सध्याच्या काळात सुंदर दिसणं अत्यंत आवश्यक झालं आहे. आपल्या गुणवत्तेपेक्षा दिसण्याला जास्त महत्व देण्यात येत आहे, यामुळे अनेक वेळा आपण मेकअप लावतो. परंतु या मेकअपमध्ये काही रासायनिक पदार्थ असतात ज्यामुळे आपल्या त्वचेवर परिणाम होऊ शकतो. त्वचा निस्तेज होऊ शकते तसेच चेहऱ्यावर अनेक मार्क्स येण्याची देखील शक्यता असते. अशावेळी महागडे प्रोडक्ट्स वापरण्यापेक्षा चमकदार त्वचेसाठी घरगुती उपाय करणे कधीही योग्य ठरते. आपल्या घरातच त्वचेसाठी गुणकारी अशा अनेक वस्तू उपलब्ध असतात ज्यामुळे आपण आपली त्वचा तजेलदार बनवू शकतो. आज या लेखात आपण चमकदार त्वचेसाठी घरगुती उपाय पाहूया…
चमकदार त्वचेसाठी घरगुती उपाय:
१) कोरफड:
कोरफड ही अत्यंत औषधी वनस्पती आहे. त्वचा चमकदार बनवण्यासाठी कोरफड हा एक उत्कृष्ट असा नैसर्गिक उपाय आहे. यामध्ये व्हिटॅमिन A, C, आणि E हे जीवनसत्व असल्याने कोरफड तुमच्या त्वचेला शांत आणि तेजवान करण्यात यशस्वी ठरते. दररोज कोरफड लावल्याने वृद्धत्वाची लक्षणे कमी होऊन त्वचेवरील इरिटेशन्स किंवा खाज कमी करण्यास मदत होते. कोरफडीच्या पानांमधून त्याचा गर काढून तो चेहऱ्यावर तसेच अन्य अवयवांवर लावावा, अर्धा तास राहू द्यावं आणि थंड पाण्याने चेहरा धुवून घ्यावा. कोरफडीचा तुमच्या नियमित दिनचर्येत वापर केल्याने त्वचा हायड्रेट होते आणि ताजीतवानी होते. कोरफडीच्या गरामध्ये तुम्ही मध, लिंबाचा रस या अन्य घटकांचा देखील समावेश करू शकता.

२) दूध:
चमकदार त्वचेसाठी घरगुती उपाय यामध्ये दूध हा अतिशय गुणकारी उपाय आहे. दूध हे एक सौम्य एक्सफॉलिएन्ट आहे जे त्वचेचे संथ स्नायू पुन्हा ऍक्टिवेट करतात आणि त्वचेतील मृत पेशी काढून टाकण्यास मदत करतात. दुधातील लॅक्टिक ऍसिड आपली त्वचा गुळगुळीत करण्यास उपयुक्त ठरते आणि आपली स्किन मॉइश्चराइझ होते. थोडे दूध घेऊन त्यामध्ये हळद आणि मध मिक्स करा आणि तुमच्या चेहऱ्याला लावा. अर्ध्या तासानंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा, तुम्हाला पहिल्याच वापरामध्ये आपल्या चेहऱ्यात फरक नक्कीच जाणवेल. हा पॅक आठवड्यातून एकदा किंवा दोनदा लावावा. त्वचा लवकर चमकायला सुरुवात होईल.
३) दही आणि मध:
त्वचेला हायड्रेट करण्यासाठी दही आणि मध याचे मिश्रण देखील उपयुक्त ठरते. मध हे एक नैसर्गिक मॉइश्चरायझर आहे आणि दही मृत पेशींना बाहेर काढण्यास मदत करते. यामुळे या दोघांचे मिश्रण चेहऱ्याला लावल्यास त्वचा अधिक चमकदार होते. चेहऱ्याला नुसते मध लावून तीस मिनिटांनी ते कोमट पाण्याने धुतल्यास आपली कांती सतेज होते. हा चमकदार त्वचेसाठी घरगुती उपाय अगदी उत्तम आहे.

४) पपई:
पपईमध्ये एंझाइम नावाचे घटक असते जे आपल्या त्वचेला योग्यरीत्या एक्सफोलिएट करते. पपई त्वचेवरील डाग कमी करण्यास मदत करते. पपईमधील काही गुणकारी घटक आपल्याला तरुण आणि तेजस्वी त्वचा मिळवण्यास उपयुक्त ठरते. पिकलेल्या पपईला स्मॅश करून त्यात मध आणि लिंबाचा रस मिक्स करावा आणि चेहऱ्यावर लावून १५ मिनिट तसेच राहू द्यावे. नंतर चेहरा थंड पाण्याचे स्वच्छ धुवावा. चमकदार त्वचेसाठी घरगुती उपाय यामध्ये हा फेसपॅक आपण नियमित वापरावा. यामुळे त्वचेवर तेज येते आणि त्वचा मुलायम होते.
५) पौष्टिक आहार:
चमकदार त्वचेसाठी सर्वात चांगला उपाय म्हणजे नियमित हायड्रेटेड राहणे. रोज योग्य प्रमाणात पाणी पिणं आपले शरीर हायड्रेटेड राहण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. पाण्याचे योग्य प्रमाण म्हणजे दिवसाला सात ते आठ ग्लास पाणी आपण प्यायला हवे. यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर पडण्यास मदत होते, त्वचेतील कोरडेपणा नाहीसा होतो आणि त्वचा चमकण्यास सुरुवात होते.
काकडी, संत्री इत्यादी हायड्रेटिंग फळभाज्यांचा आपल्या आहारात समावेश करावा. आपल्या आहारात जीवनसत्वे, फॅटी ऍसिड तसेच ओमेगा-३ हे घटक असणाऱ्या पदार्थांचा समावेश करावा. हिरव्या भाज्या, काजू, मासे इत्यादी पदार्थ नियमित आपल्या आहारात समाविष्ट केल्याने त्वचा अधिक चमकदार होण्यास मदत होते.
६) पुरेशी झोप:
त्वचा निस्तेज होणे तसेच त्वचावृद्धीची लक्षणे जर आपल्यामध्ये दिसत असतील तर आपली झोप पुरेशी होत नाही याची दक्षता घ्यावी. आपल्या दिनचर्येकडे तत्परतेने लक्ष द्यावे. आपले आरोग्य सर्वस्वी आपल्या दिनचर्येवर आधारित आहे यामुळे पौष्टिक आहारासह पुरेशी झोप अत्यंत महत्वाची आहे. आपली झोप किमान सात ते आठ तास होणे अत्यंत गरजेचे आहे. यामुळे आपली त्वचा सतेज होण्यास सुरुवात होईल.
७) सूर्यप्रकाश:
सकाळच्या कोवळ्या उन्हात एखादा फेरफटका मारल्याने आपली कांती चमकण्यास उपयुक्त घटक आपल्या शरीरात प्रवेश करतात. कोवळे ऊन आपली कांती तेजवान करण्यास अत्यंत गुणकारी ठरते. चमकदार त्वचेसाठी घरगुती उपाय हा सकाळचे कोवळे ऊन झेलणे आहे.

चमकदार त्वचेसाठी घरगुती फेसपॅक कोणता?
पपईमध्ये एंझाइम नावाचे घटक असते जे आपल्या त्वचेला योग्यरीत्या एक्सफोलिएट करते. पपई त्वचेवरील डाग कमी करण्यास मदत करते. पपईमधील काही गुणकारी घटक आपल्याला तरुण आणि तेजस्वी त्वचा मिळवण्यास उपयुक्त ठरते. पिकलेल्या पपईला स्मॅश करून त्यात मध आणि लिंबाचा रस मिक्स करावा आणि चेहऱ्यावर लावून १५ मिनिट तसेच राहू द्यावे. नंतर चेहरा थंड पाण्याचे स्वच्छ धुवावा. चमकदार त्वचेसाठी घरगुती उपाय यामध्ये हा फेसपॅक आपण नियमित वापरावा. यामुळे त्वचेवर तेज येते आणि त्वचा मुलायम होते.
चेहऱ्यावर चमक येण्यासाठी काय करावं?
कोरफड ही अत्यंत औषधी वनस्पती आहे. त्वचा चमकदार बनवण्यासाठी कोरफड हा एक उत्कृष्ट असा नैसर्गिक उपाय आहे. यामध्ये व्हिटॅमिन A, C, आणि E हे जीवनसत्व असल्याने कोरफड तुमच्या त्वचेला शांत आणि तेजवान करण्यात यशस्वी ठरते. दररोज कोरफड लावल्याने वृद्धत्वाची लक्षणे कमी होऊन त्वचेवरील इरिटेशन्स किंवा खाज कमी करण्यास मदत होते. कोरफडीच्या पानांमधून त्याचा गर काढून तो चेहऱ्यावर तसेच अन्य अवयवांवर लावावा, अर्धा तास राहू द्यावं आणि थंड पाण्याने चेहरा धुवून घ्यावा. कोरफडीचा तुमच्या नियमित दिनचर्येत वापर केल्याने त्वचा हायड्रेट होते आणि ताजीतवानी होते. कोरफडीच्या गरामध्ये तुम्ही मध, लिंबाचा रस या अन्य घटकांचा देखील समावेश करू शकता.
चेहरा गुळगुळीत कसा होईल?