लहान मुलांच्या वाढत्या वयात त्यांची काळजी आपण घेत असतो. त्यांना कला, संस्कार, शिक्षण योग्यरीत्या मिळेल याची आपण सतत खात्री करत असतो आणि त्याबाबत अगदीच काटेकोरपणे लक्ष देत असतो. परंतु या मुलांचे पोषण देखील त्यांच्या वाढत्या वयात अत्यंत महत्वाची बाब ठरते. लहान मुलांच्या आहारात पौष्टिक घटक असावेत याची दक्षता घेण्याची अत्यंत गरज आहे. पालकांनी त्यांच्या भविष्याच्या काळजीसह मुलांचे पोषण यांची सुद्धा काळजी घेणे आवश्यक आहे.
मुलांच्या वाढत्या वयात त्यांच्या बौद्धिक वाढीसाठी आपण त्यांना प्ले ग्रुप, अबॅकस, ट्युशन्स असे अनेक क्लास लावतो तसेच संगीत, डान्स, जिम्नॅस्टिक, गिटार इत्यादी कलात्मक बाबी त्यांच्या अंगी बाणाव्यात म्हणून अनेक कलात्मक क्लासेसमध्ये त्यांचं नाव नोंदवतो आणि मग मुलं दिवसभर शाळा, विविध क्लास आणि अभ्यास यामध्ये गुंतून राहतात. या काळात त्यांना अनेक क्षेत्रातील शिक्षणाची गरज असतेच, परंतु त्यासोबत त्यांच्या स्वास्थ्याची काळजी घेणं देखील तेवढंच महत्वाचं आहे. त्यांचा रोजचा आहार अगदी पौष्टिक असणे आवश्यक आहे. सध्या लहान मुलं जंक फूडला पसंती देत आहेत असं म्हणायला हरकत नाही. कोणत्याही रेस्टॉरंटमध्ये त्यांच्या पालकांसोबत लहान मुलं पिझा, बर्गर, नूडल्स, चायनीज हे असे आरोग्यासाठी घातक ठरणारे पदार्थ हमखास खाताना दिसतात, तर घरी असताना त्यांचा २ मिनिट नूडल्स, ब्रेड, इत्यादी गोष्टींकडे कल असतो ज्यामध्ये पोषण नसतेच, परंतु आरोग्यासाठी हानिकारक ठरणारे घटक नक्कीच असतात. अशा वेळी पालकांनी थोडं कठोर होण्याची गरज आहे. मुलांचे पोषण काही महत्वाच्या घटकांनी युक्त असायला हवे त्याबद्दल माहिती मिळवूया.
आणखी वाचा- सेंद्रिय आहार व औषधे: आरोग्यदायी प्रकृतीस महत्वपूर्ण!

मुलांचे पोषण होण्यास महत्वाचे घटक:
१) प्रथिन:
प्रथिन म्हणजेच प्रोटीन मुलांच्या वाढीसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. ते शारीरिक ऊर्जेच्या निर्माणासाठी आणि दुरुस्तीला मदत करतात. दूध, अंडी, डाळी प्रथिनांचा चांगला स्रोत आहेत.
२) फॅट्स:
फॅट्स शरीराला उष्मा प्रदान करतात आणि आवश्यक जीवनसत्त्वांचे शोषण करण्यास मदत करतात. हे मस्तिष्काच्या विकासासाठी तसेच हार्मोनल सिस्टमसाठीही महत्त्वाचे आहे. ओट्स, नट, भाज्या आणि तेल देखील चांगले स्त्रोत असतात.
३) कार्बोहायड्रेट:
कार्बोहायड्रेट शरीराला ऊर्जा प्रदान करते. मुलांच्या खेळण्याच्या आणि शिकण्याच्या क्रियाकलापांमध्ये ऊर्जा मिळवण्यासाठी ते आवश्यक आहेत. ताज्या फळांचा रस, भात, पोळी, इत्यादी कार्बोहायड्रेटचे मुख्य स्रोत आहेत.
४) व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स:
सर्व प्रकारचे व्हिटॅमिन म्हणजेच व्हिटॅमिन A, B, C आणि D मुलांच्या आहारात समाविष्ट असणे अत्यावश्यक आहे. तसेच जस्त, मिनरल्स, कॅल्शियम, लोह यासारखे पोषक घटक देखील मुलांचे पोषण आहारात असायला हवे. यामुळे मुलांची हाडं मजबूत होतात, प्रतिकारशक्ती वाढते, रक्तपुरवठा योग्यरित्या होतो. यासाठी ताज्या भाज्या, ताजी फळं, दूध, कडधान्य यांचा समावेश मुलांचे पोषण आहारात करावा.
वरील सर्व घटक लहान मुलांचे पोषण वाढवण्यासाठी अत्यंत महत्वाचे आहे, परंतु यासाठी त्यांचे वेळापत्रकही तितकेच महत्वाचं आहे. मुलांच्या दिनचर्येत त्यांच्या आहाराची विशिष्ट वेळ ठरलेली असावी जेणेकरून त्यांची जीवनशैली सुदृढ होते. पोष्टिक आहार व नियमित आहार मुलांच्या मानसिक विकासावर देखील सकारात्मक परिणाम करतो. योग्य मुलांचे पोषण यामुळे मुलांची एकाग्रता वाढते, आणि मुलांचे बुद्धिमत्तेचे स्तर सुधारतात. यामुळे त्यांचा शारीरिक, मानसिक तसेच बौद्धिक विकास उत्तमरीत्या होतो आणि त्यांच्या आत्मविश्वासात वाढ होते.
लहान मुलांचे पोषण सकाळचा नाश्ता, दुपारचे जेवण, संध्याकाळचा नाश्ता आणि रात्रीचे जेवण या पद्धतीने विभागले जावे. यामध्ये जास्तीत जास्त पोषण तत्व असावे याची पालकांनी काळजी घ्यावी. सध्याच्या काळात मुलांची दिनचर्या अत्यंत व्यस्त असते आणि त्यामध्ये त्यांचे जेवणाकडे दुर्लक्ष होत असते. अशा वेळी पालकांनी त्यांच्या आहाराची काळजी घेणं अत्यावश्यक आहे. तसेच मुलं जर पोषक आहार करण्यास टाळाटाळ करत असतील तर पालकांनी त्याकडे दुर्लक्ष न करता त्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे.
मुलांचे पोषण कसे असावे?

मुलांचे पोषण महत्वाचे का आहे?
लहान मुलांच्या वाढत्या वयात त्यांची काळजी आपण घेत असतो. त्यांना कला, संस्कार, शिक्षण योग्यरीत्या मिळेल याची आपण सतत खात्री करत असतो आणि त्याबाबत अगदीच काटेकोरपणे लक्ष देत असतो. परंतु या मुलांचे पोषण देखील त्यांच्या वाढत्या वयात अत्यंत महत्वाची बाब ठरते. लहान मुलांच्या आहारात पौष्टिक घटक असावेत याची दक्षता घेण्याची अत्यंत गरज आहे. पालकांनी त्यांच्या भविष्याच्या काळजीसह मुलांचे पोषण यांची सुद्धा काळजी घेणे आवश्यक आहे.
लहान मुलांचा आहार कसा असावा?
प्रथिन म्हणजेच प्रोटीन मुलांच्या वाढीसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. ते शारीरिक ऊर्जेच्या निर्माणासाठी आणि दुरुस्तीला मदत करतात. दूध, अंडी, डाळी प्रथिनांचा चांगला स्रोत आहेत. फॅट्स शरीराला उष्मा प्रदान करतात आणि आवश्यक जीवनसत्त्वांचे शोषण करण्यास मदत करतात. हे मस्तिष्काच्या विकासासाठी तसेच हार्मोनल सिस्टमसाठीही महत्त्वाचे आहे. ओट्स, नट, भाज्या आणि तेल देखील चांगले स्त्रोत असतात. सर्व प्रकारचे व्हिटॅमिन म्हणजेच व्हिटॅमिन A, B, C आणि D मुलांच्या आहारात समाविष्ट असणे अत्यावश्यक आहे. तसेच जस्त, मिनरल्स, कॅल्शियम, लोह यासारखे पोषक घटक देखील मुलांचे पोषण आहारात असायला हवे. यामुळे मुलांची हाडं मजबूत होतात, प्रतिकारशक्ती वाढते, रक्तपुरवठा योग्यरित्या होतो. यासाठी ताज्या भाज्या, ताजी फळं, दूध, कडधान्य यांचा समावेश मुलांचे पोषण आहारात करावा.