असलेले पदार्थ टाळल्याने सौंदर्य कायम राहण्यास मदत होते.

नेहमी सुंदर दिसण्यासाठी काय करावे?

त्वचा तेजस्वी आणि निरोगी राहण्यासाठी भरपूर पाणी पिणे शरीरासाठी आवश्यक आहे. यामुळे शरीरातील विषारी टॉक्सिन्स बाहेर पडतात आणि त्वचा स्वच्छ व डागरहित ठेवण्यास मदत करते. दिवसाला सात ते आठ ग्लास पाणी पिणे निरोगी त्वचेसाठी तसेच सौंदर्य संतुलन करण्यासाठी आवश्यक आहे. आपल्या मानसिक स्थितीचा सुद्धा सौंदर्यावर प्रभाव पडतो. जर आपण मानसिकदृष्ट्या संतुलित असू, तर आपला आत्मविश्वास वाढतो आणि शरीराकडून सकारात्मक ऊर्जा मिळते. ध्यान आणि प्राणायामामुळे ताणतणाव नियंत्रणात ठेवण्यात मानसिक शांतता मिळवण्यात यश मिळते. आपल्या आवडीच्या गोष्टी करणे, छंद जोपासणे आणि झोपेची योग्य काळजी घेणं मानसिक आरोग्यासाठी महत्त्वाचं आहे.

Leave a Comment