६ आनंदी राहण्याचे मार्ग देतील तुमच्या आयुष्याला कलाटणी!

माणसाने आयुष्य अगदी आनंदात जगावं तसंच ते अनेकांना जोडून ठेवणारं असावं असं प्रत्येकाचंच मत असतं, परंतु ते आनंदी राहण्यासाठी काय करावं हा प्रश्न अनेकांना पडतो. यासाठी आपण आज अनेक आनंदी राहण्याचे मार्ग पाहणार आहोत. खरं तर आनंदी राहण्याची इच्छा असल्यास अगदी क्षुल्लक गोष्टीत सुद्धा आपल्याला आनंद सापडतो, पण जर आपलीच मनस्थिती ठीक नसेल तर सगळीकडे आपण नाकारात्मकतेने पाहतो आणि आनंदी राहण्याखेरीज दुःख कवटाळत बसतो. पण आज आपण आनंदी राहण्याचे मार्ग पाहणार आहोत ज्यामुळे आपले आयुष्य सुखी होण्यास मदत होईल.

“You only live once, but if you do it right, once is enough”– mae west 

“You only have one life to live”. -Eleanor Brownn

आयुष्य फक्त एकदाच मिळतं याविषयी अनेक मोठमोठे दिग्गज आपली मतं मांडून गेले आहेत. वरील उदाहरण म्हणजे मे वेस्ट नावाच्या जगप्रसिद्ध कलाकारा यांचं ‘आपण एकदाच जगतो, पण जर योग्यरीत्या जगलो तर एकच आयुष्य पुरेसं आहे’ हे वाक्य अतिशय लोकप्रिय आहे. तसेच लेखिका एलेनोर ब्राउन यांचं ‘तुम्हाला जगण्यासाठी एकच आयुष्य आहे’ हे वाक्य देखील जगविख्यात आहे. यावरून आपल्याला लक्षात येईल की आयुष्य आनंदी जगणं किती महत्त्वाचं आहे. एकच आयुष्य मिळत असल्याने त्यात भरभरून जगावं. आपल्या जगण्याचा समोरच्याला हेवा वाटायला हवा असं जगावं, जेणेकरून आपल्याला पाहून समोरचा देखील आनंदी जीवन जगण्यास सुरुवात करेल. आपल्या आयुष्यातील आनंदी राहण्याचे मार्ग आपण समोरच्या व्यक्तीला देखील सांगावेत, म्हणजे अशा रीतीने एक काळ असा येईल की संपूर्ण सृष्टी आनंदी वातावरणात न्हाऊन निघेल. चला तर मग काही आनंदी राहण्याचे मार्ग पाहुयात जे आपल्याला आपल्या आयुष्यात समाविष्ट करता येतील.  

आनंदी राहण्याचे मार्ग

आनंदी राहण्याचे मार्ग:

१) भूतकाळ विसरा:

अनेक जण आपला भूतकाळ विसरू शकत नाही. भूतकाळात घडलेल्या दुर्दैवी घटना सतत मनाच्या एका कोपऱ्यात सलत राहतात. परंतु भूतकाळ आपल्या आनंदी जीवनात अडथळे आणत असतो. भूतकाळात जगत असल्याने वर्तमानाची मजा आपण हरवतो तसेच भविष्याचा विचार करण्यास वेळच मिळत नाही. यामुळे भूतकाळ विसरणे हा आनंदी राहण्याचे मार्ग यातील महत्वपूर्ण मार्ग आहे. 

२) वर्तमान जगा:

काही जण भविष्याच्या चिंतेत इतके गुरफटतात किंवा काहींना भूतकाळाच्या घटना इतक्या बोचतात की त्यामध्ये चालू असलेला वर्तमान जगायलाच विसरून जातात. आयुष्यातील प्रत्येक क्षण मनापासून जगणं अत्यंत गरजेचं आहे कारण कोणताही क्षण आपण कितीही प्रयत्न केला तरी परत येणार नाही. यामुळे आयुष्यातली प्रत्येक मोमेन्ट जगून घ्यावी. 

३) दिवसभरातून थोडा वेळ स्वतःसाठी काढा:

४) कला किंवा छंद जोपासा:

एखाद्या कलाकाराला जर आनंदी राहण्याचे मार्ग विचारले तर तो म्हणेल एखादी कला अंगी जोपासा आपोआप जीवन आनंदी होईल. हे अगदी खरंय! एखादी कला आपल्याला भरपूर आनंद देऊन जाते. आणि प्रत्येकामध्ये काही ना काही कला नक्कीच दडली असते. त्यामुळे प्रत्येकाने आपली कला ओळखून तिला नियमित जपावे. गायन, नृत्य, वादन, अभिनय अशा अनेक कला आपण आपल्या अंगी जोपासू शकतो किंवा जर नसतील तर वाचन, लिखाण, गाणे ऐकणे इत्यादी छंद जरी आपण जोपासले तरी आपले आयुष्य सुखकर होईल यात शंका नाही. 

५) स्वतःवर प्रेम करा:

आनंदी राहण्याचे मार्ग यातील सर्वात सोपा आणि महत्वाचा मार्ग म्हणजे स्वतःवर प्रेम करणे. कुटुंब तसेच मित्र परिवारावर तर आपले प्रेम असतेच, आणि ते आवश्यक ही आहे. परंतु इतरांवर प्रेम करून प्रेमभंग किंवा अपेक्षाभंग करून घेण्यापेक्षा स्वतःवर प्रेम करणे योग्य ठरेल. आपल्याला स्वतःपेक्षा जास्त कोणीच ओळखत नाही. आपल्याला काय आवडतं, काय नाही या सगळ्याची काळजी दुसऱ्यांनी घेण्यापेक्षा आपण स्वतः घेतली तर आपण आनंदी राहू शकतो. 

आनंदी राहण्याचे मार्ग

६) स्वतःची काळजी घ्या:

आजच्या काळातील अनेक रोग आपल्या आनंदी जीवनावर नकारात्मक प्रभाव टाकू शकतात. परंतु यापासून दूर राहण्यासाठी स्वतःची काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे. आपल्या आरोग्याची सतत तपासणी करत राहणं आपल्या निरोगी आयुष्यासाठी महत्वाचं आहे. तसेच नियमित व्यायाम, योग करणे हे देखील आपल्या आरोग्यासाठी अत्यंत चांगले ठरते. 

शेवट हाच की आपल्याला एकच आयुष्य मिळतं त्यात आपण हसत-खेळत आनंदी राहणं महत्त्वाचं आहे. आपल्यासोबत अन्य व्यक्तींनाही आनंद द्यावा त्यातही वेगळा आनंद आहे.

आनंदी कसं राहावं?

अनेक जण आपला भूतकाळ विसरू शकत नाही. भूतकाळात घडलेल्या दुर्दैवी घटना सतत मनाच्या एका कोपऱ्यात सलत राहतात. परंतु भूतकाळ आपल्या आनंदी जीवनात अडथळे आणत असतो. भूतकाळात जगत असल्याने वर्तमानाची मजा आपण हरवतो तसेच भविष्याचा विचार करण्यास वेळच मिळत नाही. यामुळे भूतकाळ विसरणे हा आनंदी राहण्याचे मार्ग यातील महत्वपूर्ण मार्ग आहे

नेहमी आनंदी राहण्यासाठी काय करावे?

आनंदी राहण्याचे मार्ग यातील सर्वात सोपा आणि महत्वाचा मार्ग म्हणजे स्वतःवर प्रेम करणे. कुटुंब तसेच मित्र परिवारावर तर आपले प्रेम असतेच, आणि ते आवश्यक ही आहे. परंतु इतरांवर प्रेम करून प्रेमभंग किंवा अपेक्षाभंग करून घेण्यापेक्षा स्वतःवर प्रेम करणे योग्य ठरेल. आपल्याला स्वतःपेक्षा जास्त कोणीच ओळखत नाही. आपल्याला काय आवडतं, काय नाही या सगळ्याची काळजी दुसऱ्यांनी घेण्यापेक्षा आपण स्वतः घेतली तर आपण आनंदी राहू शकतो.

मन आनंदी कसे ठेवावे?

एखाद्या कलाकाराला जर आनंदी राहण्याचे मार्ग विचारले तर तो म्हणेल एखादी कला अंगी जोपासा आपोआप जीवन आनंदी होईल. हे अगदी खरंय! एखादी कला आपल्याला भरपूर आनंद देऊन जाते. आणि प्रत्येकामध्ये काही ना काही कला नक्कीच दडली असते. त्यामुळे प्रत्येकाने आपली कला ओळखून तिला नियमित जपावे. गायन, नृत्य, वादन, अभिनय अशा अनेक कला आपण आपल्या अंगी जोपासू शकतो किंवा जर नसतील तर वाचन, लिखाण, गाणे ऐकणे इत्यादी छंद जरी आपण जोपासले तरी आपले आयुष्य सुखकर होईल यात शंका नाही. 

Leave a Comment