४ अँटी एजिंग ट्रीटमेंट्स बनवतील तुम्हाला कॉन्फिडन्ट!

वय वाढण्यासोबत त्वचेत काही बदल होतात. काही लोक हे बदल स्वीकारतात, परंतु काही लोकांना हा शरीरातील मोठा बदल सहन होत नाही. त्वचा कोरडी होणे, चेहऱ्यावर सुरकुत्या येणे, तेज कमी होणे आणि रंग उतरणे या सर्व समस्या वयाबरोबर दिसू लागतात. यामुळे आपल्या प्रतिमेचा प्रभाव कमी होऊ शकतो. परंतु योग्य अँटी एजिंग ट्रीटमेंट्स च्या मदतीने या समस्यांवर मात केली जाऊ शकते. अँटी एजिंग ट्रीटमेंट्स म्हणजे काही उपकरणे वापरून किंवा मसाज थेरपी वापरून त्वचा पुन्हा टवटवीत करणे होय. 

आणखी वाचा- सौंदर्यवृद्धीसाठी आयुर्वेदिक उपाय! सुंदर दिसण्यासाठी टिप्स!

अँटी एजिंग ट्रीटमेंट्स चे प्रकार:

१) फेशियल्स: 

फेशियल्स हे त्वचेसाठी एक उत्कृष्ट अँटी एजिंग ट्रीटमेंट्स आहे. यामधील मसाज प्रक्रियेमुळे रक्ताभिसरण सुधारते, त्वचेवर गुळगुळीतपणा येतो आणि सुरकुत्या कमी होतात. या फेशियल मुळे त्वचा हायड्रेट होते आणि टवटवीत होते. फेशियल ही अँटी एजिंग ट्रीटमेंट्स सर्व्हिस कोणत्याही फिमेल तसेच मेल सॅलोन मध्ये उपलब्ध असते.

२) बोटॉक्स आणि फिलर्स: 

बोटॉक्स ही अँटी एजिंग ट्रीटमेंट्स मधील एक लोकप्रिय ट्रीटमेंट आहे, ज्यामुळे चेहऱ्यावरच्या सुरकुत्या आणि रेषा कमी होतात. ही एक नॉन-सर्जिकल ट्रीटमेंट आहे. या संबंधित, ह्यॅलुरोनिक ऍसिड आधारित फिलर्स त्वचेच्या हायड्रेशनला मदत करतात आणि त्वचा सुधारतात.

अँटी एजिंग ट्रीटमेंट्स

२) मायक्रोनिडलिंग: 

मायक्रोनेडलिंग एक अत्याधुनिक पद्धत आहे, ज्यात त्वचेत सूक्ष्म सुई वापरून छोट्या छिद्रांची निर्मिती केली जाते. यामुळे त्वचेमध्ये कोलेजन उत्पादन वाढते. यामुळे सुरकुत्या, डाग आणि त्वचेवरील सुरकुत्यांची समस्या दूर होऊ शकते. 

३) लेझर ट्रीटमेंट्स: 

अँटी एजिंग ट्रीटमेंट्स मधील लेझर ट्रीटमेंट्स त्वचेला पुनर्जीवित करण्यासाठी वापरले जातात. या पद्धतीचा उपयोग त्वचेवरचे डाग, सुरकुत्या, रेषा, आणि लहान छिद्र सुधारण्यासाठी केला जातो. या ट्रीटमेंटमुळे त्वचा ताजीतवानी आणि गुळगुळीत दिसते.

४) केमिकल पील्स / औषधे: 

केमिकल पील्स ही एक त्वचेसाठी अत्यंत उपयुक्त अँटी एजिंग ट्रीटमेंट्स आहे. यामध्ये त्वचेवरील मृदू असलेली मृत पेशी काढून टाकली जाते, ज्यामुळे त्वचा नवी कोरी, टवटवीत आणि गुळगुळीत होते.

वरील अँटी एजिंग ट्रीटमेंट्स या बाह्य ट्रीटमेंट्स आहेत आणि त्या खर्चिक आहेत, परंतु आपण घरबसल्या आपली त्वचा तुकतुकीत करू शकतो. आपल्या दैनंदिन जीवनशैलीत थोडासा बदल करून आपण आपली लाइफस्टाइल बदलवून चेहरा पुन्हा उजळ, टवटवीत आणि गुळगुळीत बनवू शकतो. 

घरगुती अँटी एजिंग टिप्स:

१) सनस्क्रीनचा वापर: 

सूर्याच्या कठोर किरणांपासून त्वचेचे संरक्षण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. नियमित आपल्या त्वचेवर सनस्क्रीन लावणे अत्यावश्यक आहे. ही सवय आपण आपल्या रोजच्या दिनचर्येत समाविष्ट करावी जेणेकरून आपली त्वचा सूर्यकिरणांमुळे जळणार नाही आणि त्वचेला इरिटेशन तसेच लाल चट्टे यासारख्या समस्या होणार नाहीत. 

अँटी एजिंग ट्रीटमेंट्स

२) नियमित पाणी पिणे: 

शरीराला हायड्रेटेड ठेवल्यास त्वचा चमकदार होते आणि टवटवीत होते तसेच ते त्वचेच्या आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. यामुळे रोज कमीत कमी सात ते आठ ग्लास पाणी पिणे अत्यावश्यक आहे. आपल्या दिनचर्येत पाणी पिण्याबाबत तत्पर राहणे गरजेचे आहे. 

३) संतुलित आहार: 

अँटी एजिंग ट्रीटमेंट्स म्हणजे आपल्या जीवनशैलीत संतुलित आणि पोषक आहार समाविष्ट करणे होय. आपल्या त्वचेसोबतच आपल्या आंतरारोग्यासाठी पौष्टिक आहार अत्यंत महत्त्वाचा आहे. फळं, भाज्या, माशांचे तेल आणि प्रथिने यांचा समावेश आपल्या आहारात करावा. त्वचेसाठी सर्वात महत्वाचं म्हणजे अँटीऑक्सिडन्ट्स आणि ओमेगा 3 फॅटी ऍसिड्स. हे घटक ज्या पदार्थांमध्ये असतात ते ग्रहण करावे. 

४) नियमित व्यायाम: 

नियमित व्यायाम केल्याने शरीरातील विषारी घटक आणि मृत पेशी बाहेर पडतात तसेच त्वचेमध्ये रक्ताभिसरण सुधारते, ज्यामुळे त्वचा ताजीतवानी दिसते. आपल्या जीवनशैलीत व्यायाम, योग यांचा समावेश जरूर करावा.

अँटी एजिंग ट्रीटमेंट्स

५) पुरेशी झोप घ्या: 

झोपेची कमतरता ही त्वचेसाठी हानिकारक असू शकते. त्वचेला पुनर्निर्मितीसाठी आणि नवे कोलेजन तयार करण्यासाठी सात ते आठ तासांची झोप आवश्यक आहे.

अँटी एजिंग ट्रीटमेंट्स म्हणजे काय?

वय वाढण्यासोबत त्वचेत काही बदल होतात. काही लोक हे बदल स्वीकारतात, परंतु काही लोकांना हा शरीरातील मोठा बदल सहन होत नाही. त्वचा कोरडी होणे, चेहऱ्यावर सुरकुत्या येणे, तेज कमी होणे आणि रंग उतरणे या सर्व समस्या वयाबरोबर दिसू लागतात. यामुळे आपल्या प्रतिमेचा प्रभाव कमी होऊ शकतो. परंतु योग्य अँटी एजिंग ट्रीटमेंट्स च्या मदतीने या समस्यांवर मात केली जाऊ शकते. अँटी एजिंग ट्रीटमेंट म्हणजे काही उपकरणे वापरून किंवा मसाज थेरपी वापरून त्वचा पुन्हा टवटवीत करणे होय.

अँटी एजिंग ट्रीटमेंट्सचे प्रकार कोणते?

फेशियल्स हे त्वचेसाठी एक उत्कृष्ट अँटी एजिंग ट्रीटमेंट्स आहे. यामधील मसाज प्रक्रियेमुळे रक्ताभिसरण सुधारते, त्वचेवर गुळगुळीतपणा येतो आणि सुरकुत्या कमी होतात. या फेशियल मुळे त्वचा हायड्रेट होते आणि टवटवीत होते. फेशियल ही अँटी एजिंग ट्रीटमेंट्स सर्व्हिस कोणत्याही फिमेल तसेच मेल सॅलोन मध्ये उपलब्ध असते. बोटॉक्स ही अँटी एजिंग ट्रीटमेंट्स मधील एक लोकप्रिय ट्रीटमेंट आहे, ज्यामुळे चेहऱ्यावरच्या सुरकुत्या आणि रेषा कमी होतात. ही एक नॉन-सर्जिकल ट्रीटमेंट आहे. या संबंधित, ह्यॅलुरोनिक ऍसिड आधारित फिलर्स त्वचेच्या हायड्रेशनला मदत करतात आणि त्वचा सुधारतात. मायक्रोनेडलिंग एक अत्याधुनिक पद्धत आहे, ज्यात त्वचेत सूक्ष्म सुई वापरून छोट्या छिद्रांची निर्मिती केली जाते. यामुळे त्वचेमध्ये कोलेजन उत्पादन वाढते. यामुळे सुरकुत्या, डाग आणि त्वचेवरील सुरकुत्यांची समस्या दूर होऊ शकते. 

अँटी एजिंगसाठी तसेच सुंदर दिसण्यासाठी घरगुती उपाय कोणते?

सूर्याच्या कठोर किरणांपासून त्वचेचे संरक्षण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. नियमित आपल्या त्वचेवर सनस्क्रीन लावणे अत्यावश्यक आहे. ही सवय आपण आपल्या रोजच्या दिनचर्येत समाविष्ट करावी जेणेकरून आपली त्वचा सूर्यकिरणांमुळे जळणार नाही आणि त्वचेला इरिटेशन तसेच लाल चट्टे यासारख्या समस्या होणार नाहीत.

Leave a Comment