दातांकडे दुर्लक्ष आरोग्यासाठी हानिकारक, या ५ टिप्स वापरा!

सकाळची आपली सुरुवातच दात घासण्याने होते, यावरूनच दात किती महत्त्वाचे आहेत याची जाणीव आपल्याला होत असेल. दिवसभर आपण या दातांच्या मदतीने अन्न चावतो आणि मग ते अन्न गिळण्यास योग्य होते. सकाळी आणि रात्री झोपण्यापूर्वी असे दोन वेळा दात घासण्याचा सल्ला तज्ज्ञ डॉक्टरांनी दिला आहे. दातांची काळजी घेणं प्रत्येक व्यक्तीसाठी अत्यंत महत्वाचं आहे. दातांकडे दुर्लक्ष करणं हे अनेक आरोग्य समस्यांना आमंत्रण देणारं ठरू शकतं. आपल्या आयुष्यात दातांचे फार महत्व आहे त्यासाठी आपण दातांकडे दुर्लक्ष न करता दातांची काळजी घ्यावी.

१) अन्न पचन:

दातांचे मुख्य कार्य अन्न चावून बारीक करणे आहे. दातांद्वारे अन्नाचे छोटे तुकडे करून त्याची पचन प्रक्रिया सोपी केली जाते. चांगले चावलेले अन्न पचनाच्या प्रक्रियेत मदत करते, आणि शरीराला आवश्यक पोषण मिळवण्यात मदत करते. दातांकडे दुर्लक्ष केल्यास अन्नपचनात अडथळा निर्माण होऊ शकतो.

२) पचनाचा आरोग्याशी संबंध:

दातांची योग्य काळजी घेतली तर पचन तंत्राला देखील फायदा होतो. खराब दातांमुळे अन्न नीट पचत नाही, आणि विविध पचन समस्यांचे आपण शिकार होऊ शकतो. दातांची स्वच्छता आणि नियमित तपासणी आपले पचन सुधारू शकते.

३) हसू आणि चेहऱ्याची सुंदरता:

सुंदर दातांसह आपण खुलून हसू शकतो. पांढरे आणि चांगले दात चेहऱ्याची आकर्षकता वाढवतात. तसेच, खराब दातांमुळे आत्मविश्वास कमी होऊ शकतो आणि इतरांमध्ये वावरताना फक्त दातांमुळे आपलं बोलणं थांबण्याची शक्यता आहे. 

दातांकडे दुर्लक्ष

दातांकडे दुर्लक्ष केल्यास खालील समस्या उद्भवू शकतात:

१) दातात पोकळी निर्माण होणे (Cavities): 

दातावर लागलेली कीड काही काळानंतर दातांमध्ये पोकळी निर्माण करू शकते. जर त्याची वेळीच काळजी घेतली नाही, तर ही पोकळी मोठ्या प्रमाणात निर्माण होण्याची शक्यता वर्तवता येते.

२) दात किडणे (Tooth decay)

दातांची काळजी न घेतल्यामुळे दात किडण्यास सुरुवात होते. आणि किडलेले दात गळून पडू शकतात. यामुळे रोजच्या आहारावर, सवयीच्या पोषणावर आणि एखाद्या व्यक्तीच्या बोलण्यावरही परिणाम होतो.

३) हिरड्या किंवा दातांच्या आजारांचा धोका (Gum disease): 

दातांचे आरोग्य व्यवस्थित न ठेवल्याने हिरड्या आणि मसूड्यांवर अधिक ताण पडू शकतो. मसूड्यांच्या आजारांमुळे रक्तस्त्राव, सूज किंवा वास येणे अशा समस्या निर्माण होऊ शकतात ज्या आपल्या दैनंदिन जीवनात आपल्याला त्रासदायक ठरू शकतात. 

दातांकडे दुर्लक्ष

४) हृदयविकार (Heart diseases)

तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, किडलेले दात किंवा हिरड्यांचे आजार यामुळे हृदयविकारांचा धोका वाढण्याची दाट शक्यता वर्तवता येते. दात हे आपल्या शरीरात अन्न पचवण्याची पहिली पायरी आहे. म्हणजेच दात अन्नाचे जितके बारीक तुकडे करेल तितके अन्नपचन लवकर होईल. दात स्वच्छ आणि मजबूत नसतील तर अन्नाचे बारीक तुकडे होऊ शकत नाहीत आणि अन्नपचन प्रक्रियेची गती हळुवार होते. यावेळी अन्नाचे रक्तात रूपांतर होऊन ते शरीरात पुरवण्यास हृदयाला जड जाते आणि यामुळे असे विकार होण्याची संभावना असते. 

१) दातांची स्वच्छता

आपल्या रोजच्या दिनचर्येत दोन वेळा, किमान दोन मिनिटांसाठी, दात घासणे महत्त्वाचे आहे. तज्ज्ञांनी सुचवलेले तसेच फ्लोराइडयुक्त टूथपेस्टचा वापर करणे योग्य ठरते.

२) दातांची तपासणी: 

किमान दर सहा महिन्यांनी दातांच्या तपासणीसाठी दात चिकित्सकाला भेट द्या. यामुळे कोणत्याही दाताच्या समस्या लवकर ओळखता येतात.

दातांकडे दुर्लक्ष

३) पौष्टिक आहार: 

दातांची ताकद आणि आरोग्य राखण्यासाठी कॅल्शियम, व्हिटॅमिन D आणि फॉस्फरस असलेला आहार घेणे महत्त्वाचे आहे.

४) आहारात साखरेचे कमी प्रमाण: 

दातांना हानिकारक असलेल्या साखरेचे प्रमाण आपल्या आहारात कमी असावे. यामुळे दात खराब होण्याची शक्यता कमी होईल.

५) धूम्रपान आणि मद्यपान टाळा:

धूम्रपान आणि मद्यपानामुळे दातांचे आरोग्य खराब होते. तंबाखू आणि सिगारेट सेवनामुळे दात किडू शकतात. यामुळे मसुड्यांची विकृती आणि तोंडाच्या कॅन्सरची शक्यता वाढते. तंबाखू आणि सिगारेट वापरणे टाळा, तसेच मद्यपानापासून दूर राहा.

दात निरोगी असणे हे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत महत्वाचे आहे. दातांची योग्य काळजी न घेतल्यास त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावर होऊ शकतो. त्यामुळे दातांची स्वच्छता आणि काळजी घेणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे.

दातांकडे दुर्लक्ष झाल्यास काय होते?

दातावर लागलेली कीड काही काळानंतर दातांमध्ये पोकळी निर्माण करू शकते. जर त्याची वेळीच काळजी घेतली नाही, तर ही पोकळी मोठ्या प्रमाणात निर्माण होण्याची शक्यता वर्तवता येते. तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, किडलेले दात किंवा हिरड्यांचे आजार यामुळे हृदयविकारांचा धोका वाढण्याची दाट शक्यता वर्तवता येते. दात हे आपल्या शरीरात अन्न पचवण्याची पहिली पायरी आहे. म्हणजेच दात अन्नाचे जितके बारीक तुकडे करेल तितके अन्नपचन लवकर होईल. दात स्वच्छ आणि मजबूत नसतील तर अन्नाचे बारीक तुकडे होऊ शकत नाहीत आणि अन्नपचन प्रक्रियेची गती हळुवार होते. यावेळी अन्नाचे रक्तात रूपांतर होऊन ते शरीरात पुरवण्यास हृदयाला जड जाते आणि यामुळे असे विकार होण्याची संभावना असते.

दातांचे महत्त्व काय आहे?

दातांचे मुख्य कार्य अन्न चावून बारीक करणे आहे. दातांद्वारे अन्नाचे छोटे तुकडे करून त्याची पचन प्रक्रिया सोपी केली जाते. चांगले चावलेले अन्न पचनाच्या प्रक्रियेत मदत करते, आणि शरीराला आवश्यक पोषण मिळवण्यात मदत करते. दातांकडे दुर्लक्ष केल्यास अन्नपचनात अडथळा निर्माण होऊ शकतो.

धूम्रपानाचा दातांवर कसा परिणाम होतो?

धूम्रपान आणि मद्यपानामुळे दातांचे आरोग्य खराब होते. तंबाखू आणि सिगारेट सेवनामुळे दात किडू शकतात. यामुळे मसुड्यांची विकृती आणि तोंडाच्या कॅन्सरची शक्यता वाढते. तंबाखू आणि सिगारेट वापरणे टाळा, तसेच मद्यपानापासून दूर राहा.

Leave a Comment