गर्भधारणा काळजी आई आणि बाळाच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक!

गर्भधारणा ही नैसर्गिक बाब असली तरी त्यामध्ये काही धोके असूच शकतात. गर्भधारणेदरम्यान स्त्रियांच्या शरीरात अनेक शारीरिक, मानसिक तसेच भावनिक बदल होत असतात. गर्भधारणा सुखरुपरित्या पार पडणे व आई आणि बाळ दोन्हीही सुखरूप असणे अत्यावश्यक आहे. त्यासाठी गर्भधारणा काळजी घेणे अत्यावश्यक आहे. या लेखात आपण गर्भधारणा निदान आणि गर्भधारणा काळजी याविषयी माहिती मिळवणार आहोत. 

जाणून घ्या- प्रसूतीनंतरची काळजी आई आणि बाळासाठी आवश्यक!


गर्भधारणा निदान:

१) मासिक पाळी चुकणे:

मासिक पाळी चुकणे किंवा मासिक पाळीत आलेली अनियमितता हे गर्भधारणेचे निदान असते. मासिक पाळीची तारीख जाऊन जर दोन आठवडे झाले असतील तर आपण गर्भधारणा चेकअप करून घ्यावे. काहीवेळा मासिक पाळी दोन-दोन महिने येत नाही. यावेळी आपण त्या स्त्रीबाबत खात्रीने गर्भधारणेचे निदान वर्तवू शकतो. 

गर्भधारणा काळजी


२) मळमळ:


गर्भधारणा होत असल्यास सकाळी स्त्रियांना मळमळ होते. याला कोरड्या उलट्या सुद्धा म्हटलं जातं. स्त्रियांमधील संप्रेरक-इस्ट्रोजेन वाढल्यामुळे असे होते. परंतु हे निदान काही स्त्रियांना होत नाही तर काहींना याचा खूप त्रास होतो. 


३) तपासणी:


पाळी चुकल्यानंतर आपल्याला गर्भधारणेची शक्यता वाटल्यास स्त्रिया त्याची तपासणी करून निदान जाणून घेऊ शकतात. यावेळी लघवी तपासणी हा एक तपासणीचा प्रकार आहे जो आपण घरीच करू शकतो. आतून तपासणी हा प्रकार योनीमार्गातून करण्यात येतो तर गर्भाशयाचे निदान हे पोटावर गर्भाशय हाताला लागून देखील होऊ शकते. 


गर्भधारणा काळजी:


गर्भधारणेच्या काळात महिलेसाठी अनेक शारीरिक, मानसिक आणि भावनिक बदल होतात. या काळात योग्य गर्भधारणा काळजी घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण यामुळे मातेसोबतच गर्भाचंही योग्य संरक्षण होतं. गर्भधारणेची काळजी घेणं ही सुरक्षित आणि निरोगी प्रसूतीसाठी आवश्यक आहे.


१) पौष्टिक आहार:


गर्भधारणेच्या काळात योग्य आणि संतुलित आहार घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. गर्भासाठी आवश्यक असलेले पोषक तत्वे, व्हिटॅमिन्स, आणि मिनरल्स मिळवण्यासाठी रोज ताजं, निरोगी आणि विविध पदार्थांचा समावेश असलेला आहार घेणं आवश्यक आहे. विशेषत: फोलिक अ‍ॅसिड, आयरन, कॅल्शियम, प्रथिनं आणि जीवनसत्त्वे गर्भवृद्धीसाठी महत्त्वाची असतात. योग्य आहारामुळे गर्भाच्या विकासासाठी आवश्यक पोषण मिळतं.  

गर्भधारणा काळजी


२) तज्ज्ञांद्वारे नियमित तपासणी:


३) वजन नियंत्रित ठेवणे:


गर्भधारणेच्या वेळी योग्य वजन राखणं महत्त्वाचं आहे. अति वजन किंवा कमी वजन दोन्ही गर्भधारणेसाठी हानिकारक ठरू शकतात. डॉक्टरांचा सल्ला घेत आणि योग्य आहार व व्यायाम याच्या मदतीने वजनाचे नियंत्रण ठेवणं आवश्यक आहे.


४) व्यायाम:


गर्भधारणेच्या वेळी हलका व्यायाम किंवा चालणं फायदेशीर ठरू शकतं. यामुळे रक्ताभिसरण सुधारतं आणि शारीरिक ताकद वाढते. मात्र, जास्त वेगाने शारीरिक काम किंवा व्यायाम टाळावा. डॉक्टरांनी सांगितलेल्या व्यायाम प्रकाराचे पालन करणे योग्य ठरते.


५) ताणतणाव नियंत्रित ठेवणे:


गर्भधारणेत ताणतणाव कमी करणे महत्वाचे आहे तसेच स्त्रीचे मानसिक व भावनिक आरोग्य सांभाळणे देखील तितकेच महत्वाचे आहे. महिलेला या काळात विविध भावनिक बदलांचा सामना करावा लागतो. ताणतणाव, चिंता किंवा मानसिक अस्वस्थता असू शकते. यासाठी, सकारात्मक विचार, योग, ध्यान आणि आराम घेणं महत्त्वाचं आहे. मित्रमंडळी, कुटुंबीयांसोबत संवाद साधणं आणि त्यांच्याकडून आधार मिळवणं देखील महत्त्वाचं आहे.


६) धूम्रपान, मद्यपान यापासून दूर राहणे:


काही स्त्रियांना धूम्रपान व मद्यपान करण्याची सवय असते, परंतु गर्भधारणा अवस्थेत याचे वाईट परिणाम होऊ शकतात. त्यामुळे गर्भधारणा काळजी घेण्यासाठी धूम्रपान तसेच मद्यपानापासून दूर राहावे.


गर्भधारणा काळात महिलेला आवश्यक असलेली गर्भधारणा काळजी घेणं ही सुरक्षित प्रसूतीसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरते. योग्य आहार, व्यायाम, मानसिक समर्थन, आणि नियमित तपासणी यांचा दिनचर्येत समावेश करून महिलांना स्वस्थ आणि सुरक्षित गर्भधारणा अनुभवता येऊ शकते. योग्य मार्गदर्शन आणि काळजी घेणं बाळासाठी तसेच आईसाठी देखील तितकंच महत्वाचं ठरतं!

गर्भधारणा काळजी कशी घ्यावी?

गर्भधारणा काळात महिलेला आवश्यक असलेली गर्भधारणा काळजी घेणं ही सुरक्षित प्रसूतीसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरते. योग्य आहार, व्यायाम, मानसिक समर्थन, आणि नियमित तपासणी यांचा दिनचर्येत समावेश करून महिलांना स्वस्थ आणि सुरक्षित गर्भधारणा अनुभवता येऊ शकते. योग्य मार्गदर्शन आणि काळजी घेणं बाळासाठी तसेच आईसाठी देखील तितकंच महत्वाचं ठरतं!

गरोदरपणात काय खावे?

गर्भधारणेच्या काळात योग्य आणि संतुलित आहार घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. गर्भासाठी आवश्यक असलेले पोषक तत्वे, व्हिटॅमिन्स, आणि मिनरल्स मिळवण्यासाठी रोज ताजं, निरोगी आणि विविध पदार्थांचा समावेश असलेला आहार घेणं आवश्यक आहे. विशेषत: फोलिक अ‍ॅसिड, आयरन, कॅल्शियम, प्रथिनं आणि जीवनसत्त्वे गर्भवृद्धीसाठी महत्त्वाची असतात. योग्य आहारामुळे गर्भाच्या विकासासाठी आवश्यक पोषण मिळतं.

गर्भधारणा कशी ओळखावी?

मासिक पाळी चुकणे किंवा मासिक पाळीत आलेली अनियमितता हे गर्भधारणेचे निदान असते. मासिक पाळीची तारीख जाऊन जर दोन आठवडे झाले असतील तर आपण गर्भधारणा चेकअप करून घ्यावे. काहीवेळा मासिक पाळी दोन-दोन महिने येत नाही. यावेळी आपण त्या स्त्रीबाबत खात्रीने गर्भधारणेचे निदान वर्तवू शकतो. गर्भधारणा होत असल्यास सकाळी स्त्रियांना मळमळ होते. याला कोरड्या उलट्या सुद्धा म्हटलं जातं. स्त्रियांमधील संप्रेरक-इस्ट्रोजेन वाढल्यामुळे असे होते. परंतु हे निदान काही स्त्रियांना होत नाही तर काहींना याचा खूप त्रास होतो. 

Leave a Comment