निरोगी जीवनशैली जगायची आहे? या ७ सवयी लावा!

सध्याची व्यस्त जीवनशैली, वेळेचा अभाव आणि विचित्र सवयीनमुळे आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. आणि आरोग्य बिघडले की मग डॉक्टरांकडे जावे लागते आणि गोळ्या-औषधी किंवा उपचार करावे लागतात. गाडी, मोबाईल, इत्यादी तंत्रज्ञानाच्या प्रगत उपकरणांमुळे आपल्या जीवनशैलीवर आणखीनच परिणाम होत चालला आहे. म्हणून आजच निरोगी जीवनशैली अवलंबण्याची काळाची गरज आहे. आपले आरोग्य निरोगी राहिल्यास आपले ध्येय साध्य करण्यास आपल्याला आणखी बळ मिळू शकेल. 

निरोगी जीवनशैली: महत्वाचे घटक

निरोगी जीवनशैली जपण्यासाठी रोजच्या दिनचर्येत काही चांगल्या सवयी लावणे गरजेचे आहे. या सवयींमुळे आपण निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यास मदत होते. या सवयी आपण आपल्या आयुष्यात नक्कीच लावून घ्याव्यात. 

१) पुरेशी झोप:

निरोगी जीवनशैली प्राप्त करण्यासाठी पुरेशी झोप अत्यंत महत्वाची आहे. आपली झोप नियमित ६ ते ७ तास तरी होणं गरजेचं आहे. झोप पूर्ण न झाल्यास मन अशांत राहतं तसेच यामुळे मधुमेह, उच्च रक्तदाब, पित्त यासारख्या समस्या निर्माण होतात. त्यामुळे वेळेत आणि पूर्ण झोप होणं अत्यंत आवश्यक आहे. 

२) सकाळी लवकर उठणे:

निरोगी जीवनशैली

३) व्यायाम:

सकाळी उठून व्यायाम केल्याने शरीर तंदुरुस्त आणि निरोगी राहण्यास मदत होते. आपण आपल्या जीवनशैलीत योग व प्राणायाम यांचाही समावेश नक्कीच करू शकतो. नियमित व्यायाम केल्याने मधुमेह, हृदयविकाराचा झटका, उच्च रक्तदाब, अपचन, वजन वाढणे, झोप न लागणे, भूक न लागणे या समस्या दूर होतात. व्यायाम केल्याने शरीरातील सुस्ती गायब होते आणि सकारात्मक ऊर्जा संचारते. निरोगी जीवनशैली मधील हा एक महत्वाचा घटक आहे. 

४) संतुलित आहार:

आपले आरोग्य अर्ध्याहून जास्त आपल्या आहारावर अवलंबून असतं. आहार सकस, पौष्टिक असेल तर आपले आरोग्य अगदी सुदृढ असते, परंतु जर आपला आहार हा जंक फूड, तेलकट पदार्थ, इत्यादी अपायकारक पदार्थानी युक्त असेल तर आपल्याला अनेक प्रकारचे रोग लागण्याची शक्यता असते. 

संतुलित आहार म्हणजे व्हिटॅमिन्स, आयर्न, कॅल्शियम, पोषकतत्वे, खनिजे यांनी युक्त आहार. यामध्ये हिरव्या पालेभाज्या, ताजी फळं, दूध याचा समावेश होतो. हे पदार्थ आपल्या रोजच्या आहारात समाविष्ट केल्याने आपली जीवनशैली अत्यंत निरोगी आणि सकारात्मक बनते. 

५) पाणी पिणे:

दिवसभरात भरपूर पाणी पिणं अतिशय गरजेचं असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे. सकाळी उठल्या उठल्या आपण चहा किंवा कॉफी पिण्याच्या अगोदर पाणी पिणे आवश्यक आहे. यामुळे शरीरातील विषारी द्रव्य बाहेर पडण्यास मदत होते तसेच त्वचा तजेलदार होते. 

६) तणाव कमी करणे:

आपल्या व्यस्त जीवनशैलीमुळे आपल्या जीवनात अनेक शारीरिक, मानसिक आणि भावनिक ताण असू शकतात. त्या ताण तणावासोबत जगणं अत्यंत कठीण आहे. त्यामुळे आपला ताण हलका करणे गरजेचे आहे. यासाठी आपल्या कुटुंबासह, मित्र-मैत्रिणींसह वेळ घालवा, कुठेतरी फिरायला जा, ध्यान करा. अशा गोष्टींमुळे रोजच्या तणावापासून आपण दूर होण्यास मदत होते आणि पुन्हा रिफ्रेश होऊन रोजच्या कामासाठी सज्ज होण्यास सोपे जाते. 

निरोगी जीवनशैली

७) धूम्रपान, मद्यपानापासून दूर राहावे:

आपल्या अनेक वाईट सवयींपैकी या दोन सवयी जर आपल्याला असतील तर वेळीच सावध झालेलं बरं. तंबाखू आणि दारूमध्ये असे काही विषारी घटक असतात जे आपल्या शरीरासाठी, आरोग्यासाठी मोठ्या प्रमाणावर घातक ठरू शकतात. तंबाखूमध्ये निकोटीन नावाचा एक घटक असतो ज्यामुळे आपण तंबाखू तसेच धूम्रपानाच्या अधीन जाऊ शकतो. यामुळे फुप्फुसाशी, श्वासाशी संबंधित रोग होण्याची शक्यता असते. तसेच ओठांचा कॅन्सर, तोंडाचा कॅन्सर, फुप्फुसाचा कॅन्सर हे भयंकर रोग उद्भवण्याची शक्यता असते. 

मद्यपानामुळे लिव्हर, पॅनक्रियाज तसेच फुप्फुसावर परिणाम होऊ शकतो. लिव्हर फेल्युअर, किडनीचे विकार, पचनसंस्थेतील अडचणी या समस्यांना मद्यपानामुळे आपल्याला तोंड द्यावे लागते आणि यामुळे मद्यपान आणि धूम्रपानाची सवय आपल्याला असल्यास त्यापासून त्वरित सुटका मिळवावी. 

निरोगी जीवनशैली कशी जगावी?

निरोगी जीवनशैली जपण्यासाठी रोजच्या दिनचर्येत काही चांगल्या सवयी लावणे गरजेचे आहे. या सवयींमुळे आपण निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यास मदत होते. या सवयी आपण आपल्या आयुष्यात नक्कीच लावून घ्याव्यात.

पाणी पिणे आवश्यक का आहे?

दिवसभरात भरपूर पाणी पिणं अतिशय गरजेचं असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे. सकाळी उठल्या उठल्या आपण चहा किंवा कॉफी पिण्याच्या अगोदर पाणी पिणे आवश्यक आहे. यामुळे शरीरातील विषारी द्रव्य बाहेर पडण्यास मदत होते तसेच त्वचा तजेलदार होते. 

सिगारेट, दारू आरोग्यासाठी कशी वाईट असते?

आपल्या अनेक वाईट सवयींपैकी या दोन सवयी जर आपल्याला असतील तर वेळीच सावध झालेलं बरं. तंबाखू आणि दारूमध्ये असे काही विषारी घटक असतात जे आपल्या शरीरासाठी, आरोग्यासाठी मोठ्या प्रमाणावर घातक ठरू शकतात. तंबाखूमध्ये निकोटीन नावाचा एक घटक असतो ज्यामुळे आपण तंबाखू तसेच धूम्रपानाच्या अधीन जाऊ शकतो. यामुळे फुप्फुसाशी, श्वासाशी संबंधित रोग होण्याची शक्यता असते. तसेच ओठांचा कॅन्सर, तोंडाचा कॅन्सर, फुप्फुसाचा कॅन्सर हे भयंकर रोग उद्भवण्याची शक्यता असते. 

मद्यपानामुळे लिव्हर, पॅनक्रियाज तसेच फुप्फुसावर परिणाम होऊ शकतो. लिव्हर फेल्युअर, किडनीचे विकार, पचनसंस्थेतील अडचणी या समस्यांना मद्यपानामुळे आपल्याला तोंड द्यावे लागते आणि यामुळे मद्यपान आणि धूम्रपानाची सवय आपल्याला असल्यास त्यापासून त्वरित सुटका मिळवावी. 

Leave a Comment