बाळाच्या वाढीसाठी योग्य आहार: १ वर्षापर्यंतचे डाएट!

मुलांचे आरोग्य अत्यंत नाजूक असते. त्यांची वाढ योग्यरित्या होत आहे किंवा नाही याची खात्री त्यांच्या पालकांनी बाळगायला हवी. जन्मल्यापासून ते वाढत्या वयापर्यंत त्यांच्या आहारात बदल होत असतो, परंतु तो आहार कसा असावा? त्यामुळे बाळाच्या वाढीत सकारात्मक बदल होत आहे किंवा नाही या सर्व गोष्टी तज्ज्ञांच्या सल्ल्याद्वारे फॉलो करणे अत्यंत आवश्यक ठरते. बाळाच्या वाढीसाठी योग्य आहार न मिळाल्यास त्यांची शारीरिक तसेच बौद्धिक वाढ यात अडथळा निर्माण होण्याची शक्यता असते. यामुळे आपल्या पाल्याच्या आहाराबद्दल पालकांनी जागरुक राहणे आवश्यक आहे. 

आणखी वाचा – मुलांचे आरोग्य सांभाळण्यासाठी या ४ घटकांची काळजी घ्यावी!

बाळाच्या वाढीसाठी योग्य आहार

वयोगटानुसार बाळाच्या वाढीसाठी योग्य आहार:


बाळ जन्मतः सहा महिन्यांपर्यंत फक्त आईच्या दुधावर असतं. त्याचा आहार म्हणजे आईचं दूध. परंतु यावेळी आईने तिच्या आहाराबाबत सतर्क राहावे. अत्यंत पौष्टिक आहार आईने करावा जेणेकरून बाळाला स्तनपानाद्वारे प्रोटीन, कार्बोहायड्रेट, फॅट्स, विटॅमिन्स आणि खनिजे ही पोषणतत्त्वे मिळतात आणि बाळाची वाढ योग्यरीत्या होण्यास मदत होते. 


बाळ आठ महिन्यांचे झाल्यास बाळाचे दात येण्यास सुरुवात होते आणि त्यामुळे बाळ सॉलिड फूड्स खाऊ शकतं. यावेळी बाळाच्या आहारात भाजीपाला, चपातीचे बारीक तुकडे यापासून तयार केलेल्या पदार्थांचा समावेश करणे आवश्यक आहे. ताज्या भाज्या, वाफवलेले गाजर, पालक अशा पोषक पदार्थांचा समावेश त्यांच्या आहारात करावा. त्यासोबत त्यांची हाडे बळकट होण्यासाठी मासे, अंडी, चिकन, मूग डाळ इत्यादी पदार्थांचा उपयोग करावा. यावेळी दुग्धजन्य पदार्थ देखील बाळाच्या वाढीसाठी योग्य आहार ठरतो. 
१२ व्या महिन्यात बाळाच्या वाढीत बरीच प्रगती झाली असते. त्यामुळे त्यांना ताजी फळं, चपाती, ताज्या भाज्या काजू, बदाम, अक्रोड, ओट्स इत्यादी पदार्थांचा समावेश करावा. यावेळी त्यांना चावण्याची सवय लागणे अत्यावश्यक आहे त्यासोबतच सर्व प्रकारचे पदार्थ खाण्याची त्यांना गोडी निर्माण होणे गरजेचे आहे. त्यांना चांगले संस्कार देण्यासोबतच त्यांना पोषक आहार मिळणे देखील तितकंच महत्वाचं आहे. 

बाळाच्या वाढीसाठी योग्य आहार

आहारात समाविष्ट करावे असे घटक:

१) व्हिटॅमिन: 


बाळाच्या वाढीसाठी योग्य आहार म्हणजे त्यांच्या आहारात सर्व प्रकारचे व्हिटॅमिन यांचा समावेश असणे होय. व्हिटॅमिन A, B, C आणि D या प्रत्येक घटकात काही महत्वाची पोषणतत्त्वे उपलब्ध आहेत जी बाळांच्या वाढीसाठी अत्यंत उपयुक्त ठरत असतात. 


शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती टिकून राहण्यासाठी तसेच डोळ्यांची क्षमता वाढवण्यासाठी व्हिटॅमिन A अत्यंत महत्वाचे ठरते. अंडी, मांसाहार तसेच टोमॅटो या पदार्थांमुळे बाळांना व्हिटॅमिन A चे पोषण मिळण्यास मदत होते. खाल्लेले अन्न पचवण्यासाठी तसेच त्या अन्नापासून ऊर्जा निर्माण करण्यासाठी व्हिटॅमिन B ची आवश्यकता असते. व्हिटॅमिन B जीवनसत्व मेंदूसाठी देखील अत्यंत उपयुक्त ठरतं. भाज्या, बिया, मासे इत्यादी पदार्थांचा समावेश व्हिटॅमिन B मिळवण्यासाठी बाळाच्या आहारात नक्कीच करावा. व्हिटॅमिन C हाडांच्या मजबुतीचा कारक असतो त्यामुळे पपई, केळी यांचा आहारात समावेश करून बाळांना व्हिटॅमिन C पोषण मिळते. हाडांच्या आणि हृदयाच्या कार्यासाठी व्हिटॅमिन D आवश्यक आहे. हा सूर्यमालेतून आणि दुधातील फॅट्समधून मिळवता येतो. 


२) कॅल्शियम:


हाडांची आणि दातांची मजबूत वाढ होण्यासाठी कॅल्शियम अत्यंत महत्त्वाचे आहे. हे दुध, दही, पनीर आणि हिरव्या पालेभाज्यांमधून मिळवता येते. 

३) लोह:

रक्ताची गुणवत्ता चांगली ठेवण्यासाठी लोह महत्त्वाचे आहे. हे लोणी, तांदूळ, गहू, चण्यांची डाळ यामधून मिळवता येते. या सर्व पदार्थांचा समावेश मुलांच्या आहारात त्यांच्या योग्य वाढीसाठी करावा. 

४) हायड्रेशन:

बाळाला योग्य प्रमाणात पाणी आणि द्रव्य मिळाल्यास त्यांचे शरीर हायड्रेटेड राहण्यास मदत होते. 

मुलांना कळायला लागल्यास ते काही खाण्यापिण्यास हट्टीपणा करतात. अशावेळी त्यांना पोषणतत्त्वे खाऊ घालणे कठीण होऊन बसते, परंतु तरीही त्यांच्या आहारात जंक फूड, तेलकट पदार्थांचा समावेश टाळून बाळाच्या वाढीसाठी योग्य आहार फॉलो करावा. यामुळे त्यांच्या भविष्यात कोणत्याही रोगाची समस्या उद्भवण्याची शक्यता कमी होते.

बाळांचा आहार कसा असावा?

मुलांचे आरोग्य अत्यंत नाजूक असते. त्यांची वाढ योग्यरित्या होत आहे किंवा नाही याची खात्री त्यांच्या पालकांनी बाळगायला हवी. जन्मल्यापासून ते वाढत्या वयापर्यंत त्यांच्या आहारात बदल होत असतो, परंतु तो आहार कसा असावा? त्यामुळे बाळाच्या वाढीत सकारात्मक बदल होत आहे किंवा नाही या सर्व गोष्टी तज्ज्ञांच्या सल्ल्याद्वारे फॉलो करणे अत्यंत आवश्यक ठरते. बाळाच्या वाढीसाठी योग्य आहार न मिळाल्यास त्यांची शारीरिक तसेच बौद्धिक वाढ यात अडथळा निर्माण होण्याची शक्यता असते. यामुळे आपल्या पाल्याच्या आहाराबद्दल पालकांनी जागरुक राहणे आवश्यक आहे. यावेळी त्यांच्या आहारात पोषणतत्त्वे यांचा समावेश असणे अत्यंत महत्वाचे आहे.

बाळाच्या आरोग्यासाठी व्हिटॅमिन महत्वाचे आहे का?

शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती टिकून राहण्यासाठी तसेच डोळ्यांची क्षमता वाढवण्यासाठी व्हिटॅमिन A अत्यंत महत्वाचे ठरते. अंडी, मांसाहार तसेच टोमॅटो या पदार्थांमुळे बाळांना व्हिटॅमिन A चे पोषण मिळण्यास मदत होते. खाल्लेले अन्न पचवण्यासाठी तसेच त्या अन्नापासून ऊर्जा निर्माण करण्यासाठी व्हिटॅमिन B ची आवश्यकता असते. व्हिटॅमिन B जीवनसत्व मेंदूसाठी देखील अत्यंत उपयुक्त ठरतं. भाज्या, बिया, मासे इत्यादी पदार्थांचा समावेश व्हिटॅमिन B मिळवण्यासाठी बाळाच्या आहारात नक्कीच करावा. व्हिटॅमिन C हाडांच्या मजबुतीचा कारक असतो त्यामुळे पपई, केळी यांचा आहारात समावेश करून बाळांना व्हिटॅमिन C पोषण मिळते. हाडांच्या आणि हृदयाच्या कार्यासाठी व्हिटॅमिन D आवश्यक आहे. हा सूर्यमालेतून आणि दुधातील फॅट्समधून मिळवता येतो.

सहा महिन्यांच्या बाळाला काय खाण्यास द्यावे?

सहा महिन्यानंतर बाळ स्तनपानासह बाहेरील अन्न खाण्यास सुरुवात करते. अशा वेळी बाळाच्या वाढीसाठी योग्य आहार कसा निवडावा हा प्रश्न पालकांना पडत असतो, कारण यामध्ये बाळाची पचनसंस्था अधिक सक्षम होते आणि त्याला विविध पोषणतत्त्वांची आवश्यकता निर्माण होते. सहा महिन्याच्या बाळांना स्तनपानासह वरण, भात, भाज्यांचं सूप तसेच फळांचा ज्यूस देखील देऊ शकतो. यामुळे त्यांच्या वाढीसाठी पोषक असा आहार अत्यंत महत्वाचा ठरतो.

Leave a Comment