सध्याच्या धकाधकीच्या जीवनात आहाराकडे लक्ष देण्यास वेळ मिळणं कठीण असतं आणि त्यामुळे लोकांमध्ये हायपर ऍसिडिटीचे प्रमाण वाढताना दिसत आहे. हायपर ॲसिडीटी हे एक सामान्य पचनसंस्थेतील विकार आहे. यामध्ये पोटात जास्त ऍसिड तयार होऊन ते गॅस्ट्रोइसोफॅगल जंक्शन म्हणजेच अन्ननलिका आणि पोट यामधील भागापर्यंत पोहोचते, ज्यामुळे जळजळ किंवा पचनाच्या समस्यांचा अनुभव होतो. हायपर ॲसिडिटी साधारणपणे जास्त तिखट, तूप, मसालेदार किंवा तेलकट पदार्थ खाल्ल्यामुळे होऊ शकते. याचे योग्य उपचार न केल्यास गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात.
हायपर ॲसिडीटीची कारणे:
१) अयोग्य आहार:
तिखट, मसालेदार, तेलकट पदार्थ आणि मोठ्या प्रमाणात मांसाहार हायपर ॲसिडीटी निर्माण करू शकते. याशिवाय चहा, कॉफी, आणि सोडासारख्या असिडिक पदार्थांचा अधिक वापर करणे देखील हायपर ॲसिडीटीचे कारण ठरू शकतात. बाहेरील जंक फूडचे जास्त सेवन केल्याने देखील या समस्येला तोंड द्यावे लागते.
२) मानसिक ताण तणाव:
दैनंदिन जीवनातील तणाव देखील हायपर ॲसिडीटीचे कारण होऊ शकते. मनावर ताण असल्यास आपले आपल्या रोजच्या दिनचर्येकडे दुर्लक्ष होऊ शकते आणि त्यामुळे आहाराचे संतुलन बिघडून मानसिक ताण एकप्रकारे हायपर ॲसिडीटीचा कारक होऊ शकतो.
३) तंबाखू आणि मद्यपान:
काही व्यक्तींना नियमित सिगारेट पिण्याची तसेच तंबाखू, दारू याचे सेवन करण्याची सवय असते. यामुळे हायपर ॲसिडीटी तर होतेच परंतु हे आपल्या आरोग्यासाठी देखील अत्यंत हानिकारक ठरू शकते. तंबाखू, दारू किंवा अन्य मादक पदार्थांचा अधिक वापर हायपर ॲसिडीटीला उत्तेजन देतो.
४) पचनक्षमता कमी होणे:
काही वेळा पचनसंस्थेची कार्यक्षमता कमी होऊ शकते आणि त्यामुळे जास्त ऍसिड तयार होतो. पोटात ऍसिड निर्माण झाल्याने हायपर ॲसिडीटी होण्याची शक्यता वर्तवता येते.
५) आरोग्याला आवश्यक घटकांची कमतरता:
आपले आरोग्य सुदृढ राहण्यासाठी फायबर्स, मिनरल्स असे अनेक पोषण तत्व आहाराद्वारे शरीरात जाणे अत्यावश्यक आहे. आपला आहार जर पौष्टिक नसेल, त्यामध्ये आवश्यक तत्व नसतील तर ही समस्या अवश्य आपल्याला संभवू शकते. तसेच डिहायड्रेशन म्हणजेच पाणी कमी प्यायल्याने देखील ॲसिडीटी उद्भवू शकते.
हायपर ॲसिडिटीची लक्षणे:

१) पोट फुगणे :
हायपर ॲसिडीटी झाल्याने पोटात मोठ्या प्रमाणात गॅस तयार होतात आणि पोट फुगते. यावेळी आपल्या शरीरातून वायू पास होण्यास अडचण होते आणि वायू पोटात साठून पोट फुगते.
२) पोटात जळजळ:
हायपर ॲसिडिटीमुळे पोटात जळजळ होऊ शकते, ज्यामुळे अन्नपचन होण्यास अडचण येते. ही जळजळ खूप मोठ्या प्रमाणात होते.
३) थोड्या वेळात खूप गॅस होणे:
पोटात गॅस बनवून पोटात फुगवटा होऊ शकतो. यामुळे वायु पास करण्याची आवश्यकता लागते.
४) पित्त आणि उलट्या:
अपचन झाल्यास पित्त उसळतं आणि तोंडात एक आंबट चव निर्माण होते तसेच कधी कधी उलट्या देखील होतात.
५) छातीमध्ये जळजळ (हार्टबर्न):
हायपर ॲसिडीटीच्या समस्येमुळे छातीमध्ये जळजळ होऊ शकते, ज्यामुळे व्यक्तीला अस्वस्थता निर्माण होऊ शकते.
६) डोके दुखी:
पचन प्रक्रिया बिघडल्यामुळे डोकं दुखण्याचे प्रमाण वाढू शकते.
हायपर ॲसिडिटीचे घरगुती उपचार:
१) आहार नियंत्रण:
हायपर ॲसिडिटीच्या उपचारामध्ये आहार नियंत्रण फार महत्त्वाचे आहे. तिखट, मसालेदार, तेलकट पदार्थ टाळणे आवश्यक आहे. यावेळी फायबर्सने भरपूर फळे, भाज्या, कडधान्ये आणि धान्ये खावेत जेणेकरून ॲसिडीटी नियंत्रणात येण्यास मदत होते.
२) जंक फूड टाळणे:
ॲसिडीटी असताना जंक फूड टाळणे अत्यंत गरजेचे असते. बाहेरील अन्न खाल्ल्याने ॲसिडीटी आणखीन वाढण्याची भीती निर्माण होते.
३) अँसिड कमी करणारे पदार्थ:
दूध आणि दुग्धजन्य पदार्थ हायपर ॲसिडिटीच्या समस्येला आराम देऊ शकतात. या शिवाय जास्त प्रमाणात पाणी पिणे आणि कोमट पाणी किंवा नारळपाणी पिणे फायदेशीर ठरते.
४) तणाव कमी करणे:
मानसिक तणाव आणि चिंता कमी करणे आवश्यक आहे. ध्यान, योग आणि श्वासोच्छ्वासाच्या तंत्रांचा वापर तणाव कमी करण्यास मदत करू शकतो.
५) आहार कमी प्रमाणात घेणे:
कमी प्रमाणात आहार घेणे, जास्त जेवण करणे टाळणे आणि एकाच वेळी जास्त प्रमाणात खाणे टाळणे यामुळे ही ॲसिडीटी कमी होऊ शकते. ही समस्या जास्त प्रमाणात असल्यास लंघन ( जेवण टाळणे ) करणे योग्य ठरते.
६) औषधे:
ऍसिड कमी करणारी औषधे किंवा अँटासिड्स घेतल्याने पोटात तयार होणाऱ्या ऍसिडचे प्रमाण कमी होईल. तथापि, औषधांचा वापर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार करावा.

७) धूम्रपान आणि मद्यपान टाळा:
तंबाखू आणि मद्यपान हायपर ॲसिडिटी वाढवतात, म्हणून धूम्रपान आणि मद्यपान टाळावे.
हायपर ॲसिडिटी एक सामान्य पचन विकार असला तरी योग्य आहार, जीवनशैलीतील सुधारणा आणि उपचारांद्वारे त्यावर नियंत्रण मिळवता येते. हा विकार दुर्लक्षित केल्यास तो अधिक गंभीर होऊ शकतो. त्यामुळे, याचे लक्षणं दिसताच त्वरित उपचार घेण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात.
हायपर ऍसिडिटी कशामुळे होते?
सध्याच्या धकाधकीच्या जीवनात आहाराकडे लक्ष देण्यास वेळ मिळणं कठीण असतं आणि त्यामुळे लोकांमध्ये हायपर ऍसिडिटीचे प्रमाण वाढताना दिसत आहे. हायपर ॲसिडीटी हे एक सामान्य पचनसंस्थेतील विकार आहे. यामध्ये पोटात जास्त ऍसिड तयार होऊन ते गॅस्ट्रोइसोफॅगल जंक्शन म्हणजेच अन्ननलिका आणि पोट यामधील भागापर्यंत पोहोचते, ज्यामुळे जळजळ किंवा पचनाच्या समस्यांचा अनुभव होतो. हायपर ॲसिडिटी साधारणपणे जास्त तिखट, तूप, मसालेदार किंवा तेलकट पदार्थ खाल्ल्यामुळे होऊ शकते. याचे योग्य उपचार न केल्यास गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात.
ऍसिडिटी टाळण्यासाठी काय करावे?
हायपर ॲसिडिटीच्या उपचारामध्ये आहार नियंत्रण फार महत्त्वाचे आहे. तिखट, मसालेदार, तेलकट पदार्थ टाळणे आवश्यक आहे. यावेळी फायबर्सने भरपूर फळे, भाज्या, कडधान्ये आणि धान्ये खावेत जेणेकरून ॲसिडीटी नियंत्रणात येण्यास मदत होते. कमी प्रमाणात आहार घेणे, जास्त जेवण करणे टाळणे आणि एकाच वेळी जास्त प्रमाणात खाणे टाळणे यामुळे ही ॲसिडीटी कमी होऊ शकते. ही समस्या जास्त प्रमाणात असल्यास लंघन ( जेवण टाळणे ) करणे योग्य ठरते.