ऑनलाइन डॉक्टर सल्ला: घरबसल्या उपचार मिळवणं शक्य!

आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात सर्व काही घरबसल्या मिळणं शक्य आहे. खाद्यपदार्थ, घरगुती वस्तूंपासून गोळ्या-औषधी सुद्धा घरबसल्या मिळवता येतात. त्यासोबतच आता आजारी असल्यास बाहेर न जाता ऑनलाइन डॉक्टर सल्ला मिळवणे देखील या डिजिटल युगात शक्य झाले आहे. आपल्या जीवनशैलीत या तंत्रज्ञानामुळे अनेक बदल घडले आहेत. ऑनलाइन डॉक्टर सल्लाही एक महत्वाचा मार्ग आहे ज्याचा फायदा आपण विविध आरोग्य समस्यांवर घेऊ शकता.


सध्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर डॉक्टरांशी सल्ला मसलत करणे सहज सोपे झाले आहे. ऑनलाईन अनेक ऍप्स तसेच सोशल मीडियावरून आपण थेट डॉक्टरांशी संवाद साधू शकतो आणि त्यांचा सल्ला घरबसल्या आपल्याला अगदी सहज शक्य झाले आहे. ऑनलाइन डॉक्टर सल्ला कसा घेता येईल ते आपण यावेळी पाहूया. 


ऑनलाइन डॉक्टर सल्ला घेण्याच्या पद्धती:

ऑनलाइन डॉक्टर सल्ला घेण्यासाठी काही सोप्या आणि प्रभावी पद्धती आहेत. या पद्धतींच्या मदतीने आपल्याला घरबसल्या डॉक्टरांचा सल्ला घेता येतो. खाली दिलेल्या स्टेप्सनुसार आपण ऑनलाइन सल्ला घेऊ शकता:

१) विश्वसनीय प्लॅटफॉर्म निवडा:

सर्वप्रथम, आपल्याला एक विश्वासार्ह आणि प्रमाणित ऑनलाइन हेल्थकेअर प्लॅटफॉर्म निवडावा लागेल. काही लोकप्रिय ऑनलाइन डॉक्टर सल्ला देणारे प्लॅटफॉर्म्स म्हणजे Practo, Mfine, DocsApp, 1mg, Portea आणि ई-संजीवनी या प्लॅटफॉर्म्सवर विशेषज्ञ डॉक्टर उपलब्ध असतात, जे आपल्याला वेगवेगळ्या आरोग्य समस्यांवर सल्ला देऊ शकतात.

ऑनलाइन डॉक्टर सल्ला

२) प्रोफाइल तयार करा:

निवडलेल्या प्लॅटफॉर्मवर आपला अकाऊंट तयार करा. यासाठी आपल्याला आपल्या आधारकार्डचा नंबर, इमेल आयडी, फोन नंबर इत्यादी माहिती द्यावी लागते. यामुळे डॉक्टर आपल्याशी थेट संपर्क साधू शकतात.

३) आरोग्य समस्या निवडा:

एकदा आपला अकाऊंट तयार झाला की, आपल्याला आपल्या आरोग्याच्या समस्येची माहिती द्यावी लागेल. प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असलेल्या पर्यायांमध्ये, आपल्याला आपल्या समस्या निवडून, त्यासाठी डॉक्टर सल्ला मागता येतो. या समस्यांमध्ये सामान्य समस्या म्हणजे सर्दी, खोकला, ताप, विशेष समस्या म्हणजे त्वचेसंबंधी समस्या, हृदयविकार, मधुमेह, मानसिक आरोग्य तसेच चिरोप्रॅक्टिक सल्ला आणि कौन्सिलिंग या सर्व समस्यांचा ऑप्शन देण्यात येतो.

४) डॉक्टर निवडा:

आपल्याला आपल्या समस्या नुसार योग्य डॉक्टरांची लिस्ट देण्यात येते, त्यातून आपल्याला हव्या त्या डॉक्टरांची निवड करावी लागते. काही प्लॅटफॉर्म्सवर डॉक्टरांचे प्रोफाइल्स असतात, ज्यात त्यांचा अनुभव, शिक्षण, रेटिंग्स, आणि तज्ञता स्पष्ट असते. उदाहरणार्थ, जर आपल्याला ह्रदयविकाराच्या सल्ल्याची आवश्यकता असेल, तर आपल्याला ह्रदयविकार तज्ञाची निवड करावी लागेल.

५) ऑनलाइन सल्ला प्राप्त करा:

ऑनलाइन डॉक्टर सल्ला मिळवण्याच्या अनेक पद्धती असतात. आपण त्यांच्याशी व्हिडीओ कॉलद्वारे देखील संवाद साधू शकतो, यावेळी पेशंट आणि डॉक्टर दोघेही एकमेकांना पाहू शकतात आणि यामुळे पेशंटची चिंता कमी होते तसेच डॉक्टरांना पेशंटची स्थिती समजण्यास मदत होते आणि त्यांच्या समस्यांवर सल्ला देणे डॉक्टरांना अत्यंत सोपे होते. पेशंट जर व्हिडीओ कॉलवर बोलायचे नसेल तर या प्लॅटफॉर्म्सवर चॅटिंगची देखील सुविधा उपलब्ध असते. चॅटद्वारे आपण डॉक्टरांचा सल्ला त्वरित  मिळवणे अगदी सोपे झाले आहे. व्हिडीओ कॉल तसेच चॅटसह फोन कॉल देखील उपलब्ध असते. डॉक्टर आपल्या आरोग्याच्या समस्यांवर आधारित मार्गदर्शन करतात, औषधांची शिफारस करतात, आणि आवश्यक असल्यास पुढील चाचण्यांची शिफारस करतात.

६) औषधे आणि उपचाराची शिफारस:

डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार, प्लॅटफॉर्मवरच आपल्याला औषधांची शिफारस मिळू शकते. काही प्लॅटफॉर्म्स आपल्या स्थानिक फार्मसीसोबत संबंधित असतात आणि आपल्याला औषधे घरपोच मिळवता येतात. यामुळे घरातून बाहेर न  निघता आपल्याला डॉक्टरांच्या सल्ल्यासह त्यावर उपचार देखील घरबसल्या मिळतात.

७) फॉलोअप करा:

आपल्या सल्ल्यानंतर काही दिवसांनी, आपल्याला डॉक्टरांच्या मार्गदर्शनानुसार फॉलोअप सल्ला घेणे आवश्यक असू शकते. काही प्लॅटफॉर्म्सवर फॉलोअप सल्ल्याची सुविधा असते, ज्यामुळे डॉक्टर आपल्याला औषधांच्या परिणामांवर आधारित पुढील सल्ला देतात.

८) बिल आणि पेमेंट:

ऑनलाइन डॉक्टर सल्ला घेतल्यावर, आपल्याला त्यासाठी संबंधित शुल्क भरावे लागते. हे शुल्क विविध प्लॅटफॉर्म्सवर भिन्न असू शकते. ऑनलाईन पेमेंट गेटवे द्वारे (क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, यूपीआय) सहजपणे पेमेंट करता येते.

ऑनलाइन डॉक्टर सल्ला फायदे:

१) घरपोच सेवा:

ऑनलाइन डॉक्टर सल्ला घेणे खूप सोपे आणि आरामदायक आहे. आपल्याला क्लिनिक किंवा हॉस्पिटलमध्ये जाऊन वेळ घालवण्याची गरज नाही. आपल्या घरी आरामात बसून, फोन किंवा लॅपटॉपच्या मदतीने डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता तसेच औषधे किंवा उपचार देखील घरपोच मिळवू शकतो.  

ऑनलाइन डॉक्टर सल्ला

२) विविध डॉक्टरांशी संवाद:

ऑनलाइन सल्ला घेत असताना, आपल्याला एकाच ठिकाणी विविध प्रकारच्या डॉक्टरांचा सल्ला मिळवता येतो. जसे की, जनरल प्रॅक्टिशनर, स्पेशलिस्ट, चिरॉप्रॅक्टर्स इत्यादी.

३) त्वरित उपचार:

४) तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला:

विविध ऑनलाइन प्लॅटफॉर्म्सवर आपल्याला देशभरातील तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला मिळवता येतो, ज्यामुळे आपल्या आरोग्याशी संबंधित समस्यांसाठी अधिक सक्षम सल्ला मिळतो.

ऑनलाईन डॉक्टर सल्ला कसा मिळवता येतो?

सध्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर डॉक्टरांशी सल्ला मसलत करणे सहज सोपे झाले आहे. ऑनलाईन अनेक ऍप्स तसेच सोशल मीडियावरून आपण थेट डॉक्टरांशी संवाद साधू शकतो आणि त्यांचा सल्ला घरबसल्या आपल्याला अगदी सहज शक्य झाले आहे. ऑनलाईन डॉक्टर सल्ला कसा घेता येईल ते आपण यावेळी पाहूया. 

ऑनलाईन डॉक्टर सल्ला पद्धती?

सर्वप्रथम, आपल्याला एक विश्वासार्ह आणि प्रमाणित ऑनलाइन हेल्थकेअर प्लॅटफॉर्म निवडावा लागेल. काही लोकप्रिय ऑनलाइन डॉक्टर सल्ला देणारे प्लॅटफॉर्म्स म्हणजे Practo, Mfine, DocsApp, 1mg, Portea आणि ई-संजीवनी या प्लॅटफॉर्म्सवर विशेषज्ञ डॉक्टर उपलब्ध असतात, जे आपल्याला वेगवेगळ्या आरोग्य समस्यांवर सल्ला देऊ शकतात.

ऑनलाईन डॉक्टर सल्ला याचे फायदे?

ऑनलाइन डॉक्टर सल्ला घेणे खूप सोपे आणि आरामदायक आहे. आपल्याला क्लिनिक किंवा हॉस्पिटलमध्ये जाऊन वेळ घालवण्याची गरज नाही. आपल्या घरी आरामात बसून, फोन किंवा लॅपटॉपच्या मदतीने डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता तसेच औषधे किंवा उपचार देखील घरपोच मिळवू शकतो.  

Leave a Comment